Category Archives: कोकण

Konkan Railway: आरक्षणाची झंझट नाही! होळीसाठी कोकण रेल्वे मार्गावर धावणार ‘अनारक्षित विशेष’ गाड्या

   Follow us on        

Konkan Railway: होळीसाठी कोकणात जाणार्‍या प्रवाशांसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वे मार्गावर अनारक्षित विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. या गाड्या दादर ते रत्नागिरी आठवड्यातुन तीन दिवस धावणार आहेत. या गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे.

गाडी क्रमांक ०११३१/०११३२ दादर-रत्नागिरी दादर त्रि-साप्ताहिक विशेष 

गाडी क्रमांक ०११३१ दादर रत्नागिरी होळी विशेष गाडी ११, १३ व १६ मार्च, २०२५ दुपारी १४:५० ला सुटून रात्री २३:४० ला रत्नागिरीला पोहोचेल.

गाडी क्रमांक ०११३२ रत्नागिरी दादर होळी विशेष गाडी १२, १४ आणि १७ मार्च, २०२५ पहाटे ४:३० ला सुटून दुपारी १३:२५ ला दादरला पोहोचेल.

या गाडीचे थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड

डब्यांची संरचना: जनरल – १४, एसएलआर – ०२ असे मिळून एकूण १६ आयसिएफ कोच

 

मुंबई – मडगाव वंदे भारत एक्सप्रेस मंगळुरु पर्यंत नेण्याचे प्रयत्न सुरू.

   Follow us on        

Konkan Railway: जलद, आरामदायी आणि अनेक आधुनिक सुविधांनी परिपूर्ण असलेली वंदेभारत एक्सप्रेस प्रवाशांच्या पसंतीस उतरली आहे. भारत सरकारने देशातील बहुतेक महत्त्वाच्या शहरांदरम्यान या गाड्या सुरू केल्या असून काही अपवाद वगळता सर्व गाड्या यशस्वी ठरल्या आहेत. मुंबई मडगाव मार्गावर सुरू करण्यात आलेली गाडी क्रमांक 22229/30 मुंबई सीएसएमटी – मडगाव वंदेभारत एक्सप्रेसची या यशस्वी गाडय़ांमध्ये गणना होत आहे. या गाडीचा मंगळुरू पर्यंत विस्तार करण्यात यावा अशी मागणी आता होताना दिसत आहे.

सध्या कोकण रेल्वे मार्गावर दोन वंदे भारत एक्सप्रेस चालत आहेत. गाडी क्रमांक 22229/30 मुंबई सीएसएमटी – मडगाव वंदे भारत एक्सप्रेस ही गाडी मुंबई मडगाव दरम्यान तर 20645/46 मडगाव – मंगळुरू सेंट्रल वंदे भारत एक्सप्रेस ही गाडी मडगाव मंगळुरू दरम्यान चालविण्यात येत आहेत. मुंबई मडगाव दरम्यान धावणारी वंदेभारत एक्सप्रेस यशस्वी ठरत असताना मडगाव – मंगळुरू दरम्यान धावणारी वंदेभारत तितकीशी यशस्वी ठरलेली दिसत नाही आहे.

मुंबई ते मंगळुरू अशी अखंड वंदेभारत एक्सप्रेस सुरू करण्यात यावी अशी मागणी कर्नाटक राज्यातून होत आहे. मुंबई सीएसएमटी – मडगाव वंदे भारत एक्सप्रेस (22229/30) हीच गाडी पुढे मंगळुरू पर्यंत विस्तारित करावी. ही गाडी विस्तारित केल्यास तिला सध्याच्या वेळापत्रकाप्रमाणे धावण्यासाठी जो अतिरिक्त रेक लागेल तो गाडी क्रमांक 20645/46 मडगाव – मंगळुरू सेंट्रल ही गाडी बंद करून तिचा रेक वापरण्यात यावा. असे केल्याने अतिरिक्त रेक न वापरता आहे त्या गाड्यांमध्ये हा बदल करून कर्नाटकातील प्रवाशांना मुंबई साठी जलद प्रवासाचा एक पर्याय उपलब्ध होईल असा युक्तिवाद करण्यात आला आहे. कर्नाटक राज्यातील प्रवासी संघटना, लोकप्रतिनिधींनी विविध माध्यमांतून ही मागणी जोर लावून धरल्याची बातमी समोर आली आहे.

