Category Archives: कोकण
आंबोली: पुणे हिंजवडी येथे सोन्याच्या दुकानावर दरोडा टाकून पळालेले चोरीतील तीन आरोपी आंबोली पोलीसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पकडले असून त्यांना सावंतवाडी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. ते गोवा येथून पुणे येथे चालले असल्याची माहिती आहे .त्यांच्याकडून दोन रिव्हॉल्व्हर आणि जीवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली. आंबोली पोलीस हवालदार दत्तात्रय देसाई, हवालदार सुमित पिळणकर,पोलिस दिपक शिंदे, पो . अभिजित कांबळे आणि उत्तम नार्वेकर आणि स्थानिक ग्रामस्थांनी त्यांना शिताफीने पकडले
पुणे-हिंजवडी येथील सराफी पेढीवर दरोडा टाकून पसार झालेल्या तीन संशयित आरोपींना आज सावंतवाडी पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना ६ ऑगस्टपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अल्ताफ खान -वय २४, राजस्थान , गोविंद दिनवाणी – वय २२ वर्षे ,राजस्थान , राजुराम बिष्णोई वय – २६ राजस्थान अशी त्यांची नावे आहेत. काल सायंकाळी आंबोली पोलिसांनी आंबोली घाटात पूर्वीचा वस मंदिराजवळ या तीन आरोपींना दोन रिव्हॉल्व्हर ,आठ जिवंत काडतुसांसह जेरबंद केले होते. त्यावेळी पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा त्यांनी प्रयत्न करत या संशयित आरोपींनी पोलिसांना चेक पोस्टवर गुंगारा देत चकवा देण्याचा प्रयत्न देखील केला होता. परंतु , पोलिसांनी शिताफीने त्यांना अखेर जेरबंद केले




Konkan Railway News:रेल्वे प्रशासनाने सामान्य प्रवाशांचा विचार करायला सुरवात केली असून काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत . त्याचाच एक भाग म्हणून इतर श्रेणीच्या डब्यांचे रूपांतर आता जनरल डब्यात करण्याचा सपाटा भारतीय रेल्वेने लावला आहे. २२ ते २४ डब्यांच्या एक्सप्रेस गाडीला किमान ४ डबे जनरल असावेत याची दक्षता घेतली जात आहे. कोकण रेल्वे मार्गावरीलही गाडयांच्या जनरल डब्यांत वाढ करण्यात येत असून लांब काही गाड्यांच्या डब्यांच्या संरचनेत बदल करण्यात येत आहे. कोकण रेल्वे प्रशासनाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्ध पत्रकानुसार खालील ६ गाड्यांच्या जनरल डब्यात वाढ करण्यात आली आहे.
1) १६३३३ / १६३३४ तिरुवनंतपुरम सेंट्रल – वेरावळ – तिरुवनंतपुरम सेंट्रल एक्सप्रेस
सध्याची रचना: टू टियर एसी – ०१, थ्री टियर एसी – ०६, थ्री टियर एसी इकॉनॉमी – ०३, स्लीपर – ०७, जनरल – ०२, पॅन्ट्री कार – ०१, जनरेटर कार – ०२ असे मिळून एकूण २२ LHB कोच
सुधारित रचना: टू टियर एसी – ०१, थ्री टियर एसी – ०५, थ्री टियर एसी इकॉनॉमी – ०२, स्लीपर – ०७, जनरल – ०४, पॅन्ट्री कार – ०१, जनरेटर कार – ०२ असे मिळून एकूण २२ LHB कोच
या गाडीच्या एका थ्री टियर एसी आणि एका थ्री टियर एसी इकॉनॉमी अशा २ कोचचे रूपांतर जनरल डब्यांत केले गेले आहे. दिनांक १९ डिसेंबर २०२४ पासून हा बदल अंमलात आणला जाईल.
2) १६३१२/ १६३११ कोचुवेली – श्रीगंगानगर -कोचुवेली एक्सप्रेस
सध्याची रचना: टू टियर एसी – ०२, थ्री टियर एसी – ०५, थ्री टियर एसी इकॉनॉमी – ०३, स्लीपर – ०६, जनरल – ०३, पॅन्ट्री कार – ०१, जनरेटर कार – ०२ असे मिळून एकूण २२ LHB कोच
सुधारित रचना: टू टियर एसी – ०२, थ्री टियर एसी – ०४, थ्री टियर एसी इकॉनॉमी – ०३, स्लीपर – ०६, जनरल – ०४, पॅन्ट्री कार – ०१, जनरेटर कार – ०२ असे मिळून एकूण २२ LHB कोच
या गाडीच्या एका थ्री टियर एसी कोचचे रूपांतर जनरल कोचमध्ये केले गेले आहे. दिनांक ०७ डिसेंबर २०२४ पासून हा बदल अंमलात आणला जाईल.
3) २२६३३ / २२६३४ तिरुवनंतपुरम सेंट्रल – एच. निजामुद्दीन – तिरुवनंतपुरम सेंट्रल एक्सप्रेस
सध्याची रचना: टू टियर एसी – ०२, थ्री टियर एसी – ०६, थ्री टियर एसी इकॉनॉमी – ०४, स्लीपर – ०६, जनरल – ०२, एसएलआर – ०१, जनरेटर कार – ०१ असे मिळून एकूण २२ LHB कोच
सुधारित रचना: टू टियर एसी – ०२, थ्री टियर एसी – ०५, थ्री टियर एसी इकॉनॉमी – ०३, स्लीपर – ०६, जनरल – ०४, एसएलआर – ०१, जनरेटर कार – ०१ असे मिळून एकूण २२ LHB कोच
या गाडीच्या एका थ्री टियर एसी आणि एका थ्री टियर एसी इकॉनॉमी अशा २ कोचचे रूपांतर जनरल डब्यांत केले गेले आहे. दिनांक ०६ डिसेंबर २०२४ पासून हा बदल अंमलात आणला जाईल.
4)२२६५३ / २२६५४ तिरुवनंतपुरम सेंट्रल – एच. निजामुद्दीन – तिरुवनंतपुरम सेंट्रल एक्सप्रेस
सध्याची रचना: टू टियर एसी – ०२, थ्री टियर एसी – ०६, थ्री टियर एसी इकॉनॉमी – ०४, स्लीपर – ०६, जनरल – ०२, एसएलआर – ०१, जनरेटर कार – ०२ असे मिळून एकूण २२ LHB कोच
सुधारित रचना: टू टियर एसी – ०२, थ्री टियर एसी – ०४, थ्री टियर एसी इकॉनॉमी – ०४, स्लीपर – ०६, जनरल – ०४, एसएलआर – ०१, जनरेटर कार – ०२ असे मिळून एकूण २२ LHB कोच
या गाडीच्या एका थ्री टियर एसी च्या २ डब्यांचे रूपांतर जनरल डब्यांत केले गेले आहे. दिनांक १३ डिसेंबर २०२४ पासून हा बदल अंमलात आणला जाईल.
5) २२६५५ / २२६५६ एर्नाकुलम जं. – एच. निजामुद्दीन – एर्नाकुलम जं. एक्सप्रेस
सध्याची रचना: टू टियर एसी – ०२, थ्री टियर एसी – ०५, थ्री टियर एसी इकॉनॉमी – ०७, स्लीपर – ०४ , जनरल – ०२, जनरेटर कार – ०२ असे मिळून एकूण २२ LHB कोच
सुधारित रचना: टू टियर एसी – ०२, थ्री टियर एसी – ०३, थ्री टियर एसी इकॉनॉमी – ०७, स्लीपर – ०४ , जनरल – ०४, जनरेटर कार – ०२ असे मिळून एकूण २२ LHB कोच
या गाडीच्या एका थ्री टियर एसी च्या २ डब्यांचे रूपांतर जनरल डब्यांत केले गेले आहे. दिनांक ११ डिसेंबर २०२४ पासून हा बदल अंमलात आणला जाईल.
6) २२६५९ / २२६६० कोचुवेली – योगनगरी ऋषिकेश – कोचुवेली एक्सप्रेस
सध्याची रचना: टू टियर एसी – ०२, थ्री टियर एसी – ०६, थ्री टियर एसी इकॉनॉमी – ०४, स्लीपर – ०६ , जनरल – ०२, जनरेटर कार – ०२ असे मिळून एकूण २२ LHB कोच
सुधारित रचना: टू टियर एसी – ०२, थ्री टियर एसी – ०४, थ्री टियर एसी इकॉनॉमी – ०४, स्लीपर – ०६ , जनरल – ०४, जनरेटर कार – ०२ असे मिळून एकूण २२ LHB कोच
या गाडीच्या एका थ्री टियर एसी च्या २ डब्यांचे रूपांतर जनरल डब्यांत केले गेले आहे. दिनांक १६ डिसेंबर २०२४ पासून हा बदल अंमलात आणला जाईल.




