

कोल्हापूर: बेळगाव-चंदगड सावंतवाडी रेल्वे लवकरात लवकर सुरू करण्यासाठी मी स्वतः जातीने लक्ष घालीन. रेल्वे मंत्र्यांना लवकरच भेटून निधी आणण्यासाठी प्रयत्न करीन, असे आश्वासन खा. धनंजय महाडिक यांनी बेळगाव, चंदगड, सावंतवाडी रेल्वे संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाला दिले.
बेळगाव-चंदगड, सावंतवाडी रेल्वे हा रेल्वे मार्ग ११४.६ कि.मी.चा असून जवळपास १८०५ करोडचा खर्च अपेक्षित आहे. या रेल्वे मार्गाचा सर्व्हे रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात आला असून या रेल्वे मार्गामुळे चंदगड, आजरा व गडहिंग्लज या तालुक्याचा विकास अपेक्षित आहे. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्याचा दक्षिण विभाग रेल्वे मार्गाने देशाशी जोडला जाईल. या संदर्भात कोल्हापूर, बेळगावचे खासदार यांना प्रत्यक्ष भेटून संघर्ष समितीने निवेदने दिली आहेत.
खा. महाडिक यांना नेसरी येथे बेळगाव, चंदगड, सावंतवाडी रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश दळवी यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे सुरू करण्यासंदर्भात चर्चा करून निवेदन देण्यात आले. यावेळी कार्याध्यक्ष विजयकुमार दळवी, भाजप नेते संग्रामसिंह कुपेकर, चंदगड पंचायत समितीचे माजी सभापती बबनराव देसाई, संघर्ष समितीचे सरचिटणीस रवी नाईक, एकनाथ वाके आदी उपस्थित होते.
Short Termination of Trains at Thane & Dadar station. pic.twitter.com/aHbXddaILw
— Konkan Railway (@KonkanRailway) January 1, 2025
Content Protected! Please Share it instead.