महाराष्ट्रातील प्रवासी संघटनांचा विरोध.

सध्या मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेस आपल्या पूर्ण क्षमतेने धावत आहे. मुंबई कर्नाटक दरम्यान गरज पडल्यास नवीन गाडी मागावी. –अखंड कोकण रेल्वे प्रवासी समिती

आम्ही तुम्हाला कर्नाटकसाठी नवीन रेकची मागणी करण्याची विनंती करतो. सध्याची सीएसएमटी-मडगाव वंदे भारत आधीच १०० टक्के पूर्ण क्षमतेने धावत आहे, नवीन ट्रेन सुरू झाल्यास महाराष्ट्र, गोवा कर्नाटकातील प्रवाशांना अधिक फायदा होईल. सध्या आम्ही या विस्ताराच्या विरोधात आहोत. –रोहा रेल्वे प्रवासी समिती

मुंबई गोवा वंदे भारत मंगळुरूपर्यंत नेण्याची मागणी कर्नाटकातून होत आहे. तेथील खासदारांनी तसे प्रयत्नही सुरू केले आहेत. आपण जोरदार विरोध करणे आवश्यक आहे. अन्यथा कोकणकन्याचा भार कमी व्हावा म्हणून सुरू केलेल्या १२१३३/१२१३४ मुंबई कारवार एक्सप्रेसप्रमाणे आपल्याला वंदे भारतलाही मुकावे लागेल. मंगळुरूच्या नवीन गाडीला विरोध नाही. परंतु आपली गाडी पुढे वाढवून नाही, तर स्वतंत्र गाडी सुरू व्हावी. तसेच, त्या गाडीला सर्व स्थानाकांना समान कोटा मिळावा व महाराष्ट्रात पुरेसे थांबे मिळावेत.-श्री. अक्षय म्हापदी, रेल्वे अभ्यासक

Loading

तुतारी एक्सप्रेससह राज्यातील एकूण ११ एक्सप्रेस गाडयांना ‘एलएचबी कोच’ जोडणे गरजेचे

 

LHBfication of Trains:रेल्वे प्रवाशांची सुरक्षा आणि रेल्वेगाड्यांचा वेग वाढवा यासाठी रेल्वे प्रशासन जुन्या प्रकारातील, पारंपरिक पद्धतीमधील डब्यांऐवजी लिंके हॉफमन बुश (एलएचबी) प्रकारातील डबे जोडण्यात येत आहेत. काही वर्षांपूर्वी रेल्वेचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या समितीने लांब पल्ल्यांच्या गाड्यांना सुरक्षित असलेले ‘एलएचबी कोच’ तातडीने जोडण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र महाराष्ट्र राज्यातील काही महत्वाच्या गाड्या ज्यांना आधुकीकरण करण्याची खरी गरज असताना अजूनही जुन्या प्रकारातील आयसीएफ रेक सह चालविण्यात येत आहेत.
कोकण विकास समितीने याकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना अनेकदा पायाभूत सुविधांच्या सुधारणांमध्ये कमी प्राधान्य दिले असल्याचा आरोपही समितीने केला आहे. कोकण विकास समितीचे जयवंत शंकर दरेकर यांनी  ई-मेल द्वारे या एक्सप्रेस गाड्यांची यादी प्रशासनाला पाठवली असून या गाड्यांचे रूपांतर लवकरात लवकर एलएचबी स्वरूपात करावे अशी मागणी केली आहे.

कोणत्या आहेत या गाड्या?

