



Mumbai Goa Highway:गेल्या १७ वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाला आता नवीन डेडलाईन मिळाली आहे. दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी पर्यंत मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण होणार असल्याचे सांगितले जात आहे मात्र महामार्गाची सध्याची स्थिती आणि चालू असलेल्या कामाची गती पाहता प्रशासन ही नवीन डेडलाईन पाळण्यास अपयशी ठरणार असल्याचा आरोप मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीने केला आहे. एवढ्यावरच न थांबता समितीने या महामार्गावरील प्रत्येक किलोमीटरच्या कामाची सध्याची स्थिती लिखित स्वरूपात सादर केली आहे. समितीने बनविलेल्या यादीनुसार बरेच काम अपूर्ण असून कामाचा वेग पाहता दिलेल्या मुदतीत काम पूर्ण होणे अशक्य असल्याचे समितीचे म्हणणे आहे.
समितीने मांडलेली महामार्गाची सद्यस्तिस्थि
टप्पा-०१ पनवेल ते कास -००/०० किमी ४२ किमी (४२ किमी)-
सदर टप्याची वर्क ऑर्डर २८ मार्च २०२३ रोजी देण्यात आलेली असून ३१ डिसेंबर २०२३ काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात आलेली होती. सदर टप्प्यात ३८ किमी कॉन्क्रीट पूर्ण झालेली असून नित्कृष्ठ दर्जाचे काम करण्यात आलेले आहे. तर अद्यापही साईट पट्टी, दुभाजकांमध्ये शोभिवंत झाडे लावणे, ड्रेनेज लाईन, सूचना फलक यांसारखी कामे अद्यापही अपूर्ण आहेत व सदर टप्प्यात ०६ महिन्याच्या आतमध्ये खड्डे महामार्गाला पडलेले आहेत. सदर टप्पा ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्यात येणार होते परंतु अद्यापही हे काम पूर्ण होण्यास किती कालावधी लागेल याची शाश्वती आम्हा कोकणवासीयांना नाही.
सदर टप्याची वर्क ऑर्डर ऑक्टोबर २०२२ रोजी देण्यात आलेली असून ३१ मे २०२४ पर्यंत काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात आलेली होती. सदर टप्याची परिस्थिती अतिशय दयनीय आहे. अद्यापही या टप्प्याची एक मार्गिका झालेली नाही. कासू ते वाकण महामार्ग नसून पायवाट झालेली आहे. महामार्गाला पेव्हर ब्लॉक दिसत आहेत. सदर टप्याचे काम दिवसाला १०० मीटर होत आहे यानुसार अंदाज लावल्यास हा महामार्ग पूर्ण होईल याची शाश्वती आम्हा कोकणकरांना नाही. तसेच या टप्यातील सर्व उड्डाणपुलाचे काम बाकी आहे, जनावरे, वहानांसाठीभुयारी मार्ग, साईटपट्टीचे काम बाकी आहे तर अद्यापही जमिनी ताब्यात घेतलेल्या नाहीत व अतिक्रमण हटावलेला नाही. या टप्प्यातील १२ किमी मध्ये ११ ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या भुयारी मार्गाचे काम १५-२० टक्के झालेला आहे तर नागोठणे येथील पुलाचे काम २०-२५ टक्के पूर्ण करण्यात आलेला आहे. याठिकाणी पेव्हर ब्लॉक असून वर खाली झाल्याने अपघात वाढत आहेत. सदर टप्प्याचे काम २००५ साली बनविण्यात आलेल्या आराखड्यानुसार होत असून २००५ साली वाहनांची संख्या व लोकसंख्या कमी होती व त्याआधारे काम चालू असल्याने भुयारी मार्ग अडचण ठरत आहेत. तसेच महामार्गावर भराव टाकल्याने शेतकऱ्या ची जमीन नकसान होत आहे.
टप्पा-०३ इंदापूर ते वडपाले-८४ किमी ते ११० (२६.७५ किमी)-
सदर टप्प्यात इंदापूर व माणगाव हे दोन बायपास येत असून सदर बायपासचे काम ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्यात येईल असे अधिकारी वर्गाकडून ०४ जुलै २०२३ रोजी माणगाव येथे करण्यात आलेल्या आंदोलन दरम्यान आश्वासन देण्यात आलेले होते परंतु अद्यापही या दोन्ही बायपासचीही अवस्था बिकट आहे. सर्व अडचणी सुटल्या असून काम धीम्या गतीने का चालू आहे याबाबत आपण स्वतः पाठपुरावा करून सदर काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे. सदर ठिकाणी जनआक्रोश समितीच्यावतीने पाहणी केली असता अद्यापही सदर कामाला गती देण्यात आलेली नाही. सद्यस्थितीत पूर्णता काम बंद असून नवीन ठेकेदार निवडन्यात येणार आहे. आपण स्वतः निरिक्षण केले असल्यास माणगांव शहरात दररोज वाहनांच्या ०४-०५ किलोमीटरच्या रांगा पहावयास मिळत असतील परिणामी सदर ठिकाणी कोकणकर व स्थानिक वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून नागरिकांना व प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. तर लोणेरे येथील ब्रिजचे काम अद्यापही बंद आहे.
एका बोगद्याचे काम झालेले असून पहिल्याच पावसात गळती पहायला मिळली तर दूसऱ्या बोगद्याचे काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्यात येणार होते परंतु अद्यापही बोगदा व त्यापुढील ब्रिजचे काम बाकी आहे. टप्पा-०६ – कशेडी १६१ किमी ते परशुराम घाट २०५ किमी
सदर टप्प्यात खेड रेल्वे स्थानक येथील ब्रिजचे काम अपूर्ण असून परशुराम घाटातील परिस्थिती बिकट आहे, सदर घाट क्षेत्रात योग्यरित्या व सुरक्षेच्या दृष्टीकोनातून काम अपेक्षित आहे. टप्पा-०७ – परशुराम घाट २०५ किमी ते आरवली २४१ किमी-
सदर टप्प्यातील चिपळूण येथील ब्रिज दुर्घटना घडली व यानंतर सदर ब्रिज तोडण्यात आले व नव्याने सदर ब्रिजचे काम होणे अपेक्षित असताना अद्यापही कामाला सुरुवात नाही. टप्पा-०८ व ०९-आरवली ते वाकेड –
सदर टप्यातील ३५% काम झालेले असून उर्वरित सर्व काम रखडलेले आहे व सदर कामाची किलोमीटरनुसार परिस्थिती दर्शवीत आहोत. तरी सदर कामाला गती देऊन लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे.