Category Archives: कोकण रेल्वे

कोकण रेल्वे मार्गावर येत्या शुक्रवारी मेगाब्लॉक; २ गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम

Konkan Railway News: कोकण रेल्वे मार्गावर येत्या शुक्रवारी सावर्डा ते रत्नागिरी या विभागां दरम्यान  रेल्वेच्या मालमत्तेच्या देखभालीसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी  ०७:०० ते ०९:३० या वेळेत हा ब्लॉक असणार आहे. या मेगाब्लॉक मुळे कोंकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या २ गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
१) Train no. 12617 Ernakulam Jn. – H. Nizamuddin Express
दिनांक १४ नोव्हेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी मडगाव ते रत्नागिरी या स्थानकांदरम्यान  १ तास ४५ मिनिटे उशिराने चालविण्यात येणार आहे. 
२) Train no. 20923 Tirunelveli – Gandhidham Express
दिनांक १४ नोव्हेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी मडगाव ते रत्नागिरी या स्थानकांदरम्यान  १ तास १० मिनिटे उशिराने चालविण्यात येणार आहे 

Loading

सबरीमाला उत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर उद्यापासून धावणार नागरकोईल – पनवेल विशेष गाडी

Konkan Railway News: केरळ राज्यातील प्रसिद्ध सबरीमाला उत्सवासाठी येणाऱ्या भाविकांची सोय व्हावी या हेतूने  कोकण रेल्वे मार्गावर पनवेल ते नागरकोईल दरम्यान एक साप्ताहिक विशेष गाडी चालविण्याचा निर्णय कोकण रेल्वे आणि दक्षिण रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
Train No. 06075 / 06076 Nagarcoil – Panvel – Nagarcoil Special (weekly) :
Train No. 06075 Nagarcoil – Panvel Special (weekly) :
ही गाडी दिनांक २८/११/२०२३ ते १६/०१/२०२३ पर्यंत दर मंगळवारी नागरकोईल या स्थानकावरुन सकाळी  ११:४०  वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी रात्री २२:२० वाजता पनवेल या स्थानकावर पोहोचेल.
Train No. 06076  Panvel – Nagarcoil  Special (weekly) :
ही गाडी दिनांक २९/११/२०२३ ते १७/०१/२०२३ पर्यंत दर बुधवारी पनवेल या स्थानकावरुन रात्री २३:५० वाजता सुटेल व ती तिसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता नागरकोईल या स्थानकावर पोहोचेल.
या गाडीचे कोकणातील थांबे
रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगांव
 
डब्यांची संरचना
एसएलआर – ०2 + जनरल – 02 + स्लीपर – 11 + थ्री टायर एसी – 05 + टू टायर एसी – 01   असे मिळून एकूण 21 डबे

Loading

येत्या शुक्रवारी कोकण रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक; तीन गाड्यांच्या वेळापत्रकांवर परिणाम

Konkan Railway News: कोकण रेल्वे मार्गावर येत्या शुक्रवारी रत्नागिरी ते वैभववाडी  रोड या विभागां दरम्यान  रेल्वेच्या मालमत्तेच्या देखभालीसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी  ०८:३० ते ११:०० या वेळेत हा ब्लॉक असणार आहे. या मेगाब्लॉक मुळे कोंकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या ३  गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
१) Train no. 16346 Thiruvananthapuram Central – Lokmanya Tilak (T) Netravati Express
दिनांक ३० नोव्हेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी उडपी ते कणकवली या स्थानकांदरम्यान  २ तास ३०  मिनिटे उशिराने चालविण्यात येणार आहे. 
२) Train no. 10106 Sawantwadi Road – Diva Express
दिनांक ०१ डिसेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी सावंतवाडी रोड ते कणकवली या स्थानकांदरम्यान ३०   मिनिटे उशिराने चालविण्यात येणार आहे. 
३) Train no. 12051 Mumbai CSMT – Madgaon Jn. Janshatabdi Express
दिनांक ०१ डिसेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी रत्नागिरी स्थानकावर १० मिनिटे थांबवून ठेवण्यात येणार आहे. 

