रत्नागिरी| होळीसाठी रेल्वेने गावी जाणार्या चाकरमान्यांचा त्रास वाढवणारी एक बातमी आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने होळीसाठी या मार्गावर सोडण्यात आलेल्या 2 गाड्या रद्द केल्या आहेत.
पुढील दोन गाड्या दिनांक 09/03/2023 ते 12/03/2023 दरम्यान रद्द करण्यात आलेल्या आहेत.
01597 मेमू ट्रेन रोहा येथून चिपळूण साठी सुटणारी रोहा – चिपळूण अनारक्षित मेमू
01598 मेमू चिपळूण येथून रोहा या स्थानकासाठी सुटणारी चिपळूण – रोहा अनारक्षित मेमू
दिवा स्थानकावरून रोहा स्थानकापर्यंत चालविण्यात येणार्या गाडीचा विस्तार करून या गाड्या चालविल्या जात होत्या. या गाड्यांमुळे कोकण रेल्वे मार्गावरील ईतर गाड्यांमध्ये होणारी गर्दी विभागली जात असताना रेल्वे प्रशासनाने अचानक या गाड्या रद्द केल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे.
सिंधुदुर्ग |शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोवा बनावटीच्या अवैध दारूची महाराष्ट्रात छुप्या पद्धतीने वाहतूक होत असल्याने पोलीस यंत्रणा अलर्ट झाली असून गोवा बनावटीची बेकायदा दारु वाहतूक केल्याप्रकरणी आंबोली पोलिसांनी बेळगाव येथील एकाला ताब्यात घेतले आहे.मंगळवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत १ लाख ८ हजारांच्या दारुसह ४ लाखाची गाडी मिळून तब्बल ५ लाख ८ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर अवैध दारू वाहतूक प्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. कलमेश अल्लाप्पा मुलाबट्टी (३६, रा.अदालट्टी, ता. अथणी, बेळगांव ) असे त्याचे नाव आहे. ही कारवाई सावंतवाडी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल दीपक शिंदे, हेड कॉन्स्टेबल दत्ता देसाई व होमगार्ड जंगले यांनी आंबोली तपासणी नाक्यावर केली. यात गोवा बनावटीच्या इम्पेरियल ब्ल्यू ब्रँडच्या बाटल्यांचे नऊ बॉक्स जप्त करण्यात आले. तर या प्रकरणी वापरण्यात आलेली पांढऱ्या रंगाची शेवरलेट एन्जॉय ( के ए – २३ एन ३६३५) ही कार देखील पोलिसांनी जप्त केली आहे.
Holi Special Trains News | 03 Mar 2023 |प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रशासनाने अजून काही विशेष गाड्या कोकण रेल्वे मार्गावर चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
दिनांक ०४/०३/२०२३ शनिवार व ०७/०३/२०२३ मंगळवार या दिवशी ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई या स्थानकावरुन रात्री ००:३० वाजता सुटेल व ती त्याच दिवशी सकाळी ०९:०० वाजता रत्नागिरी या स्थानकावर पोहोचेल.
Train no. 01152 Ratnagiri – Mumbai CSMT Special
दिनांक ०६/०३/२०२३ सोमवार या दिवशी ही गाडी रत्नागिरी या स्थानकावरुन सकाळी ०६:३० वाजता सुटेल व ती त्याच दिवशी दुपारी १३:५० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस,मुंबई या स्थानकावर पोहोचेल.
दिनांक ०४/०३/२०२३ शनिवार व ०७/०३/२०२३ मंगळवार या दिवशी ही गाडी रत्नागिरी या स्थानकावरुन सकाळी १०:०० वाजता सुटेल व ती त्याच दिवशी संध्याकाळी १६:२०वाजता पनवेल या स्थानकावर पोहोचेल.
Train no. 01153 Panvel – Ratnagiri
दिनांक ०५/०३/२०२३ रविवार व ०८/०३/२०२३ बुधवार या दिवशी ही गाडी पनवेल या स्थानकावरुन संध्याकाळी १८:२० वाजता सुटेल व ती रात्री ०० :२० वाजता रत्नागिरी या स्थानकावर पोहोचेल.
दिनांक ०४/०३/२०२३ शनिवार व ०७/०३/२०२३ मंगळवार या दिवशी ही गाडी पनवेल या स्थानकावरुन संध्याकाळी १८:२० वाजता सुटेल व ती दुसया दिवशी सकाळी ०४:१० वाजता सावंतवाडी या स्थानकावर पोहोचेल.
Train no. 01155 Panvel – Sawantwadi Road Special:
दिनांक ०५/०३/२०२३ रविवार व ०८/०३/२०२३ बुधवार या दिवशी ही गाडी सावंतवाडी या स्थानकावरुन सकाळी ०७:४५ वाजता सुटेल व ती त्याच दिवशी संध्याकाळी १७:२० वाजता पनवेल या स्थानकावर पोहोचेल.
