Category Archives: कोकण रेल्वे

कोरोनाकाळापासून बंद असलेला तुतारी एक्सप्रेसचा नांदगाव रोड थांबा पूर्ववत

Konkan Railway News : नांदगाव रोड प्रवाशांसाठी रेल्वेकडून एक खुशखबर आहे. रेल्वे मंत्रालयाने गाडी क्रमांक ११००३/११००४ दादर – सावंतवाडी रोड – दादर तुतारी एक्स्प्रेस  नांदगाव रोड स्थानकावर प्रायोगिक तत्त्वावर खाली दिलेल्या तारखांपासून तात्काळ थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोना पूर्व काळात या गाडीला नांदगाव येथे थांबा होता. मात्र कोरोना लॉकडाउन मुळे हा थांबा बंद करण्यात आला होता. त्यानंतर तो आजपर्यंत चालू केला नाही होता. प्रवाशांनी वारंवार मागणी केल्याने हा थांबा पुन्हा देण्यात आला आहे.
उद्या दिनांक ४ ऑगस्ट पासून हि गाडी नांदगाव रोड या स्थानकावर थांबणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे.
नांदगाव रोड या स्थानकावर या गाडीची वेळ खालीलप्रमाणे असेल
११००३ दादर – सावंतवाडी रोड तुतारी एक्सप्रेस    –  09:48 / 09:50
११००४ सावंतवाडी रोड – दादर तुतारी एक्सप्रेस    –  19:04 / 19:06

Loading

तुतारी एक्सप्रेस एलएचबी कोचसहित चालविण्यात यावी – कोंकण विकास समिती

Konkan Railway News :कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची अडचण लक्षात घेऊन काल दिनांक ०२ ऑगस्ट रोजी कोंकण विकास समितीने रेल्वे राज्य मंत्री मा. श्री. रावसाहेब दानवे, मध्य रेल्वे महाव्यवस्थापक व विभागीय रेल्वे व्यवस्थापक (मुंबई) यांच्याकडे काही महत्वाच्या मागण्यांसाठी निवेदन लेखी दिले आहे.

यातील एक मागणी म्हणजे ११००३/११००४ तुतारी एक्सप्रेसचे जुनाट डबे बदलून आधुनिक एलएचबी डबे Linke Hofmann Busch (LHB) वापरून ही गाडी चालवणे ही आहे. प्रवाशांचा प्रवास सुखकर, सुरक्षित आणि आरामदायक व्हावा या हेतूने ही मागणी केली गेली आहे. या आधी मुंबई ते मडगाव दरम्यान धावणार्‍या कोकणकन्या एक्सप्रेस , मांडवी एक्सप्रेस, दिवा- सावंतवाडी तसेच एलटीटी-मडगाव या गाड्या एलएचबी कोच सहित धावत आहेत.

का होत आहे ही मागणी? 

अधिक सुरक्षित: एलएचबी डबे जर्मन तंत्रज्ञानाचे असून ते लोखंडाऐवजी स्टेनलेस स्टील पासून बनलेले आहेत.दोन ट्रेनची टक्कर जरी झाली किंवा रूळांवरून ट्रेन घसरली तरी या हलक्या डब्यांमुळे कमी जीवितहानी होते.

जलद प्रवास:हे डबे दर ताशी 130 कि.मी. वेगाने धावण्याच्या क्षमतेचे असतात. या कारणाने प्रवास जलद होतो

अधिक प्रवासी क्षमता :एलएचबी डबे पारंपारिक डब्यांपेक्षा 1.7 मीटरने लांब असल्याने त्यात जादा प्रवाशांना बसता येते.

मेन्टेनन्स कमी :रेल्वेच्या पारंपारिक डब्यांची दर 18 महिन्याला मेन्टेनन्स करावे लागते. तर नव्या एलएचबी डब्यांना दोन वर्षांतून एकदा मेन्टेनन्ससाठी कारखान्यात पाठवावे लागते.

आधुनिक तंत्रज्ञान :तसेच हे डबे नव्या थ्री फेज तंत्राचे असल्याने ‘हेड ऑन जनरेशन’साठी (ओएचईच्या वीजेवर डब्यातील वीज उपकरणे चालविणे ) अत्यंत योग्य असतात. आयसीएफचे जुने पारंपारिक कोच टू फेजचे असल्याने त्यात ‘हेड ऑन जनरेशन’ तंत्र वापरण्यासाठी सर्कीट बदल करावा लागतो. नव्या तंत्रज्ञानाच्या एलएचबी डब्यांसाठी हे ‘हेड ऑन जनरेशन’ तंत्र लागलीच वापरता येते.

