Category Archives: कोकण रेल्वे

कोकण रेल्वेसंबधी विविध मागण्यांसाठी कोंकण विकास समिती आणि जल फाउंडेशनच्या शिष्टमंडळाने घेतली खासदार गोपाळ शेट्टी यांची भेट

मुंबई :पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल/वांद्रे टर्मिनस येथून सावंतवाडी/मडगावसाठी थेट गाडी सुरू करण्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या व गेला दशकभरपेक्षा जास्त काळ चर्चेत असलेल्या नायगाव जुचंद्र जोड मार्गिका प्रकल्पाला गती देऊन काम लवकरात लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने पावले टाकण्याची विनंती करण्यासाठी कोंकण विकास समिती आणि जल फाउंडेशन यांच्या शिष्टमंडळाने उत्तर मुंबईचे  खासदार गोपाळ शेट्टी यांची आज शनिवार दि. ९ सप्टेंबर, २०२३ सकाळी १० वाजता कांदिवली येथील त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. 
यावेळी सर्वप्रथम शिष्टमंडळाच्या सदस्यांनी खेड स्थानकात मंगला एक्सप्रेस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस कोचुवेली एक्सप्रेस थांबवण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांसाठी त्यांचे आभार मानले.
नायगाव जुचंद्र जोड मार्गिकेला रेल्वे बोर्डाने मान्यता दिली असली तरी कालबद्ध कार्यक्रम देऊन सदर काम पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यामुळे लवकरात लवकर भूसंपादन पूर्ण करून त्यानंतर साधारण एका वर्षाच्या कालावधीत हे काम करण्यासाठी केंद्र शासन व राज्य शासनातील संबंधित विभागांकडे पाठपुरावा करण्याची विनंती शिष्टमंडळाच्या सदस्यांनी खासदार गोपाळ शेट्टी यांना केली . तसेच, काम पूर्ण होण्याची वाट न पाहता तत्पूर्वीच लवकरात लवकर मुंबई सेंट्रल किंवा वांद्रे टर्मिनसयेथून सावंतवाडीला जाणारी नियमित गाडी सुरु करणे आवश्यक असल्याचे त्यांना सांगण्यात आले.
त्याचबरोबर कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण, दादर चिपळूण रेल्वे, रत्नागिरी दिवा पॅसेंजर आणि सावंतवाडी दिवा एक्सप्रेस दादरवरून चालवणे, दिवा रत्नागिरी मेमू केवळ गणपती सणापुरती न चालवता कायमस्वरुपी करणे, अनेक थांबे कमी करून दिवा सावंतवाडी पॅसेंजरची एक्सप्रेस केल्यानंतरही प्रवास वेळेत काहीही फरक पडलेला नसल्यामुळे दिवा सावंतवाडी एक्सप्रेसला रोहा ते रत्नागिरी दरम्यान सर्व थांबे देणे, तेजस एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस मडगाव एक्सप्रेस, गांधीधाम नागकोईल एक्सप्रेस व मारुसागर एक्सप्रेस गाड्यांना वैभववाडी स्थानकात थांबा देण्यासंबंधीची निवेदने खासदारांना यावेळी देण्यात आली .
खासदार गोपाळ शेट्टी यांनी या विषयात लक्ष घालून कामे पूर्ण करून घेण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी कोंकण विकास समितीचे संस्थापक – अध्यक्ष श्री. जयवंत शंकरराव दरेकर,  जल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री. नितीन सखाराम जाधव,  रेल्वे अभ्यासक श्री. अक्षय मधुकर महापदी, ॲड. श्री. प्रथमेश रावराणे, श्री. रविंद्र वसंतराव मोरे, श्री. विनोद भगवंत भोसले, ॲड. श्री. चंद्रकांत सकपाळ, श्री. वसंत रामचंद्र मोरे, श्री. सचिन काते, श्री. रविंद्र मोरे, श्री. निवृत्ती निकम इ. उपस्थित होते.
[pdf-embedder url=”https://kokanai.in/wp-content/uploads/2023/09/2309-Thanks-Letter-for-Mangala-and-KCVL-Gopal-Shetty.pdf” title=”2309 Thanks Letter for Mangala and KCVL – Gopal Shetty”] [pdf-embedder url=”https://kokanai.in/wp-content/uploads/2023/09/2309-Diva-SWV-Halt-Restoration-Gopal-Shetty.pdf” title=”2309 Diva SWV Halt Restoration – Gopal Shetty”] [pdf-embedder url=”https://kokanai.in/wp-content/uploads/2023/09/2309-KR-Merger-Gopal-Shetty.pdf” title=”2309 KR Merger – Gopal Shetty”] [pdf-embedder url=”https://kokanai.in/wp-content/uploads/2023/09/2309-Naigaon-Juchandra-Gopal-Shetty.pdf” title=”2309 Naigaon Juchandra – Gopal Shetty”] [pdf-embedder url=”https://kokanai.in/wp-content/uploads/2023/09/2309-Railway-Gopal-Shetty.pdf” title=”2309 Railway – Gopal Shetty”]