दिनांक ०९/०३/२०२३ गुरुवार या दिवशी ही गाडी रत्नागिरी या स्थानकावरुन सकाळी ०६:३० वाजता सुटेल व ती त्याच दिवशी दुपारी १३:३० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस,मुंबई या स्थानकावर पोहोचेल.
मुंबई : देशामध्ये महत्त्वाच्या काही शहरां दरम्यान सुरू केलेली वंदे भारत एक्सप्रेस आता कोकण रेल्वे मार्गावर मुंबई गोवा या दोन शहरांदरम्यान लवकरच सुरू होणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत. मुंबई- गोवा या मार्गावरील विद्युतीकरणाची कामे अंतिम टप्प्यात असून, कामे पूर्ण झाल्यानंतर मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात येईल, असे आश्वासन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज येथे दिल्याची माहिती भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी दिली.
कोकणासह ठाणे जिल्ह्यातील रेल्वेच्या विविध प्रश्नांसंदर्भात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे-पाटील यांची मुंबईत भाजपाच्या आमदारांनी भेट घेतली. या आमदारांमध्ये सर्वश्री प्रविण दरेकर, निरंजन डावखरे, गणपत गायकवाड, प्रसाद लाड आदींचा समावेश होता. त्यावेळी त्यांनी कोकणातील प्रवाशांसाठीचे विविध मुद्दे मांडले.
कोकणातील प्रवाशांचा प्रवास वेगाने होण्यासाठी शिर्डी व सोलापूरप्रमाणेच गोव्यापर्यंत वंदे भारत एक्सप्रेस सुरू करावी, अशी आग्रही मागणी आमदारांनी केली. त्यावेळी रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाल्यावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचे आश्वासन राज्यमंत्री दानवे यांनी दिले.
रेल्वे राज्यमंत्रि रावसाहेब दानवे यांच्याकडे केलेल्या इतर काही मागण्या.
`वन प्रॉडक्ट, वन स्टॉल’ प्रकल्पानुसार कोकण रेल्वेतील प्रकल्पग्रस्त व्यक्ती वा त्यांच्या वारसांना स्टॉल द्यावेत
शेतकऱ्यांसाठी प्रत्येक स्थानकात फिरता स्टॉल असाव
कोकण रेल्वेमार्गावरील सर्व स्थानकांतील प्लॅटफॉर्म व गाडीमधील उंची समान ठेवावी.
रेल्वे पुलामुळे महाड येथे पूरस्थिती निर्माण होत असल्याबद्दल उपाययोजना करावी.
Holi Special Train | 02/03/2023 : कोकण रेल्वेमार्गावर होळीसाठी एका एकमार्गी (One Way) विशेष गाडीची घोषणा कोकणरेल्वे आणि मध्य रेल्वेकडून करण्यात आली आहे. ही गाडी मडगाव ते लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकांदरम्यान चालविण्यात येणार आहे.
Train no.01592 Madgaon Jn.- Lokmanya Tilak (T ) One Way Special
ही गाडी मंगळवारी दिनांक 07/03/2023 रोजी मडगाव या स्थानकावरून सकाळी 08:45वाजता सुटून लोकमान्य टिळक टर्मिनस या स्टेशनला त्याच दिवशी रात्री 21:50 वाजता पोहोचेल.
Holi Special Trains News |01 Mar 2023 | शिमगोत्सव साजरा करण्यासाठी कोकणात जाणार्या भाविकांना एक खुशखबर आहे. प्रवाशांची वाढती प्रतिसाद लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रशासनाने मध्यरेल्वे च्या सहाय्याने अजून काही विशेष गाड्या कोकण रेल्वे मार्गावर चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
दिनांक ०२/०३/२०२३ व ०९/०३/२०२३ (गुरुवार) या दिवशी ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावरुन रात्री २२:१५ वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी सकाळी १०:०० वाजता करमाळी या स्थानकावर पोहोचेल.
Train No. 01188 Karmali – Lokmanya Tilak (T) Special (Weekly)
दिनांक ०३/०३/२०२३ व १०/०३/२०२३ (शुक्रवार) या दिवशी ही गाडी करमाळी टर्मिनस या स्थानकावरुन संध्याकाळी १६:२० वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी पहाटे ०३:४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावर पोहोचेल.
दिनांक ०७/०३/२०२३ (मंगळवार) या दिवशी ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावरुन रात्री २२:१५ वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी संध्याकाळी १७:२० वाजता मंगळूरु या स्थानकावर पोहोचेल.
दिनांक ०८/०३/२०२३ (बुधवार) या दिवशी ही गाडी मंगळूरु या स्थानकावरुन संध्याकाळी १८:४५ वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी ११:४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावर पोहोचेल..