Special Train Request for Independence day: स्वातंत्र्यदिन व रक्षाबंधननिमित्त १५ ते १९ ऑगस्ट पर्यंत मुंबई आणि सावंतवाडी दरम्यान धावणाऱ्या सर्व गाड्यांना भलीमोठी प्रतीक्षा यादी लागलेली आहे. १४ ऑगस्ट, २०२४ च्या रात्रीपासूनच्या गाड्यांना लागलेला रिग्रेट संदेश हा अनावर गर्दीचा निदर्शक आहे. तसेच, शुक्रवार, शनिवार, रविवार अशा लागून आलेल्या सुट्टीमुळे गाड्यांमध्ये गर्दी होणार यात शंका नाही.२६ जानेवारीला लागून आलेल्या सुट्टीच्यावेळी जादा गाड्या न सोडल्यामुळे आरक्षण न मिळालेल्या प्रवाशांनी एसी डब्यांतही गर्दी केलेली आपण पहिली आहे. हा मागील अनुभव पाहता त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी मुंबई आणि सावंतवाडी दरम्यान स्वातंत्र्यदिन व रक्षाबंधननिमित्त विशेष गाड्या सोडाव्यात असे विनंतीवजा निवेदन कोकण विकास समिती तर्फे संस्थापक सदस्य जयवंत दरेकर यांनी ईमेलद्वारे सबंधित रेल्वे प्रशासनाला केले आहे.

संस्थापक सदस्य – कोकण रेल्वे,
सल्लागार- सखांड कोकण रेल्वे सेवा समिती




Changes in Ganpati special trains: गणपती उत्सवासाठी सोडण्यात आलेल्या काही विशेष गाड्यांना पेण आणि झाराप येथे अतिरिक्त थांबे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी विशेष गाड्यांना या स्थानकांवर थांबे न दिल्याने प्रवासी आणि प्रवासी संघटनांनी नाराजी व्यक्त केली होती व या स्थानकांवर थांबे देण्यात यावे अशी मागणी केली गेली होती. सुबक गणेशमूर्ती साठी प्रसिद्ध असलेल्या पेण स्थानकावर गणपती विशेष गाड्यांना थांबा न देणे हा मोठा विरोधाभास म्हणावे लागेल. दुसरीकडे फक्त एका नियमित गाडीला थांबा असलेल्या झाराप स्थानकावर किमान विशेष गाड्यांना तरी थांबे मिळावेत अशी मागणी झाली आहे. त्याप्रमाणे रेल्वे प्रशासनाने खालील गाड्यांना येथे थांबे देण्याचा निर्णय घेतला आहे.
गाडी क्रमांक क्र. ०११५१/०११५२ मुंबई सीएसएमटी – सावंतवाडी रोड – मुंबई सीएसएमटी विशेष या गाडीला पेण आणि झाराप येथे
गाडी क्रमांक ०११५३/०११५४ मुंबई सीएसएमटी – रत्नागिरी – मुंबई सीएसएमटी विशेष या गाडीला पेण येथे
गाडी क्रमांक ०११६७/०११६८ लोकमान्य टिळक (टी) – कुडाळ – लोकमान्य टिळक (टी) विशेष या गाडीला पेण येथे
गाडी क्रमांक ०११८५/०११८६ लोकमान्य टिळक (टी) – कुडाळ – लोकमान्य टिळक (टी) विशेष या गाडीला पेण येथे
गाडी क्रमांक ०११६५/०११६६ लोकमान्य टिळक (टी)- कुडाळ – लोकमान्य टिळक (टी) विशेष या गाडीला पेण येथे
गाडी क्रमांक ०११७१/०११७२ लोकमान्य टिळक (टी) – सावंतवाडी रोड – लोकमान्य टिळक (टी) विशेष या गाडीला पेण आणि झाराप येथे
गाडी क्रमांक ०९००९/ ०९०१० मुंबई सेंट्रल – सावंतवाडी रोड – मुंबई सेंट्रल स्पेशल या विशेष गाडीला झाराप येथे थांबे देण्यात आले आहेत.
त्याचप्रमाणे खालील दोन विशेष गाड्यांच्या सेवेच्या कालावधीत काही बदल करण्यात आले आहेत.
गाडी क्र. ०११५४ रत्नागिरी – मुंबई सीएसएमटी आणि गाडी क्र. ०११६८ कुडाळ – लोकमान्य टिळक (टी) विशेष या दोन्ही गाड्यांचा कालावधी ०२/०९/२०२४ ते १९/०९/२०२४ असा सुधारित करण्यात आला आहे. याआधी तो ०१/०९/२०२४ ते १८/०९/२०२४ असा होता.
प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी आणि त्याप्रमाणे आपल्या प्रवासाचे नियोजन करावे असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.