Loading

Konkan railway | मत्स्यगंधा एक्सप्रेस दोन दिवस अतिरिक्त कोचसहित धावणार

Revised News
Konkan Railway News : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेवून मत्स्यगंधा एक्स्प्रेसला या आठवड्यातील दोन दिवस अतिरिक्त डबा जोडण्यात येणार आहे.
कोकण रेल्वेच्या माहितीनुसार, 
12620  Mangaluru Central – Lokmanya Tilak (T) Matsyagandha Express
या गाडीला दि. ०८ सप्टेंबर आणि १५ सप्टेंबरच्या फेरीसाठी  थ्री टायर एसी कोच जोडण्यात येणार आहे. 
तर परतीच्या प्रवासात
12619 Lokmanya Tilak (T) – Mangaluru Central Matsyagandha Express 
या गाडीला दि. ०९ सप्टेंबर आणि  १६ सप्टेंबरच्या फेरीसाठी एक थ्री टायर एसी कोच जोडण्यात येणार आहे.
प्रवाशांनी याची नोंद घेऊन सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. 

Loading

वंदे भारत एक्सप्रेसच्या एसी चेअर कारच्या रत्नागिरी आणि खेडसाठीच्या आरक्षण कोट्यात दुपटीने वाढ

कोंकण विकास समितीच्या मागणीला यश
अक्षय महापदी | मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेसमधील एसी चेअर कारचा रत्नागिरीपासूनचा आरक्षण कोटा दुपटीने वाढवून आधीच्या २२ ऐवजी ४४ केला आहे.
रेल्वे मंत्रालयाने दि. २८ जून, २०२३ पासून मुंबई आणि मडगाव दरम्यान वंदे भारत एक्सप्रेसची सेवा सुरु केली. या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, कणकवली आणि थिवी येथे थांबे दिले गेले. कोकण रेल्वेने २२२३० मडगाव मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला मडगाव, थिवी आणि कणकवलीसाठी एसी चेअर कार साधारण ३५० व एक्सिक्युटीव्ह क्लास ३० अशा एकूण ३८० जागा तर रत्नागिरी आणि खेडसाठी एसी चेअर कार २२ व एक्सिक्युटीव्ह क्लास ४ अशा केवळ २६ जागांचा आरक्षण कोटा निश्चित केला केला होता. यामुळे रत्नागिरी व खेड या दोन्ही स्थानकातून वंदे भारतला अपेक्षित उत्पन्न मिळण्यास अडथळा निर्माण झाला होता.
ही तफावत लक्षात घेता कोंकण विकास समितीने पहिल्या दिवसापासून मुंबईकडे येणाऱ्या २२२३० मडगाव मुंबई वंदे भारत एक्सप्रेसमधील एसी चेअर कारचा रत्नागिरीपासूनचा आरक्षण कोटा वाढवण्याची मागणी लावून धरली होती. ऑगस्ट महिन्यात यासाठी पुन्हा पाठपुरावा केला होता.
याचीच दखल घेऊन कोकण रेल्वेने १२० दिवसांच्या आगाऊ आरक्षण कालावधीपासून आरक्षण कोटा वाढवलेला आहे. त्यानुसार, दि. ३ जानेवारी, २०२४ पासून २२२३० मुंबई वंदे भारत एक्सप्रेसमधील एसी चेअर कारचा रत्नागिरीपासूनचा आरक्षण कोटा दुपटीने वाढवून आधीच्या २२ ऐवजी ४४ केला आहे. त्यामुळे जानेवारीपासून रत्नागिरी व खेडसाठी एसी चेअर कार ४४ व एक्सिक्युटीव्ह क्लास ४ अशा एकूण ४८ जागांचा आरक्षण कोटा उपलब्ध असेल. रत्नागिरी व खेडमधील प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा कोंकण असे आवाहन  विकास समितीने केले आहे. 
अक्षय मधुकर महापदी
सदस्य, कोंकण विकास समिती
  

