Category Archives: सिंधुदुर्ग

वैभववाडी: खांबाळे मोहितेवाडीत लोखंडी पूल कोसळला; अडकलेल्या चार गुरांची सुटका

   Follow us on        

वैभववाडी:

​खांबाळे मोहितेवाडी (खालचीवाडी) येथील ओढ्यावरील लोखंडी साकव मंगळवारी सकाळी अचानक कोसळला. या दुर्दैवी घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी चार जनावरे जखमी झाली आहेत.

​मौजे मोहितेवाडी येथील संजय गोविंद पवार हे आपल्या मालकीची सहा जुरे चराईसाठी घेऊन ओढ्यावरील लोखंडी साकवावरून जात असताना ही घटना घडली. साकव अचानक कोसळल्यामुळे जनावरे तिथेच अडकली. मात्र, ग्रामस्थांनी तात्काळ प्रसंगावधान राखून अडकलेल्या जुरेची सुरक्षित सुटका केली. या अपघातात चार जनावरांना दुखापत झाली आहे.

​घटनेची माहिती मिळताच पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांनी घटनास्थळी भेट देऊन साकवाची पाहणी केली. यावेळी ग्रामपंचायत प्रशासक प्राजक्ता कदम, माजी सरपंच गणेश पवार तसेच विक्रांत पवार उपस्थित होते.

​या घटनेत जखमी झालेल्या चार जनावरांवर आचिर्णे येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे पर्यवेक्षक डॉ. हेूळकर यांनी जनावरांच्या मालकाच्या घरी जाऊन उपचार केले. दरम्यान, तलाठी केदारी बागल यांनी घटनास्थळी पंचनामा करून संबंधितांचे जबाब नोंदवले व अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केला. याप्रसंगी पोलीस पाटील अस्मिता चव्हाण आणि कोतवाल संतोष काळे उपस्थित होते.

 

सावंतवाडी: शालेय विद्यार्थ्यांच्या नशिबी टोके लागलेले धान्य

   Follow us on        

सावंतवाडी: सावंतवाडी पंचायत समितीच्या मासिक सभेत शालेय पोषण आहार योजनेबाबत एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तालुक्यातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पुरवण्यात येणाऱ्या पोषण आहारातील धान्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचा गंभीर आरोप लोकप्रतिनिधींनी बैठकीदरम्यान केला आहे. लहान मुलांच्या आरोग्याशी थेट खेळणाऱ्या या प्रकारामुळे संपूर्ण तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

​पुरवठादाराकडून शाळांपर्यंत पोहोचवण्यात येणारे धान्य किडलेले, अस्वच्छ आणि लहान मुलांच्या खाण्यायोग्य अजिबात नसल्याचे सभेदरम्यान समोर आले. प्रशासकीय निष्काळजीपणामुळे अशा प्रकारचे अस्वच्छ धान्य विद्यार्थ्यांच्या ताटात पोहोचत असल्याचे पाहून लोकप्रतिनिधींनी आणि उपस्थितांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला.

​या गंभीर बाबीची तातडीने दखल घेत पंचायत समितीच्या बैठकीत सदस्यांनी प्रशासनाला आक्रमकपणे जाब विचारला. सरकारी योजनांचा निधी मिळूनही विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात असल्याने संबंधित विभागाच्या ढिसाळ कारभारावर जोरदार ताशेरे ओढण्यात आले.

​विद्यार्थ्यांच्या जीवाशी आणि आरोग्याशी खेळ करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच या संपूर्ण प्रकाराकडे दुर्लक्ष करणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवरही तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी लावून धरली आहे.

​शेवटी, या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून निकृष्ट धान्याचा पुरवठा त्वरित थांबवावा, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वेळेत, दर्जेदार आणि स्वच्छ पोषण आहार मिळेल याची खात्री प्रशासनाने तत्काळ करावी, अशी ठाम भूमिका बैठकीत घेण्यात आली.

