गणेशोत्सवादरम्यान कोकणमार्गावर २००+ विशेष गाड्या चालविण्यात येणार आहे असे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले होते. त्याबरोबर जबलपुर – कोईम्बत्तूर सुपरफास्ट विशेष गाडी जी समर स्पेशल म्हणुन ह्या मार्गावर चालविण्यात आली होती ती गाडी गणेशोत्सवात चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
JBP CBE SPECIAL (02198)
दिनांक 05/08/2022 ते 30/09/2022 दरम्यान ही गाडी दर शुक्रवारी चालवली जाईल.
S.N.
Station Name
Time
Day
1
JABALPUR
23:50
1
2
NARSINGHPUR
00:55
2
3
GADARWARA
01:30
2
4
PIPARIYA
02:05
2
5
ITARSI JN
03:45
2
6
HARDA
04:47
2
7
KHANDWA
06:48
2
8
BHUSAVAL JN
08:35
2
9
NASHIK ROAD
11:50
2
10
PANVEL
15:25
2
11
ROHA
16:50
2
12
KHED
18:20
2
13
CHIPLUN
18:54
2
14
RATNAGIRI
20:40
2
15
KANKAVALI
22:52
2
16
KUDAL
23:22
2
17
THIVIM
00:32
3
18
MADGAON
01:45
3
19
KARWAR
02:52
3
20
KUMTA
03:52
3
21
MOOKAMBIKA ROAD
05:02
3
22
KUNDAPURA
05:52
3
23
UDUPI
06:52
3
24
MULKI
07:52
3
25
MANGALURU JN
09:30
3
26
KASARAGOD
10:15
3
27
KANNUR
11:40
3
28
KOZHIKKODE
13:05
3
29
SHORANUR JN
14:30
3
30
PALAKKAD JN
15:20
3
31
COIMBATORE JN
17:10
3
CBE JBP SPECIAL (02197)
दिनांक 05/08/2022 ते 30/09/2022 दरम्यान ही गाडी दर सोमवारी चालवली जाईल.
S.N.
Station Name
TIME
Day
1
COIMBATORE JN
15:25
1
2
PALAKKAD JN
16:35
1
3
SHORANUR JN
17:20
1
4
KOZHIKKODE
18:30
1
5
KANNUR
19:50
1
6
KASARAGOD
20:55
1
7
MANGALURU JN
23:10
1
8
MULKI
01:04
2
9
UDUPI
01:36
2
10
KUNDAPURA
02:02
2
11
MOOKAMBIKA ROAD
02:28
2
12
KUMTA
03:32
2
13
KARWAR
04:32
2
14
MADGAON
05:55
2
15
THIVIM
06:38
2
16
KUDAL
07:30
2
17
KANKAVALI
08:37
2
18
RATNAGIRI
10:55
2
19
CHIPLUN
13:02
2
20
KHED
13:32
2
21
ROHA
15:55
2
22
PANVEL
16:55
2
23
NASHIK ROAD
20:45
2
24
BHUSAVAL JN
00:30
3
25
KHANDWA
02:40
3
26
HARDA
03:55
3
27
ITARSI JN
05:15
3
28
PIPARIYA
06:17
3
29
GADARWARA
06:52
3
30
NARSINGHPUR
07:25
3
31
JABALPUR
08:45
3
डब्यांची स्थिती AC (1A) – 01 + AC (2A) – 02 + AC (3A) – 06 + Sleepr – 11 + General – 02 + SLR– 2 = Total 24
ह्या गाडीचे आरक्षण सुरु झाले असून सर्व आरक्षण तिकीट विंडो तसेच सर्व अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध आहेत.
सिंधुदुर्ग : कुडाळ आणि रत्नागिरी येथे फणस प्रक्रिया प्रशिक्षण च्या यशस्वी आयोजनानंतर मोठ्या प्रमाणात व्यवसायाच्या संधी असलेल्या डिहायड्रेशन टेक्नॉलॉजी वर विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन अभिनव उद्योग प्रबोधिनी तर्फे करण्यात आले आहे.
22-23-24 जुलै रोजी हे प्रशिक्षण कुडाळ येथील दुर्वांकुर सभागृहात संपन्न होणार आहे.
फळं, फुलं, भाज्या, मसाल्याचे पदार्थ, हंगामी पीके, मासे अशा अनेक वस्तू डिहायड्रेशन पद्धतीने कशा तयार करायच्या याचं सखोल मार्गदर्शन या प्रशिक्षणात दिले जाणार आहे.
