Category Archives: कोकण रेल्वे

Konkan Railway: वास्को स्थानकावर सापडली तब्बल १६ किलोची चांदीची छत्री

   Follow us on        
Konkan Railway : मंगळवारी (ता. १५) सायंकाळी ५.३० वा.च्या दरम्यान वास्को रेल्वे पोलिस व रेल्वे प्रोटेक्शन फोर्सचे जवान रेल्वे फलाटावर गस्त घालीत असताना त्यांना एक लाल रंगाची बॅग बेवारस स्थितीत मिळाली. त्यांनी ती ताब्यात घेऊन तपासणी केली असता आतमध्ये चादरीमध्ये गुंडाळलेली पांढऱ्या धातूची एक वस्तू दिसून आली. याप्रकरणी त्यांनी स्थानिक सोनाराला पाचारण करून त्याच्यामार्फत त्या वस्तूची तपासणी केली. पडताळणीअंती ती वस्तू चांदीची छत्री (छत) असल्याचे सिध्द झाले. तिचे वजन १६.४ किलोग्रॅम होते. ८७.५० टक्के शुध्दता असलेल्या त्या छत्रीची किंमत अंदाजे ५ लाख ३७ हजार ६०० रुपये होते.
वास्को रेल्वे स्थानकावर मंगळवारी (ता.१५) सायंकाळी सापडलेली चांदीची छत्री ही कारवार येथील साईबाबा मंदिरातून संशयितांनी चोरल्याचे उघडकीस आले. कारवार पोलिसांनी बुधवारी (ता.१६) वास्कोला येऊन ती छत्री कायदेशीर सोपस्कारानंतर ताब्यात घेतली, असे वास्को रेल्वे पोलिस स्थानकाचे निरीक्षक आनंद शिरोडकर यांनी सांगितले.
ही चांदीची छत्री (छत्र) कारवार येथील साईबाबा मंदिरात चोरी झालेल्या मुद्देमालापैकी एक असल्याचे उघडकीस आले. चोरट्यांनी त्या मंदिरातील सोळा किलोग्रॅम वजनाच्या चांदीच्या वस्तू चोरल्या होत्या. त्यानंतर कदाचित ते वास्कोला आले असावेत. वास्को रेल्वे स्थानकावर पोलीस गस्त त्याची चांदीची छत्री असलेली बॅग फलाटावर सोडून तेथून पळ काढला असावा , अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे .

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणार मंगळुरू – हजरत निजामुद्दीन विशेष एक्सपेस

   Follow us on        
Konkan Railway: प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वे मार्गावर मंगळुरू सेंट्रल – एच. निजामुद्दीन दरम्यान एकेरी विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आहे. या गाडीचा तपशील खालीलप्रमाणे..

१) गाडी क्रमांक ०६०७५ मंगळुरू सेंट्रल – एच. निजामुद्दीन वन वे सुपरफास्ट स्पेशल :

गाडी क्रमांक ०६०७५ मंगळुरू सेंट्रल – एच. निजामुद्दीन वन वे सुपरफास्ट स्पेशल १८/०४/२०२५, शुक्रवारी दुपारी ४:०० वाजता मंगळुरू सेंट्रल येथून निघेल आणि  तिसऱ्या दिवशी सकाळी ८:०० वाजता हजरत  निजामुद्दीन येथे पोहोचेल.
ही गाडी उडुपी, कुंदापारा, मुर्डेश्वर, कुमटा, गोकर्ण रोड, कारवार, मडगाव जंक्शन, करमाळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पनवेल, वसई रोड, सुरत, वडोदरा जं., रतलाम, नागदा जं., कोटा जं., सवाईमाधोपूर जं. आणि मथुरा जं या स्थानकांवर थांबेल.
डब्यांची  रचना : एकूण २२ कोच = स्लीपर – २० कोच, एसएलआर – ०२.

Konkan Railway: पावसाळ्यात वेग मंदावणाऱ्या ‘त्या’ ३२ गाड्यांच्या प्रवासावर ‘सुपरफास्ट’चा अधिभार कशाला?

