Category Archives: कोकण रेल्वे
मागील २ महिन्यांची प्रवासी संख्या
मार्ग | जानेवारी | फेब्रुवारी | एकूण |
सीएसएमटी-मडगाव | १३,१९६ | ११,६१४ | २४,८१० |
मडगाव-सीएसएमटी | १३,२४५ | १२,६८४ | २५,९२९ |




Konkan Railway: होळी सणाच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि कोकण यांना जोडणारी थेट विशेष रेल्वे गाडी चालविण्यात यावी अशी मागणी कोकण विकास समितीने केली आहे. पुणे ते सावंतवाडी दरम्यान कल्याण मार्गे विशेष रेल्वे सुरू केल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांवरील ताण कमी होऊन पुणे आणि कोकण दरम्यानची कनेक्टिव्हिटी वाढेल, असे कोकण विकास समितीचे अध्यक्ष जयवंत शंकर दरेकर यांनी ईमेल द्वारे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.
पुणे आणि कोकण दरम्यान थेट रेल्वे गाडी नसल्यामुळे प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागतो. मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी असते, त्यामुळे प्रवासाचा अनुभव खूपच त्रासदायक होतो. या मार्गावर विशेष रेल्वे सुरू केल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल आणि कोकणच्या विकासाला चालना मिळेल, असे दरेकर यांनी म्हटले आहे.
यापूर्वी या मार्गावर विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या होत्या, ज्यांना प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने पुन्हा एकदा या मार्गावर विशेष गाड्या सुरू कराव्यात, अशी मागणी कोकण विकास समितीने केली आहे.
या गाडीला खालील थांबे देण्यात यावेत
पुणे – चिंचवड – तळेगाव – लोणावळा – कर्जत – कल्याण – पनवेल – पेण – रोहा – माणगाव – वीर – सापे वामने – करंजाडी – खेड – चिपळूण – सावर्डा – अरावली रोड – संगमेश्वर रोड – रत्नागिरी – आडवली – विलावडे – राजापूर रोड – वैभववाडी रोड – नांदगाव रोड – कणकवली – सिंधुदुर्ग – कुडाळ – झारप – सावंतवाडी रोड
रेल्वे प्रशासन या मागणीचा सकारात्मक विचार करून लवकरात लवकर विशेष रेल्वे गाडी सुरू करेल, अशी अपेक्षा कोकण विकास समितीने व्यक्त केली आहे.




Konkan Railway: होळीसाठी कोकणात जाणार्या प्रवाशांची गर्दी कमी करण्याच्या हेतूने होळी सणा दरम्यान म्हणजेच दिनांक 13 मार्च ते 16 मार्च पर्यंत कोकण रेल्वे मार्गावर पनवेल – चिपळूण विशेष मेमू सेवा सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या गाडीचा अधिक तपशील खालीलप्रमाणे
गाडी क्रमांक 01018 / 01017 चिपळूण – पनवेल – चिपळूण अनारक्षित मेमू विशेष गाडी
चिपळूण – पनवेल अनारक्षित मेमू विशेष (01018) ही गाडी दिनांक 13 मार्च ते 16 मार्च दरम्यान दररोज चिपळूण वरून दुपारी 15:25 वाजता निघेल आणि पनवेल येथे रात्री 20:20 वाजता पोहोचेल.
पनवेल – चिपळूण अनारक्षित मेमू विशेष (01017) ही गाडी दिनांक 13 मार्च ते 16 मार्च दरम्यान पनवेल वरून रात्री 21:10 वाजता सुटून चिपळूण येथे दुसऱ्या दिवशी पहाटे 02:00 वाजता पोहोचणार आहे.
थांबे : अंजनी, खेड, कळंबणी बुद्रुक, दिवाणखवटी, विन्हेरे, करंजाडी, सापे वामने, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा आणि पेण.
डब्यांची रचना: ८ कार मेमू




Konkan Railway: होळीसाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर आहे. होळी सण २०२५ दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने मध्य रेल्वेच्या समन्वयाने अजून काही विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीचा तपशील खालीलप्रमाणे आहे,
१)गाडी क्र. ०११०२/०११०१ मडगाव – पनवेल – मडगाव साप्ताहिक विशेष
गाडी क्र. ०११०२ मडगाव – पनवेल साप्ताहिक विशेष ही गाडी शनिवार दिनांक १५/०३/२०२५ आणि २२/०३/२०२५ रोजी मडगाव येथून सकाळी ८:०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी १७:३० वाजता पनवेल या स्थानकावर पोहोचेल.
गाडी क्र. ०११०१ पनवेल – मडगाव साप्ताहिक विशेष ही गाडी शनिवार दिनांक १५/०३/२०२५ आणि २२/०३/२०२५ रोजी पनवेल येथून संध्याकाळी १८:२० वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी पहाटे ६:४५ वाजता मडगाव या स्थानकावर पोहोचेल.
ही गाडी पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी कणकवली, कुडाळ, सावंतवाडी , थिविम, करमाळी या स्थानकांवर थांबणार आहे.
डब्यांची रचना: एकूण २० एलएचबी कोच: टू टायर एसी – ०१ कोच, थ्री टायर एसी – ०३, थ्री टायर एसी इकॉनॉमी- ०२ कोच, स्लीपर – ०८ कोच, जनरल – ०४ कोच, जनरेटर कार – ०१, एसएलआर – ०१
२)गाडी क्र. ०११०४/०११०३ मडगाव – एलटीटी – मडगाव साप्ताहिक विशेष
गाडी क्र. ०११०४ मडगाव – एलटीटी साप्ताहिक विशेष ही गाडी रविवार दिनांक १६/०३/२०२५ आणि २३/०३/२०२५ रोजी मडगाव येथून संध्याकाळी १६:३० वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी पहाटे ०६:२५ वाजता एलटीटी मुंबई या स्थानकावर पोहोचेल.
गाडी क्र. ०११०३ एलटीटी – मडगाव साप्ताहिक विशेष ही गाडी सोमवार दिनांक १७/०३/२०२५ आणि २४/०३/२०२५ रोजी एलटीटी येथून सकाळी ०८:२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २१:४० वाजता मडगाव या स्थानकावर पोहोचेल.
ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी , थिविम, करमाळी या स्थानकांवर थांबणार आहे.
डब्यांची रचना: एकूण २० एलएचबी कोच: टू टायर एसी – ०१ कोच, थ्री टायर एसी – ०३, थ्री टायर एसी इकॉनॉमी- ०२ कोच, स्लीपर – ०८ कोच, जनरल – ०४ कोच, जनरेटर कार – ०१, एसएलआर – ०१




Konkan Railway: होळीसाठी कोकणात जाणार्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वे मार्गावर अनारक्षित विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. या गाड्या दादर ते रत्नागिरी आठवड्यातुन तीन दिवस धावणार आहेत. या गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे.
गाडी क्रमांक ०११३१/०११३२ दादर-रत्नागिरी दादर त्रि-साप्ताहिक विशेष
गाडी क्रमांक ०११३१ दादर रत्नागिरी होळी विशेष गाडी ११, १३ व १६ मार्च, २०२५ दुपारी १४:५० ला सुटून रात्री २३:४० ला रत्नागिरीला पोहोचेल.
गाडी क्रमांक ०११३२ रत्नागिरी दादर होळी विशेष गाडी १२, १४ आणि १७ मार्च, २०२५ पहाटे ४:३० ला सुटून दुपारी १३:२५ ला दादरला पोहोचेल.
या गाडीचे थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड
डब्यांची संरचना: जनरल – १४, एसएलआर – ०२ असे मिळून एकूण १६ आयसिएफ कोच