तंत्र एक आणि उद्योगाचे मंत्र अनेक असं डिहायड्रेशनचं महत्व असून आंबा, काजू, फणस, डाळिंब, चिकू, कोकम, नारळ, कांदा, लसूण, आलं, टोमॅटो, कडिपत्ता, शेवगा, भोपळा अशा अनेक वस्तूंपासून विविध उत्पादने तयार करता येतात.
या प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्यासाठी कृपया 8767473919 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन अभिनव उद्योग प्रबोधिनी तर्फे करण्यात आलेले आहे.
निसर्गसंपन्न असलेलं कोकण नानाविध फळं, फुलं, भाज्या, औषधी वनस्पती, मासे आणि इतर अनेक गोष्टींनी समृद्ध आहे.अशा या वैभवशाली कोकणातील स्थानिक लोकांना उद्योग व्यवसायासाठी प्रेरित करणे, त्यांच्या व्यवसायाला प्रोत्साहन देणे, व्यवसायाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे, विविध उद्योग संधी कडे त्यांचे लक्ष वेधणे आणि त्यासाठी मार्गदर्शन, प्रशिक्षण शिबिर आयोजित करणे यासाठी अभिनव उद्योग प्रबोधिनी सातत्याने प्रयत्न करत आहे.
ह्या आधीच गणेशोत्सवादरम्यान कोकणमार्गावर १९८ विशेष गाड्या चालविण्यात येणार आहे असे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले होते. त्यात भर म्हणून रेल्वे प्रशासनने मुंबई ते मंगळरू मार्गावरअजून ८ विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ह्या गाड्यांचे आरक्षण रेल्वेच्या आरक्षण तिकीट खिडकीवर तसेच IRCTC संकेतस्थाळावर दिनांक 18 जुलै रोजी चालू होईल.
LTT – MANGLORE JN. EXPRESS (01165)
दिनांक 16/08/2022 ते 06/09/2022 दरम्यान ही गाडी दर मंगळवारी चालवली जाईल. ही गाडी रात्री 00:45 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबईवरून निघेल ती मंगलोरला त्याच दिवशी संध्याकाळी 19:30 वाजता पोहोचेल.
डब्यांची स्थिती AC (1A) – 01 + AC (2A) – 03 + AC (3A) – 15 + Generator Van – 2
MANGLORE JN. – LTT EXPRESS (01166)
दिनांक 16/08/2022 ते 06/09/2022 दरम्यान ही गाडी दर मंगळवारी चालवली जाईल. ही गाडी रात्री 22:20 वाजता मंगलोरवरून निघेल ती दुसऱ्या दिवशी संध्याकाळी लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबईला 18:30 वाजता पोहोचेल.
डब्यांची स्थिती AC (1A) – 01 + AC (2A) – 03 + AC (3A) – 15 + Generator Van – 2
ह्या गाड्या ठाणे, पनवेल, रोहा,माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रॊड, थिवीम, करमाळी, मडगाव, कानकोना, कारवार, अंकोला ,गोकर्णा रोड,कुमता, होन्नावर, मुरुडेश्वर,भटकल,मूकाम्बिका रोड, कुंदापुरा, उडपी, मुलकी, सुरथकाल आणि ठोकूर ह्या सर्व स्थानकांवर थांबतील.
सावंतवाडी येथे प्रस्तावित मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमुळे जनतेला तातडीने वैद्यकीय सेवा उपलब्ध होऊ शकेल, रुग्णांना उपचारासाठी गोवा येथे जाण्याची आवश्यकता भासणार नाही. हे हॉस्पिटल लवकरात लवकर उभे राहण्यासाठी सर्व अडचणींवर मार्ग काढण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले आहेत.
सावंतवाडी आणि तळकोकणातील तालुक्यातील लोकांना मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल जवळपास नसल्याने गोवा बांभूळी येते जावे लागते. कधी कधी वेळीच उपचार न झाल्याने गंभीर रुग्ण दगावतो. दुसरे म्हणजे अंतर जास्त असल्याने रुग्णांसमवेत असलेल्या नातेवाईकांचे खूप हाल होतात. मागे गोवा सरकारने महाराष्ट्रातील रुग्णावर ह्या हॉस्पिटल मध्ये बंदी घातली होती. सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी विनंती करून ही सेवा पुन्हा चालू करायला लावली. ह्या सर्व गोष्टींमुळे सावंतवाडी येथे एक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलची मागणी जोर धरू लागली होती.