Loading

सावंतवाडी टर्मिनस प्रेमी व समर्थकांची श्रीराम वाचन मंदिर येथे उद्या रविवारी सभा

सावंतवाडी :सावंतवाडी रोड स्थानकाला टर्मिनसचा दर्जा देण्यासाठी व नवीन रेल्वे गाड्यांना सावंतवाडी स्थानकात थांबा मिळण्यासाठी पुरेसे माध्यम असताना तसेच या स्थानकावरील अवलंबून प्रवासी वर्गाला, सावंतवाडीतील नागरिकांना, वेंगुर्ले व दोडामार्ग मधील नागरिकांना आणि कोकण रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विश्वासात न घेता कोकण रेल्वे प्रशासनाने वारंवार सावंतवाडी टर्मिनस (?) वर जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याने सावंतवाडीवासियांनी एकदिलाने व एकजुटीने वेळीच एकत्र येऊन कोकण रेल्वे प्रशासनाविरोधात लढ्यासाठी चर्चा आणि विचार विनिमय करून कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी, व सावंतवाडी रेल्वे टर्मिनस बचाव समिती 2.0 स्थापन करण्यासाठी सावंतवाडी टर्मिनस प्रेमी व समर्थकांची सभा रविवार दिनांक २६/११/२०१३ रोजी सकाळी ११.०० वाजता श्री राम वाचन मंदिर सावंतवाडी येथे आयोजित केली असल्याचे सावंतवाडी टर्मिनस प्रेमी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले असून या सभेस सावंतवाडी टर्मिनस प्रेमी व समर्थकांनी उपस्थित राहण्याचे आवाहनही केले आहे.

अलीकडेच कोकण रेल्वेच्या एका बड्या अधिकाऱ्याने सावंतवाडीकरांना रेल्वेच तिकीट परवडत नाही म्हणून खिल्ली उडवली होती तोच प्रत्यय पुन्हा देखील घडला, ही अपमानास्पद वागणूक न कळतपणे सावंतवाडीकरांची आहे.या साठी सनदशीर तसेच कायदेशीर मार्गाने जाण्याची तयारी केली पाहिजे, या संदर्भात तरी या सभेला आपली उपस्थिती प्रार्थनीय असून या सभेस आपली उपस्थिती नोंदवावी असे आवाहन ॲड, श्री संदीप निंबाळकर, श्री अभिमन्यू लोंढे, श्री मिहिर मठकर आणि भूषण बांदिवडेकर यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

 

Loading

महत्त्वाचे: हिवाळी पर्यटन आणि ख्रिसमससाठी चालविण्यात येणार्‍या गाड्यांच्या आरक्षणाची तारीख जाहीर.

Konkan Railway News 20/11/2023 : ख्रिसमस आणि नवीन वर्ष साजरे करण्यासाठी गोव्याला मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देतात. त्यांच्या सोयीसाठी रेल्वे तर्फे मुंबई आणि पुण्यावरून काही विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. आज या गाड्यांच्या आरक्षणाची तारीख पण जाहीर करण्यात आली आहे.

1)खालील विशेष गाड्यांचे आरक्षण उद्या दिनांक 21 नोव्हेंबर पासून पिआरएस PRS काऊंटर वर आणि अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध करण्यात येणार आहे.

Train nos. 01151 / 01152 Mumbai CSMT – Thivim – Mumbai CSMT (Daily) Special,

01445 / 01446 Pune – Karmali – Pune (Weekly) Special,

01447 / 01448 Panvel – Karmali – Panvel (Weekly) Special

2)खालील विशेष गाड्यांचे आरक्षण परवा दिनांक 22 नोव्हेंबर पासून पिआरएस PRS काऊंटर वर आणि अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध करण्यात येणार आहे.

01455 / 01456 Lokmanya Tilak (T) – Karmali – Lokmanya Tilak (T) (Weekly) Special

01459 / 01460 Lokmanya Tilak (T) – Karmali – Lokmanya Tilak (T) (Weekly) Special

Source – Railway Notification

 

 

 

Loading

येत्या मंगळवारी कोकण रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक; दोन गाड्यांच्या वेळापत्रकांवर परिणाम

Konkan Railway News: कोकण रेल्वे मार्गावर येत्या मंगळवारी करंजाडी ते कामथे विभागां दरम्यान  रेल्वेच्या मालमत्तेच्या देखभालीसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. दुपारी १२:४० ते १५:१० या वेळेत हा ब्लॉक असणार आहे. या मेगाब्लॉक मुळे कोंकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या २  गाड्यांच्या वेळापत्रकांवर परिणाम होणार आहे.
१) Train no. 02197 Coimbatore – Jabalpur Special
दिनांक २० नोव्हेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी मडगाव ते संगमेश्वर रोड या स्थानकांदरम्यान  ११० मिनिटे उशिराने चालविण्यात येणार आहे. 
१) Train no. 10106 Sawantwadi Road – Diva Express
दिनांक २१ नोव्हेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी सावंतवाडी ते संगमेश्वर रोड या स्थानकांदरम्यान ७०  मिनिटे उशिराने चालविण्यात येणार आहे. 