सावंतवाडीत चेन स्नॅचिंग करणाऱ्या दोन सराईत चोरांना कोल्हापुरात अटक

   Follow us on        

सावंतवाडी:

येथील सालईवाडा भागात सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून पळून जाणाऱ्या दोन अट्टल चोरांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पथकाने या आरोपींना आधी दुसऱ्या एका गुन्ह्यात अटक केली होती. तेथील तपासादरम्यान त्यांनी सावंतवाडी येथील गुन्ह्याचीही कबुली दिली. त्यानंतर सावंतवाडी पोलिसांनी या आरोपींचा ताबा घेऊन त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

​या कारवाईत अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे वैभव नारायणराव अडोळे (वय २६, रा. एरला, ता. मोर्शी, जि. अमरावती, सध्या रा. हिंजवडी, पुणे) आणि करण गोरखनाथ जगधने (वय १९, रा. पिंपळवाडी पिराची, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर, सध्या रा. विधाते वस्ती, औंध गावठाण, पुणे) अशी आहेत.

​सकाळी चालताना घडली होती घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० जून रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास श्रीमती रंजना ठाकूर (रा. साळईवाडा, सावंतवाडी) या बिल्डिंगखालील रस्त्यावरून चालत जात होत्या. याच वेळी दुचाकीवरून आलेल्या या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचा दागिना हिसकावून नेला आणि तेथून पोबारा केला होता. या घटनेनंतर सावंतवाडी शहरात प्रचंड खळबळ उडाली होती.

​कोल्हापूर पोलिसांच्या तपासात उघडकीस आला गुन्हा

सावंतवाडीतील या घटनेनंतर काही दिवसांतच कोल्हापूर भागातही अशाच प्रकारची चेन स्नॅचिंगची घटना घडली होती. कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने या गुन्ह्याचा छडा लावत वैभव अडोळे आणि करण जगधने यांना जेरबंद केले. कोल्हापूर पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत आरोपींनी सावंतवाडीतही रंजना ठाकूर यांच्या गळ्यातील सोन्याचा दागिना चोरल्याची कबुली दिली. त्यानंतर चोरांकडून सोन्याचा दागिना हस्तगत करण्यात आला असून संशयितांना २० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

​सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या सूचनेनुसार, पोलीस उपनिरीक्षक श्री. प्रमोद पाटील यांनी आपल्या पथकासह कोल्हापूर कारागृहात जाऊन दोन्ही संशयित आरोपींचा रीतसर ताबा घेतला. संशयित आरोपींची ओळख परेड (टी.आय. परेड) करायची असल्याने, त्यांची ओळख उघड होऊ नये म्हणून त्यांना चेहरा मास्काने झाकूनच वेळोवेळी न्यायालयात हजर करण्यात येत होते. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

सावंतवाडी-रत्नागिरी बस आणि कारचा हुमरसजवळ भीषण अपघात

   Follow us on        

कुडाळ: सावंतवाडी आगाराच्या एका एसटी बसला शनिवार, १८ जुलै २०२६ रोजी दुपारी कुडाळ येथील हुमरस परिसरात भीषण अपघाताचा सामना करावा लागला. सावंतवाडीहून रत्नागिरीच्या दिशेने मार्गस्थ झालेली बस (MH 13 CU 8729) हुमरस बस थांब्याजवळ आली असता, समोर उभ्या असलेल्या एका रेनॉल्ट क्विड कारला (MH 07 AG 6538) बसने मागच्या बाजूने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कारचा मागील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला असून कारचे मोठे नुकसान झाले आहे.

या दुर्घटनेत कार चालक पांडुरंग श्रीधर नाईक (वय ५४ वर्षे, रा. लक्ष्मीनगर, सावंतवाडी, मूळ रा. नेरूर) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

​घटनेची माहिती मिळताच कुडाळ पोलीस स्टेशनच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन अपघाताचा पंचनामा केला. तसेच कुडाळ आगार व्यवस्थापक रोहित कारभारी नाईक हे या प्रकरणातील पुढील कायदेशीर कारवाई आणि परिस्थिती हाताळत आहेत. पोलीस सध्या या अपघाताच्या नेमक्या कारणांचा अधिक तपास करत आहेत.

‘राखणदार’ मळेवाड येथे दाखल!