गेल्या वर्षी गणेशोत्सवात ‘मोदी एक्सप्रेस’ नावाने कोकणसाठी विशेष गाडी सोडण्यात आली होती. गेल्या वर्षी कोकणचे नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची केंद्रात मंत्रिपदी निवड झाल्यावर नारायण राणे यांनी दादर येथून ‘मोदी एक्सप्रेस’ला हिरवा झेंडा दाखवला होता. या वर्षीही मुंबई भाजपकडून ही गाडी सोडण्यात येणार आहे.
हि विशेष गाडी दिनांक २८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता सावंतवाडीसाठी सुटणार आहे. हि गाडी चिपळूण,रत्नागिरी, कणकवली या स्थानकांवर थांबणार आहे. या गाडीचा सर्व संपूर्ण खर्च मुंबई भाजपकडून केला जाणार आहे.
मुंबईतील प्रत्येक मंडलमधून ५० प्रवाशांची नावे नोंदवण्यात येतील. जिल्हाध्यक्षांची चर्चा करून ही ही नावे नोंदवली जातील. नोंदणीसाठी प्रत्येकी १०० रुपये शुल्क द्यावे लागेल. कोकणातील चाकरमान्यांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
गणेशोत्सव कालावधीत कोकणात जाणार्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेने MEMU विशेष रोहा-चिपळूण-रोहा (01157/01158) ह्या गाडीचे डबे वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. ह्या आधी ही गाडी ८ डब्यांची चालणार असे घोषित करण्यात आले होते ती आता १२ डब्यांची केली आहे.
मागच्याच आठवड्यात कोकण रेल्वेने ६१०११ /६१०१२ दिवा-रोहा-दिवा ही गाडीपुढे चिपळूण पर्यंत विस्तारित केली होती. हीच गाडी पुढे रोहा ते चिपळूण आणि चिपळूण ते रोहा ०११५७/०११५८ ह्या नंबरने चालविण्यात येणार आहे.
वसईमार्गे गणेशोत्सवासाठी काही विशेष गाड्या सोडण्याचे कोकण रेल्वेने जाहीर केले आहे. ह्या सर्व गाड्यांचे आरक्षण रेल्वेच्या आरक्षण तिकीट खिडकीवर तसेच IRCTC संकेतस्थाळावर दिनांक 18 जुलै रोजी चालू होईल. ह्या गाड्यांचा फायदा ठाणे आणि पालघर तालुक्यातील कोकणवासीयांना होईल. मुंबई सेंट्रल वरून वसईमार्गे काही गाड्या सोडण्यात आल्या आहेत. वेस्टर्न लाईनला राहणाऱ्या कोकणवासीयांच्या सोयीसाठी ह्या गाड्यांना बोरिवली येथे थांबा दिला आहे.
1. MUMBAI CENTRAL TO THOKUR
MUMBAI CENTRAL- THOKUR EXPRESS (09001)
हि गाडी आठवड्यातून एक दिवशी मंगळवारी 23/08/2022, 30/08/2022, 06/09/2022 रोजी ही गाडी 12.00 वाजता मुंबई सेंट्रलवरून निघेल ती ठोकूर, मंगलोरला दुसऱ्या दिवशी 9.30 वाजता पोहोचेल.
THOKUR – MUMBAI CENTRAL EXPRESS (09002)
हि गाडी आठवड्यातून एक दिवशी बुधवारी 24/08/2022, 31/08/2022, 07/09/2022 रोजी ही गाडी 10.45 वाजता ठोकूरवरून,मंगलोर निघेल ती मुंबई सेंट्रलला दुसऱ्या दिवशी 7.05 वाजता पोहोचेल.
डब्यांची स्थिती AC (2A) -1 + Sleeper (SL)-12 + General – 4 + AC (3A)-5 + SLR-2 Total 24 Coaches.
ह्या गाड्या बोरिवली,वसई रोड,पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी,राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रॊड, थिवीम, करमाळी, मडगाव, कारवार, गोकर्णा रोड,कुमता,मुरुडेश्वर,भटकल,मूकाम्बिका रोड, कुंदापुरा, उडपी, मुलकी, सुरथकाल ह्या सर्व स्थानकांवर थांबतील.