   Follow us on        
मुंबई : कोकण रेल्वेमार्गावर सुरक्षिततेच्या कारणांसाठी अंगिकारलेल्या पावसाळी वेळापत्रकामुळे मेल-एक्स्प्रेस गाड्यांचा वेग मंदावतो. परिणामी प्रवासाचा वेळ दोन ते चार तासांनी वाढतो. असे असतानाही मेल-एक्स्प्रेस ट्रेनच्या तिकिटात ‘सुपरफास्ट’चा अधिभार प्रवाशांकडून वसूल करण्यात येतो. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात हे वेळापत्रक लागू होण्यापूर्वी रेल्वेने तिकीट यंत्रणेत बदल करावा, अशी मागणी कोकण विकास समितीने इमेलद्वारे केली आहे.
मध्य आणि पश्चिम रेल्वेवरून कोकण मार्गावर नियमित ट्रेन व्यतिरिक्त ३०० हून अधिक एक्स्प्रेस फेऱ्या चालवण्यात येत आहेत. कोकणातील अतितीव्र पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे मार्गावर ट्रेनसाठी तशी 50 किलोमीटर ची वेगमर्यादा घालण्यात येते. कोकण रेल्वेवर १० जून ते ३१ ऑक्टोबरदरम्यान १४४ दिवस पावसाळी वेळापत्रक लागू होते. वेग कमी झाल्याने प्रवासाचा वेळ वाढत असला तरीही तिकिटांवर अतिजलदचा अधिभार प्रवाशांकडून घेतला जातो.
रेल्वेच्या २००६ च्या १०५ कमर्शियल परिपत्रकात, ५५ किलोमीटर प्रति तास वेगापेक्षा कमी ट्रेनचा समावेश ‘सुपरफास्ट’ म्हणून करू नये. त्यामुळे या ट्रेनवर ‘सुपरफास्ट’ गाड्यांचा अधिभार लावू नये, असे स्पष्ट सांगितले आहे. असे असतानाही हा अधिभार घेतला जात असल्याकडे प्रवासी संघटनांनी लक्ष वेधले आहे.
नियमाप्रमाणे सुपरफास्ट ट्रेचा वेग ताशी किमान ५५ किमी असणे आवश्यक आहे. तेवढा वेग नसणाऱ्या गाड्यांसाठी सुपरफास्ट अधिभार घेणे योग्य नाही. आधीच कोकण रेल्वेच्या भाड्यावर ४० टक्के अधिभार असताना त्यात ‘सुपरफास्ट’ अधिभाराचा भर पडत आहे. रेल्वे प्रशासनाने या निवेदनाचा विचार करून कोकण रेल्वे मार्गावर सुपरफास्ट म्हणून चालविण्यात येणाऱ्या ३२ गाड्यांच्या प्रवासावरील हा अधिभार रद्द करावा अशी मागणी कोकण रेल्वे विकास समितीतर्फे जयवंत दरेकर आणि अक्षय महापदी यांनी केली आहे.
Sr. No. Train No Name Owner Zone Actual Distance (KM)
Average Speed (kmph)
1 12051 Janshatabdi Express Central Railway 590 52
2 12052 Janshatabdi Express Central Railway 590 50
3 22119 Tejas Express Central Railway 590 53
4 22120 Tejas Express Central Railway 590 51
5 12133 Mumbai Mangaluru Express Central Railway 905 51
6 12134 Mangaluru Mumbai Express Central Railway 905 51
7 22113 LTT Kochuveli Express Central Railway 1517 51
8 22114 Kochuveli LTT Express Central Railway 1517 49
9 22115 LTT Karmali AC Express Central Railway 546 52
10 22116 Karmali LTT AC Express Central Railway 546 49
11 22149 Ernakulam Pune Express Central Railway 1372 50
12 22150 Pune Ernakulam Express Central Railway 1372 51
13 12223 LTT Ernakulam Duronto Express Central Railway 1306 57
14 12224 Ernakulam LTT Duronto Express Central Railway 1306 54
15 20111 Konkan Kanya Express Konkan Railway 590 47
16 20112 Konkan Kanya Express Konkan Railway 590 51
17 22629 Dadar Tirunelveli Express Southern Railway 1765 48
18 22630 Tirunelveli Dadar Express Southern Railway 1765 53
19 12619 Matsyagandha Express Southern Railway 895 48
20 12620 Matsyagandha Express Southern Railway 895 50
21 12201 Garibrath Express Southern Railway 1516 51
22 12202 Garibrath Express Southern Railway 1516 50
23 2197 Coimbatore Jabalpur Special
West Central Railway
2219 54
24 2198 Jabalpur Coimbatore Special 2220 54
25 22475 Hisar Coimbatore AC Express
North Western Railway
2790 54
26 22476 Coimbatore Hisar AC Express 2790 55
27 20931 Kochuveli Indore Express Western Railway 2300 53
28 20932 Indore Kochuveli Express Western Railway 2300 52
29 20909 Kochuveli Porbandar Express Western Railway 2426 53
30 20910 Porbandar Kochuveli Express Western Railway 2426 51
31 20923 Tirunelveli Gandhidham Humsafar Express Western Railway 2410 54
32 20924 Gandhidham Tirunelveli Humsafar Express Western Railway 2409 53

