Category Archives: रायगड

Mumbai Goa Highway: मागील ९ दिवसांत जाणार्‍या-येणार्‍या ७ लाख वाहनांची नोंद

   Follow us on        

Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्गावरून येणार्‍या-जाणार्‍या वाहनांची नोंद झाली असून मागील ९ दिवसांत सुमारे ७ लाख या मार्गावरून गेल्या आहेत.

महामार्गावरुन गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणार्‍या व येणार्‍या चाकरमान्यांचा प्रवास निर्विघ्नपणे होण्याकरिता खारपाडा येथे कोकणात जाणार्‍या सर्व प्रकारच्या वाहनांची नोंद रायगड पोलीसांच्या विशेष यंत्रणेच्या माध्यमातून घेतली गेली होती. या नोंदी नुसार आज पर्यंत नऊ दिवसात अंदाजे सात लाख गाड्या महामार्गावरून धावल्या आहेत. बाप्पाच्या विसर्जनानंतर रविवार दुपारी ३ वाजल्या पासून पुन्हा मुंबई, गुजरातच्या दिशेने येणार्‍या या वाहन संख्येमध्ये वाढ होत असून मोठ्या प्रमाणात वाहने परतीचा प्रवास करत आहेत.

दिवस रात्रभर सुरू असणारा सदरचा प्रवास पहाटे पर्यंत सुरूच होता. परतीच्या प्रवासासाठी सुद्धा मुंबई-गोवा महामार्गावर ठिकठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. मुंबई- गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरु असून माणगाव जवळ बायपासचे काम अपूर्ण असल्याने माणगाव- कोलाड बाजारपेठेत वाहतुकीचा ताण पडत आहे.

महामार्गावरील चाकरमान्यांचा प्रवास निर्विघ्न, सुखकर आणि वाहतूक कोंडी विना व्हावा याकरिता महामार्गाच्या खारपाडा ते कशेडी या रायगड जिल्ह्याच्या हद्दीत रायगड जिल्हा पोलीस दलातील १६३ पोलीस अधिकारी आणि १ हजार ७०० पोलीस जवान २४ तास तैनात करण्यात आले आहेत. तर अवजड वाहनांची बंदी आदेश मोडणार्‍या अंदाजे ५० हुन अधिक अवजड वाहनांवर रायगड पोलीसांनी कारवाई केली आहे.

Loading

Mumbai Goa Highway: निकृष्ट दर्जाचे काम करणार्‍या ठेकेदाराविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल; अभियंत्याला अटक

   Follow us on        

रायगड : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे या कामाच्या ठेकेदाराविरुद्ध माणगाव पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी कारवाई चालू केली असून प्रकल्प समन्वयक अभियंता सुजित सदानंद कावळे यांना अटक करण्यात आली आहे.

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरी करणाच्या इंदापूर ते वडपाले या २६.७ कि.मी. अंतराचा महामार्गाचे चौपदीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दर्जाहिन कामामुळे व अपूर्ण असलेल्या कामाच्या ठिकाणी महामार्गास खड्डे पडले. काम पूर्ण झालेल्या ठिकाणी आवश्यक त्या सुरक्षा उपाययोजना त्यामध्ये थर्मोप्लास्टीक पेंट (पांढ-या पट्टया), कॅट आईज, डेलीनेटर, वाहन चालकांच्या माहितीसाठीचे माहिती, सूचना फलक लावणे, अनधिकृत रस्ते दुभाजक बंद करणे आवश्यक होते. हे काम केले नाही. त्यामुळे या महामार्गावर अपघात होऊन होऊ लागले. २०२० पासून एकूण १७० मोटार अपघात झाले. त्यामध्ये एकूण ९७ प्रवाशांच्या मृत्यूस झाला. २०८ प्रवाशी जखमी झाले. त्याचप्रमाणे वाहनाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या ठेकदार कंपनी विरुद्द मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील अधिक तपास रायगडचे पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बेलदार करीत आहेत.