2. MUMBAI CENTRAL TO MADGAON JN
MUMBAI CENTRAL- MADGAON JN EXPRESS (09003)
हि गाडी आठवड्यातून रोज मंगळवार सोडून दिनांक 24/08/2022 ते 11/09/2022 पर्यंत चालविण्यात येईल. ही गाडी 12.00 वाजता मुंबई सेंट्रलवरून निघेल ती मडगावला दुसऱ्या दिवशी 4.30 वाजता पोहोचेल.
MADGAON JN – MUMBAI CENTRAL EXPRESS (09004)
हि गाडी आठवड्यातून रोज बुधवार सोडून दिनांक 25/08/2022 ते 12/09/2022 पर्यंत चालविण्यात येईल. ही गाडी 09.15 वाजता मडगाववरून निघेल ती मुंबई सेंट्रलला दुसऱ्या दिवशी 1.00 वाजता पोहोचेल.
डब्यांची स्थिती AC (2A) -1 + Sleeper (SL)-12 + General – 4 + AC (3A)-5 + SLR-2 Total 24 Coaches.
ह्या गाड्या बोरिवली,वसई रोड,पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा ,आरवली road,संगमेश्वर रोड, रत्नागिरी,आडवली, विलवडे,राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड,कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रॊड, थिवीम, करमाळी ह्या स्थानकांवर थांबतील.
3. BANDRA TO KUDAL
BANDRA(T) – KUDAL EXPRESS (09011)
हि गाडी आठवड्यातून एक दिवशी गुरुवारी 25/08/2022, 01/09/2022, 06/09/2022 रोजी ही गाडी 14.40 वाजता बांद्रा टर्मिनसवरून निघेल ती कुडाळला दुसऱ्यादिवशी 5:40 ला पोहोचेल.
KUDAL – BANDRA(T) EXPRESS (09012)
हि गाडी आठवड्यातून एक दिवशी शुक्रवारी 26/08/2022, 02/09/2022, 07/09/2022 रोजी ही गाडी 6:45 वाजता कुडाळवरून निघेल ती बांद्रा टर्मिनसला दुसऱ्यादिवशी 21:30 ला पोहोचेल.
डब्यांची स्थिती General – 20 + Generator Car-2 Total 22 Coaches.
ह्या गाड्या बोरिवली,वसई रोड,पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा ,आरवली,संगमेश्वर रोड, रत्नागिरी,आडवली, विलवडे,राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड,कणकवली, सिंधुदुर्ग ह्या स्थानकांवर थांबतील.
4. UDHNA TO MADGAON JN
UDHNA – MADGAON EXPRESS (09018)
हि गाडी आठवड्यातून एक दिवशी शुक्रवारी 26/08/2022, 02/09/2022, 09/09/2022 रोजी ही गाडी 15:25 वाजता उधनावरून निघेल ती मडगावला दुसऱ्यादिवशी 9:00 ला पोहोचेल.
MADGAON – UDHNA EXPRESS (09017)
हि गाडी आठवड्यातून एक दिवशी शनिवारी 27/08/2022, 03/09/2022, 10/09/2022 रोजी ही गाडी 10:05 वाजता मडगाववरून निघेल ती उधनाला दुसऱ्यादिवशी 5:00 ला पोहोचेल.
डब्यांची स्थिती AC (2A) -1 + Sleeper (SL)-12 + General – 4 + AC (3A)-5 + SLR-2 Total 24 Coaches.
ह्या गाड्या नवसारी ,वलसाड, वापी, पालघर,वसई रोड,पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा ,आरवली,संगमेश्वर रोड, रत्नागिरी,आडवली, विलवडे,राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड,कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रॊड, थिवीम, करमाळी ह्या स्थानकांवर थांबतील.
5. AHMEDABAD TO KUDAL
AHMEDABAD – KUDAL EXPRESS (09412)
हि गाडी आठवड्यातून एक दिवशी मंगळवारी 30/08/2022, 06/09/2022,रोजी ही गाडी 09:30 वाजता अहमदाबादवरून निघेल ती कुडाळला दुसऱ्यादिवशी 5:40 ला पोहोचेल.