अधिक आरामदायक :दोन्ही प्रकारच्या कोचची तुलना करता एलएचबी अधिक आरामदायक आहेत.

वरील सर्व बाबी लक्षात घेवून आम्ही ही मागणी करत असल्याचे कोंकण विकास समितीने आपल्या निवेदनात नमूद केले आहे.

या मागणी व्यतिरिक्त २२११९/२२१२० तेजस एक्सप्रेस आणि ११०९९/१११०० लोकमान्य टिळक टर्मिनस मडगाव एक्सप्रेस या गाड्यांना वैभववाडी रोड येथे थांबा देण्याची मागणी एका स्वतंत्र निवेदनात केली गेली आहे.

यावेळी संस्थापक अध्यक्ष श्री. जयवंत शंकरराव दरेकर व श्री. अक्षय मधुकर महापदी उपस्थित होते.

 

[pdf-embedder url=”https://kokanai.in/wp-content/uploads/2023/08/wp-1691038912309.pdf”] [pdf-embedder url=”https://kokanai.in/wp-content/uploads/2023/08/wp-1691038868292.pdf”]

 

Loading

वंदे भारत एक्सप्रेसला चिपळुणात थांबा मिळावा या मागणीसाठी आ. शेखर निकम यांची रेल्वे राज्यमंत्र्यांशी भेट

 

नवी दिल्ली: कोकण रेल्वे मार्गावर मुंबई ते मडगाव दरम्यान हायस्पीड वंदे भारत रेल्वे सुरू झाली आहे, पण या रेल्वेला रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी व खेड अशा दोनच ठिकाणी थांबा आहे. चिपळूण हे रत्नागिरी जिल्ह्याचे मध्यवर्ती व महत्त्वाचे ठिकाण असल्याने चिपळूण येथे वंदे भारत रेल्वेला थांबा मिळावा, यासाठी आमदार शेखर निकम यांनी सोमवारी सकाळी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली.
वंदे भारत ट्रेनला थांबा मिळावा, यासह अन्य विषयांवर या वेळी आमदार शेखर निकम यांनी ना. रावसाहेब दानवे यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

यावेळी अजितदादा पवार राष्ट्रवादीचे बाबाजीराव जाधव, जिल्हा बँक संचालक राजू सुर्वे, राष्ट्रवादीचे नेते अजित यशवंतराव, सामाजिक कार्यकर्ते संजीव अणेराव आदी उपस्थित होते. आमदार शेखर निकम यांच्या निवेदनावर रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

Loading

दरडीचा धोका टाळण्यासाठी एक्सप्रेस कोकण रेल्वे मार्गे वळवली आणि ४५ प्रवाशांना न घेताच पुढे गेली; नेमका प्रकार काय ?

Express Missed to Passengers : तुमच्या कडे एका गाडीचे आरक्षित तिकीट आहे. गाडी पकडण्यासाठी अर्धा किंवा एक तास आधी तुम्ही स्थानकावर पोहोचता आणि तुम्हाला समजते की तुमची गाडी दीड तास अगोदर निघून गेली. किती मनस्ताप होईल तुमचा? असाच मनस्ताप गुरुवारी मनमाड स्थानकावर 45 प्रवाशांना सहन करावा लागला. कारण त्यांची गाडी त्यांना न घेता दीड तास अगोदरच स्थानकावरून रवाना झाली होती.

वास्को-निजामुद्दीन गोवा एक्स्प्रेस (12779) वास्को येथून हुबळी, मिरज, पुणे, दौंड, मनमाडमार्गे ती दिल्लीसाठी मार्गस्थ होते. दरम्यान या गाडीची मनमाड रेल्वे स्थानकात येण्याची वेळ सकाळी 10.30 ही आहे. मात्र, गुरुवारी ही रेल्वे मनमाड रेल्वे स्थानकात सकाळी 9.30 वाजता आली व पाच मिनीटे थांबून पूढे मार्गस्थ झाली.

