Category Archives: लोकसभा निवडणूक २०२४

Exit Poll: एक्झिट पोल म्हणजे काय? एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात कुणाला किती जागा मिळतील? इथे वाचा

   Follow us on        
Exit Poll: लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवार दिनांक ०४ जून रोजी हाती येणार आहे.  मंगळवारी अंतिम निकाल हाती येणार असला तरी त्याआधी अंदाज वर्तवले जात आहेत. यामधील एक प्रक्रिया म्हणजे एक्झिट पोल. एक्झिट पोलच्या माध्यमातून कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याचा अंदाज वर्तवण्यात येत असतो. हा एक्झिट पोल म्हणजे नेमकं काय आहे ? कशा पद्धतीने तो घेतला जातो ? अशा अनेक गोष्टी आपण आज जाणून घेणार आहोत.
निवडणूक निकालाचे अंदाज व्यक्त करण्याची अनेक माध्यमं असून त्यातील सर्वात विश्वासार्ह माध्यम म्हणून एक्झिट पोलकडे पाहिलं जातं. कारण एक्झिट पोल तंतोतंत नसला तरी निकालाच्या जवळपास जाणारा असतो.
एक्झिट पोल कधी जाहीर केला जातो ?
एक्झिट पोल हा नेहमी निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर घेतला जातो. भारतात एक्झिट पोल मतदान झाल्यानंतरच दाखवण्यास परवानगी आहे. मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडल्यानंतर त्यादिवशी संध्याकाळी एक्झिट पोल जाहीर केला जातो. 



कशा पद्धतीने घेतला जातो एक्झिट पोल ?
एक्झिट पोल हा ज्यादिवशी मतदान होते म्हणजे मतदानाच्या दिवशीच घेतला जातो. मतदानाच्या दिवशीच मतदारांकडून माहिती गोळा केली जाते. मतदान करुन आल्यानंतर मतदाराला कुणाला मत दिलं आहे यासंबंधी विचारलं जातं. यावेळी त्या मतदान केंद्रावर किती मतदार आहेत याची माहिती आधीच घेतली गेलेली असते. त्याच्या आधारेच मतदान केंद्रांची निवड करण्यात आलेली असते. मतदान करुन येणार पंधरावा, विसावा माणूस सॅम्पल म्हणून निवडला जातो. यावेळी मतदारांनी दिलेल्या उत्तराच्या आधारे सर्व्हे केला जातो आणि संबंधित मतदारसंघातील निकालाचा अंदाज व्यक्त केला जातो.
एक्झिट पोल आणि ओपिनियन पोलमध्ये काय फरक ?
ओपिनियन पोल म्हणजे जनमत चाचणी. ओपिनियन पोल मतदानापुर्वी सादर केला जातो. मतदान होण्यापुर्वी विविध मतदारसंघांमध्ये जाऊन मतदारांचा कल जाणून घेतला जातो आणि त्यानुसार ओपिनियन पोल तयार केला जातो.
ओपनियन पोलवर कितपत निर्भर राहू शकतो ?
एक्झिट पोल आणि ओपनियन पोलमधील मुख्य फरक म्हणजे एक मतदानाआधी आणि एक मतदानानंतर घेतला गेलेला असतो. ओपनियन पोल मतदानाच्या आधी घेतला गेला असल्याने तो बदलण्याची शक्यता असते. त्याचे अंदाज बदलू शकतात. पण एक्झिट पोल हा मतदान घेतल्यानंतरचा असल्याने त्याच्यावर निर्भर राहू शकतो.
एक्झिट पोलची सुरुवात कधी झाली ?
एक्झिट पोलची सुरुवात कधी झाली यामध्ये मतांतर आहेत. नेदरलँडमधील समाजशास्त्र आणि माजी राजकीय नेते मार्सेल वॉन डॅम यांनी एक्झिट पोलची सुरुवात केली असं म्हटलं जातं. १५ फेब्रुवारी १९६७ रोजी पहिला एक्झिट पोल आला होता.
एक्झिट पोल निकालाचं चित्र स्पष्ट करतात का?
आता प्रश्न उरतो की निकालाचं चित्र हे एक्झिट पोल स्पष्ट करतात की नाही? या प्रश्नाचे उत्तर हो असे आहे. बऱ्याचदा एक्झिट पोलचा अंदाज हा निकालाच्या जवळ जाणाराच असतो असं दिसून आलं आहे. मात्र एक्झिट पोल म्हणजे निकाल नाही हे मात्र आपण लक्षात ठेवायला हवं.
सी व्होटर, चाणक्य, इंडिया टुडे-अॅक्सिस, एबीपी-नेल्सन, इंडिया टीव्ही-CNX या आणि अशा अनेक संस्था न्यूज चॅनल्सच्या सोबतीने त्यांचे अंदाज वर्तवतात. या अंदाजामध्ये जनतेचा सहभाग असतो. कारण अंदाज जनतेशी बोलून झाल्यानंतर हा अंदाज बांधण्यात आलेला असतो. त्यामुळेच निकालाचं चित्र स्पष्ट करणारे हे एक्झिट पोल ठरतात. देशात सात आणि महाराष्ट्रात चार टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडली. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून निकालाच्या दिवसापर्यंत विविध जनमत चाचण्या आणि अंदाज घेतले जातात. बऱ्याचदा राजकीय विश्लेषकही काही अंदाज वर्तवत असतात त्यावरूनही एक्झिट पोलचे अंदाज बांधले जातात.