दिनांक ०४/०३/२०२३ व १२/०३/२०२३ या दिवशी ही गाडी रोहा या स्थानकावरुन सकाळी ११:०५ वाजता सुटेल व ती त्याच दिवशी दुपारी १३:२० वाजता चिपळूण या स्थानकावर पोहोचेल.
Train No. 01598 Chiplun – Roha MEMU Special
दिनांक ०४/०३/२०२३ व १२/०३/२०२३ या दिवशी ही गाडी चिपळूण या स्थानकावरुन दुपारी १३:४५ वाजता सुटेल व ती त्याच दिवशी संध्याकाळी १६:१० वाजता रोहा या स्थानकावर पोहोचेल.
या गाडीचे थांबे
माणगाव, वीर, सापे वामने, कारंजाडी, विन्हेरे, आणि खेड
डब्यांची संरचना
12 मेमू कोच
प्रवाशांनी या अतिरिक्त फेर्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन कोकण रेल्वे तर्फे करण्यात आले आहे.
Holi Special Trains | प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने कोंकण रेल्वेमार्गावर ६ विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या आधी कोंकण रेल्वे मार्फत काही अतिरिक्त गाड्या सोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे कोकणात शिमगोत्सव साजरा करण्यासाठी गावी जाणाऱ्या भाविकांचा प्रवास आरामदायक होईल हे नक्की
1) Train no. 09057 / 09058 Udhana Jn – Mangaluru Jn – Udhana Jn Special on Special Fare
Train no. 09057 Udhana Jn – Mangaluru Jn
ही गाडी दिनांक ०१/०३/२०२३ (बुधवार), ०५/०३/२०२३ (रविवार) या दिवशी ही गाडी उधाणा या स्थानकावरुन रात्री २०:०० वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी संध्याकाळी १९:४० वाजता मंगळुरु या स्थानकावर पोहोचेल.
Train no. 09058 – Mangaluru Jn – Udhana Jn
ही गाडी दिनांक ०२/०३/२०२३ (गुरुवार), ०६/०३/२०२३ (सोमवार) या दिवशी ही गाडी मंगळुरु या स्थानकावरुन रात्री २१:१० वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी रात्री २१:०५ वाजता उधाणा या स्थानकावर पोहोचेल.
दिनांक ०५/०३/२०२३ (बुधवार) मंगळुरूसाठी प्रस्थान करणारी आणि दिनांक ०६ /०३/२०२३ (गुरुवार) परत येणाऱ्या गाडीच्या डब्यांची स्थिती
एसएलआर – ०2 + सेकंड सीटिंग – 04 + स्लीपर – 12 + थ्री टायर एसी – 03 + टू टायर एसी – 01 असे मिळून एकूण 22 डबे
2) Train no. 09412 / 09411 Ahmedabad – Karmali – Ahmedabad Jn Special on Special Fare
Train no. 09412 Ahmedabad – Karmali
ही गाडी दिनांक ०७/०३/२०२३ (मंगळवार) या दिवशी ही गाडी अहमदाबाद या स्थानकावरुन सकाळी ०९:३० वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी पहाटे ०४:२५ वाजता करमाळी या स्थानकावर पोहोचेल.
Train no. 09411 – karmali – Ahmedabad
ही गाडी दिनांक ०८/०३/२०२३ (बुधवार) या दिवशी ही गाडी करमाळी या स्थानकावरुन सकाळी ०९:२० वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी सकाळी ०७:०० वाजता अहमदाबाद या स्थानकावर पोहोचेल.
एसएलआर – ०2 + सेकंड सीटिंग – 05+ स्लीपर – 12 + थ्री टायर एसी – 04 + टू टायर एसी – 01 असे मिळून एकूण 24 डबे
आरक्षण
गाडी क्रमांक 09411 या गाडीचे आरक्षण दिनांक २६/०२/२०२३ पासून रेल्वेच्या सर्व तिकीट खिडक्यांवर आणि अधिकृत संकेतस्थळावर सुरु होणार असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयातर्फे देण्यात आली आहे.
ही गाडी दिनांक २६/०२/०२२३ , ०५/०३/२०२३ आणि १२/०३/२०२३ या दिवशी (रविवारी) ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावरुन रात्री २२:१५ वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी सकाळी १०:३० वाजता मडगाव या स्थानकावर पोहोचेल.
ही गाडी दिनांक २७/०२/०२२३ , ०६/०३/२०२३ आणि १३/०३/२०२३ या दिवशी (सोमवारी) ही गाडी मडगाव या स्थानकावरुन सकाळी ११:३० वाजता सुटेल व ती त्याच दिवशी रात्री २३:४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावर पोहोचेल.
