Category Archives: कोकण




Konkan Railway Updates:एकीकडे कोकणरेल्वे मार्गावर होणाऱ्या गर्दी कमी करण्यासाठी या मार्गावर चालविण्यात येणाऱ्या गाड्या पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी त्यांच्या डब्यांत वाढ करण्यात यावी अशी मागणी होत असताना रेल्वे प्रशासन मात्र गाड्यांचे सध्या असलेले डबे कमी करताना दिसत आहे. कोकण रेल्वे प्रशासनने अलीकडेच प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धपत्रकानुसार कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या दोन गाड्यांच्या डब्यांच्या संरचनेत बदल करून डबे कमी करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. तपशील खालीलप्रमाणे
१) ११०९९ / १११०० लोकमान्य टिळक (टी) – मडगाव जं. – लोकमान्य टिळक (टी) एक्सप्रेस
एलएचबी स्वरूपात चालविण्यात येणाऱ्या या गाडीच्या टू टियर एसी आणि थ्री टियर एसीचा प्रत्येकी १ डबा कमी करण्यात आला आहे.
सध्याची संरचना: फर्स्ट एसी – ०१ , २ टियर एसी – ०२, ३ टियर एसी – ०६, स्लीपर – ०८, सामान्य – ०२, पँट्री कार – ०१, एसएलआर – ०१, जनरेटर कार – ०१
सुधारित संरचना: फर्स्ट एसी – ०१ , २ टियर एसी – ०१, ३ टियर एसी – ०५, स्लीपर – ०८, सामान्य – ०२, पँट्री कार – ०१, एसएलआर – ०१, जनरेटर कार – ०१
दिनांक १२ जानेवारी २०२४ पासून हा बदल अमलांत आणला जाणार आहे.
२) २२११३ /२२११४ लोकमान्य टिळक (टी) – कोचुवेली – लोकमान्य टिळक (टी) एक्सप्रेस
एलएचबी स्वरूपात चालविण्यात येणाऱ्या या गाडीच्या टू टियर एसी आणि थ्री टियर एसीचा प्रत्येकी १ डबा कमी करण्यात आला आहे.
सध्याची संरचना: २ टियर एसी – ०१, ३ टियर एसी – ०७, स्लीपर – ०९, सामान्य – ०३ ,जनरेटर कार – ०२
सुधारित संरचना: २ टियर एसी – ०१, ३ टियर एसी – ०६, स्लीपर – ०९, सामान्य – ०३ ,जनरेटर कार – ०१ ,एसएलआर – ०१
दिनांक १४ जानेवारी २०२५ पासून हा बदल अमलांत आणला जाणार आहे.




Konkan Railway: मध्य रेल्वेतर्फे कोकण रेल्वे मार्गावर सोडण्यात आलेल्या हिवाळी विशेष गाड्यांचे थांबे पाहून महाराष्ट्रात थांबे देताना हात आखडता घेण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. नाताळ आणि नववर्ष गोव्याची मक्तेदारी असली तरीही त्या काळात महाराष्ट्रातही पर्यटकांचे प्रमाण वाढते. तसेच शालेय सुट्ट्यांमुळे स्थानिक नागरिकही आपापल्या मूळ गावी जाण्याच्या प्रयत्नात असतात. तळकोकणात जत्रांचा हंगामही सुरू होत असल्याने चाकरमानी गावी जात असतात. सर्व नियमित गाड्यांचे आरक्षण याआधीच भरल्यामुळे प्रवाशांची मदार विशेष गाड्यांवर होती. परंतु महाराष्ट्रातील बऱ्याच तालुक्यांत थांबे न दिल्यामुळे प्रवाशांचा हिरमोड झाला आहे. याबाबत अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती, महाराष्ट्रचे सचिव अक्षय मधुकर महापदी यांनी समितीतर्फे नाराजी व्यक्त केली असून या गाड्यांना महाड, लांजा, राजापूर, वैभववाडी आणि सावंतवाडी या तालुक्यांतील रेल्वे स्थानकांवर थांबे देण्याची मागणी निवेदना द्वारे मध्य रेल्वे प्रशासनाला केली आहे.
हिवाळी पर्यटन आणि सणांच्या काळात धावणाऱ्या ०११५१/०११५२ मुंबई-करमळी, ०१४६३/०१४६४ लोकमान्य टिळक टर्मिनस-कोचुवेली, आणि ०१४०७/०१४०८ पुणे-करमळी या हिवाळी विशेष गाड्यांना महाड, लांजा, राजापूर आणि वैभववाडी या तालुक्यांत थांबा न दिल्याबद्दल आम्ही खेद व्यक्त करतो. या गाड्या या भागातील प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरू शकतात.