लोकांनी दिलेली माहिती, एक्झिट पोल मांडणाऱ्या संस्थाचं तयार झालेला अंदाज, राजकीय तज्ज्ञ, विश्लेषकांनी वर्तवलेले अंदाज या सगळ्यातून एक्झिट पोल आकाराला येत असतो. त्याचमुळे तो निकालाचं चित्र बऱ्यापैकी स्पष्ट करणारा ठरतो. सत्ताधारी पक्षाला किती जागा? विरोधी पक्षाला किती जागा? अपक्षांची कामगिरी काय? हे आणि अशा अनेक प्रकारचे अंदाज एक्झिट पोलमधून वर्तवण्यात येत असतात. त्यामुळे एक्झिट पोल हे निकाल काय लागू शकतो याचा अंदाज वर्तवणारं एक उत्तम माध्यम ठरतं.
Maharashtra Lok Sabha Poll of Exit Poll : 2024 एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात कुणाला किती जागा मिळतील? 
एक्झिट पोल एजन्सी महायुती महाविकास आघडी इतर 
ABP News-CVoter  24  23  1
TV9 पोलस्ट्राट  22  25  1
Republic Bharat-Matrize  30-36 13-19 0
Republic PMARQ  29 19 0
News18 exit poll 32-35 13-16 0
School of Politics 31-35 42705 0
TIMES NOW Survey exit polls 26 24 0
News 24 Chanakya exit polls report 33 15 0
Rudra survey 13 34 1
NDTV India – Jan Ki Baat 34-41 42614 0

Lok Sabha Poll of Exit Poll : 2024 एक्झिट पोलमध्ये देशात कुणाला किती जागा मिळतील? 

Alliance / Party NDA INDIA OTHERS
ABP-C Voter 353-383 152-182 04 -12
India Today- Axis My India 361-401 131-166 08-20
News 18 355-370 125-140 42-52
TV9-Polstrat 353-368 118-133 43-38
Today’s Chanakya 385-415 96-118 27-45
NDTV-Poll Of Polls 358 148 37
Republic-PMARQ 359 154 30
News Nation 342-378 153-169 21-23
India NewsDynamics 371 125 47



Loading

कौल जनतेचा | रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात मैदान कोण मारणार?

   Follow us on        

कौल जनतेचा

रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात मैदान कोण मारणार?

*नारायण राणे* की *विनायक राऊत*

आपला उमेदवार मागे ईथेही मागे पडता नये… खालील लिंक वर क्लिक करून आपले मत नोंदवा…

Loading

Loksabha Election 2024: मतदानाच्या टक्केवारीत सावंतवाडी सरस | राज्यात अपेक्षेपेक्षा कमी मतदान.. जाणून घ्या मतदानाची पूर्ण आकडेवारी

   Follow us on        

Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या तिसर्‍या टप्प्यातील मतदान आज पार पाडले. महाराष्ट्र राज्यात 54.98% एवढे मतदान झाले असून सर्वात जास्त मतदान कोल्हापूर मतदारसंघात (63.71%) झाले आहे तर सर्वात कमी मतदान माढा मतदारसंघात (47.84%) एवढे झाले आहे.