रेल्वे गाडी नियोजीत वेळेच्या दीड तास आधीच मार्गस्थ झाल्याने या गाडीच्या प्रवासाचे आरक्षण करणारे 45 पेक्षा अधिक प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली. त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

झालेला प्रकार लक्षात येताच रेल्वे प्रशासनाने मुंबईहून हावडाला जाणाऱ्या गितांजली एक्सप्रेसला मनमाड रेल्वे स्थानकात विशेष थांबा देवून गोवा एक्सप्रेसचे आरक्षण केलेल्या 45 हून अधिक प्रवाशांना गीतांजली एक्सप्रेसमध्ये बसविण्यात आले. यावेळी गोवा एक्सप्रेसला जळगाव रेल्वे स्थानकात थांबविण्यात आले होते. गीतांजली एक्सप्रेसने आलेल्या प्रवाशांना गोवा एक्सप्रेसमध्ये बसविण्यात आले.

दरडी कोसळत असल्याने मार्गात बदल

सतत पडणाऱ्या पावसामुळे कर्नाटकातील हुबळी भागातीलल रेल्वे मार्गावर दरडी कोसळत आहेत. त्यामुळे प्रवासी रेल्वे गाड्या नियमीत मार्गाने न जाता रत्नागिरी-रोहा-पनवेल-कल्याणमार्गे वळविण्यात आल्या आहेत. मार्ग बदलण्यात आल्यामुळे गोवा एक्सप्रेस दीड तास आधीच मनमाड रेल्वे स्थानकात पोहचली.

“गोवा एक्सप्रेस नियोजित वेळेआधीच पोचल्याने प्रवाशांचा गोंधळ उडाला. मार्ग बदलण्यात आल्याने वास्को-निजामुद्दीन गोवा एक्स्प्रेस मनमाड रेल्वे स्थानकात दीड तास आधीच पोचली. ही रेल्वेच्या संबंधित विभागाची चूक असल्याचे लक्षात आले असून याबाबत चौकशी करून कारवाई करण्यात येईल” अशी माहिती शिवराज मानसपुरे एका वृत्तवाहिनीला दिली.

Loading

कोईमतुर-हिसार एक्सप्रेसला महिनाभरासाठी अतिरिक्त डबे

Konkan Railway News  – प्रवाशांचा प्रतिसाद वाढल्यामुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या कोईमतुर-हिसार एक्सप्रेसला गाडीला तात्पुरत्या स्वरूपात डबे वाढवण्यात आले आहेत . 

कोकण रेल्वेकडून प्राप्त माहितीनुसार हरियाणा राज्यातील हिसार जंक्शन ते तामिळनाडूमधील कोयमतुर दरम्यान धावणाऱ्या 22475/ 22476 या गाडीला सप्टेंबर पहिल्या महिन्याभरासाठी  वातानुकलीत टू टायर श्रेणीचे दोन अतिरिक्त कोच जोडले जाणार आहेत. त्यामुळे या गाडीच्या डब्यांची संख्या 21 होणार आहे. 

या संदर्भात रेल्वे कडून प्राप्त माहितीनुसार हिसार जंक्शन ते कोईमतुर या मार्गावर धावताना  गाडी क्रमांक 22475 ला 02 ऑगस्ट  ते 31 ऑगस्ट 2023 तर कोईमतुर ते हिसार जंक्शन या मार्गावर धावताना गाडी क्रमांक 22476 ला 5 ऑगस्ट ते 02 सप्टेंबर 2023 या कालावधीत गाडीला वाढीव दोन डबे जोडले जातील

 

Loading

सावंतवाडी स्थानकाचे नामकरण ”प्राध्यापक मधू दंडवते टर्मिनस” करण्याच्या व ईतर मागण्यांसाठी कोकण रेल्वे प्रवासी संघाचे रेल्वे मंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्ग | सागर तळवडेकर : गेली अनेक वर्षे रेंगाळलेले सावंतवाडी टर्मिनस चे काम पूर्ण करून त्याचे “प्राध्यापक मधू दंडवते टर्मिनस” असे नामकरण करावे आणि महत्वाचा अशा रेल्वे गाड्यांना येथे थांबा द्यावा असे निवेदन कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ (रजिस्टर) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, खासदार विनायक राऊत आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रविन्द्र चव्हाण यांना पाठवले आहे.

या पत्राचा मजकूर पुढीलप्रमाणे

कोकण रेल्वे मार्गावर मुंबई ते ठोकूर असा कोकण रेल्वे मार्ग असला तरी महाशय कोकण रेल्वे प्रवासी यांचा रेल्वे प्रवास वा कोकणवासियांच्या तळ कोकणातील अत्यंत अतिमहत्वाचे स्थानक “सावंतवाडी रोड” होय. कालांतराने आता सावंतवाडी रोड रेल्वे स्थानक असे नावारूपास आले. कोकणवासियांच्या महत्त्वाच्या मेल/ एक्सप्रेस मधील जनशताब्दि एक्स., मांडवी एक्स., कोकणकन्या एक्स,. या गाड्यांव्यतिरिक्त तुतारी एक्स. व दिवा एक्स. सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकात दैनंदिन प्रकारात आग कोकणवासियांना या एक्सप्रेस गाड्यांचा बराच मोठा फायदा तर होतोच आहे; परंतु दैनंदिन गाड्यांच्या तुलनेत आणि सावंतवाडी हे तळकोकण चे रेल्वे स्थानक असल्यामुळे खालील काही मुद्दे मांडत सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकासाठी अधिक थांब्यासाठी काही गाड्यांची मागणी करीत आहोत असे राजू कांबळे यांनी सांगितले.

१. सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकास टर्मिनल्स चा दर्जा मिळावा यासाठी पूरेपूर यशस्वी प्रयत्नशील राहत कार्य सिद्धीस करावे.

२. सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकास कोकण रेल्वे मार्गाचे शिल्पकार आदरणीय प्रा. मधू दंडवते साहेब यांचे नाव देवून *प्रा. मधू दंडवते टर्मिनल्स* असे नामकरण करण्यात यावे.

३. सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकात आरक्षण तिकीट विक्री खिडकी सायंकाळी ७ वाजेपर्यंत चालू ठेवण्यात यावी.

३. गाडी क्र.१२६१८/१२६१७ मंगला लक्षद्विप एक्सप्रेस, निजामउद्दीम-एर्नाकूलम/ एर्नाकूलम-निजामउद्दीम. या दैनंदिन गाड्यंस सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकात थांबा देण्यात यावा.

४. गाडी क्र. १६३४५/१६३४६ नेत्रावती एक्सप्रेस, लो. टिळक टर्मि.-तिरूवअनंतपूरम/तिरूवअनंतपूरम-लो. टिळक टर्मि. या दैनंदिन गाड्यांस सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकास थांबा देण्यात यावा.

५. गाडी क्र. १२६१९/१२६२० मत्स्यगंधा एक्सप्रेस, लो. टिळक टर्मि.-मेंगलोर सेन्ट्रल/मेंगलोर सेंट्रल-लो. टिळक टर्मि., या गाड्यांसही सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकास थांबा देण्यात यावा.

६. गाडी क्र. ०११३९/०११४० नागपूर-मडगांव विशेष/मडगांव-नागपूर विशेष गाडीस सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकास थांबा देण्यात यावा.

७. गाडी क्र. २२२२९/२२२३० वन्दे भारत एक्सप्रेस, मुंबई-मडगांव/मडगांव- मुंबई या वातानुकूलित गाडीस सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकात थांबा देण्याची मोठ्या प्रमाणात मागणी करीत आहोत.

महोदय, कोकणवासियांच्या गर्दीचा वाढता ओघ पाहता तसेच सावंतवाडी तालुक्यात बऱ्याच गावांचा

समूह असताना तळ कोकण म्हणून सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकास टर्मिनल्स चा दर्जा मिळालाच पाहिजे. त्याचप्रमाणे सदर गाड्यांस सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकात थांबे मिळाल्यास इतर गाड्यांवरील प्रवाशांचा गर्दीचा भार कमी होण्यास मदत होईल आणि जास्तीत जास्त कोकणवासियांना याचा बऱ्याच मोठ्या संख्येने लाभ घेता येईल. महोदय कृपया या निवेदनाचा प्रत्यक्षपणे सबब पाहता कार्य सिद्धीस आणावे ही समस्त कोकणवासियांची मनपेक्षा.

Loading

गणेशभक्तांना खुशखबर; मुंबई ते कुडाळ दरम्यान धावणार 18 अनारक्षित गाड्या


Special Unreserved Trains: गणेशोत्सव दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे मुंबई आणि कुडाळ दरम्यान 18 अतिरिक्त अनारक्षित गणपती विशेष गाड्या चालवणार आहे. या गाड्यांमुळे आता एकूण विशेष सेवा 266 एवढ्या झाल्या आहेत.

 

01185/01156 LTT-KUDL-LTT(Tri-Weekly) Unreserved Special 

01185  विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सोमवार, बुधवार आणि शनिवारी 13.09.2023 ते 02.10.2023 या कालावधीत 00.45 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 11.30 वाजता कुडाळ येथे पोहोचेल.