रत्नागिरी ते कणकवली या १११ किलोमीटरच्या भागात कोणत्याही गाडीला एकही थांबा न दिल्यामुळे या गाड्या नक्की कोणासाठी सोडल्या जातात हा प्रश्न उभा राहिला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस कोचुवेली विशेष गाडी सावंतवाडीच्या पुढे दर १५ ते २० किलोमीटरवर थांबणार आहे. परंतु, महाराष्ट्रात थांबे देण्यास आपले प्रशासन तयार नाही. कोकण रेल्वेत २२% आर्थिक सहभाग उचलून महाराष्ट्राला काहीही मिळाले नाही या आमच्या मतावर या प्रकारांमुळे मोहोर उमटते.
कोकण रेल्वे मार्गावरील वरील सर्व तालुके हे कोकणातील आर्थिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. सणासुदीचा कालावधी तसेच पर्यटन हंगामामुळे येथे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. अशा परिस्थितीत या स्थानकांना थांबे न दिल्याने स्थानिक रहिवाशांची अनावश्यक गैरसोय होणार आहे.
वरील गाड्यांना वरील स्थानकांवर थांबा दिल्यास स्थानिक नागरिकांची दळणवळणाची समस्या सुटेल,पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल व प्रवाशांचा वेळ आणि खर्च वाचेल.
आपण या भागातील प्रवाशांच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि वरील गाड्यांना आरक्षण सुरु होण्यापूर्वी महाड तालुक्यातील वीर, लांजा तालुक्यातील विलवडे, राजापूर तालुक्यातील राजापूर रोड आणि वैभववाडी तालुक्यातील वैभववाडी रोड तसेच ०११५१/०११५२ मुंबई-करमळी गाडीला सावंतवाडी रोड स्थानकांवर तातडीने थांबे देण्याची व्यवस्था करावी, अशी आम्ही नम्र विनंती करतो.
आपण लवकरात लवकर याबाबत सकारात्मक निर्णय घ्याल, अशी अपेक्षा आहे असे या निवेदनात त्यांनी म्हटले आहे.




रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे एका सर्वेक्षणातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे या तालुक्यातील 50 टक्क्यांहून अधिक जागांचे मालक हे परराज्यातील किंवा अन्य जिल्ह्यांतील आहेत. तालुक्यात असणार्या मोक्याच्या जागा या आधीच बळकावल्या गेल्या आहेत. त्यामुळे दापोलीत स्थानिकांचे अस्तित्व जवळपास संपुष्टात येताना दिसत आहे.
तालुक्यात 105 ग्रामपंचायती आणि 173 गावे आहेत. या 173 गावांमध्ये अन्य राज्यातील लोकांनी जमिनी खरेदी केल्याचे व्यवहार झाले आहेत. त्यामुळे अनेक ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात घरे, रो -हाऊसेस, बंगलो, बांधकामाच्या नोंदी दर महिन्याला होताना दिसत आहेत. शेकडो एकर जागा खरेदी केलेले परप्रांतीय मालकांना गाव पातळीवर विरोध होऊ नये म्हणून मंदिर, सार्वजनिक इमारती, सार्वजनिक सुविधा अशा ठिकाणी ते देणगी देत असून स्थानिक पुढार्यांचे ‘खिसेही गरम’ केले जात असल्याची चर्चा सुरु आहे.
तालुक्यातील अनेक जागांचे व्यवहार हे बनवाबनवी करून झाले असल्याचीही ओरड होताना दिसत आहे. स्थानिकांकडून खरेदी केलेल्या जागेवर विकासकांनी रो-हाऊसेस, बंगलो बांधून शेकडो लोकांना त्याची विक्री केली आहे. यातील अनेक ठिकाणी विकसकांना विक्री केलेल्या जागेत जागा मालक मजूर म्हणून राबताना दिसत आहेत.
कोकणातील लोक वडिलोपार्जित जागा विकून स्थानिक लोक मुंबईसारख्या ठिकाणी खोली विकत घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. गावातील जागा विकल्याने तालुक्यातील अनेकांचे कायम वास्तव्य हे मुंबईत होताना दिसत आहे. गावाला केवळ सणासुदीला तो येताना दिसत आहे. शासनाकडून मिळणार्या धान्यामुळे तालुक्यातील शेतीही ओसाड पडण्याच्या मार्गावर आहे. अशा प्रकारे शेती ओसाड ठेऊन करायची काय म्हणून ती विकली जात असून भावी पिढीसाठी चिंतेचे बाब ठरली आहे.