महामार्गाचे निकृष्ठ काम केल्याप्रकरणी मे. चेतक एंटरप्रायझेस लिमीटेड (मे. चेतक अॅप्को (जेव्ही)) (कॉन्ट्रॅक्टर), ५०१, नमन सेंटर, सी-३१, जी ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पश्चिम), मुंबई-५१ या कंपनीचे व्यवस्थापकिय संचालक हुकमीचंद जैन, जनरल मॅनेजर अवधेश कुमार सिंह, प्रकल्प समन्वयक अभियंता सुजित सदानंद कावळे व कंपनीच्या इतर जबाबदार व्यक्ती यांच्या विरुध्द प्रकल्प अभियंता, राष्ट्रीय महामार्ग यांनी तक्रारी केली होती. त्यानुसार माणगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहीता कलम १०५,१२५ (अ) (ब) व ३ (५) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. कंपनीने महामार्गाच्या रुंदीकरण व आधुनिकी करणाचे काम सुरु केले. परंतू त्यांनी हे काम मुदतीत पूर्ण न करता दर्जाहिन काम केले.

Loading

रायगड: अलिबाग – पनवेल एसटी बस उलटली; ४ प्रवासी जखमी

 

   Follow us on        

रायगड दि. १५ जुलै : अलिबागहून पनवेलला जाणारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (MSRTC) बस उलटली. बसमध्ये 45 ते 50 प्रवासी होते. या अपघातात ४ प्रवासी जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच रायगडच्या पोयनाड पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले, लोकांना बाहेर काढण्यात आले.

पोयनाड पोलीस ठाणे हद्दीत कार्लेखिंड येथे अलिबाग ते पनवेल जाणाऱ्या बसला अपघात झाला आहे. एसटी बसचा एस्केल तुटल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती रायगड पोलिसांनी दिली.

Loading

Mumbai Goa Highway | पोलादपुरात कारला भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, ३ जण जखमी

   Follow us on        
Accident on Mumbai Goa Highway:आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावर पोलादपूर येथील आंबेडकर नगर येथे झालेल्या कार आणि कंटेनर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात  २ जण जागीच मृत्युमुखी तर ०३ जण गंभीर जखमी झाले आहेत.
सविस्तर वृत्त असे की आज सकाळी पोलादपूर येथील आंबेडकर नगर येथे उभ्या असलेल्या कंटेनर क्रमांक NL01 AE3150 ला मुंबई दिशेकडून खेड दिशेकडे जाणाऱ्या MH03 CS 1177 या कारने मागून भरधाव वेगाने येऊन धडक दिल्याने हा अपघात घडला. भरधाव वेगाने येणाऱ्या कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार कंटेनर च्या मागील भागात अडकली. या कार मध्ये ५ प्रवासी प्रवास करीत होते. या भीषण अपघातात २ जण जागीच मृत्युमुखी तर ०३ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना गाडीतून बाहेर काढण्यास ४५ मिनिटांचा कालावधी लागला. अपघाताची माहिती मिळताच पोलादपूर पोलिस ठाणे येथील कर्मचारी, पोलादपूर ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी,स्थानिक ग्रामस्थ, नरवीर रेसक्यू टीम, श्री काळभैरवनाथ रेसक्यु टीम यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.
Ad -

मराठी मुलांमुलींना युरोप, पोर्तुगाल,माल्टा,इटली आणि पोलंड येथे नोकरीच्या संधी....
🔸Retail Jobs 🔸Malls 🔸Corporate Staff 🔸Sales 🔸Back Office 🔸Hotels
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Loading

मोठी बातमी: बळवली-पत्रादेवी कोकण द्रुतगती मार्गाच्या संरेखनात बदल होणार; नवीन डीपीआर येणार..कारण काय?