Loading

ख्रिसमस आणि हिवाळी पर्यटनासाठी कोकण रेल्वे मार्गावर अजून ४ विशेष गाड्यांची घोषणा

Konkan Railway News:हिवाळी पर्यटन हंगाम तसेच ख्रिसमस साठी गोव्याकडे येणाऱ्या रेल्वे प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन कोकण रेल्वे मार्गावर आणखी चार विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय कोकण रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
1) Train no. 01453 / 01454 Lokmanya Tilak (T) –  Mangaluru Jn. – Lokmanya Tilak (T) Special (Weekly):
Train no. 01453 Lokmanya Tilak (T) –  Mangaluru Jn. Special (Weekly):
ही गाडी दिनांक  २२/१२/२०२३  आणि  २९/१२/२०२३  या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावरुन रात्री  २२:१५  वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी संध्याकाळी १७:०५ वाजता मंगुळुरु या स्थानकावर पोहोचेल.
Train no. 01454   Mangaluru Jn. -Lokmanya Tilak (T) Special (Weekly):
ही गाडी दिनांक  २३/१२/२०२३  आणि  ३०/१२/२०२३  या दिवशी मंगुळुरु या स्थानकावरुन संध्याकाळी १८:४५   वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी दुपारी १४:२५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावर पोहोचेल.
या गाडीचे थांबे
ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगांव, कानाकोना,  कारवार, कुमठा, मुरुडेश्वर, भटकळ, कुंदापूर, उडुपी, मुल्की आणि सुरतकल
डब्यांची संरचना
एसएलआर – ०2 + जनरल – 05 + स्लीपर – 08 + थ्री टायर एसी – 05 + टू टायर एसी – 01   असे मिळून एकूण 21 डबे
2)  Train no. 01455 / 01456 Lokmanya Tilak (T) – Karmali – Lokmanya Tilak (T) Special (Weekly):
 Train no. 01455 Lokmanya Tilak (T) – Karmali Special (Weekly):
ही गाडी दिनांक  २४/१२/२०२३  आणि  ३१/१२/२०२३  या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावरुन रात्री  २२:१५  वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी सकाळी ११:१५ वाजता करमाळी या स्थानकावर पोहोचेल.
Train no. 01456 Karmali –  Lokmanya Tilak (T) Special (Weekly):
ही गाडी दिनांक  २५/१२/२०२३  आणि  ०१/०१/२०२४ या दिवशी करमाळी या स्थानकावरुन सकाळी ११:४५ वाजता सुटेल व ती त्याच दिवशी रात्री  २३:४५  वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावर पोहोचेल.
या गाडीचे थांबे
ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी,राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम
डब्यांची संरचना
एसएलआर – ०2 + जनरल – 05 + स्लीपर – 08 + थ्री टायर एसी – 05 + टू टायर एसी – 01   असे मिळून एकूण 21 डबे
3)  Train no. 01155 / 01156 Lokmanya Tilak (T) –  Mangaluru Jn. – Lokmanya Tilak (T) Special (Weekly):
Train no. 01155 Lokmanya Tilak (T) –  Mangaluru Jn. Special (Weekly):
ही गाडी दिनांक  २६/१२/२०२३  आणि ०२/०१/२०२४ या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावरुन रात्री  २२:१५  वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी संध्याकाळी १७:०५ वाजता मंगुळुरु या स्थानकावर पोहोचेल.
Train no. 01156 Mangaluru Jn. – Lokmanya Tilak (T)   Special (Weekly):
ही गाडी दिनांक  २७/१२/२०२३  आणि  ०३/०१/२०२४  या दिवशी मंगुळुरु या स्थानकावरुन संध्याकाळी १८:४५   वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी दुपारी १४:२५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावर पोहोचेल.
या गाडीचे थांबे
ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगांव, कानाकोना,  कारवार, कुमठा, मुरुडेश्वर, भटकळ, कुंदापूर, उडुपी, मुल्की आणि सुरतकल
डब्यांची संरचना
थ्री टायर एसी – 15 + टू टायर एसी – 03  + फर्स्ट एसी – 01  + पॅन्टरी कार  – ०1 +  जनरेटर  कार – 02  असे मिळून एकूण  22 LHB डबे
4) Train no. 01459 / 01460 Lokmanya Tilak (T) – Karmali – Lokmanya Tilak (T) Special (Weekly):
Train no. 01459  Lokmanya Tilak (T) – Karmali Special (Weekly):
ही गाडी दिनांक  २१/१२/२०२३  आणि  २८/१२/२०२३  या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावरुन रात्री  २२:१५  वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी सकाळी ११:१५ वाजता करमाळी या स्थानकावर पोहोचेल.
Train no. 01460 Karmali  –  Lokmanya Tilak (T) Special (Weekly):
ही गाडी दिनांक  २२/१२/२०२३  आणि  २९/१२/२०२४ या दिवशी करमाळी या स्थानकावरुन सकाळी ११:४५ वाजता सुटेल व ती त्याच दिवशी रात्री  २३:४५  वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावर पोहोचेल.
या गाडीचे थांबे
ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी,राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम
डब्यांची संरचना
थ्री टायर एसी – 15 + टू टायर एसी – 03  + फर्स्ट एसी – 01  + पॅन्टरी कार  – ०1 +  जनरेटर  कार – 02  असे मिळून एकूण  22 LHB डबे