एसएलआर – ०2 + सेकंड सीटिंग – 03 + स्लीपर – 08 + थ्री टायर एसी – 03 + टू टायर एसी – 01 असे मिळून एकूण 17 डबे
2) Train no. 01445 / 01446 Pune Jn – Karmali – Pune Jn Special (Weekly):
Train no. 01445 Pune Jn – Karmali Special (Weekly)
ही गाडी दिनांक २४/०२/०२२३ , ०३/०३/२०२३, १०/०३/२०२३ आणि १७/०३/२०२३ या दिवशी (शुक्रवारी) ही गाडी पुणे या स्थानकावरुन संध्याकाळी १७:३० वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी सकाळी ०८:३० वाजता करमाळी या स्थानकावर पोहोचेल.
Train no. 01446 Karmali – Pune Jn Special (Weekly)
ही गाडी दिनांक २६/०२/०२२३ ,०५/०३/२०२३, १२/०३/२०२३ आणि १९/०३/२०२३ या दिवशी (रविवारी ) ही गाडी करमाळी या स्थानकावरुन सकाळी ०९:२० वाजता सुटेल व ती त्याच दिवशी रात्री २३:३५ वाजता पुणे या स्थानकावर पोहोचेल.
ही गाडी दिनांक २५/०२/०२२३ , ०४/०३/२०२३, ११/०३/२०२३ आणि १८/०३/२०२३ या दिवशी (शनिवारी) ही गाडी करमाळी या स्थानकावरुन संध्याकाळी ०९:२० वाजता सुटेल व ती त्याच दिवशी रात्री २०:१५ वाजता पनवेल या स्थानकावर पोहोचेल.
Train no. 01447 panvel – Karmali Special (Weekly)
ही गाडी दिनांक २५/०२/०२२३ , ०४/०३/२०२३, ११/०३/२०२३ आणि १८/०३/२०२३ या दिवशी (शनिवारी) ही गाडी पनवेल या स्थानकावरुन रात्री २२:०० वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी सकाळी ०८:३० वाजता करमाळी या स्थानकावर पोहोचेल.
एसएलआर – ०2 + सेकंड सीटिंग(जनरल) – 04 + स्लीपर – 11 + थ्री टायर एसी – 04 + टू टायर एसी – 01 असे मिळून एकूण 22 डबे
आरक्षण Train no. 01446 Karmali – Pune Jn या गाडीचे आरक्षण दिनांक २३/०२/२०२३ पासून, तर Train no. 01448 Karmali – Panvel आणि Train no. 01460 Madgaon Jn – Lokmanya Tilak (T) या गाड्यांचे आरक्षण २४/०२/२०२३ पासून रेल्वेच्या सर्व तिकीट खिडक्यांवर आणि अधिकृत संकेत्स्थानवर उपलब्ध होईल अशी माहिती कोंकण रेल्वेतर्फे देण्यात आली आहे.
रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या अखत्यारीत येणाऱ्या 741 किलोमीटर मार्गांवर विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. विद्युतीकरण झाल्यामुळे इंधनाची बचत होणार असून प्रवाशांना वेगवान आणि प्रदूषणमुक्त वातावरणात प्रवास करणे शक्य होणार आहे. नाण्याची दुसरी बाजू अशी की विद्युतीकरणामुळे येणाऱ्या व जाणाऱ्या गाडयांचा आवाज येत नाही. त्यामुळे रेल्वे ट्रॅक ओलांडताना नागरिकांचा किंवा प्राण्यांचा अपघात होण्याची शक्यता जास्त असते. हे अपघात टाळण्यासाठी जे गाव रेल्वे ट्रॅकच्या लगत आहेत अशा गावांना रेल्वे प्रशानाने जाळी बसवावी, अशी मागणी कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी केली आहे.
या आधी गाड्या डिजेल इंजनवर चालायच्या. त्यामुळे त्याचा आवाज मोठा असायचा पण आता आवाज कमी येतो. रेल्वे चालक हॉर्न वाजवतात पण त्यावर पण काही मर्यादा येतात. रेल्वे पटरीवरून जाते वेळी व येते वेळी विजेवर चालणाऱ्या ट्रेनचा आवाज येत नसल्यामुळे नागरिक व गुरा घोरांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. असे त्यांचे म्हणणे आहे.
Konkan Railway News:बयाणा येथे होणाऱ्या प्री-नॉनइंटरलॉक,नॉनइंटरलॉक कार्यसाठी मध्य रेल्वेने एक विशेष ब्लॉक घेतला आहे. या ब्लॉक साठी या मार्गावरून जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द केल्या गेल्या आहेत. या ब्लॉकमुळे कोंकणरेल्वे मार्गावरील खालील दर्शवलेल्या गाड्या दिलेल्या दिवशी रद्द करण्यात आलेल्या आहेत.