   Follow us on        
सिंधुदुर्ग, दि. २६ एप्रिल:बळवली पत्रादेवी कोकण द्रुतगती मार्गाबद्दल एक महत्वाची बातमी समोर येत आहे. या मार्गाच्या डीपीआरमध्ये सुधारणा केली जात असल्याची माहिती आहे, या पूर्वीच्या संरेखनाप्रमाणे हा महामार्ग सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यातील ‘पर्यावरणीयदृष्टीने संवेदनशील’ Eco-Sensitive  झोनमधून जात होता. या कारणांमुळे या महामार्गाच्या पर्यावरणीय मंजुरीसाठी समस्या निर्माण होणार असल्याने त्यात बदल करण्यात येणार आहे.
अलीकडेच उच्च न्यायालयाने राज्य आणि केंद्र सरकारला तळकोकणातील २५ गावांचा समावेश इको-सेन्सिटिव्ह झोन मध्ये करण्यासाठी ६ महिन्यांची मुदत दिली आहे. त्यामुळे येथील भागातील वृक्षतोडीवर, जंगलतोडीवर मर्यादा येणार आहेत. या कारणांमुळे या महामार्गासाठी पर्यावरणीय मंजुरी मिळवणे कठीण जाणार आहे.
हा एक्स्प्रेस वे तयार झाल्यावर, शिवडी, मुंबई ते पणजी, गोवा असा प्रवास ६ तासांपेक्षा कमी वेळेत करता येणार आहे  कारण अटल सेतू आणि विरार-अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉर या एक्स्प्रेसवेशी अखंडपणे जोडले जाणार आहेत. कोकण द्रुतगती महामार्ग हा रायगड जिह्यातील पेण, अलिबाग, रोहा, तळा, माणगाव, म्हसळा तसेच रत्नागिरी जिह्यातील मंडणगड, दापोली, खेड, गुहागर, रत्नागिरी, लांजा, राजापूर आणि सिंधुदुर्ग जिह्यातील देवगड, मालवण, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी असा जाणार आहे. महामार्ग पेण जिह्यातल्या बलवली गावातून सुरू होईल आणि एकूण ४ टप्प्यात या महामार्गाचे बांधकाम करण्यात येईल. या महामार्ग पूर्ण झाल्यावर मुंबई ते कोकण अगदी कमी वेळामध्ये पार करता येणार आहे. त्याच बरोबर मुंबई गोवा महामार्गावरील ताण कमी होईल.

Loading

Konkan Biodiversity | अलिबाग येथे आढळले दुर्मिळ वाघाटी रानमांजर

   Follow us on        
अलिबाग– अलिबाग तालुक्यातील कणकेश्वर मंदिरालगत असलेल्या जंगल परिसरात दुर्मिळ अशा वाघाटी रानमांजराचे Rusty Spotted Cat प्रथमच दर्शन झाले आहे. सर्वात लहान आकारातील मांजरांची प्रजाती म्हणून ही मांजर ओळखली जाते.
वाईल्ड लाईफ वॉरियर्स ऑफ अलिबाग संस्थेचे सदस्य अदिती सगर आणि समीर पालकर हे कणकेश्वर मंदीर परिसरालगतच्या जंगल परिसरात भ्रमंती करत असताना त्यांना ही मांजर आढळून आली. रस्टी स्पॉटेड कॅट नावाने ओळखली जाणारी ही मांजर यापूर्वी कधीही अलिबाग लगतच्या परिसरात आढळून आली नव्हती.
ही रानमांजर प्रामुख्याने ओल्या दमट पानगळीच्या जंगलात आढळून येते. राज्यात ताडोबा आणि पश्चिम घाट परिसरात या मांजरांचे वास्तव्य आढळून आले आहे. वाघाटीच्या  चेहऱ्यावर दोन गडद पांढऱ्या रेषा, तर चार गडद काळ्या रेषा असतात. सदर रेषा या नाकापासून वर डोक्यापर्यंत स्पष्ट असतात. या मांजरीचे डोळे खूप मोठे असतात आणि त्यांच्या बुबुळांचा रंग निळसर ते राखाडी तपकिरी असतो. त्यांचे कान गोलाकार आणि लहान असतात आणि पाठीवर राखाडी ठिपके असतात. वाघाटी प्राणी इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर (IUCN) द्वारे नामशेष होण्याची भीती असलेल्या यादीत आहे. मार्जारकुळात समावेश असलेल्या वाघाटीचा समावेश नामशेष होत चाललेल्या वन्यजीवांमध्ये होतो.