01186 स्पेशल कुडाळहून सोमवार, बुधवार आणि शनिवारी 13.09.2023 ते 02.10.2023 या कालावधीत 12.10 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 00.35 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

या गाडीचे थांबे : ठाणे,पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी,आडवली , विलवडे, राजपूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली आणि सिंधुदुर्ग येथे थांबे असतील.

डब्यांची संरचना : या गाडीला 2 लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅनसह 24 सामान्य द्वितीयश्रेणी डबे असतील.

 

Loading

IRCTC ची वेबसाइट मागील १० तासांपासून डाऊन; प्रवाशांची गैरसोय

IRCTC Ticket Booking Site Down : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. आज सकाळपासूनच ऑनलाईन रेल्वे तिकीट अॅप आणि संकेतस्थळ आयआरसीटीसी (IRCTC) बंद पडले आहे. आयआरसीटीसीचे संकेतस्थळ आणि अ‍ॅपवरून प्रवाशांना तिकीट बुकिंग आणि पेमेंटमध्ये काही तांत्रिक अडचणी येत आहेत.

आयआरसीटीसीकडून ट्विटर मध्ये पोस्ट केलेल्या ट्विटमध्ये सांगण्यात आले की, तांत्रिक कारणांमुळे तिकीट सेवा उपलब्ध नाही. आमची तांत्रिक टीम समस्येचे निराकरण करण्यासाठी काम करत आहे. समस्येचे निराकरण होताच, आम्ही त्याबद्दल माहिती देऊ. तो पर्यंत युजर्सनी Amazon, MakemyTrip या सारख्या रेल्वे आरक्षणाची सुविधा देणार्‍या सेवा वापराव्यात असे आवाहन रेल्वे तर्फे करण्यात आले आहे.

याबरोबरच रेल्वे आरक्षणासाठी काही महत्त्वाच्या स्थानकांवर अतिरिक्त तिकीट खिडक्या चालू करण्यात आल्या असल्याचे रेल्वे प्रशासना तर्फे सांगण्यात आले आहे.

Loading

कोकण रेल्वे मार्गावर उद्या ब्लॉक; ‘या’ गाडय़ांवर होणार परीणाम

Konkan Railway News : कोकण रेल्वे मार्गावरील खेड ते आरवली दरम्यान देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी उद्या दि. २५ जुलै २०२३ रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा मेगाब्लॉक दुपारी १ वाजल्यापासून सायंकाळच्या ४ वाजेपर्यंत असणार आहे. या मेगाब्लॉकमुळे कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या खालील गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.

1) दिनांक 24 जुलैला प्रवास सुरू होणारी कोईमतुर -जबलपूर 02197 ही विशेष गाडी मडगाव ते संगमेश्वर दरम्यान सुमारे अडीच तास थांबवून ठेवली जाईल.

2)दिनांक 25 रोजी प्रवास सुरू होणारी गाडी क्रमांक 10106 सावंतवाडी रोड -दिवा एक्सप्रेस ही गाडी सावंतवाडी ते संगमेश्वर दरम्यान २ तास रोखून जाणार आहे.

3)दिनांक 25 रोजी प्रवास सुरू होणारी गाडी क्रमांक 10104 मडगाव -मुंबई सी एस एम टी मांडवी एक्सप्रेस रत्नागिरी ते संगमेश्वर दरम्यान एक तास थांबवून ठेवली जाणार आहे.

Loading

गणेश चतुर्थीला गावी जाण्यासाठी तिकिटे नाहीत? काळजी नको; कोकण रेल्वे चालवणार अजून विशेष गाड्या

Specials Trains for Ganesha Festival : यंदा गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या भाविकांसाठी रेल्वेकडून एक खुशखबर आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी कोंकण रेल्वे आणि मध्य रेल्वे गणेशोत्सवादरम्यान अजून काही विशेष फेऱ्या चालविणारआहे, त्यामुळे ज्या चाकरमान्यांना याआधी जाहीर केलेल्या गाड्यांमध्ये आरक्षित तिकिटे भेटली नाहीत त्यांना तिकिटे मिळवण्याची एक अजून संधी मिळणार आहे. या विशेष फेऱ्या खालीलप्रमाणे असतील.