  • ११००३/११००४  दादर – सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस (२ रेक)
  • ११०२९/११०३०  कोल्हापूर-मुंबई कोयना एक्सप्रेस (३ रेक)
  • ११०३९/११०४०  कोल्हापूर – गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस / ०१०२३/०१०२४ कोल्हापूर – पुणे एक्सप्रेस (५ रेक)
  • १७६१७/१७६१८ नांदेड – मुंबई तपोवन एक्सप्रेस / १७६८७/१७६८८ मराठवाडा एक्सप्रेस (३ रेक)
  • १७६११/१७६१२ नांदेड – मुंबई राज्यराणी एक्सप्रेस (२ रेक)
  • २२१५५/२२१५६ कोल्हापूर – कलबुर्गी एक्सप्रेस (१ रेक)
  • ११४०१/११४०२ (०१.०३.२०२५ पासून ११००१/११००२ या नावाने पुनर्क्रमित करा) मुंबई – बल्हारशाह नंदीग्राम एक्सप्रेस (3 रेक)
  • ११०२७/११०२८ दादर – सातारा एक्सप्रेस (पुणे-पंढरपूर मार्गे) / ११०४१/११०४२ दादर – शिर्डी एक्सप्रेस (पुणे मार्गे) (2 रेक)
  • १२१३१/१२१३२ दादर – शिर्डी एक्सप्रेस (मनमाड मार्गे) / २२१४७/२२१४८ दादर – शिर्डी एक्सप्रेस (मनमाड मार्गे) (१ रेक)
  • ०११३९/०११४० नागपूर – मडगाव एक्सप्रेस (१ रेक)
  • ११४०३/११४०४ कोल्हापूर-नागपूर एक्सप्रेस (१ रेक)
या गाड्या मध्य आणि दक्षिण रेल्वे विभागाच्या अखत्यारीत आहेत. या गाड्यांचे महत्व आणि प्रवाशांकडून होणारी गर्दी पाहता या गाडयांना ‘एलएचबी कोच’ तातडीने जोडण्यात यावेत अशी समितीने मागणी  केली आहे.

दोडामार्ग भेडशी गावची सुकन्या साक्षी गावडेची गोवा रणजी क्रिकेट संघात निवड

 

मुंबई: दोडामार्ग तालुक्यातील भेडशी खानयाळ गावची सुकन्या आणि सद्यस्थितीत मुंबई-दहिसर येथे स्थायिक असलेल्या साक्षी बंड्या गावडे हिची 23 वर्षाखालील महिलांच्या गोवा रणजी क्रिकेट संघात ऑलराऊंडर खेळाडू म्हणून दिनांक २८ फेब्रुवारी रोजी निवड झाली असून तिचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. साक्षी हिने मास मीडिया मधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. इयत्ता सातवी पासून लेदर बॉल क्रिकेटचे धडे घेत आहे. तिचे वडील बंड्या गावडे यांना क्रिकेटची फार आवड. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिची यापूर्वी मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये १६ आणि १९ वर्षाखालील महिलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली होती. तिचा परफॉर्मन्स पाहून गोवा क्रिकेट अकॅडमीने तिची 23 वर्षाखालील महिलांच्या गोवा रणजी क्रिकेट स्पर्धेसाठी ऑलराऊंडर म्हणून निवड केली आहे. सध्या ती गोवा येथे रणजी क्रिकेट स्पर्धेसाठी प्रशिक्षण घेत आहे. सावंतवाडी तालुक्यातील कलंबिस्त येथील अशोक नारायण परब (मांजरेकर) यांची ती नात असून रणजी संघामध्ये झालेल्या निवडीबद्दल तिच्या मामेगावी कलंबिस्त येथे तिचे कौतुक होत आहे. सामाजिक कार्यकर्ते किरण सावंत, निलेश पास्ते, अशोक राऊळ यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

Konkan Railway: दोन्ही गाड्या दादर पर्यंत नेण्यासाठी शिवसेनेकडून रेल्वेला वाढीव अवधी; होळीआधी मागणी पूर्ण न झाल्यास ‘रेल रोको’ चा इशारा

   Follow us on        

मुंबई: दादरहून कोकणात जाणाऱ्या रत्नागिरी व सावंतवाडी पॅसेंजर ट्रेन अचानक बंद केल्यामुळे शिवसेनेने पुकारलेले (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शनिवारचे ‘रेल रोको’ आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याची माहिती शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत यांनी दिली आहे.