Loading

“भीक नको, पण…..” सावंतवाडीकरांच्या मागण्यांची कोकण रेल्वे अधिकाऱ्यांकडून थट्टा 

सावंतवाडी :सावंतवाडी रेल्वे स्थानकावर बऱ्याच सुविधेंचा अभाव आहे. येथून मिळणारे उत्त्पन्न तुलना केल्यास चांगले असूनही खूप कमी गाडयांना येथे थांबे आहेत. टर्मिनस चे काम अपुरे आहेत. असे अनेक प्रश्न असल्याने सावंतवाडीकर कधी कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांना, तर कधी राजकीय पुढाऱ्यांना निवेदने देत आहेत. तरीही सर्वच प्रश्नच तसेच आहे. उलट सावंतवाडीकरांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे प्रकार कोकण रेल्वेच्या उच्च अधिकाऱ्यांकडून होताना दिसत आहेत. निवेदने स्वीकारताना दिलेल्या निवेदनाची अक्षरशः थट्टा केली जात असल्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे आता सावंतवाडीकरांना कोकण रेल्वे प्रशासनाने ‘भीक नको पण कुत्रा आवर’ या म्हणीप्रमाणे म्हणण्याची वेळ आणून ठेवली आहे.

काल कोकण रेल्वे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री संजय गुप्ता सावंतवाडी स्थानकाच्या भेटीला आले असता आपल्या ग्रुप तर्फे मिहिर मठकर, विनायक गवस आणि भूषण बांदिवडेकर यांनी सावंतवाडी स्थानकातील गैरसोयी बद्दल निवेदन दिले परंतु श्री गुप्ता यांनी दिलेल्या निवेदनाची अक्षरशः थट्टा केली. ते या वरही ना थांबता स्वर्गीय डी के सावंत यांच्याबद्दल टिपण्णी केली असल्याचा आरोप मिहिर मठकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केला आहे. यावेळचा विडिओ देखील त्यांनी बनवला असून त्यात श्री संजय गुप्ता हे या मागण्यांची चेष्ठा करताना दिसत आहेत.

मागे ऑगस्ट महिन्यात मीहिर मठकर आणि सुरेंद्र नेमळेकर यांनी कोंकण रेल्वे कॉर्पोरेशनच्या बेलापूर ऑफिस मधे चीफ ऑपरेटिंग मॅनेजर श्री वी.स. सिन्हा यांची भेट घेतली होती. त्यावेळी सावंतवाडी स्थानकावरील राजधानी एक्सप्रेस या गाडीचा थांबा पूर्ववत करावा तसेच वंदे भारत तसेच अन्य गाडयांना या स्थानकावर थांबा मिळावा यासाठी निवेदन देण्यात आले होते. मात्र त्यावेळी वी.स. सिन्हा यांनी राजधानी सारख्या गाड्यां मधून प्रवास करण्याची सावंतवाडीकरांची कुवत नाही असे अपमानास्पद विधान केले होते.

 

Loading

कोकण रेल्वेमध्ये १९० जागांसाठी भरती; ‘असा’ करा अर्ज

मुंबई : कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या काही रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० डिसेंबर २०२३ आहे. कोकण रेल्वे भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
पदाचे नाव –
पदवीधर अप्रेंटिस, जनरल स्ट्रीम पदवीधर अप्रेंटिस, टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस
एकूण रिक्त पदे – १९०
शैक्षणिक पात्रता –
  • पदवीधर अप्रेंटिस : संबंधित विषयात इंजिनीअरिंग.
  • जनरल स्ट्रीम पदवीधर अप्रेंटिस : B.A/ B.Com/ B.Sc/ BBA /BMS/पत्रकारिता आणि जनसंवाद/ व्यवसाय अभ्यास पदवी.
  • टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस : संबंधित विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा.
वयोमर्यादा –
खुला प्रवर्ग – १८ ते २५ वर्षे.
ओबीसी – ३ वर्षे सूट.
मागासवर्गीय – ५ वर्षे सूट.
अर्ज फी –
खुला/ ओबीसी प्रवर्ग – १०० रुपये.
मागासवर्गीय/ महिला/ EWS – फी नाही.
नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र-गोवा आणि कर्नाटक.
अधिकृत वेबसाईट – https://konkanrailway.com/
महत्वाच्या तारखा –
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – १५ नोव्हेंबर २०२३
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० डिसेंबर २०२३
भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील जाहिरात अवश्य पाहा.