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणार वास्को द गामा – मुझफ्फरपूर विशेष एक्सप्रेस

   Follow us on        

Konkan Railway: कोकण रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. उन्हाळी हंगाम – २०२५ मध्ये प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी कोकण रेल्वे मार्गावर अजून एक विशेष गाडी चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या गाडीचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

गाडी क्रमांक ०७३११ / ०७३१२ वास्को द गामा – मुझफ्फरपूर जंक्शन – वास्को द गामा साप्ताहिक एक्सप्रेस स्पेशल :

गाडी क्रमांक ०७३११ वास्को द गामा – मुझफ्फरपूर जंक्शन साप्ताहिक एक्सप्रेस स्पेशल ०७/०४/२०२५ ते ०२/०६/२०२५ पर्यंत दर सोमवारी वास्को द गामा येथून दुपारी ४:०० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी १२:३० वाजता मुझफ्फरपूर जंक्शनला पोहोचेल.

गाडी क्रमांक ०७३१२ मुझफ्फरपूर जंक्शन – वास्को द गामा साप्ताहिक एक्सप्रेस स्पेशल मुझफ्फरपूर जंक्शन येथून सुटेल. १०/०४/२०२५ ते ०५/०६/२०२५ पर्यंत दर गुरुवारी १४:४५ वाजता मुझफ्फरपूर जंक्शन येथून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी १४:५५ वाजता वास्को द गामाला पोहोचेल.

ही गाडी मडगाव जंक्शन, थिविम, सावंतवाडी रोड, रत्नागिरी, चिपळूण, रोहा, पनवेल, कल्याण जंक्शन, मनमाड जंक्शन, भुसावळ जंक्शन, खांडवा जंक्शन, इटारसी जंक्शन, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर जंक्शन, प्रयागराज, छे इथं थांबेल. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र आणि हाजीपूर जंक्शन या स्थानकांवर थांबेल

डब्यांची रचना : एकूण २० एलएचबी कोच = टू टायर एसी – ०१ कोच, थ्री टायर एसी – ०५ कोच, स्लीपर – १२ कोच, जनरेटर कार – ०१, एसएलआर – ०१.

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणार इरोड – बारमेर विशेष गाडी

   Follow us on        
Konkan Railway: उन्हाळी सुट्टीत कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. उन्हाळी हंगाम – २०२५ मध्ये प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी कोकण रेल्वे मार्गावर दक्षिण रेल्वेच्या समन्वयाने एक विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या गाडीचा तपशील खालील प्रमाणे आहे.
गाडी क्रमांक ०६०९७ / ०६०९८ इरोड जंक्शन – बारमेर – इरोड जंक्शन साप्ताहिक विशेष:
गाडी क्रमांक ०६०९७ इरोड जंक्शन – बारमेर साप्ताहिक विशेष ही गाडी दर मंगळवारी, ०८/०४/२०२५ ते १०/०६/२०२५ पर्यंत इरोड जंक्शन येथून सकाळी ०६:२० वाजता सुटेल आणि गाडी तिसऱ्या दिवशी ०४:३० वाजता बारमेरला पोहोचेल.
गाडी क्रमांक ०६०९८ बाडमेर – इरोड जंक्शन साप्ताहिक विशेष ही गाडी दर शुक्रवारी, ११/०४/२०२५ ते १३/०६/२०२५ पर्यंत बाडमेरहून रात्री २२:५० वाजता सुटेल आणि इरोड जंक्शन येथे तिसऱ्या दिवशी २०:१५ वाजता पोहोचेल.
ही गाडी तिरुपूर,पोदनूर जंक्शन, पलक्कड, शोरानूर जं., तिरूर. कोझिकोड, कन्नूर, कासारगोड, मंगळुरु जं., उडुपी, कुंदापूर, मुकांबिका रोड बयंदूर (एच), भटकळ, मुर्डेश्वर, कुमटा, गोकर्ण रोड, अंकोला, कारवार, मडगाव जं., करमाळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, कणकवली , वैभववाडी रोड, राजापूर रोड. रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पनवेल, वसई रोड, पालघर, वापी, सुरत, भरुच जं., वडोदरा जं., नडियाद जं., साबरमती, भिलडी जं., राणीवरा, मारवाड भीनमाळ, मोदरण, जालोर, मोक्लधारी, जं. आणि बायतु स्टेशनला थांबेल.
डब्यांची रचना : एकूण २२ कोच : थ्री टायर एसी – ०२ कोच, स्लीपर – १४ कोच, जनरल – ०४ कोच, एसएलआर – ०२.