Loading

वर्ष संपत आले तरी महामार्ग पूर्ण होण्याची चिन्हे दिसेनात; जनआक्रोश समितीतर्फे साखळी उपोषण सुरू

पेण: मुंबई गोवा चौपदरीकरणाचे काम २०११ पासून सुरु असून १२ वर्षे उलटूनही पनवेल ते इंदापूर व पुढे इंदापूर ते पत्रादेवी (गोवा सीमा) मार्गाचे काम पूर्ण झालेले नाही. याबाबत अनेक वर्षे अनेक आंदोलने झाली. माननीय उच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल करण्यात आली. परंतु काम पूर्ण झाले नाही. गणेशोत्सव काळात कामाला गती देण्यात आली होती. त्यामुळे या महिन्यात सदर काम पूर्ण होईल अशा आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतु, गणेशोत्सवानंतर कामाची गती मंदावली असून डिसेंबर अखेरीस काम पूर्ण होण्याची शक्यता धूसर झाली आहे.

याच मुद्द्यावर कोंकण विकास समितीच्या शिष्टमंडळाने आपली टिप टॉप प्लाझा, ठाणे येथे भेट घेऊन निवेदन दिले होते. आपण त्याच वेळी संबंधितांना सूचना देण्याचे आश्वासन दिले होते.

त्यानंतर, स्थानिक नागरिक, शेतकरी व मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीतर्फे दि. १२ डिसेंबर, २०२३ पासून रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील पांडापूर, कासू येथे साखळी उपोषण सुरु आहे. त्याची उच्चस्तरीय दखल घेतली असल्याचे दिसत नाही.

तरी, आपण यात लक्ष घालून आपण स्वतः संबंधित मंत्री, वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधींसोबत सदर ठिकाणी भेट देऊन मागण्यांची नोंद घ्यावी व संपूर्ण मुंबई गोवा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत अशी विनंती जनआक्रोश समितीतर्फे करण्यात आली आहे.

Loading

महाड: सजावटीच्या आकर्षक दिव्यांनी उजळून निघणार चवदार तळे

रायगड: महाड येथील चवदार तळे व आजूबाजूचा परिसर आता सजावटीच्या आकर्षक दिव्यांनी उजळून निघणार आहे. यासाठी सुमारे दोन कोटी रुपयांची तरतूद केली असून लवकरच हे काम पूर्णत्वास येणार असल्‍याचे महाड नगरपालिकेकडून सांगण्यात येत आहे.
महाडमध्ये २० मार्च १९२७ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्याचे पाणी प्राशन करून अस्पृश्यतेविरोधात सामाजिक न्यायासाठी लढा दिला होता. या सत्याग्रहानंतर चवदार तळे जगाच्या नकाशावर आले. महाड नगरपालिकेने चवदार तळ्याचा इतिहास जपण्यासाठी १९८७ मध्ये तळ्याचे सुशोभीकरणाचे काम पूर्ण केले होते.
चवदार तळ्याच्या भिंती नव्याने बांधण्यात आल्या असून तळ्याच्या काठी सभागृह बांधण्यात आले आहे. ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी सत्याग्रह केला होता, त्या पायऱ्यांचे देखील सुशोभीकरण केले आहे. तळ्याच्या मध्यभागी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आहे व दोन्ही बाजूला उद्याने विकसित करण्यात आली आहेत. चवदार तळ्यावर वर्षभर असंख्य अनुयायी व पर्यटक भेट देतात. शिवाय दरवर्षी चवदार तळे सत्याग्रह स्मृतिदिन, मनुस्मृतिदिन, डॉ. आंबेडकर जयंती व पुण्यतिथी यानिमित्त लाखो अनुयायी अभिवादन करण्यासाठी येतात.
तळ्याच्या सुशोभीकरणांमध्ये आणखीन भर पडावी, या दृष्टीने महाड नगरपालिकेने आता चवदार तळे व परिसरामध्ये सजावटीचे दिवे व आकर्षक दिव्यांचे खांब उभारण्यास सुरुवात केली आहे. तळ्याच्या चारी बाजूने तसेच दोन्ही उद्यानांमध्ये ११० खांब उभारण्यात आले आहेत. खांबांवर नक्षीदार असे सजावटीचे दिवे लावले जाणार आहेत. या दिव्यांमुळे चवदार तळ्याचा परिसर आणखीनच उठून दिसेल. महानगरपालिकेने आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुदानातून सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून हे दिवे बसवण्यास सुरुवात केली आहे.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search