 

१) गाडी क्र. ०९००९ / ०९०१० मुंबई सेंट्रल – सावंतवाडी रोड – मुंबई सेंट्रल (आठवड्यातील ६ दिवस) विशेष भाडे:

गाडी क्रमांक ०९००९ मुंबई सेंट्रल – सावंतवाडी रोड (आठवड्यातील ६ दिवस) विशेष भाड्याने मुंबई सेंट्रल येथून सोमवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार १४/०९/२०२३ ते १८/०९/२०२३ आणि २०/०९/२०२३ ते ३०/०९/२०२३ पर्यंत दुपारी १२.०० वाजता सुटेल. गाडी दुसऱ्या दिवशी रात्री ०३.०० वाजता सावंतवाडी रोडला पोहोचेल.

गाडी क्रमांक ०९०१० सावंतवाडी रोड – मुंबई सेंट्रल (आठवड्यातील ६ दिवस) विशेष भाड्याने सावंतवाडी रोडवरून मंगळवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार १५/०९/२०२३ ते १९/०९/२०२३ आणि २१/०९/२०२३ ते ०१/१०/२०२३ पर्यंत सकाळी  ०५.०० वाजता सुटेल. ट्रेन त्याच दिवशी रात्री  २०:१० वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल

थांबे : बोरिवली, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ

डब्यांची रचना : एकूण २४ कोच = २ टायर एसी – ०१ कोच, ३ टायर एसी – ०५ कोच, स्लीपर – १२ कोच, जनरल – ०४ डबे, SLR – ०२.

२) गाडी क्रमांक ०९०१८/ ०९०१७ उधना – मडगाव जं. – उधना (साप्ताहिक) विशेष भाड्यावर विशेष:

गाडी क्र. ०९०१८ उधना – मडगाव जं. (साप्ताहिक) विशेष भाड्यावर उधना येथून शुक्रवार, 15/09/2023, 22/09/2023 आणि 29/09/2023 रोजी १५:२५ वाजता सुटेल. ट्रेन मडगाव जंक्शनला दुसऱ्या दिवशी सकाळी ०९:३० वाजता पोहोचेल.

गाडी क्र. ०९०१७ मडगाव जं. – उधना (साप्ताहिक) विशेष भाड्यावर शनिवार, 16/09/2023, 23/09/2023 आणि 30/09/2023 रोजी सकाळी १०:२० वाजता मडगाव जंक्शन येथून सुटेल ती दुसऱ्या दिवशी उधना येथे सकाळी  ०५:०० वाजता पोहोचेल.

थांबे : नवसारी, वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी.

डब्यांची रचना : एकूण २२ एलएचबी कोच = संमिश्र (प्रथम एसी + २ टायर एसी) – ०१ कोच, २ टायर एसी – ०२ कोच, ३ टायर एसी – ०६ कोच, स्लीपर – ०८ कोच, जनरल – ०३ डबे, एसएलआर – ०१, कार – ०१ कार.

३) ट्रेन क्र. ०९१५० / ०९१४९ विश्वामित्री – कुडाळ – विश्वामित्री (साप्ताहिक) विशेष भाड्यावर :

गाडी क्र. ०९१५० विश्वामित्री – कुडाळ साप्ताहिक विशेष भाड्यावर सोमवार, 18/09/2023 आणि 25/09/2023 रोजी सकाळी 10 वाजता विश्वामित्री येथून सुटेल. ट्रेन दुसऱ्या दिवशी सकाळी ०४:१० वाजता कुडाळला पोहोचेल.

गाडी क्र. ०९१४९ कुडाळ – विश्वामित्री साप्ताहिक विशेष भाड्यावर कुडाळ येथून मंगळवार, १९/०९/२०२३ आणि २६/०९/२०२३ रोजी सकाळी  ०६:३० वाजता सुटेल. ट्रेन दुसऱ्या दिवशी रात्री ०१:०० वाजता विश्वामित्रीला पोहोचेल.

थांबे : भरूच, सुरत, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली आणि सिंधुदुर्ग

डब्यांची रचना : एकूण २१ एलएचबी कोच : फर्स्ट एसी – ०१ कोच, २ टायर एसी – ०२ कोच, ३ टायर एसी – ०६ कोच, स्लीपर – ०८ कोच, जनरल – ०२ डबे, एसएलआर – ०१ , जनरेटर कार – ०१.

आरक्षण
या गाड्यांच्या आरक्षणाची तारीख अजून रेल्वे प्रशासनातर्फे जाहीर केली गेली नसून लवकरच ती जाहीर करण्यात येणार असल्याचे समजते.

वरील गाड्यांचे तपशीलवार थांबे आणि वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा.

 

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search