KUDAL- AHMEDABAD EXPRESS (09411)
हि गाडी आठवड्यातून एक दिवशी मंगळवारी 30/08/2022, 06/09/2022,रोजी ही गाडी 06:45 वाजता कुडाळवरून निघेल ती अहमदाबादला दुसऱ्यादिवशी 3:30 ला पोहोचेल.
डब्यांची स्थिती AC (2A) -2 + Sleeper (SL)-8 + General – 4 + AC (3A)-6 + SLR-2 Total 22Coaches.
ह्या गाड्या सुरत,वापी,पालघर,वसई रोड,पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा ,आरवली,संगमेश्वर रोड, रत्नागिरी,आडवली, विलवडे,राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड,कणकवली, सिंधुदुर्ग ह्या स्थानकांवर थांबतील.
6. VISHVAMITRI TO KUDAL
VISHVAMITRI – KUDAL EXPRESS (09150)
हि गाडी आठवड्यातून एक दिवशी सोमवारी 29/08/2022, 05/09/2022,रोजी ही गाडी 10:00 वाजता विश्वामित्रीवरून निघेल ती कुडाळला दुसऱ्यादिवशी 5:40 ला पोहोचेल.
KUDAL- VISHVAMITRI EXPRESS (09411)
हि गाडी आठवड्यातून एक दिवशी मंगळवारी 30/08/2022, 06/09/2022,रोजी ही गाडी 06:45 वाजता कुडाळवरून निघेल ती विश्वामित्रीला दुसऱ्यादिवशी 1:00 ला पोहोचेल.
डब्यांची स्थिती AC (2A) -1 + Sleeper (SL)- 12 + General – 4 + AC (3A)-5 + SLR-2 Total 24 Coaches.
ह्या गाड्या भारूच ,सुरत,वापी,पालघर,वसई रोड,पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा ,आरवली,संगमेश्वर रोड, रत्नागिरी,आडवली, विलवडे,राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड,कणकवली, सिंधुदुर्ग ह्या स्थानकांवर थांबतील..
यंदाच्या गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेने कोकण मार्गावर याआधी सोडलेल्या काही विशेष गाड्यांशिवाय अजून काही विशेष गाड्या सोडणार आहेत असे जाहीर केले आहे . नागपूर ते मडगाव ह्या स्टेशन दरम्यान ह्या गाड्या चालविण्यात येतील. ह्या गाडीच्या एकूण 20 फेऱ्या चालविण्यात येतील.
ह्या सर्व गाड्यांचे आरक्षण रेल्वेच्या आरक्षण तिकीट खिडकीवर तसेच IRCTC संकेतस्थाळावर दिनांक 16 जुलै रोजी चालू होईल.
NGP MAO SPECIAL (01139)
हि गाडी 27 जुलै ते 28 सप्टेंबर पर्यंत आठवड्याला 2 दिवस बुधवार आणि शनिवार 27,30 जुलै,3,6,10ऑगस्ट, 14,17,21,24,28 सप्टेंबर ह्या दिवशी
चालविण्यात येणार आहेत.
डब्यांची स्थिती AC (2A) -1 + Sleeper (SL)-11 + General – 4 + AC (3A)-4 + SLR-2 Total 22 Coaches.
ह्या गाडीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे.
NGP MAO SPECIAL (01139)
Station Name
TIME
Day
NAGPUR
15:05
1
WARDHA JN
16:12
1
PULGAON JN
16:33
1
DHAMANGAON
16:50
1
BADNERA JN
18:03
1
AKOLA JN
19:03
1
MALKAPUR
20:25
1
BHUSAVAL JN
21:35
1
NASHIK ROAD
01:00
2
IGATPURI
01:50
2
KALYAN JN
04:35
2
PANVEL
05:40
2
ROHA
06:50
2
MANGAON
07:24
2
VEER
07:38
2
KHED
08:26
2
CHIPLUN
08:48
2
SAVARDA
09:04
2
ARAVALI ROAD
09:18
2
SANGMESHWAR
09:32
2
RATNAGIRI
10:25
2
ADAVALI
10:56
2
VILAVADE
11:12
2
RAJAPUR ROAD
11:36
2
VAIBHAVWADI RD
12:02
2
NANDGAON ROAD
12:20
2
KANKAVALI
12:40
2
SINDHUDURG
13:02
2
KUDAL
13:22
2
SAWANTWADI ROAD
13:52
2
THIVIM
14:42
2
KARMALI
15:32
2
MADGAON
17:30
2
MAO NGP SPECIAL (01140)
हि गाडी 28 जुलै ते 29 सप्टेंबर पर्यंत आठवड्याला 2 दिवस गुरुवार आणि रविवार 28,31 जुलै. 4,7,11ऑगस्ट, 15,18,22,25,29 सप्टेंबर चालविण्यात येणार आहेत.