   Follow us on         सिंधुदुर्ग: ​कोकणची अमूल्य निसर्गसंपदा, पर्यावरण आणि समृद्ध संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी ‘राखणदार सेवा संघा’च्या वतीने ‘राखणदार पदयात्रा’ आयोजित करण्यात आली आहे. या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड जकात नाका येथे सुरुवात झाली, जिथे स्थानिक ग्रामस्थांनी या उपक्रमाचे अत्यंत उत्साहात स्वागत केले.
​सध्याच्या काळात वाढती वृक्षतोड, जमिनींचे सपाटीकरण आणि परप्रांतीय गुंतवणूकदारांकडून कवडीमोल भावाने होणारी जमिनींची खरेदी यांमुळे कोकणच्या मूळ ओळखीला मोठा धोका निर्माण झाला आहे. निसर्गरम्य कोकण भकास होण्याच्या मार्गावर असून हे संकट दूर करण्यासाठी विविध सामाजिक संस्था आणि जागृत नागरिक आता रस्त्यावर उतरले आहेत.

​पूर्वजांनी जीवापाड जतन केलेल्या जमिनी आणि संस्कृती वाचवण्यासाठी ‘रानमाणूस’ अशी ओळख असलेले पर्यावरण कार्यकर्ते प्रसाद गावडे यांनी यावेळी आपल्या खास शैलीत गाऱ्हाणे मांडून जनजागृती केली. केवळ घोषणाबाजी न करता, निसर्गाचा ऱ्हास करणाऱ्या प्रवृत्तींविरोधात प्रत्येकाने प्रत्यक्ष कृतीतून स्वतः ‘राखणदार’ होणे गरजेचे असल्याचा संदेश या पदयात्रेतून देण्यात आला.

​या पदयात्रेच्या दरम्यान पर्यावरण रक्षणावर आधारित विविध प्रबोधनात्मक गीते, घोषणा आणि थेट संवादाच्या माध्यमातून मळेवाड परिसरातील नागरिकांमध्ये जागृती करण्यात आली. आपल्या गावाचे अस्तित्व शाबूत ठेवण्यासाठी आणि निसर्गाचे होणारे नुकसान रोखण्यासाठी सर्वांनी संघटित होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

​या उपक्रमाला मळेवाड आणि परिसरातील अबालवृद्धांसह बहुसंख्य ग्रामस्थांची लक्षणीय उपस्थिती लाभली होती. जल, जंगल, जमीन आणि पर्यावरण रक्षणासाठी कोकणी माणूस मोठ्या संख्येने एकवटला असून, गावागावांत या पदयात्रेचे जंगी स्वागत केले जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

शक्तीपीठ महामार्गासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भू-संपादनाची घोषणा; २१ दिवसांत हरकती नोंदवण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग (विशेष प्रतिनिधी):

नागपूर ते गोवा दरम्यान जोडणाऱ्या ‘पवनार ते पत्रादेवी (नागपूर-गोवा) महाराष्ट्र शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग’ (राज्य महामार्ग विशेष क्र. १०) या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाला वेग आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने (मंत्रालय) या महामार्गाच्या बांधकाम, देखभाल आणि व्यवस्थापनासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील विविध गावांमधील जमिनींचे संपादन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.

शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या या अधिसूचनेनुसार, बाधित शेतकरी आणि भूधारकांना आपल्या हरकती नोंदवण्यासाठी २१ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

सावंतवाडी तालुक्यातील ‘या’ गावांचा समावेश

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) वतीने या महामार्गाचे प्राधिकरण करण्यात येत असून, सावंतवाडी तालुक्यातील खालील गावांच्या जमिनी या प्रकल्पासाठी संपादित केल्या जाणार आहेत:

  • बांदा

  • केगद

  • उडेली

  • नेने

  • फणसवडे

  • घाराप

  • दाभिळ

  • असनिये

  • पडवे माजगाव

  • पडवे

  • डेगवे

या गावांमधील विविध भूमापन क्रमांक (गट क्रमांक) आणि रस्ता, नाला लगतच्या क्षेत्रांचा सविस्तर तपशील शासनाने राजपत्रात प्रसिद्ध केला आहे.

२१ दिवसांत हरकती सादर करण्याचे आवाहन

या जमीन संपादनाशी संबंधित कोणत्याही व्यक्तीला किंवा भूधारकाला या जमिनीच्या वापराबाबत काही आक्षेप असल्यास, ते आपली हरकत लेखी स्वरूपात आणि कारणांसह मांडू शकतात.