सीमावर्ती भागातील मराठी जनतेवर कोकण रेल्वेचा अन्याय

   Follow us on        

Konkan Railway:सीमावर्ती भागातील मराठी जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असताना आता कोकण रेल्वे प्रशासन सुद्धा त्यांच्यावर अन्याय करत असल्याचे सिद्ध झाले आहे. कोकण रेल्वे मार्गावर पूर्वी चालणारी कारवार- रत्नागिरी गाडी बंद करून कोकण रेल्वेने कारवारच्या मराठी माणसावर अन्याय केला असल्याची खंत कोकण रेल्वेचे संस्थापक सदस्य सुरेंद्र हरिश्चंद्र नेमळेकर यांनी व्यक्त केली आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे मुंबई मडगाव कोकणकन्या एक्सप्रेसचा अतिरिक्त भार कमी व्हावा म्हणून या गाडीला समांतर अशी दुसरी गाडी असावी अशी वारंवार मागणी व्हायला लागली व कोकणकन्याला पर्याय म्हणून कारवार ते मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेस (आताची मुंबई-मंगळुरू एक्सप्रेस) सुरू करण्यात आली होती. परंतु सुरेश कलमाडी रेल्वेमंत्री झाल्यानंतर  या गाडीचा थेट मेंगलोर पर्यंत या गाडीचा विस्तार केला गेला.

कारवार या शहरांमध्ये 80 टक्के मराठी लोक राहतात त्यांची मूळ कुलदैवता सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहेत. जसे गोव्यामध्ये मराठी तसेच कारवार मधले मराठी हे मूळचे मराठीच आहेत. मेंगलोर पर्यंत विस्तार केला गेलेल्या या गाडीचा कारवार वासियांना कोणताही फायदा होत नाही कारण मेंगलोर पासून कारवारला गाडी येईपर्यंत त्याची जनरल डबे फुल झालेले असतात. इथे पण “केला तुका झाला माका” अशी परिस्थिती आहे.

या गाडीला दक्षिणेकडे मेंगलोर पर्यंत आता दोन थांबे वाढवले परंतु सावंतवाडीला मात्र थांबा दिला जात नाही इथेही अन्याय. ही गाडी मराठी माणसांचीच होती ती थेट मेंगलोरला नेली आहे. मुळात कोकण रेल्वे ही सुद्धा महाराष्ट्रापुरती सीमित होती परंतु जॉर्ज फर्नांडिस यांच्या दूरदर्शी विचारांमुळे कोकण रेल्वेचा मेंगलोर पर्यंत विस्तार करण्यात आला. पण त्यामुळे ज्या महाराष्ट्राने कोकण रेल्वेसाठी पन्नास वर्षे वाट बघितली त्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसांना अनेक सीमावर्ती मराठी माणसांच्या तोंडाला आता कोकण रेल्वेने पाने पुसल्यासारखीच आहेत. आता सीएसटी मेंगलोर गाडीला कारवार साठी स्वतंत्र डबा जोडण्यात यावा व सीमावर्ती कारवारच्या मराठी लोकांवर होणारा अन्याय दूर करण्यात यावा अशी मागणी सुरेंद्र हरिश्चंद्र नेमळेकर पत्रकाद्वारे केली आहे.

 

 

Konkan Railway: खुशखबर! उन्हाळी हंगामासाठी कोकण रेल्वे मार्गावर अजून एका विशेष गाडीची घोषणा

   Follow us on        

Konkan Railway: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुलांसोबत पालक पिकनिकचं प्लानिंग करतात. तर अनेक पालक हे आपल्या मुलांसोबत गावी जात असतात. यामुळे दैनंदिन रेल्वे सेवेवर अधिक भार येतो आणि गर्दीमुळे प्रवाशांची गैरसोय होते. उन्हाळी सुट्ट्यांसाठी मध्य रेल्वेने  कोकण रेल्वे मार्गावर अजून काही उन्हाळी विशेष रेल्वे सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

१) गाडी क्रमांक ०११०४ / ०११०३ मडगाव जंक्शन – लोकमान्य टिळक (टी) – मडगाव जंक्शन साप्ताहिक विशेष:

गाडी क्रमांक ०११०४ मडगाव जंक्शन – लोकमान्य टिळक (टी) साप्ताहिक विशेष ०६/०४/२०२५ ते ०४/०५/२०२५ पर्यंत दर रविवारी १६:३० वाजता मडगाव जंक्शन येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०६:२५ वाजता लोकमान्य टिळक (टी) येथे पोहोचेल.