Loading

Megablock on Konkan Railway: उद्याची जनशताब्दी एक्सप्रेस उशिराने धावणार

Konkan Railway News :  कोकण रेल्वे मार्गावर उद्या गुरुवार दिनांक ०७ सप्टेंबर रोजी चिपळूण ते संगमेश्वर दरम्यान रेल्वेच्या मालमत्ता देखभालीच्या कामासाठी सकाळी ७:३० ते १०:३० असा तीन तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहेत. कोकण रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या मेगाब्लॉकमुळे या मार्गावर धावणाऱ्या ३ गाड्यांच्या वेळापत्रकांवर परिणाम होणार आहे.
१) Train no. 01139 Nagpur – Madgaon Jn. Special 
दिनांक ०६ सप्टेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी कोलाड ते चिपळूण दरम्यान १०० मिनिटे उशिराने धावणार आहे.
२) Train no. 12051 Mumbai CSMT – Madgaon Jn. Janshatabdi Express
दिनांक ०७ सप्टेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी कोलाड ते चिपळूण दरम्यान सुमारे ४० मिनिटे उशिराने धावणार आहे.
३)Train no. 16346 Thiruvananthapuram Central – Lokmanya Tilak (T) Netravati Express
दिनांक ०६ सप्टेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी रत्नागिरी ते संगमेश्वर दरम्यान सुमारे ४० मिनिटे  उशिराने धावणार आहे.

Loading

वसई-विरार आणि पाश्चिम रेल्वे क्षेत्रातील कोकणवासियांसाठी खुशखबर; कोकणात जाण्यासाठी सोयीच्या रेल्वेमार्गाला रेल्वेबोर्डाकडून मंजुरी

मुंबई:वसई-विरार, मिरा- भायंदर तसेच बोरिवली आणि पश्चिम रेल्वे कक्षेत राहणाऱ्या कोकण वासियांसाठी एक खुशखबर आहे. कोकणात जाण्यासाठी एक सोयीचा आणि जवळचा रेल्वेमार्ग लवकरच उपलब्ध होणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरून पनवेलसाठी सोयीचा असलेल्या नायगाव आणि जूचंद्र दरम्यानच्या नवीन दुहेरी रेल्वे लाईनचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. त्याला रेल्वेबोर्डकडून मान्यता मिळाली आहे.
पश्चिम रेल्वेवरून मुंबई सेंट्रल, वांद्रे, बोरिवली येथून कोकण रेल्वेवर जाणाऱ्या नियमित गाड्या सुरु करण्यासाठी महत्वाच्या असणाऱ्या नायगाव – जूचंद्र कॉर्ड लाईन (जोड मार्गिका) चा प्रस्ताव रेल्वे कडे पाठविण्यात आला होता. रेल्वे अभ्यासक अक्षय महापदी यांनी माहिती अधिकारात या प्रस्तावाची सद्यस्थितीची माहिती मागवली  होती. या महितीनुसार या प्रस्तावाला रेल्वे बोर्डने दिनांक २७ जुलै २०२३ रोजी मान्यता दिली असून या प्रकल्पाची अंदाजित रक्कम १७५.९९ कोटी इतकी ठरविण्यात आली आहे. जमिनी अधिग्रहण केल्यापासून ३ वर्षात हा प्रकल्प पूर्णत्वास जाणार आहे.
सध्या उपरोक्त परिसरातील नागरिकांना कोकणाकडे जाण्याकरिता दादर किंवा कुर्ला स्थानकात जाऊन पुढची रेल्वे पकडावी लागते. गर्दीमुळे ते त्रासचे ठरते. म्हणून नायगाव आणि जूचंद्रदरम्यान नवीन दुहेरी रेल्वे लाईन टाकण्याची मागणी केली गेली होती, त्या मागणीला यश आले आहे. आता प्रतीक्षा आहे ती लवकरात लवकर हा प्रकल्प पूर्ण करून करण्याची.  त्यासाठी पाठपुरावा करणे आवश्यक आहे. हा नवीन मार्ग झाल्यास पश्चिम रेल्वे कक्षेत येणाऱ्या मुंबईतील नागरिकांना कोकणात जाण्याचा जवळचा मार्ग उपलब्ध होणार आहे. कोकणात जाणाऱ्या काही गाड्या या मार्गावरून वळविण्यात येणे शक्य होणार आहे. 

Loading

गणेशोत्सवात कोकण रेल्वे मार्गावरील मालवाहतूक आणि रो-रो सेवा स्थगित ठेवा

रेल्वे अभ्यासक अक्षय महापदी यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे साकडे
मुंबई: गणेशचतुर्थीला कोकणात रेल्वेने गावी जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि जलद होण्यासाठी दिनांक १५ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर या कालावधीत कोकण रेल्वे मार्गावरील मालवाहतूक आणि रो रो सेवा स्थगित ठेवावी असे साकडे रेल्वे अभ्यासक अक्षय महापदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे घातले आहे.
गणेशोत्सवानिमित्त कोकण रेल्वे मार्गावर नियमित गाड्यांशिवाय अजूनपर्यंत ३१२ विशेष गाड्या चालविण्याची घोषणा करण्यात आली आहे. या सर्व गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले असून मालवाहतूक आणि रो रो सेवा या कालावधीत पूर्णपणे स्थगित ठेवल्यास अजून गाड्या चालविण्यात येऊ शकतात. असे त्यांनी या निवेदनात म्हंटले आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे अतिरिक्त गाड्यांमुळे कोकण रेल्वे मार्गावर ताण येणार आहे. या कालावधीत मालवाहतूक आणि रो रो सेवा चालविल्यास रेल्वेमार्गावर गाड्यांचा खोळंबा होणार आहे. अनेक गाड्या सिंग्नल साठी थांबवाव्या लागणार असून त्याचा त्रास प्रवाशांना होणार आहे. त्यामुळे मालवाहतूक आणि रो रो सेवा या कालावधीत पूर्णपणे बंद ठेवण्याचे साकडे त्यांनी मुख्यमंत्र्यांना घातले आहे. 
[pdf-embedder url=”https://kokanai.in/wp-content/uploads/2023/09/Fw-गणेशोत्सव-काळात-१५-ते-२७-सप्टेंबर-२०२३-पर्यंत-कोकण-रेल्वे-मार्गावरील-मालवाह.pdf” title=”Fw गणेशोत्सव काळात १५ ते २७ सप्टेंबर, २०२३ पर्यंत कोकण रेल्वे मार्गावरील मालवाह”]

Loading

Konkan Railway : जबलपूर कोईमतूर गाडीला कल्याण येथे थांबा देण्याची मागणी

Konkan Railway News : गाडी क्रमांक ०२१९७/०२१९८ जबलपूर कोईमतूर या कोकण मार्गे धावणाऱ्या गाडीला कल्याण येथे थांबा देण्यात यावा या मागणीसाठी ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी मध्य रेल्वे प्रशासनाला निवेदन सादर केले आहे. 
कल्याण,अंबरनाथ,बदलापूर येथे मोठ्या प्रमाणात कोकणातील चाकरमानी स्थित आहेत. त्यांना कोकणात जाण्यासाठी ठाणे किंवा दादर या ठिकाणी जावे लागते. सध्या गणेशचतुर्थीचा हंगाम असल्याने या स्थानकावरून जाणाऱ्या गाडयांना मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. जबलपूर कोईमतूर ही गाडी  कल्याण स्थानकावरून जाते; मात्र या स्थानकावर या गाडीला थांबा नाही आहे. या गाडीला कोकणातील रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी,  कणकवली आणि कुडाळ या स्थानकावर थांबा आहे. या गाडीला कल्याण स्थानकावर कायम स्वरूपी थांबा मिळाल्यास येथील कोकणवासीयांसाठी एक चांगला पर्याय उपलब्ध होणार आहे.  
[pdf-embedder url=”https://kokanai.in/wp-content/uploads/2023/09/JBP-CBE-1.pdf” title=”JBP CBE (1)”]

Loading

कोकण रेल्वे मार्गावर पुढच्या आठवड्यात दोन ठिकाणी मेगाब्लॉक; ५ गाड्या उशिराने धावणार

रत्नागिरी :  कोकण रेल्वे मार्गावर मंगळवार दिनांक ०५ सप्टेंबर आणि गुरुवार दिनांक ०७ सप्टेंबर रोजी दोन वेगवेगळ्या ठिकाणी रेल्वेच्या मालमत्ता देखभालीच्या कामासाठी मेगाब्लॉक घेतले जाणार आहेत. या मेगाब्लॉकमुळे या मार्गावर धावणाऱ्या ५ गाड्यांच्या वेळापत्रकांवर परिणाम होणार आहे.
दिनांक ०५  सप्टेंबर चिपळूण ते करंजाडी दरम्यान रोजी दुपारी १२ वाजून २० मिनिटे ते ३ वाजून २० मिनिटे असा तीन तासांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे.. या  मेगा ब्लॉकच्या कालावधीत या मार्गावरुन धावणाऱ्या तीन गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. 
१)Train no. 02197 Coimbatore Jn. – Jabalpur Express
दिनांक ०४ सप्टेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी मडगाव ते चिपळूण दरम्यान सुमारे दीड तास उशिराने धावणार आहे.
२) Train no. 10106 Sawantwadi Road – Diva Jn. Express 
दिनांक ०५ सप्टेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी सावंतवाडी रोड ते चिपळूण दरम्यान सुमारे दीड तास उशिराने धावणार आहे.
३)Train no. 16345 Lokmanya Tilak (T) – Thiruvananthapuram Central Netravati Express 
दिनांक ०५ सप्टेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही  गाडी कोलाड ते वीर दरम्यान सुमारे अर्धा तास उशिराने धावणार आहे.
दिनांक ०७ सप्टेंबर गुरुवारी सेनापुरा ते ठोकूर दरम्यान रोजी दुपारी ३ संध्याकाळी ६ असा तीन तासांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे.. या  मेगा ब्लॉकच्या कालावधीत या मार्गावरुन धावणाऱ्या दोन गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. 
१)Train no. 10108 Mangaluru Central – Madgaon Jn. MEMU Express 
 दिनांक ०७ सप्टेंबर प्रवास सुरु करणारी ही गाडी मंगुळुरु सेंट्रल या सुरवातीच्या स्थानकावरून १ तास १५ मिनिटे उशिराने सुटणार आहे. 
२)Train no. 12134 Mangaluru Jn. – Mumbai CSMT Express journey commences 
दिनांक ०७ सप्टेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी मंगुळुरु सेंट्रल या सुरवातीच्या स्थानकावरून १ तास उशिराने सुटणार आहे. 

Loading

Konkan Railway | मार्ग मोकळा करण्यात रेल्वेला यश, मात्र अजूनही वाहतूक विस्कळीतच; प्रवाशांचे अतोनात हाल

Konkan Railway News : पनवेल – वसई रेल्वेमार्गावर मालगाडीचे डबे घसरल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून गावावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले आहेत.तर अनेक गाड्या रद्द, अंशतः रद्द आणि पर्यायी मार्गावरून वळविण्यात आलेल्या आहेत. काल संध्याकाळी ७:३० वाजता त्या मालगाडीचे डबे हटवून मार्ग वाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले होते. मात्र अजूनही कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्वपदावर आली नाही आहे. गाड्या १० ते १२ तास रखडल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत.