सिंधुदुर्ग: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू व दीपकभाई केसरकर यांना घेऊन २७ जून २०१५ सावंतवाडी टर्मिनसचा शिलान्यास केला होता. तेव्हा कोकणी जनता आणि मुंबईस्थित चाकरमानी या घटनेने सुखावले होते, मात्र त्यानंतर या टर्मिनसचे काम रखडले ते आजतागायत पूर्ण झाले नाही आहे. २०१९ रोजी विधानसभा निवडणुकीत ‘मी पुन्हा येईन’ असा नारा त्यांनी दिला होता. आताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते नुसते आलेच नाही तर पक्षाच्या विक्रमी जागांसह सत्तेवर आले आहेत. त्यामुळे आता तरी ते सावंतवाडी टर्मिनसचे काम पूर्ण करतील अशी आशा समस्त कोकणकरां कडून करण्यात येत आहे.
आता नाही तर कधीच नाही...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या विकासासाठी पोषक राजकिय वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात केंद्रात आणि राज्यात महायुतीचा दबदबा आहे. जिल्हय़ातील सर्वच आमदार आणि खासदार सत्ताधारी पक्षाचे आहेत. त्यामुळे सावंतवाडी टर्मिनस आणि ईतर रेंगाळलेली कामे पूर्णत्वास नेण्यासाठी एक सकारात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे खासदार नारायण राणे आणि सावंतवाडीचे विद्यमान आमदार आणि माजी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यात चांगले संबध निर्माण झाले आहेत. आमदार दिपक केसरकर यापुर्वीपासूनच सावंतवाडी टर्मिनस साठी आग्रही आहेत आणि त्यांच्या परीने ते त्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. सावंतवाडी टर्मिनस साठी लागणार्या पाण्यासाठी तिलारी प्रकल्पातून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न करत असल्याचेही मागे सांगितले होते. मात्र त्यासाठी मोठी दिरंगाई होताना दिसत आहे. सध्याची केंद्रीय, राज्यातील आणि जिल्हय़ातील राजकिय परिस्थिती पाहता हे काम पूर्ण करून घेण्यासाठी हीच नामी संधी आहे.
कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी चा पाठपुरावा
सावंतवाडी येथे टर्मिनस व्हावे, येथे महत्त्वाच्या गाडय़ांना थांबा मिळावा आणि ईतर मागण्यांसाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी आपल्या पूर्ण कार्यक्षमतेने प्रयत्न करत आली आहे. विविध माध्यमातून संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी यासाठी जनजागृती केली तर आहे त्याबरोबरच आपला मागण्या प्रशासनाकडे आणि लोकप्रतिनिधींकडे मांडल्या आहेत. सावंतवाडी टर्मिनसचे काम पूर्ण व्हावे यासाठी संघटना आग्रही आहे. राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा येवून देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले आहेत. २०१५ साली त्यांनी सावंतवाडी टर्मिनसचे जे स्वप्न त्यांनी कोकणी जनतेला दाखवले होते ते लवकरच पूर्ण करतील असा विश्वास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना आहे.




Konkan Railway Updates:कोकण रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. कोकण रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या गाड्यांच्या संरचनेत तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्यात येणार आहे. तब्बल सहा गाड्यांच्या डब्यांच्या बदल करण्यात येणार असून खासकरून या गाड्यांचे जनरल डबे कमी करण्यात येणार आहेत. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार खालील गाड्यांच्या संरचनेत तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्यात येणार आहे.
१६३३४ / १६३३३ तिरुवनंतपुरम सेंट्रल – वेरावळ – तिरुवनंतपुरम सेंट्रल एक्सप्रेस
सध्याची रचना: २ टियर एसी – ०१, ३ टियर एसी – ०५, 3 टियर एसी इकॉनॉमी – ०२ ,स्लीपर – ०७ ,जनरल – ०४ , पॅन्ट्री कार – ०१, जनरेटर कार – ०२
सुधारित रचना: २ टियर एसी – ०१, ३ टियर एसी – ०६, ३ टियर एसी इकॉनॉमी – ०३ ,स्लीपर – ०७ ,जनरल – ०२, पॅन्ट्री कार – ०१, जनरेटर कार – ०२
दिनांक ०२ डिसेंबर २०२४ ते २६ डिसेंबर २०२४ पर्यंत या बदलानुसार ही गाडी चालविण्यात येणार आहे.
१६३१२/ १६३११ कोचुवेली – श्रीगंगानगर -कोचुवेली एक्सप्रेस
सध्याची रचना – टू टियर एसी – ०२, थ्री टियर एसी – ०४, थ्री टियर एसी इकॉनॉमी – ०३, स्लीपर – ०६,जनरल -०४, पँट्री कार – ०१, जनरेटर कार – ०२
सुधारित रचना – टू टियर एसी – ०१, थ्री टियर एसी – ०५, थ्री टियर एसी इकॉनॉमी – ०३, स्लीपर – ०७,जनरल – ०३, पँट्री कार – ०१, जनरेटर कार – ०२
दिनांक ०७ डिसेंबर २०२४ ते २४ डिसेंबर २०२४ पर्यंत या बदलानुसार ही गाडी चालविण्यात येणार आहे.
२२६३४ / २२६३३ तिरुवनंतपुरम सेंट्रल – एच. निजामुद्दीन – तिरुवनंतपुरम सेंट्रल एक्सप्रेस
सध्याची रचना – टू टियर एसी – ०२, थ्री टियर एसी – ०५, थ्री टियर एसी इकॉनॉमी – ०३, स्लीपर – ०६,जनरल – ०४, पँट्री कार – ०१, एसएलआर – ०१
सुधारित रचना – टू टियर एसी – ०२, थ्री टियर एसी – ०६, थ्री टियर एसी इकॉनॉमी – ०४, स्लीपर – ०६,जनरल – ०२, पँट्री कार – ०१, एसएलआर – ०१
दिनांक ०४ डिसेंबर २०२४ ते २७ डिसेंबर २०२४ पर्यंत या बदलानुसार ही गाडी चालविण्यात येणार आहे.
२२६५३ / २२६५४ तिरुवनंतपुरम सेंट्रल – एच. निजामुद्दीन – तिरुवनंतपुरम सेंट्रल एक्सप्रेस
सध्याची रचना – टू टियर एसी – ०२, थ्री टियर एसी – ०४, थ्री टियर एसी इकॉनॉमी – ०४, स्लीपर – ०६,जनरल -०४, जनरेटर कार – ०२
सुधारित रचना – टू टियर एसी – ०२, थ्री टियर एसी – ०६, थ्री टियर एसी इकॉनॉमी – ०४, स्लीपर – ०६,जनरल -0२, जनरेटर कार – ०२
दिनांक ०७ डिसेंबर २०२४ ते २३ डिसेंबर २०२४ पर्यंत या बदलानुसार ही गाडी चालविण्यात येणार आहे.
२२६५५ / २२६५६ एर्नाकुलम जं. – एच. निजामुद्दीन – एर्नाकुलम जं. एक्सप्रेस
सध्याची रचना – टू टियर एसी – ०२, थ्री टियर एसी – ०३, थ्री टियर एसी इकॉनॉमी – ०७, स्लीपर – ०४ ,जनरल – ४, जनरेटर कार – ०२
सुधारित रचना – टू टियर एसी – ०२, थ्री टियर एसी – ०५, थ्री टियर एसी इकॉनॉमी – ०७, स्लीपर – ०४ ,जनरल – २, जनरेटर कार – ०२
दिनांक ११ डिसेंबर २०२४ ते २७ डिसेंबर २०२४ पर्यंत या बदलानुसार ही गाडी चालविण्यात येणार आहे.
२२६५९ / २२६६० कोचुवेली – योगनगरी ऋषिकेश – कोचुवेली एक्सप्रेस
सध्याची रचना – टू टियर एसी – ०२, थ्री टियर एसी – ०४, थ्री टियर एसी इकॉनॉमी – ०४, स्लीपर – ०६ ,जनरल – ४, जनरेटर कार – ०२
सुधारित रचना -०२, थ्री टियर एसी – ०६, थ्री टियर एसी इकॉनॉमी – ०४, स्लीपर – ०६ ,जनरल – ०२, जनरेटर कार – ०२
दिनांक ०६ डिसेंबर २०२४ ते २३ डिसेंबर २०२४ पर्यंत या बदलानुसार ही गाडी चालविण्यात येणार आहे.