गाडी क्रमांक ०११०३ लोकमान्य टिळक (टी) – मडगाव जंक्शन. साप्ताहिक विशेषांक लोकमान्य टिळक (टी) येथून ०७/०४/२०२५ ते ०५/०५/२०२५ पर्यंत दर सोमवारी ०८:२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 21:40 वाजता मडगाव या स्थानकावर पोहोचेल.

ही गाडी करमाळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापुरा रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल आणि ठाणे या स्थानकांवर थांबेल.

डब्यांची रचना : एकूण २० एलएचबी कोच : टू टायर एसी – ०१ कोच, थ्री टायर एसी – ०३ कोच, थ्री टायर इकॉनॉमी – ०२ कोच, स्लीपर – ०८ कोच, जनरल – ०४ कोच, जनरेटर कार – ०१, एसएलआर – ०१.

आरक्षण

गाडी क्रमांक ०११०४ चे आरक्षण दिनांक ०२/०४/२०२५ रोजी सर्व पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टम (PRS), इंटरनेट आणि आयआरसीटीसी वेबसाइटवर सुरू होईल.

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर पुन्हा ओव्हरहेड वायर तुटली; दोन गाड्या रखडल्या

🔘 आज रात्री मुंबई सीएसएमटी येथून सुटणारी कोकणकन्या अडीच तास उशिराने सुटणार

   Follow us on        

Konkan Railway :ओव्हरहेड वायर तुटल्याने पुन्हा एकदा कोकण रेल्वे मार्गावर विघ्न निर्माण झाले आहे. कोकण रेल्वे मार्गावर खेड दिवाण खवटी येथे ओव्हरहेड वायर आज मंगळवारी संध्याकाळी ६-६.१५ वाजण्याच्या सुमारास तुटली. यामुळे मांडवी आणि मत्स्यगंधा एक्स्प्रेस या दोन गाड्यांवर परिणाम झाला. दोन्ही गाड्या स्थानकात थांबवून ठेवण्यात आल्या आहेत . मात्र याची माहिती मिळताच कोकण रेल्वे प्रशासनातर्फे तत्काळ उपाय योजना सुरु करण्यात आल्या. संध्याकाळी ७ वाजेपर्यंत तुटलेली ओव्हर हेड वायर जोडण्यात आली होती. फिट सर्टिफिकेट मिळून काही वेळातच थांबलेल्या गाड्या मार्गस्थ होतील असे कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी सांगितले.

या घटनेमुळे रेल्वे मार्गावरील केवळ दोन गाड्यांचे वेळापत्रक काही मिनिटांसाठी विस्कळीत झाले आहे. मात्र अन्यथा उर्वरित गाड्या नियमित वेळेत धावत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकारामुळे मुंबईकडे जाणारी मांडवी एक्सप्रेस खेड स्थानकात थांबून आहे तर गोव्याच्या दिशेने जाणारी मत्स्यगंधा एक्सप्रेस ला रोहा स्थानकात थांबवून ठेवण्यात आली आहे.

आजची मुंबई – मडगाव कोकणकन्या उशिराने

गोव्या वरून मुंबईला निघालेली मांडवी एक्सप्रेस उशिरा धावत असल्याने आज रात्री मुंबई सीएसएमटी येथून सुटणारी कोकणकन्या अडीच तास उशिराने म्हणजे रात्री एक वाजून तीस मिनिटाने सुटणार आहे.

