सिंधुदुर्गात निघणार ‘राखणदार पदयात्रा’

   Follow us on        

सिंधुदुर्ग:

कोकणातील जल, जंगल, जमीन आणि स्थानिक पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘राखणदार संघा’तर्फे आगामी १३ जूनपासून ‘राखणदार पदयात्रे’चे आयोजन करण्यात आले आहे. या पदयात्रेच्या पहिल्या टप्प्यामध्ये सहभागी होण्यासाठी निसर्गप्रेमी, तरुण आणि कोकणप्रेमींना पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या पदयात्रेचा पहिला टप्पा गोवा-कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरील कणकुंबी येथून सुरू होणार असून, गोवा-दोडामार्ग सीमावर्ती भागातून तेरेखोल नदी खोऱ्यात प्रवेश करत सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली माऊली मंदिर येथे या टप्प्याची सांगता होणार आहे.

​या यात्रेदरम्यान विविध गावांना भेटी देऊन कोकणच्या निसर्गपूजक परंपरा, सातेरी-राखणदार संस्कृती, पवित्र देवराया आणि पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व याबाबींवर मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली जाणार आहे. तसेच जल, जंगल, जमीन आणि मानवी जीवन यांच्यातील परस्परसंबंध अधोरेखित करत स्थानिक समुदायांशी थेट संवाद साधला जाईल. तरुण पिढीला पर्यावरणीय प्रश्नांची जाणीव करून देणे, कोकणासमोरील वाढत्या पर्यावरणीय आव्हानांवर चर्चा घडवून आणणे आणि सामूहिक उपाययोजनांबाबत विचारमंथन करणे हा या यात्रेचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. ही

पदयात्रा केवळ एक जनजागृती मोहीम नसून, कोकणच्या नैसर्गिक वारशाशी आणि सांस्कृतिक परंपरांशी पुन्हा नाते जोडण्याचा एक सामूहिक प्रयत्न आहे. या पदयात्रेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी अधिक माहितीसाठी ७०५८८२६६७४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन ‘राखणदार संघा’कडून करण्यात आले आहे.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search