राजपत्र प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून २१ दिवसांच्या आत ‘संबंधित भूसंपादन अधिकारी तथा उप-विभागीय अधिकारी, उप-विभाग सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग’ यांच्याकडे आपले आक्षेप लेखी स्वरूपात सादर करावेत, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

अ.क्र. गाव भूमापन क्रमांक / गट क्रमांक क्षेत्र (हेक्टर आर)
१) केगद ८७ १.५३.००
२) केगद ९८ ६.०१.२८
३) केगद ९९ ४.३७.६७
४) केगद १०० ०.६४.९९
५) केगद ८४ २.९८.७८
६) केगद ८६ ०.२६.७०
७) केगद ८६ ४.९३.८७
८) केगद ८२ ३.१८.१४
९) केगद ७३ १.१५.७३
१०) केगद ७८ २.०८.९७
११) केगद ६६ २.९०.१४
१२) केगद ६४ ८.८१.६१
१३) केगद ६५ ०.०१.४७
१४) केगद ५२ ०.३७.५६
१५) केगद ५३ ७.३६.९९
१६) केगद ४६ ०.३३.२८
१७) केगद ४५ ०.८९.२४
८) केगद ४४ १.६८.४४
१९) केगद ४७ ३.२८.१३
२०) केगद ४२ ०.०६.३८
२१) केगद ४८ ०.८६.३८
२२) केगद ४१ ०.०७.६३
२३) केगद ३० ०.१६.०३
२४) केगद २८ ३.६६.८३
२५) केगद ५० २.३२.३६
२६) केगद ५४ १.४७.६९
२७) केगद २७ ३.३१.६५
२८) केगद २६ ०.१७.५४
२९) केगद २२ ०.४५.९६
३०) केगद ४३ ०.७६.१०
३१) केगद एनए लगत गट नं. ५४, ५३ ०.१२.६०
३२) केगद रस्ता लगत गट नं. ४३, ४७ १.६८.०७
३३) केगद नाला लगत गट नं. ४२, ४०, ३८, ३० ०.३५.८३
३४) उडेली २३ ५.४८.३७
३५) उडेली २४ ५.८९.२९
३६) उडेली नाला लगत गट नं. १९, ३३, १८, २०, ३५ ०.२७.९७
३७) उडेली २५ ४.३४.५५
३८) उडेली २७ ७.६१.४०
३९) नेने १५ ५.२५.०३
४०) नेने १४ ४.९६.२७
४१) फणसवडे १४ २.७९.५५
४२) फणसवडे १० ४.७२.५५
४३) फणसवडे १३ ५.९२.७४
४४) फणसवडे ५.२१.९२
४५) फणसवडे नाला लगत गट नं. १७, १३, १४, १५, २२ ०.८५.४४
४६) फणसवडे ११ २.३६.५३
४७) फणसवडे १७ ०.४५.७९
४८) फणसवडे ५७ ४.१६.३९
४९) फणसवडे १५ ६.३८.४७
५०) फणसवडे ५६ ६.००.०३
५१) फणसवडे ०.७०.६०
५२) फणसवडे ५५ १.९९.१७
५३) फणसवडे ४६ ७.७७.८९
५४) फणसवडे ४८ १.८०.२५
५५) फणसवडे ४७ ५.३७.८९
५६) घाराप ६९ १.४९.७३
५७) घाराप ६८ १.२५.४८
५८) दाभिळ ११.०९.७८
५९) दाभिळ नाला लगत गट नं लगत फणसवडे, ९ ०.०१.००
६०) असनिये १५ २.४९.१४
६१) असनिये १३ ५.५२.५४
६२) असनिये १२ २.९६.७७
६३) असनिये ७७ ७.००.८४
६४) पडवे माजगाव ३१ २.१५.२२
६५) पडवे माजगाव ४२ ४.६७.५४
६६) पडवे माजगाव २६ ०.१३.८३
६७) पडवे माजगाव १८ ०.५०.९६
६८) पडवे माजगाव ४४ १.२८.७५
६९) पडवे माजगाव ४३ ७.९८.९२
७०) पडवे ७.१८.०८
७१) पडवे ४.३५.१३
७२) डेगवे ८७ ०.०१.८९
७३) डेगवे १०० ०.४४.५६
७४) डेगवे १०२ ०.६९.१२
७५) डेगवे ६७ ०.७२.७१
७६) डेगवे १३ ०.१६.७६
७७) डेगवे १०३ १.०३.८८
७८) डेगवे ९९ ६.४९.८२
७९) डेगवे १६ २.७३.५८
८०) डेगवे २.८२.५३
८१) डेगवे ९८ २.९५.००
८२) डेगवे १२ २.९३.४३
८३) डेगवे ९९ २.८७.४५
८४) डेगवे १० २.५३.६२
८५) डेगवे १०५ १.७०.४७
८६) डेगवे १०४ ३.८३.६२
८७) डेगवे रस्ता लगत गट नं. १७०, १६९, १६, १४० ०.३०.०३
८८) डेगवे १७० ०.०२.८२
८९) डेगवे १४० ०.६१.६८
९०) डेगवे १६९ ०.०९.९५
९१) डेगवे १४२ ०.०२.४३
९२) बांदा रस्ता लगत गट नं. १८६, ११४, २२७, १९९, १४४, ४० ०.३७.७१
९३) बांदा रस्ता लगत गट नं. १६२, १४०, १६१ ०.११.४२
९४) बांदा १६१ १.१०.९७
९५) बांदा १६२ २.३२.७०
९६) बांदा १५६ ०.१८.२१
९७) बांदा १५८ ०.०३.२९
९८) बांदा १६० १.७०.६७
९९) बांदा १५७ ०.८२.७९
१००) बांदा १५५ २.४४.६४
१०१) बांदा १५३/अ १.०७.८५
१०२) बांदा १५१ ०.८५.९४
१०३) बांदा १५४ ६.४१.७४
१०४) बांदा १६४ ०.४६.५४
१०५) बांदा १५२ १.९८.७५
१०६) बांदा १५३/ब ०.०४.८८
१०७) बांदा १६३ ०.२६.३५
१०८) बांदा १०० ०.०३.९५
१०९) बांदा १०१ ०.२६.२३
११०) बांदा १६६ ६.४२.५०
१११) बांदा १६५ १.२२.०६
११२) बांदा १४४ ०.०६.१९
११३) बांदा एनए लगत गट नं. १०१, १४५, ३४, १४२ ०.६९.५०
११४) बांदा १५१/अ १.०९.३९
११५) बांदा १६७ ६.८९.४५
११६) बांदा ३५ ०.०१.८०
११७) बांदा ३४ ०.४४.१३
११८) बांदा १५० ८.३५.७१
११९) बांदा नाला लगत गट नं. ३३, ३६, १५१, १४६ ०.५२.३५
१२०) बांदा ३३ ०.१४.२१
१२१) बांदा १४६ ०.९२.८७
१२२) बांदा १४५ ०.०३.६८
१२३) बांदा १७२ १.४६.०८
१२४) बांदा १६८ ६.५४.६२