डब्यांची स्थिती AC (2A) -1 + Sleeper (SL)-11 + General – 4 + AC (3A)-4 + SLR-2 Total 22 Coaches.
हल्लीच घडलेल्या गैरप्रकारांनंतर सिंधुदुर्ग पोलिसांनी आंबोलीत गर्दीच्या ठिकाणी सुट्टीच्या दिवशी म्हणजे वीकएंडला पोलीस बंदोबस्त वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्याच आठवड्यात काही मद्यधुंध तरुणांनी हुल्लडबाजी करून वाहतुकीस अडथळा आणला होता. तसेच बेळगावच्या एका तरुणाने सावंतवाडी आगाराच्या ST चालकाला गाडीतून ओढून मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. हे अनुचित प्रकार टाळण्यासाठी इथला बंदोबस्त वाढविण्यात येणार आहे.
आंबोली पोलीस दूरक्षेत्र येथे पोलिसांची बैठक घेण्यात आली होती त्यात जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून सुरक्षेचा आढावा घेण्यात आला होता, तेव्हा सुरक्षिततेच्या दृष्टीकोनाने काही निर्णय घेण्यात आले.
मुख्य धबधब्याच्या ठिकाणी गाड्या योग्य नियोजनाअभावी पार्क केल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. त्यामुळे पोलिसांकडून पार्किंगसंबधी नियमावली लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. वाहने पार्क करण्यासाठी आंबोली येथील सात पर्यटन स्थळावर पार्किंगसाठी जागा लवकरच निश्चित केली जाईल. त्यानंतर वाहतुकीमध्ये सुसूत्रता आणण्यात येईल.
राज्यात निर्माण झालेल्या राजकिय परिस्थिती मुळे कोणताही अनुचित प्रकार जिल्हय़ात घडू नये म्हणुन सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी आपल्या अधिकारकक्षेत जिल्हय़ात मनाईचे आदेश जाहीर केले आहेत. जिल्हय़ात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी त्यांनी खालील गोष्टींवर मनाई आणली आहे. ही मनाई २७ जुलै पर्यंत असेल असे त्यांनी जाहीर केले आहे. कलम ३७/१ 1. शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुऱ्या, काठ्या, लाठ्या आणि कोणतेही शारीरिक इजा करण्यासाठी वापरण्यात येणारी वस्तू बाळगणे. 2. अंग भाजून टाकणारा किंवा स्फोटक पदार्थ घेऊन फिरणे. 3. दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे सोडण्याची साधने किंवा उपकरणे सोबत बाळगणे किंवा तयार करणे. 4. व्यक्तींची प्रतिमा, पुतळे किंवा आकृती यांची प्रदर्शने करणे. (ज्यामुळे समाजाच्या भावना दुखावतील) 5. सार्वजनिक रीतीने आक्षेपार्ह घोषणा करणे, गाणी म्हणणे किंवा वाजवणे. 6. सभ्यता व निती याविरुद्ध अशी किंवा शांतता धोक्यात येईल अशी भाषणे तयार करणे किंवा सोंग आणणे किंवा कोणतेही वस्तू किंवा जिन्नस तयार करणे व लोकांत प्रसार करणे. कलम ३७/३ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५ किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी एकत्र जमा होणे, जमाव करणे, मिरवणुका काढणे किंवा सभा घेणे.
हा हुकूम ज्या सरकारी नोकरांना त्यांची कर्तव्ये व अधिकार बजावणीचे संदर्भात उपनिर्दिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग अगर संबधीत उपविभागीय पोलीस अधिकारी याना संबधीत विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम पोलीस प्राधिकारी यांची परवानगी घेतली आहे अशा व्यक्तींना तसेच लग्नसमारंभ किंवा इतर धार्मिक समारंभ तसेच अंतिम विधीसाठी लागू पडणार नाही.
वरील कालावधीतील मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच ध्वनिक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग तसेच त्यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांस व सिंधुदुर्ग जिल्हयातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांस राहील.
वरील आदेशाचे उल्लंघन केल्यास तो व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३५ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील.