सावंतवाडी:
येथील जिमखाना परिसरातील रहिवासी सौ. मैनाबाई रघुनाथ लाखे (वय ६० वर्षे) या गेल्या काही महिन्यांपासून अंडाशयाच्या (ओव्हरी) कर्करोगासारख्या दुर्धर आजाराशी झुंज देत आहेत. त्यांच्यावर सध्या बेळगाव येथील केएलई रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, लाखे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने पुढील उपचाराचा खर्च उचलणे त्यांना अशक्य झाले आहे. पैशांअभावी उपचार थांबवण्याची वेळ आल्याने, आपल्या आईचे प्राण वाचवण्यासाठी लाखे कुटुंबीयांनी जिल्हावासीयांसह दानशूर व्यक्ती व सेवाभावी संस्थांकडे आर्थिक मदतीचे जाहीर आवाहन केले आहे.
मैनाबाई लाखे यांना सुरुवातीला पोटदुखी आणि तीव्र अशक्तपणाचा त्रास जाणवू लागला होता. अधिक तपासणीसाठी त्यांना गोवा बांबोळी रुग्णालयात नेण्यात आले असता, त्यांना कर्करोग झाल्याचे स्पष्ट झाले. हे समजताच लाखे कुटुंब पूर्णपणे कोलमडून पडले. गेल्या मार्च महिन्यापासून त्यांच्यावर बेळगावमध्ये उपचार सुरू असून, दरमहा केमोथेरपी आणि इतर औषधांसाठी सुमारे पाऊण लाख रुपयांचा खर्च येत आहे. घरात शेती किंवा उदरनिर्वाहाचे इतर कोणतेही साधन नसल्याने उपचारासाठी कुटुंबाकडे शिल्लक असलेले सर्व पैसे आता संपले आहेत.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मैनाबाई यांच्या पुढील औषधोपचारासाठी सुमारे ५ लाख रुपयांची तातडीने गरज आहे. लाखे कुटुंबीयांनी आपल्या आईच्या उपचारासाठी समाजातील दानशूर व्यक्तींना सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन केले आहे. मदत करू इच्छिणाऱ्यांनी त्यांचा मुलगा राकेश रघुनाथ लाखे यांच्या खालील बँक खात्यावर किंवा गुगल पे नंबरवर आपली मदत जमा करावी:
बँक खाते नाव: राकेश रघुनाथ लाखे (Rakesh Raghunath Lakhe)
बँक खाते क्रमांक: 3777020 10105422
आयएफएससी कोड (IFSC Code): UBIN0537772
बँक: युनियन बँक ऑफ इंडिया, शाखा – सावंतवाडी (Union Bank of India, Sawantwadi)
गुगल पे (Google Pay) / फोन पे नंबर: 8806318029
UPI ID: rakeshlakhe071@okaxis
या संदर्भात अधिक माहितीसाठी किंवा थेट संपर्कासाठी 8806318029 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधता येईल. आपली छोटीशी मदत या माऊलीला नवीन आयुष्य देण्यासाठी मोठा आधार ठरू शकते.