  • लातूर 55.38 %
  • सांगली 52.56 %
  • बारामती 47.84%
  • हातकणंगले 62.18%
  • कोल्हापूर 63.71%
  • माढा 50%
  • उस्मानाबाद 58.24%
  • रायगड 50.31%
  • रत्नागिरी  – सिंधुदुर्ग 53.75 %
  • सातारा 56.38 %
  • सोलापूर 49.17%

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात 53.75% मतदान झाले आहे. या मतदारसंघात सावंतवाडीत सर्वाधिक 60.30% एवढे मतदान झाले असून राजापुरात सर्वात कमी 47.31% एवढे मतदान झाले आहे.

  • कुडाळ 59.09%
  • कणकवली 55.14%
  • सावंतवाडी 60.30%
  • राजापूर 47.31%
  • चिपळूण 52.62%
  • रत्नागिरी  49.83%

रायगड लोकसभा मतदारसंघात 50.31% मतदान झाले आहे. या मतदारसंघात दापोली येथे सर्वाधिक 59.12% एवढे मतदान झाले असून महाड मध्ये  सर्वात कमी 45.60%  एवढे मतदान झाले आहे.

  • अलिबाग 52.33%
  • दापोली 59.12%
  • गुहागर 53.77%
  • महाड 45.60%
  • पेण 51%
  • श्रीवर्धन 49.48 %

देशात आज निवडणूकीच्या तिसर्‍या टप्प्यात एकूण 61.60% एवढे मतदान झाले असून आसाम राज्यात सर्वाधिक सुमारे 75.30% एवढे मतदान झाले आहे तर महाराष्ट्र राज्य टक्केवारीत (54.98%) सर्वात मागे आहे. अपेक्षेपेक्षा कमी मतदान झाल्याने उमेदवारांचे धाबे दणाणले आहेत. मतदानाच्या टक्क्यावर वाढलेल्या तापमानाचा परिणाम झाला असून मतदानाची टक्केवारी कमी झाली आहे.

टीप : वरील आकडेवारी शासनाच्या अधिकृत माध्यमांतून उपलब्ध झाली असली तरी ती अंदाजित स्वरूपाची आहे. ही माहिती टप्प्याटप्प्याने येत असल्याने त्यात काहीशी वाढ अपेक्षित आहे. यात टपालाने केलेल्या मतांचा समावेश नाही आहे. 

Ad -

मराठी मुलांमुलींना युरोप, पोर्तुगाल,माल्टा,इटली आणि पोलंड येथे नोकरीच्या संधी....
🔸Retail Jobs 🔸Malls 🔸Corporate Staff 🔸Sales 🔸Back Office 🔸Hotels
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

 

 

 

 

 

 

 

Loading

Election 2024 Voting Live Updates: राज्यात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५% टक्के मतदान; टक्केवारीत महाराष्ट्र इतर राज्यांच्या मागे

   Follow us on        
Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत  ३१.५५% मतदान झाले असून सर्वात जास्त मतदान कोल्हापूर मतदारसंघात (३८.४२%)  झाले आहे तर सर्वात कमी मतदान माढा मतदारसंघात (२६.६१%)झाले आहे.
लातूर – ३२.७१ %
सांगली २९.६५ %
बारामती २७.५५%
हातकणंगले ३६.१७%
कोल्हापूर ३८.४२%
माढा २६.६१%
उस्मानाबाद ३०.५४%
रायगड ३१.३४%
रत्नागिरी  – सिंधुदुर्ग ३३.९१ %
सातारा ३२.७८ %
सोलापूर २९.३२%
रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात दुपारी १ वाजेपर्यंत ३३.९१% मतदान झाले आहे. या मतदारसंघात चिपळूण येथे सर्वाधिक ३७.९० % एवढे मतदान झाले असून रत्नागिरीत सर्वात कमी २८% एवढे मतदान झाले आहे.
कुडाळ ३२.८८%
कणकवली ३१.५९%
सावंतवाडी ३६.६५%
राजापूर ३७.०५%
चिपळूण ३७.९०%
रत्नागिरी  २८%
रायगड मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.३४% मतदान झाले आहे. या मतदारसंघात गुहागर येथे सर्वाधिक ३९.००% एवढे मतदान झाले असून पेण मध्ये  सर्वात कमी २२.२०%  एवढे मतदान झाले आहे.
अलिबाग ३२.९०%
दापोली ३६.४५%
गुहागर ३९.००%
महाड ३२.००%
पेण २२.२०%
श्रीवर्धन २६.९४ %
देशात १ वाजेपर्यंत एकूण ३९.९२% एवढे मतदान झाले असून गोवा आणि पश्चिम बंगाल येथे सर्वाधिक सुमारे ४९% मतदान झाले आहे तर महाराष्ट्र राज्य टक्केवारीत सर्वात मागे आहे.
Ad -

मराठी मुलांमुलींना युरोप, पोर्तुगाल,माल्टा,इटली आणि पोलंड येथे नोकरीच्या संधी....
🔸Retail Jobs 🔸Malls 🔸Corporate Staff 🔸Sales 🔸Back Office 🔸Hotels
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Loading

राज्यात ११ वाजेपर्यंत १८.१८% टक्के मतदान; कोल्हापूर मतदारसंघात सर्वात जास्त मतदानाची नोंद, जाणून घ्या संपूर्ण माहिती

   Follow us on        
Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी  महाराष्ट्रात ११ वाजेपर्यंत  १८.१८% टक्के मतदान झाले असून सर्वात जास्त मतदान कोल्हापूर मतदारसंघात (२३.७७%)  झाले आहे तर सर्वात कमी मतदान बारामती मतदारसंघात ( १४.६४%)झाले आहे.
लातूर – २०.७४%
सांगली १६.६१%
बारामती १४.६४%
हातकणंगले २०.७४%
कोल्हापूर २३.७७%
माढा १५.११%
उस्मानाबाद १७.०६%
रायगड १७.१८%
रत्नागिरी  – सिंधुदुर्ग २१.१९%
सातारा १८.९४ %
सोलापूर १५.६९%
रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात 11 वाजेपर्यंत  २१.१९%  मतदान झाले आहे. या मतदारसंघात चिपळूण येथे सर्वाधिक २४.१८% एवढे मतदान झाले असून रत्नागिरीत सर्वात कमी १५% एवढे मतदान झाले आहे.
कुडाळ २१.४०%
कणकवली २२.०९%
सावंतवाडी २१.७४%
राजापूर २३.६३%
चिपळूण २४.१८%
रत्नागिरी  १५.०० %
Ad -

मराठी मुलांमुलींना युरोप, पोर्तुगाल,माल्टा,इटली आणि पोलंड येथे नोकरीच्या संधी....
🔸Retail Jobs 🔸Malls 🔸Corporate Staff 🔸Sales 🔸Back Office 🔸Hotels
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Loading

IMD Alert | मतदानाच्या दिवशी हे मतदारसंघ ‘तापणार’, कोणती काळजी घ्याल?

   Follow us on        

मुंबई :उद्या दिनांक ७ मे रोजी लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील भागातील निवडणूक होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर भारतीय हवामान खात्याने IMD महाराष्ट्रात ज्या भागात मतदान होणार आहे त्या भागातील हवामान अंदाज जाहीर केले आहेत.

IMD ने वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापुर, वाडा, सांगली, सातारा आणि हातकंगाले या जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० डिग्री सेल्सिअस ही पातळी ओलांडणार आहे. तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या कोकण भागात तापमान ३४ ते ३६ डिग्री सेल्सिअस च्या घरात राहणार आहे. कोल्हापूर जिल्हय़ात अधिकतम तापमान ३९ डिग्री सेल्सिअस असण्याची शक्यता आहे.

कोणती काळजी घ्याल? 