महापुरात अडकले शेतकरी, ‘सह्याद्री रेस्क्यू’ने वाचवले प्राण!

   Follow us on        

सावंतवाडी:

नांगरतासवाडी परिसरात भात लावणीसाठी गेलेले चार शेतकरी अचानक आलेल्या महापुरात अडकल्याची एक थरारक आणि अंगावर काटा आणणारी घटना नुकतीच घडली. या परिसरामध्ये दोन पुरुष आणि दोन महिला शेतकरी नेहमीप्रमाणे शेतात भात लावणीचे काम करत होते. मात्र, दुपारच्या सुमारास आंबोली आणि परिसरामध्ये अचानक ढगफुटीसदृश मुसळधार पाऊस सुरू झाला. या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना प्रचंड पूर आला आणि पाण्याचा प्रवाह तसेच पातळी अत्यंत वेगाने वाढली. आंबोली पापडी पुलाच्या खाली असलेल्या आसोलकर मळ्यात काम करणारे हे चारही शेतकरी काही समजण्याच्या आतच पुराच्या पाण्याच्या वेढ्यात अडकले. पाण्याचा वेग इतका तीव्र होता की त्यांना स्वतःहून बाहेर पडणे अशक्य झाले होते. यामध्ये रामू जंगले, भागी जंगले यांच्यासह अन्य दोघांचा समावेश होता.