Loading

ख्रिसमस आणि हिवाळी पर्यटनासाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्यांची घोषणा

Konkan Railway News: पुढील महिन्यात कोकणात गावी कोकणवासीयांची आणि गोव्यात जाणाऱ्या पर्यटकांसाठी एक महत्वाची  बातमी आहे. कोकण रेल्वे मार्गावर ख्रिसमस तसेच हिवाळी पर्यटन हंगामासाठी तीन विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते थिवी, पुणे करमाळी तसेच पनवेल ते करमाळी या मार्गांवर या विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत.
१) गाडी क्र. ०११५१ / ०११५२ मुंबई सीएसएमटी – थिविम – मुंबई सीएसएमटी विशेष (दैनिक)
या संदर्भात रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार गाडी क्र. 01151 मुंबई CSMT – थिविम स्पेशल म्हणून रोज धावणार आहे 22/12/2023 ते 02/01/2024 पर्यंत ही गाडी जाणार आहे. मुंबई CSMT येथून दररोज 00.20 वाजता हि गाडी सुटे आणि त्याच दिवशी 14.00 वाजता थिविमला पोहोचेल.
गाडी क्र. 01152 थिविम – मुंबई सीएसएमटी स्पेशल (दैनिक) गाडी असेल. थिविम येथून हि गाडी 22/12/2023 ते 02/01/2024 पर्यंत दररोज 15.00 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 03.50 वाजता मुंबई सीएसएमटीला पोहोचेल.
या गाडीचे थांबे
ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि पेडणे स्थानकांवर थांबेल.
डब्यांची संरचना
ही गाडी एकूण 22 डब्यांची असेल. त्यात दोन टायर एसी – 01 कोच, थ्री टायर एसी – 03 कोच, स्लीपर – 11 कोच, जनरल – 05 डबे, एसएलआर – 02 अशी रचना असेल.
२) गाडी क्र. ०१४४५ / ०१४४६ पुणे जं. – करमाळी – पुणे जं. विशेष (साप्ताहिक)
गाडी क्र. ०१४४५ पुणे जं. – करमाळी विशेष (साप्ताहिक) पुणे जंक्शन शुक्रवार, 22/12/2023 आणि 29/12/2023 रोजी 17:30 वाजता सुटून ट दुसऱ्या दिवशी सकाळी 8.30 वाजता करमाळीला पोहोचेल.
परतीच्या प्रवासात गाडी क्र. ०१४४६ करमाळी – पुणे जं. विशेष (साप्ताहिक) रविवार, 24/12/2023 आणि 31/12/2023 रोजी करमाळी येथून 09:20 वाजता सुटेल आणि पुणे जंक्शनला त्याच दिवशी 23:35 वाजता पोचेल.
या गाडीचे थांबे
ही गाडी लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम स्थानकांवर थांबणार आहे.
डब्यांची संरचना
एकूण 22 कोच = दोन टायर एसी – 01 कोच, थ्री टायर एसी – 04 कोच, स्लीपर – 11 कोच, जनरल – 04 कोच, SLR – 02.
3) गाडी क्र. ०१४४८ / ०१४४७ करमाळी – पनवेल – करमाळी विशेष (साप्ताहिक) :
गाडी क्र. 01448 करमाळी – पनवेल विशेष (साप्ताहिक) शनिवार, 23/12/2023 आणि 30/12/2023 रोजी करमाळी येथून 09:20 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 20:15 वाजता पनवेलला पोहोचेल.
गाडी क्र. 01447 पनवेल – करमाळी विशेष (साप्ताहिक) शनिवार, 23/12/2023 आणि 30/12/2023 रोजी पनवेल येथून 22:00 वाजता सुटेल. ट्रेन दुसऱ्या दिवशी सकाळी 8.30 वाजता करमाळीला पोहोचेल.
या गाडीचे थांबे
ही गाडी थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड आणि रोहा स्थानकावर थांबेल.
डब्यांची संरचना
एकूण 22 कोच = दोन टायर एसी – 01 कोच, थ्री टायर एसी – 04 कोच, स्लीपर – 11 कोच, जनरल – 04 कोच, SLR – 02.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search