शक्यतो सकाळी मतदानासाठी बाहेर पडावे. मतदान केंद्रावर गर्दी असल्यास उन्हातही मोठी रांग लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदानासाठी बाहेर पडताना हातात छत्री घेऊनच बाहेर पडावे. सोबत पाण्याची मोठी बाटली घेऊन निघा. वेळोवेळी पाणी पीत रहा. तहान लागली नाही तरीही पाणी पित रहा. शक्य असेल तर ORS, लिंबू सरबत अशी घरगुती पेय सोबत घेतल्यास फायद्याचं ठरेल. हलक्या रंगाचे, सुती कपडे परिधान करावेत. बाहेर पडल्यानंतर शक्यतो डोकं टोपी, रुमाल यांनी झाकावं. तुम्हाला चक्कर येत असेल, आजारी वाटत असेल तर हयगय न करता मतदानकेंद्रातील कर्मचाऱ्याकडून मदत मिळवा.

 

Loading

कोकण रेल्वे मार्गावर सोमवारपासून धावणार दोन ‘निवडणूक स्पेशल ट्रेन’

   Follow us on        

Konkan Railway News :कोकणात दिनांक 07 मे रोजी लोकसभेच्या जागेसाठी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावर दोन विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे आहे. या गाड्यांच्या दोन्ही बाजूने मिळून एकूण चार फेर्‍या होणार आहेत. या गाड्यांमुळे कोकणात मतदानासाठी जाणार्‍या चाकरमान्यांना दिलासा मिळणार आहे.

या गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे

1) गाडी क्रमांक 01158/01157 मडगाव जं. – पनवेल – मडगाव जं. विशेष:

गाडी क्र. 01158 मडगाव जं. – पनवेल विशेष ही गाडी दिनांक 06/05/2024, सोमवारी सकाळी 06:00 वाजता मडगाव जंक्शन येथून सुटून त्याच दिवशी संध्याकाळी 18:50 वाजता पनवेलला पोहोचेल.

गाडी क्र. 01157 पनवेल – मडगाव जं. -पनवेल विशेष दिनांक 08/05/2024, बुधवार रोजी सकाळी 04:00 वाजता पनवेल येथून सुटेल ती मडगाव जंक्शनला त्याच दिवशी संध्याकाळी 17:00 वाजता पोहोचेल.

ही गाडी करमाळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, सावर्डा, चिपळूण, खेड, वीर, माणगाव आणि रोहा स्थानकांवर थांबेल.

डब्यांची रचना : एकूण 20 LHB कोच = स्लीपर – 10 कोच, सामान्य – 08, SLR – 02.

2) गाडी क्रमांक 01159/ 01160 पनवेल – सावंतवाडी रोड – पनवेल विशेष :

गाडी क्र. 01159 पनवेल – सावंतवाडी रोड स्पेशल पनवेल येथून सोमवार दिनांक 06/05/2024 रोजी रात्री 20:00 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 06:00 वाजता सावंतवाडी रोडला पोहोचेल.

गाडी क्र. 01160 सावंतवाडी रोड – पनवेल विशेष गाडी सावंतवाडी रोडवरून दिनांक 07/05/2024 मंगळवार रोजी संध्याकाळी 16:00 वाजता सुटेल ती दुसऱ्या दिवशी सकाळी 03:00 वाजता पनवेलला पोहोचेल.

ही गाडी रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्थानकावर थांबेल.

रचना : एकूण 20 LHB कोच = स्लीपर – 10 कोच, सामान्य – 08, SLR – 02.

वरील गाड्यांचे तपशीलवार थांबे आणि वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

 