​या जीवघेण्या संकटाची माहिती मिळताच आपत्कालीन परिस्थितीत सदैव तत्पर राहणाऱ्या ‘सह्याद्री ॲडव्हेंचर रेस्क्यू ग्रुप’ (आंबोली-सांगली) च्या जवानांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. पुराच्या पाण्याचा भयानक प्रवाह आणि परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रेस्क्यू टीममधील धाडसी जवान उत्तम नार्वेकर, सुजित नायर, मायकल डिसोजा, संतोष पालयेकर, राजू राऊळ आणि नारायण चव्हाण यांनी आपल्या जीवाची अजिबात पर्वा न करता थेट पाण्याच्या वेगवान प्रवाहात उड्या घेतल्या. या जवानांनी अत्यंत कुशलतेने, अथांग धैर्याने आणि जीवाची बाजी लावून पाण्यात अडकलेल्या चारही जणांपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले. त्यांनी अत्यंत सावधगिरीने एक-एक करून चारही शेतकऱ्यांना सुरक्षितपणे पाण्याच्या बाहेर काढले.

 

सह्याद्री रेस्क्यू ग्रुपने दाखवलेल्या या अद्भूत तत्परतेमुळे आणि अतुलनीय धाडसामुळे चार निरपराध शेतकऱ्यांचे प्राण वाचले आहेत. या यशस्वी कामगिरीमुळे रेस्क्यू टीममधील जवानांचे आणि संपूर्ण ग्रुपचे सावंतवाडी परिसरासह संपूर्ण जिल्ह्यातून कौतुक होत असून, संकटकाळात हा ग्रुप नेहमीच देवदूत बनून मदतीला धावून येतो, याची प्रचिती पुन्हा एकदा आली

Kankavali: पैसे काढण्यासाठी घेतलेली मदत पडली महागात; महिलेची फसवणूक

   Follow us on        

कणकवली:

कणकवली शहरात एटीएम धारकांसाठी एक अत्यंत धक्कादायक आणि डोळे उघडवणारी घटना समोर आली आहे. एटीएम मशीनमधून पैसे काढण्यासाठी अनोळखी व्यक्तीची मदत घेणे एका महिलेला भलतेच महागात पडले आहे. गुरुवारी (१६ जुलै) सायंकाळी चार वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेत एका भामट्याने हातचलाखी करून महिलेचे एटीएम कार्ड बदलले आणि तिच्या बँक खात्यातून तब्बल ९ हजार रुपयांची रोकड लांबवून फसवणूक केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र खळबळ उडाली असून एटीएम वापरणाऱ्या नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, आशिये रोड परिसरात राहणारी संबंधित पीडित महिला कणकवली शहरातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेसमोरील एटीएम केंद्रामध्ये पैसे काढण्यासाठी गेली होती. एटीएम मशीनमध्ये कार्ड स्वाइप केल्यानंतर काही तांत्रिक अडचणींमुळे रक्कम बाहेर येत नव्हती. त्यामुळे व्यवहार पूर्ण होण्याची ती महिला वाट पाहत उभी होती. नेमकी याच वेळी तिची अडचण पाहून पाठीमागे उभा असलेला एक अज्ञात तरुण मदतीचा बहाणा करत पुढे आला.

​पैसे काढून देतो असे सांगून त्या भामट्याने महिलेच्या हातातील एटीएम कार्ड स्वतःकडे घेतले आणि मशीनमध्ये काहीतरी प्रक्रिया करू लागला. मात्र, पुन्हा प्रयत्न करूनही मशीनमधून पैसे आले नाहीत, असे भासवत त्याने अत्यंत हुशारीने मूळ एटीएम कार्ड स्वतःकडे ठेवून घेत त्याऐवजी दुसरेच हुबेहूब दिसणारे बनावट कार्ड महिलेच्या हातात सोपवले आणि तो तिथून पसार झाला.

