मुंबई :कोकण रेल्वेमार्गाने प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाश्यांसाठी एक खुशखबर आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव ह्या स्थानकांदरम्यान धावणारी गाडी क्रमांक 11099 / 11100 LTT – MAO – LTT हि आठवड्यातून एका दिवशी चालवण्यात येणारी गाडी दिनांक ४ नोव्हेंबर पासून आठवड्यातून ४ दिवस म्हणजे प्रत्येक मंगळवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार ह्या दिवशी चालवण्यात येणार आहे.
रत्नागिरी: प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वे मार्गावर धावणार्या काही काही गाड्यांना तात्पुरत्या स्वरूपात अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे.
खालील गाड्या 1 अतिरिक्त स्लीपर कोच सहित चालविण्यात येणार आहे.
Train no. 22908 Hapa – Madgaon Express
दिनांक : 02/11/2022
Train no. 22907 Madgaon – Hapa Express
दिनांक : 04/11/2022
या दोन्ही गाड्यांचे कोकणातील थांबे
वसई, पनवेल, खेड, रत्नागिरी, कुडाळ
Train no. 20910 Porbandar – Kochuveli Express
दिनांक :03/11/2022
Train no. 20909 Kochuveli – Porbandar Express
दिनांक; 06/11/2022
या दोन्ही गाड्यांचे कोकणातील थांबे :
पालघर, वसई, पनवेल, रत्नागिरी
अधिक माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in ह्या संकेतस्थळास भेट द्यावी.
पुणे: वाडीवरवडे- मेस्त्रीवाडी येथील रहिवाशी भरत मेस्त्री यांना आर्ट बिट्स फॉउंडेशन पुणेच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय कला सन्मान २०२२ पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. ते हेळेकर दशावतारी नाट्यमंडळात कलाकार म्हणून कार्यरत आहेत.
आर्ट बिट्स फॉउंडेशन पुणेच्या वतीने दरवर्षी कला क्षेत्रातील कलाकारांना सन्मानित करण्यासाठी हा पुरस्कार देण्यात येतो. भरत मेस्त्री यांच्या कार्याची दखल घेऊन या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यात त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल.
रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या पावसाळी वेळापत्रक दि. १ नोव्हेंबरपासून बदलणार आहे. आता नव्या वेळापत्रकानुसार रेल्वे गाड्या धावणार आहेत. पावसाळ्यात होणारे अपघात टाळण्यासाठी दरवर्षी गाड्यांच्या वेगावर मर्यादा घालण्यात येतात. त्यामुळे वेळापत्रक बदलण्यात येते. कोकण रेल्वेमार्गावरील सर्व गाड्या पावसाळी वेळप्रत्रकानुसार चालविण्यात येत असतात. हे पावसाळी वेळापत्रक दि. १ नोव्हेंबरपासून समाप्त होत आहे आणि नवीन वेळापत्रकानुसार सर्व गाड्या चालविण्यात येणार आहेत.
दापोली :शिवसेनेचे नेते आणि राज्याचे माजी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या दापोलीतील मुरुड इथल्या साई रिसॉर्ट व सी कोंच रिसॉर्ट तोडण्यासाठी बांधकाम विभागाने निविदा मागवल्या आहेत. चिपळूणच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वृत्तपत्रात रविवारी (20 ओक्टोम्बर) जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. २७ ओक्टोम्बर २०२२ सकाळी १० वाजता ते १० नोव्हेंबर 2022 या कालावधीपर्यंत संध्याकाळी ६ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे.
किरीट सोमय्यांचे आरोप
रिसॉर्टच्या बांधकामात काळ्या पैशांचा वापर करण्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. मार्च 2022 महिन्यात दापोली कोर्टात भारत सरकारने अनिल परब यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी याचिका करण्यात आली. भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने हा रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याने 31 जानेवारी 2022 रोजी हा रिसॉर्ट 90 दिवसांत तोडण्याचे आदेश दिले होते. 12 मार्च 2021 रोजी रिसॉर्टचे उद्घाटन करण्यात आले होते.
अनिल परब यांची ईडी चौकशी
शिवसेना नेते अनिल परब यांची दापोली रिसॉर्ट प्रकरणी याआधी ईडीने चौकशी केली आहे. राज्याचे परिवहन मंत्री असताना अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी आणि खासगी निवासस्थानी ईडीकडून मे महिन्यात छापेमारी करण्यात आली होती. त्यानंतर अनिल परब यांची तीन वेळा ईडी चौकशी करण्यात आली होती. साई रिसॉर्ट आपले नसल्याचा दावा परब यांनी याआधीच केला आहे.