Loading

“प्रचारास प्रवेश बंदी” शिरवल गावातील ‘तो’ बॅनर ठरतोय चर्चेचा विषय

   Follow us on        
कणकवली, दि. ०२ मे: कणकवली तालुक्यातील शिरवल गावाच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आलेला एक बॅनर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक चर्चेचा विषय बनला आहे. “प्रचारास प्रवेश बंदी” असे या बॅनर वर लिहिले असून हा बॅनर येथील ग्रामस्थांनी  लावला आहे.
“निषेध निषेध निषेध, प्रचारास प्रवेश बंदी, जो पर्यंत मुख्यरस्ता डांबरीकरण करून मिळत नाही, तोपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाने प्रचारासाठी येऊ नये” असे या बँनरवर लिहिण्यात आले आहे. गेली ३० वर्षे हा रस्ता डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. गावाला तालुक्याशी जोडणारा हा एकमेव रस्ता असून त्याची सध्याची स्थिती खूपच खराब झाली आहे. या रस्त्यावरून प्रवास करणे अवघड झाले असून अपघाताची शक्यताही निर्माण झाली आहे. हा रस्ता मंजूर होऊनही गेले काही महिने प्रत्यक्ष कामाला सुरवात झाली नाही आहे. विशेष म्हणजे कणकवली शहरापासून हा रस्ता फक्त ५ किलोमीटर अंतरावर असून याकडे दुर्लक्ष होत असून हे सर्व सहनशक्तीच्या पलीकडचे आहे. त्यामुळे अशा आशयाचा बॅनर येथे लावला असे ग्रामस्थानी पत्रकारांशी बोलताना सांगितले. जो पर्यंत मुख्यरस्ता डांबरीकरण करून मिळत नाही, तोपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाने गावात प्रचारासाठी येऊ नये अशी ताकीदच गावकऱ्यांनी दिली आहे.

Loading

Loksabha Eelection 2024 | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची रविवारी सावंतवाडीत सभा

   Follow us on        
सावंतवाडी, दि. ०१ मे : येत्या रविवारी (ता.५) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सावंतवाडीमध्ये सभा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. महायुतीचे लोकसभा उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी ते सावंतवाडी येथे येणार असल्याची माहिती सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे समन्वयक माजी आमदार राजन तेली यांनी पत्रकार परिषदेत दिली
‘‘निवडणूक अंतिम टप्प्यात आली असून राणेंचा विजय निश्चित आहे. सहाही विधानसभा मतदारसंघातून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यासाठी भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी अजित पवार गट व रामदास आठवले आरपीआयच्या माध्यमातून कार्यकर्ते व पदाधिकारी प्रयत्न करत आहेत. केंद्राच्या ५४ योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य जनतेसाठी आणल्यात त्या आम्ही जनतेसमोर घेऊन जात असून कणखर नेतृत्व म्हणून मोदी हे जगभरात प्रसिद्ध आहेत. आम्ही जनतेसमोर मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेली कामगिरी घेऊन जात आहोत आणि चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. ऑनलाइन अर्थात डिजिटल पद्धतीने चलनात पैसा येऊ लागल्याने अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकावर आली आहे. ती पुढील काळात तीन नंबरवर आणण्यासाठी मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम होईल. केंद्रीय मंत्री राणे यांनी बेरोजगारीवर पर्याय शोधले असून त्यांनी प्रकल्प साकारण्याचा निश्चय केला आहे. सी वर्ल्ड प्रकल्प झाला असता तर आज मोठ्या प्रमाणात बेरोजगारी दूर झाली असती. पण, खासदार विनायक राऊत आणि ठाकरे यांच्या आमदारांनी त्याला विरोध केला. रिफायनरीला देखील विरोध राहिल्याने तो होऊ शकला नाही. असे राजन तेली  या वेळी म्हणालेत.
‘‘आडाळी एमआयडीसी, दोडामार्ग तालुका निर्मिती राणे यांनी केली आहे. या ठिकाणी देखील रोजगार आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पुढील काळात जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासोबतच रोजगाराच्या प्रश्नावर नारायण राणे यांचे मॉडेल तयार आहे. ते निश्चित काम करतील.’’ असे ते पुढे म्हणालेत

Loading

उदय सामंत व किरण सामंत यांचा राणेंना पाठिंबा.. मात्र शिवसैनिक नाराज, राजीनामा सत्र चालू

रत्नागिरी, दि.१९ एप्रिल: नारायण राणे यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात उमेदवारी मिळाली असल्याने शिंदे गटातील काही कार्यकर्ते यामुळे नाराज आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत व किरण सामंत यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन राणे (Narayan Rane) यांना आपला पाठिंबा जाहीर केला असूनही पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज झाले आहेत.
इतकंच नाही तर रत्नागिरी पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामा सत्र ही चालू केले आहे.  युवा सेनेच्या तीन जिल्हा पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे दिले आहेत. याची देखील राजकारणात चर्चा होऊ लागली आहे.त्यामुळे सामंत बंधू आपल्या नाराज कार्यकर्त्यांची नाराजी कशी दूर करतात, हे पाहावं लागेल.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search