Block at CSMT: कोकण रेल्वे मार्गावरील तीन गाड्यांचा प्रवास ठाणे-दादरपर्यंतच

   Follow us on        

Konkan Railway: मुंबई सीएसएमटी येथे प्लॅटफॉर्म क्रमांक १२ आणि १३ च्या विस्तारीकरणाचे काम अपूर्ण राहिल्याने या कामासाठी घेण्यात आलेल्या ब्लॉक च्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. या वाढीव ब्लॉक मुळे काही गाड्यांचा प्रवास अलीकडच्या स्थानकांवर संपवण्यात येणार (Short termination) आहे. याबाबत अधिक माहिती खालील प्रमाणे

गाडी क्रमांक १२१३४ मंगळुरू जंक्शन – मुंबई सीएसएमटी एक्सप्रेसचा प्रवास आजपासून दिनांक ३१/०३/२०२५ पर्यंत ठाणे स्थानकावर संपविण्यात येणार आहे.

गाडी क्रमांक २२१२० मडगाव जंक्शन – मुंबई सीएसएमटी तेजस एक्सप्रेसचा प्रवास आजपासून ३१/०३/२०२५ पर्यंत दादर स्थानकावर संपविण्यात येणार आहे.

गाडी क्रमांक १२०५२ मडगाव जंक्शन – मुंबई सीएसएमटी जनशताब्दी एक्सप्रेसचा प्रवास आजपासून ३१/०३/२०२५ पर्यंत दादर स्थानकावर संपविण्यात येणार आहे.

Loading

कोकण रेल्वे मार्गावर “धर्मवीर आनंद दिघे विशेष एक्सप्रेस” चालविण्यात यावी

   Follow us on        

ठाणे: कोकण रेल्वे मार्गावर गणेशोस्तव २०२५ साठी ठाणे ते सावंतवाडी दरम्यान “धर्मवीर आनंद दिघे एक्सप्रेस” गाडी सेवा सुरू करण्यासंबंधीचे निवेदन कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ (रजि) ठाणे यांच्यावतीने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे काल दिनांक २२ मार्च रोजी सुपूर्त केले.

मध्य रेल्वेवरील ठाणे रेल्वे स्थानक हे महाराष्ट्रातील खूप महत्त्वाचे स्थानक गणले जाते. त्यातच ठाणे येथील सर्वेसर्वा धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे ठाणे, हे ठाणे वासियांसाठी श्रद्धास्थान आहे. आणि ठाणे स्थानकातून कोकण रेल्वे मार्गावर जाणारे-येणारे कोकणवासी यांचे प्रवासी स्थानक ही आहे. दैनंदिन कोकणवासीय, कोकण प्रवासी या स्थानकातून कोकणात मोठ्या संख्येने प्रवास करीत असतात. गाड्यांची संख्या मुबलक प्रमाणात असली तरी प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात आहे. महोदय धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे कार्य ठाणे शहरास नवीन नाही. आपले सर्वतोपरी योगदान आणि समाजकार्यात मोठ्या प्रमाणात समाजसेवा घडवीत ठाण्यातील जनतेत आपले अढळ स्थान ठामपणे प्रखरतेने उमटवले होते ना आहेच ते न मिटण्यासारखे आहे. अशा थोर समाज सेवकास खरी आदरांजली देण्याकरिता गेली सतत तीन (३) वर्षे करीत असलेली मागणी ठाण्यातील लहानातल्या लहान संघटनेपासून राज्य पातळीवरील संघटना, कोकणवासिय, कोकण रेल्वे प्रवासी यांच्या जोरदार आणि प्रचंड मागणीनूसार कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ रजि ठाणे संघटना आपणांकडे सदर विषयांतर्गत निवेदन सादर करीत या वर्षांतरी कोकण वासियांना “धर्मवीर आनंद दिघे” एक्सप्रेस गाडी चा लाभ घेता येईल हीच अपेक्षा आहे. अशा आशयाचे निवेदन यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले. याप्रसंगी कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ (रजि)प्रमुख सल्लागार राजू कांबळे, अध्यक्ष सुजित लोंढे, सहसचिव अजिंक्य नार्वेकर, सल्लागार निलेश चव्हाण आणि संपर्कप्रमुख प्रमोद घाग, नामदेव चव्हाण सभासद साहिल सकपाळ हनुमंत निकम उपस्थित होते

यापूर्वीही कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ (रजि)यांच्या वतीने खासदार नरेश मस्के, खासदार संजीव नाईक, मा. खासदार कपिल पाटील, आमदार संजय केळकर यांना भेटून या मागणी संबधी निवेदने देण्यात आली आहेत. यावर्षी या मागणीचा विचार करण्यात येवून “धर्मवीर आनंद दिघे” एक्सप्रेस यावर्षीच्या गणेशोत्सवात धावेल अशी आशा संघटनेने व्यक्त केली आहे.

 

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search