प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन गणेशोत्सवासाठी सोडण्यात आलेल्या नागपूर ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या Nagpur – Madgaon Jn – Nagpur Special (Bi-Weekly) 01139/01140 या विशेष रेल्वे गाडीला डिसेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे ही गाडी आता 31 डिसेंबरपर्यंत धावणार आहे.
ह्या गाडीच्या वेळा पत्रकामध्ये आणि स्थानकांमध्ये काहीसे बदलही करण्यात आलेले आहेत. सुधारित वेळापत्रकानुसार ही गाडी नागपूर येथून बुधवारी तसेच शनिवारी दुपारी 3:05 सुटून गुरुवार तसेच रविवारी ती मडगावला दुसऱ्या दिवशी सायंकाळी 5:00 वाजता पोहोचेल.
मडगाव ते नागपूर दरम्यान धावताना ही गाडी (01140) गुरुवार तसेच रविवारी मडगाव येथून रात्री 8:00 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री 9:30 वाजता ते नागपूरला पोहोचेल.
नागपूर ते मडगाव या प्रवासात गाडी वर्धा, पुलगाव, धामणगाव बडनेरा, अकोला मलकापूर, भुसावळ, नाशिक, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, कुडाळ, थीवी तसेच करमाळी या स्थानकांवर थांबणार आहे.
ह्या गाडीला 2 Tier AC – 01, 3 Tier AC – 04, Sleeper – 11, General – 04, SLR-02 असे एकूण 22 डबे असणार आहेत.
एक महिन्याच्या कालावधीत या विशेष गाडीच्या दोन्ही बाजूच्या मिळून अठरा फेऱ्या होणार आहेत.
ह्या अतिरिक्त फेऱ्यांचे आरक्षण 23/10/2022 पासून रेल्वेच्या तिकीट खिडक्यांवर आणि ऑनलाईन पोर्टलवर चालू होईल.
Vision Abroad
मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
सिंधुदुर्ग: आज महाराष्ट्र भाजपचे आमदार,मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी ओरस येथील सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रधान कार्यालयाला भेट दिली. यावेळी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी व उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी पुषपगुच्छ त्यांचे देऊन स्वागत केले.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व मुंबै जिल्हा बँकेच्या समन्वयातून कोकणचा विकास,युवकांना रोजगार व पर्यटन या विषयांवर एकत्रित काम करण्याबाबत त्यांनी सकारात्मक चर्चा झाली. यावेळी आमदार, भाजपा सचिव प्रमोद जठार, संचालक बाबा परब आदी उपस्थित होते.
मुंबई : ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाच्या तडाख्याने महाराष्ट्रातील शेतीचं अपरिमित नुकसान झालं आहे. त्यामुळे राज्य सरकारने युद्धपातळीवर आढावा घेऊन उपाययोजना कराव्यात आणि ‘ओला दुष्काळ’ जाहीर करून माझ्या शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा. अशा आशयाचे पत्र आज राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे.
काय लिहिले आहे या पत्रात?
“ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाच्या तडाख्याने महाराष्ट्रातील शेतीचं अपरिमित नुकसान झालं आहे. त्यामुळे राज्य सरकारने युद्धपातळीवर आढावा घेऊन उपाययोजना कराव्यात आणि ‘ओला दुष्काळ’ जाहीर करून माझ्या शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा”, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.
“या वर्षी मान्सूनचा मुक्काम लांबला आणि त्यात परतीच्या पावसाने तर कहर केला. या परतीच्या पावसाने खरीप पिकांचे अपरिमित नुकसान केलं आहे. एकूणच हवामान पाहता रब्बी हंगामाबाबतीतही शेतकरी बांधव चिंतातुर आहे. ऐन पीक काढणीच्या वेळेस हा पाऊस आल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत पीक वाया गेले आहे. यावर सरकारने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत, हे चांगलच आहे, पण तेवढं पुरेसं नाही. सध्याची परिस्थिती पाहिली तर लक्षात येईल की शेतकऱ्यांचं राज्यभर झालेलं नुकसान मोठं आहे. त्यामुळे राज्य सरकारने ‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा”, असे राज ठाकरे यांनी पत्रात लिहिले आहे.