​काही वेळानंतर, पीडित महिलेच्या मोबाईलवर बँक खात्यातून ९ हजार रुपये काढले गेल्याचा संदेश आला. हा मेसेज पाहताच महिलेच्या पायाखालची जमीन सरकली. तिने तात्काळ कणकवली येथील संबंधित बँकेत धाव घेऊन चौकशी केली असता, तिच्या खात्यातून सदर रक्कम काढली गेल्याचे स्पष्ट झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने थेट कणकवली पोलीस ठाणे गाठून या संपूर्ण प्रकाराबाबत लेखी तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून एटीएम परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी सुरू केली असून अज्ञात आरोपीचा कसून शोध घेतला जात आहे.

Sindhudurg: ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्याच्या तटबंदीला भगदाड

प्रशासकीय दुर्लक्षामुळे भगदाड; दुर्गप्रेमींमध्ये संतापाची लाट

   Follow us on        

मालवण:

छत्रपती शिवाजी महाराज यांनी समुद्रात उभारलेला आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या नामांकनासाठी पात्र ठरलेला ऐतिहासिक जलदुर्ग ‘सिंधुदुर्ग’ सध्या प्रशासकीय दुर्लक्षामुळे संकटात सापडला आहे. किल्ल्याच्या दोन क्रमांकाच्या बुरुजाची तटबंदी अचानक ढासळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या तटबंदीचे काही महत्त्वाचे दगड हलल्यामुळे तिथे तब्बल तीन मीटर रुंदीचे मोठे भगदाड पडले आहे. किल्ल्यावर राहणारे स्थानिक रहिवासी मंगेश सावंत यांनी या घटनेची माहिती दिली असून, शिवरायांच्या या ऐतिहासिक ठेव्याची अशी दुरवस्था पाहून अत्यंत दुःख आणि हताशपणा वाटत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

​तटबंदी कोसळल्याच्या या घटनेमुळे इतिहासप्रेमी, दुर्गप्रेमी आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पुरातत्त्व विभाग या किल्ल्याच्या संवर्धनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असून अत्यंत ढिसाळ कारभार करत असल्याचा थेट आरोपही स्थानिक रहिवाशांकडून करण्यात आला आहे. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या वास्तूचे तात्काळ संरक्षण व्हावे, यासाठी किल्ल्याची तातडीने संरचनात्मक पाहणी (Structural Audit) करून आवश्यक दुरुस्तीचे काम हाती घेण्यात यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. राज्य सरकार, केंद्र सरकार आणि पुरातत्त्व विभागाने या गंभीर बाबीकडे त्वरित लक्ष देऊन प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी आग्रही मागणी शिवप्रेमींकडून केली जात आहे.

दशावतार कलाकारांची नोंदणी सुरू; अधिकारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल

   Follow us on        

सिंधुदुर्ग:

पावसाळी अधिवेशनात आमदार निलेश राणे यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण मागणीची दखल घेत, अखेर सांस्कृतिक मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आजपासून प्रत्यक्ष कामासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले आहेत. जिल्ह्यातील पारंपारिक दशावतार कलाकारांची अधिकृत नोंदणी व्हावी आणि त्यांना शासनाच्या विविध योजनांचा थेट लाभ मिळावा, यासाठी ही मोहीम राबवली जात आहे.

​आमदार निलेश राणे यांनी सभागृहात आग्रही मागणी केली होती की, कलाकारांना ऑनलाईन नोंदणीमध्ये अडचणी येत असल्याने केवळ कागदी घोडे न नाचवता अधिकाऱ्यांनी स्वतः मैदानात उतरावे. एकही कलाकार लाभापासून वंचित राहू नये म्हणून मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी थेट जिल्ह्यात येऊन काम करावे, अशी भूमिका त्यांनी मांडली होती. त्यांच्या या मागणीनंतर संबंधित खात्याचे वरिष्ठ अधिकारी आज जिल्ह्यात पोहोचले असून त्यांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे.

​हे अधिकारी पुढील काही दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यातच मुक्कामी राहणार आहेत. या कालावधीत ते जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला भेट देतील आणि स्थानिक दशावतार कलाकारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन त्यांची अधिकृत नोंद गोळा करणार आहेत. दरम्यान, या मोहिमेसाठी सिंधुदुर्गात दाखल झालेल्या सर्व अधिकाऱ्यांचे आमदार निलेश राणे यांनी कुडाळ येथे उत्साहात स्वागत केले. या मोहिमेमुळे दशावतार कलाकारांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search