Konkan Railway:मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि मशीद स्थानकांदरम्यान कार्नाक रोड ओव्हर ब्रिजच्या (आरओबी) पुनर्बांधणीसाठी सहा दिवसीय विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. पुलाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ओपन वेब गर्डर्स सुरू करण्यासाठी ब्लॉकची योजना आखण्यात आली आहे. या कामासाठी सलग सहा रात्रींसाठी दीर्घकालीन पॉवर आणि वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक दरम्यान मुंबई लोकल सेवेबरोबर लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. या ब्लॉकचा कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांवर होणार परिणाम खालीलप्रमाणे
गाडी क्र. १२०५२ मडगाव जं. – मुंबई CSMT जनशताब्दी एक्स्प्रेसचा २५/०१/२०२५ रोजी सुरू होणारा प्रवास दादर समाप्त होईल.
गाडी क्र. २२१२० मडगाव जं. – मुंबई सीएसएमटी तेजस एक्सप्रेसचा दिनांक २५/०१/२०२५ रोजी सुरू होणारा प्रवास दादर समाप्त होईल.
गाडी क्र. १२१३४ मंगळुरु जं. – मुंबई सीएसएमटी चा दिनांक २५/०१/२०२५ रोजी सुरू होणारा प्रवास दादर स्थानकावर समाप्त होईल.
दिनांक २६/०१/२०२५ रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्र. १२०५१ मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. जनशताब्दी एक्सप्रेस आरंभ स्थानकावरून २० – ३० मिनिटांनी उशिराने निघेल
दिनांक २६/०१/२०२५ रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्र. २२२२९ मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. वंदे भारत एक्सप्रेस आरंभ स्थानकावरून २० – ३० मिनिटांनी उशिराने निघेल
दिनांक २६/०१/२०२५ रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्र. २२११९ मुंबई सीएसएमटी – मडगाव तेजस एक्सप्रेस आरंभ स्थानकावरून २० – ३० मिनिटांनी उशिराने निघेल
दिनांक २५/०१/२०२५ रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्र. २०११२ कोकणकन्या एक्सप्रेस अर्धा तास उशिराने चालविण्यात येणार आहे.
गाडी क्र. १२०५२ मडगाव – मुंबई सीएसएमटी जनशताब्दी एक्सप्रेस चा दिनांक २६/०१/२०२५ रोजी सुरू होणारा प्रवास दादर स्थानकावर समाप्त होईल.
गाडी क्र. २२१२० मडगाव – मुंबई सीएसएमटी तेजस एक्सप्रेस चा दिनांक २६/०१/२०२५ रोजी सुरू होणारा प्रवास दादर स्थानकावर समाप्त होईल.
Facebook Comments Box
Vision Abroad