“सरकारने पंचनाप्याचे आदेश दिले आहेत, पण पूर्वानुभवानुसार प्रशासकीय पातळीवर ते पंचनामे नीट होत नाहीत. गरजू शेतकरी नेहमीच उपेक्षित राहतो. त्यामुळे सरकारने हे पंचनामे नीट होतील, हे पहावे आणि परिस्थितीचा युद्धपातळीवर आढावा घेऊन राज्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा. तसंच कोरडवाहू आणि बागायती शेतीसाठी शेतकऱ्यांना जी प्रतिहेक्टरी नुकसान भरपाई दिली जाते, ती पुरेशी नाही तिचादेखील पुनर्विचार करावा”, अशी मागणीही त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.
“दिवाळी हा आनंदाचा सण आहे. खरंतर लॉकडाऊनच्या संकटानंतर शेतकरीही दिवाळी धूमधडाक्यात साजरी करण्याच्या मनस्थितीत असणार, अशा वेळी त्यांना दिलासा देऊन त्यांचीही दिवाळी अतिशय आनंदात साजरी होईल याकडे राज्य सरकारने लक्ष द्यावं”, असेही ते म्हणाले.
सिंधुदुर्ग: राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी अधिनिस्त वैद्यकीय अधिकारी आणि इतर असे एकूण १५ पदांच्या ८५ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत.
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २७ ओक्टोम्बर २०२२ आहे. इच्छुक उमेदवारांनी दिनांक १४/१०/२०२२ ते २७/१०/२०२२ या कालावधीत सकाळी १० ते संध्याकाळी ५ ह्या वेळेत ह्या बातमीसोबत जोडलेल्या जाहिरातीतील अर्ज भरून सीआरयु कक्ष(टपाल शाखा) मुख्य प्रशाकीय इमारत, तळमजला, जि. प. सिंधुदुर्ग, सिंधुदुर्गनगरी, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग मध्ये मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. सिंधुदुर्ग यांचे नावे राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM , SINDHUDURG ), व पदाच्या नावाचे स्पष्ट उल्लेख करून सादर करावेत.
ह्या पदांसाठी पात्रता,अटी,वेतनश्रेणी आणि इतर माहितीसाठी खालील जाहिरात डाउनलोड करावी.
Click here to download>>>>>>>>>> जाहिरात आणि अर्ज
Vision Abroad
मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
सिंधुदुर्ग :केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी आमदार भास्कर जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भास्कर जाधवांवर गुन्हा दाखल व्हावा, अशी तक्रार भाजप कार्यकर्त्यांनी केली होती. कुडाळमधील सभेत राणेंवर अत्यंत खालच्या दर्जाची शिवराळ भाषा वापरल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे.
गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी कुडाळ पोलीस स्थानकात तक्रार दाखल केल्यानंतर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. 153, 505 (1) (क), 500, 504 कलमांतर्गत अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भास्कर जाधव यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे होमग्राउंड समजल्या जाणाऱ्या सिंधुदूर्ग जिल्ह्यात राणेंवर घणाघाती टीका केली.
काय म्हणाले होते भास्कर जाधव?
नारायण राणे हे देशाचे नेते असल्याचं सांगतात पण गल्लीत त्यांना कुत्रंदेखील विचारत नाही. भास्कर जाधव यांनी मध्यम, लघु, सुक्ष्म खातं म्हणत नारायण राणे, नितेश राणे, निलेश राणे या तिघांवर टीका केली. शिवसेनेने काही केले नाही, असं नारायण राणे म्हणतात. मग तू काय म्हशी भदरात होता? अशा शब्दात जाधव यांनी टीकास्त्र सोडलं. नारायण राणे केंद्रात मंत्री आहेत. मात्र, त्यांच्यामुळे देशात कोकणाची लाज जात असल्याचं सांगितलं. राणेंना तामिळनाडूचा प्रश्न विचारला की, केरळचे उत्तर देतात. कोकणातून देशाला विद्वान, विचारवंत नेते मिळाले. मात्र, राणेंनी देशात कोकणाची लाज काढली असल्याची घणाघाती टीका केली. यावेळी भास्कर जाधव यांनी राणेंची मिमिक्री करत टीकास्त्र सोडलं होते.
Vision Abroad
मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.