सावंतवाडी: सावंतवाडी तालुक्यातील कलंबिस्त गणशेळवाडी येथील 26 वर्षीय निलेश न्हानु सावंत या युवकाने घराच्या अंगणातील लोखंडी छप्पराला गळफास लावत आत्महत्या केल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. या घटनेने कलंबिस्त गावात हळहळ व्यक्त होत आहे. मयत निलेश सावंत याचे काका राजन सावंत यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील, पोलीस हवालदार प्रसाद कदम, लक्ष्मण काळे यांनी जाऊन पंचनामा केला. निलेश हा शांत व मनमिळाऊ स्वभावाचा होता. त्याचा मित्रपरिवार ही मोठा होता. निलेश याच्या पश्चात आई, भाऊ, बहीण, काका असा मोठा परिवार आहे.
Category Archives: सिंधुदुर्ग
सावंतवाडी: सावंतवाडीतील कलंबीस्त गावातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे आलेल्या एका फिरत्या विक्रेत्याच्या कुल्फीमध्ये किडे सापडले आहेत. हा प्रकार समजल्यानंतर येथील जागृत ग्रामस्थांनी त्या विक्रेत्याला धारेवर धरले आहे.
याबद्दल जाब विचारल्यानंतर विक्रेत्याने यात आपली काही चूक नसून या खाद्यपदार्थांची मी फक्त विक्री करत आहे असे सांगितले. त्याने जेथून हे खाद्यपदार्थ विकत घेतो त्या व्यावसायिकाचे नावही सांगितले.
या प्रकारामुळे या विक्रेत्यांकडून हे पदार्थ विकत घेणार्या लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हे पदार्थ बनवताना योग्य ती स्वच्छता राखली जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा व्यावसायिकांवर योग्य वेळी कारवाई केली गेली नाही तर पुढे या निष्काळजीपणामुळे जीव गमावण्यांची शक्यता नाकारता येत नाही. केंद्र सरकारने अन्नसुरक्षेसाठी FSSAI या संस्थेची नियुक्ती स्थापना केली आहे. या संस्थेने या प्रकरणाची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
Video: लहान मुलांच्या आरोग्याशी खेळ; फिरत्या विक्रेत्याच्या कुल्फीमध्ये आढळल्या अळ्या – Kokanai
सविस्तर वृत्त – https://t.co/eVBM0j7pqV#sawantwadi pic.twitter.com/7nQMd294hd
— Kokanai Digital News Channel (@kokanai21) March 11, 2025
![]()
पट्टेरी वाघ कि बिबट्या?
Fact Check: कोकणातील परुळे गावात सिंहाचा वावर? नेमके सत्य काय? – Kokanai https://t.co/Ac9j6XyUGr#fakenews #lion pic.twitter.com/11WjdCOVlM
— Kokanai Digital News Channel (@kokanai21) March 7, 2025
सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यात लवकरच एसटी महामंडळाच्या मिनी बसेस दाखल होणार आहेत. यासंदर्भात पालकमंत्री नितेश राणे यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विवेक भिमणवार यांची विधानभवनातील आपल्या दालनात बैठक घेऊन चर्चा केली.
या बैठकीत जिल्ह्यातील एसटी सेवांबाबत आणि कारभाराबाबत चर्चा केली. पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गात मिनी बस सेवा सुरू करणे तातडीची गरज असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. या मागणीला एसटी महामंडळाच्या संचालकांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच मिनी बस सेवा सुरू करण्याचे सांगितले.पालकमंत्री नितेश राणे यांनी यावेळी जिल्ह्यातील काही बसस्थानके दुरावस्थेत असल्याचे ही अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्या बसस्थानकांची तात्काळ डागडुजी करून सुशोभीकरण करण्याच्या सूचना ही पालकमंत्री यांनी दिल्या. गावा गावांचा संपर्क वाढविण्यासाठी बसेच्या फेऱ्यात वाढ करण्याच्या सूचना ही पालकमंत्री नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच रिक्त असलेले विभाग नियंत्रक पद तात्काळ भरण्याच्या सूचना ही अधिकाऱ्यांना दिल्या.
सावंतवाडी : सावंतवाडी टर्मिनसचा समावेश अमृत भारत स्थानक योजनेत करा अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. रेल्वे मंत्र्यांना या मागणीच पत्र श्री. राणे यांनी दिलं आहे. याबद्दल कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी ने खासदार श्री. राणेंचे आभार मानले आहेत.
या निवेदनात खास. राणे यांनी म्हटले आहे की, कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी कडून अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत कोकण रेल्वेवरील सावंतवाडी स्टेशन टर्मिनसचा विकास करण्याची विनंती केली आहे. सावंतवाडी हे हजारो लोक विशेषतः उत्सवाच्या काळात वापरणारे एक महत्त्वाचे स्थानक आहे. सावंतवाडीचा विकास कोकण रेल्वेवरील प्रवाशांसाठी सर्वात उपयुक्त ठरेल. त्यामुळे या प्रकरणात वैयक्तिकरित्या लक्ष घालून संबंधित संघटनेची विनंती स्वीकारण्याची, ती मान्य करण्याची सूचना द्या अशी मागणी खास. राणेंनी केंद्रीय रेल्वेमंत्री श्री. वैष्णव यांच्याकडे केली आहे. याबाबत खास नारायण राणे यांचे कोकण रेल्वे प्रवासी संघटनेकडून आभार मानले आहेत.
मुंबई: दोडामार्ग तालुक्यातील भेडशी खानयाळ गावची सुकन्या आणि सद्यस्थितीत मुंबई-दहिसर येथे स्थायिक असलेल्या साक्षी बंड्या गावडे हिची 23 वर्षाखालील महिलांच्या गोवा रणजी क्रिकेट संघात ऑलराऊंडर खेळाडू म्हणून दिनांक २८ फेब्रुवारी रोजी निवड झाली असून तिचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. साक्षी हिने मास मीडिया मधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. इयत्ता सातवी पासून लेदर बॉल क्रिकेटचे धडे घेत आहे. तिचे वडील बंड्या गावडे यांना क्रिकेटची फार आवड. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिची यापूर्वी मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये १६ आणि १९ वर्षाखालील महिलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली होती. तिचा परफॉर्मन्स पाहून गोवा क्रिकेट अकॅडमीने तिची 23 वर्षाखालील महिलांच्या गोवा रणजी क्रिकेट स्पर्धेसाठी ऑलराऊंडर म्हणून निवड केली आहे. सध्या ती गोवा येथे रणजी क्रिकेट स्पर्धेसाठी प्रशिक्षण घेत आहे. सावंतवाडी तालुक्यातील कलंबिस्त येथील अशोक नारायण परब (मांजरेकर) यांची ती नात असून रणजी संघामध्ये झालेल्या निवडीबद्दल तिच्या मामेगावी कलंबिस्त येथे तिचे कौतुक होत आहे. सामाजिक कार्यकर्ते किरण सावंत, निलेश पास्ते, अशोक राऊळ यांनी तिचे अभिनंदन केले आहे.