अडकलेल्या प्रवाशांना रेल्वेची माहिती देण्यासाठी सीएसएमटी, पनवेल, कल्याण, ठाणे येथे मदतकक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच अडकलेल्या प्रवाशांसाठी सुमारे 4000 पाण्याच्या बाटल्या, 4000 बिस्किट/स्नॅक्स/खाण्याच्या पाकिटांची व्यवस्था करून ती प्रवाशांमध्ये वाटण्यात आली. नागोठणे, कळंबोली, तळोजा आदी ठिकाणी काल प्रवाशांच्या वाहतुकीसाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली असल्याचे रेल्वेतर्फे सांगण्यात आले आहे.

कोंकण रेल्वे मार्गावरील गाड्यांची सध्याची स्थिती. वेळ 09:42 AM दिनांक 02/10/2023

[pdf-embedder url=”https://kokanai.in/wp-content/uploads/2023/09/kokan-railway-station-list-1.pdf” title=”kokan railway station list”]

 

Live Updates>>>>>

[pdf-embedder url=”https://kokanai.in/wp-content/uploads/2023/09/KR-Bulletin-No.-04.pdf” title=”KR Bulletin No. 04″] [pdf-embedder url=”https://kokanai.in/wp-content/uploads/2023/09/KR-Bulletin-No.-03.pdf” title=”KR Bulletin No. 03″] [pdf-embedder url=”https://kokanai.in/wp-content/uploads/2023/09/KR-Bulletin-No.-02.pdf” title=”KR Bulletin No. 02″] [pdf-embedder url=”https://kokanai.in/wp-content/uploads/2023/09/KR-Bulletin-No.-01.pdf” title=”KR Bulletin No. 01″]

 

Loading

वैभववाडी स्थानकात गाडयांना थांबा देणे ‘रेल्वे बोर्ड’ च्या अधिकार कक्षेत; कोकण रेल्वेने हात झटकले

Konkan Railway News: वैभववाडी स्थानकात तेजस एक्सप्रेस आणि एलटीटी- मडगाव एक्सप्रेस या गाडयांना थांबा देण्याबाबत कोकण विकास समितीने केलेल्या निवेदनाला रेल्वे प्रशासनाकडून उत्तर आले आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड KRCL ने ही मागणी रेल्वे बोर्डच्या कक्षेत येत आहे असे सांगून आपले हात झटकले आहेत. 
वैभववाडी स्थानकात सध्या ५ नियमित गाडयांना थांबा देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे गणपती/होळी/दिवाळी विशेष गाडयांना येथे थांबा देण्यात येत आहे. यंदाही गणेशोत्सव विशेष गाडयांना वैभववाडी या स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या स्थानकावर अधिक गाडयांना थांबे द्यावेत कि नाही याबाबत रेल्वे बोर्ड ठरवणार आहे अशा शब्दात या निवेदनास उत्तर देण्यात आले आहे. 
वैभववाडी स्थानकावर वाढणारी प्रवासी संख्या लक्षात घेऊन या स्थानकावर गाडी क्रमांक २२११९/२२१२० तेजस एक्सप्रेस आणि गाडी क्रमांक ११०९९/१११०० एलटीटी- मडगाव  एक्सप्रेस या गाडयांना थांबा देण्याबाबत कोकण विकास समितीने २३/०६/२०२३ रोजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे याना  एक निवेदन सादर केले होते. या निवेदनात मागील १० वर्षात रेल्वेला येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून मिळणाऱ्या उत्पन्नाचे आकडे अधोरेखित करून येथे या दोन गाडयांना थांबा दिल्यास प्रवासीसंख्या वाढून रेल्वेच्या उत्पन्नात वाढ होणार असल्याने येथे थांबा मजूर करण्यात यावा अशी विनंती करण्यात आली होती. 
 

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search