कोकणी जनतेची गैरसोय करणाऱ्या मध्य रेल्वेला आठवडाभरापूर्वी शिवसेनेने उग्र आंदोलनाचा इशारा दिला होता. दादर-रत्नागिरी आणि दादर- सावंतवाडी पॅसेंजर होळीआधी सुरू करा, नाहीतर १ मार्चला दादर स्थानकात तीव्र ‘रेल रोको’ करू, दादरहून गोरखपूर व बरेलीला जाणाऱ्या ट्रेन सुटूच देणार नाही, असा निर्वाणीचा इशारा शिवसेनेच्या शिष्टमंडळाने दिला होता. शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते-माजी खासदार विनायक राऊत, शिवसेना उपनेते अरुण दुधवडकर, आमदार सुनील शिंदे, महेश सावंत, रेल कामगार सेनेचे सरचिटणीस बाबी देव, संजय जोशी, विभागप्रमुख संतोष शिंदे यांनी २० फेब्रुवारी रोजी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट घेऊन त्यांना स्मरणपत्र दिले होते. त्याचवेळी दोन्ही पॅसेंजर दादरवरून कशा सोडता येईल, या ट्रेनचा इतर गाड्यांवर कोणताही परिणाम होणार नाही, याबाबत रेल्वे कामगार सेनेचे संजय जोशी, बाबी देव यांनी अभ्यासपूर्ण म्हणणे मांडले होते. मध्य रेल्वे प्रशासनाने आपण दादर ते दिवा मार्गाचा पाहणी करून ही गाडी पुन्हा दादर पर्यंत कशी नेता येईल याबाबत अभ्यास करू असे आश्वासन दिले होते. त्यामुळे शिवसेनेने रेल्वेला यासाठी अधिक वेळ देण्याचा निर्णय घेतला असून हे आंदोलन स्थगित केले असल्याचे सांगितले आहे.

होळीआधी ट्रेन सुरू झाली नाही तर ‘रेल रोको

दादर-रत्नागिरी आणि दादर-सावंतवाडी या दोन्ही पॅसेंजर पूर्वीच्या वेळापत्रकानुसार दादर स्थानकातून तातडीने सुरू करण्याबाबत रेल्वे विभागाकडून होळीआधी योग्य ती कार्यवाही न झाल्यास दादरवरून गोरखपूर आणि बरेलीला जाणाऱ्या ट्रेनसमोर कोणत्याही क्षणी ‘रेल रोको’ आंदोलन केले जाईल. दादर-गोरखपूर आणि दादर-बरेली या गाड्या दादरवरून सुटू देणार नाही, असा इशारा शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून दिला आहे.

पवनार-पत्रादेवी द्रुतगती महामार्गाला कोल्हापुरच्या पाच तालुक्यातील शेतकर्‍यांचा ‘सशर्त’ पाठींबा

   Follow us on        

Shaktipeeth Expressway Updates:राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणार्‍या पवनार पत्रादेवी (नागपूर – गोवा) महामार्गा संबधित एक महत्वाची बातमी समोर आली आहे. या महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड, राधानगरी, आजरा, हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातील शेतकर्‍यांनी सशर्त पाठिंबा दर्शविला आहे. येथील शेतकऱ्यांनी भूसंपादनाच्या 5 पट बाजारभाव मोबदल्याच्या बदल्यात पवनार पत्रादेवी शक्तीपीठ द्रुतगती महामार्गाला पाठिंबा दर्शवला आहे.

प्रत्यक्षात भुदरगड तालुक्यातील शेतकऱ्यांनी शक्तीपीठ द्रुतगती महामार्गासाठी यापूर्वीच अधिकाऱ्यांना पाठिंब्याचे पत्र दिले असून त्यांनी या तालुक्यासाठी आणि जिल्ह्यासाठी विशेष विकास पॅकेजची मागणी केली आहे.

पवनार – पत्रादेवी एक्स्प्रेस वे ८०२ किलोमीटर लांबीचा आहे. या द्रुतगती मार्गाला सहा लेन कॉरिडॉर आहेत. नागपूर आणि गोवा यांना जोडणारा नवीन द्रुतगती मार्ग हा, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) विकसित करीत आहे. या एक्स्प्रेसवेमुळे प्रवासाचा वेग वाढणार आहे. ज्यामुळे वेळेचीही बचत होणार आहे. नागपूर आणि गोवा यांना जोडणाऱ्या नवीन द्रुतगती मार्गामुळे प्रवासाचा वेळ, १८ ते २० तासांवरून केवळ ८ ते १० तासांवर येईल. त्यामुळे महाराष्ट्रातील पर्यटनालाही चालना मिळणार आहे.

Konkan Railway | होळी आणि उन्हाळी हंगामासाठी पाश्चिम रेल्वेच्या विशेष गाडीची घोषणा; एकूण ७० फेर्‍या

   Follow us on        
Konkan Railway News: या वर्षी होळीला आणि उन्हाळी सुट्टीत कोकणात आपल्या गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. या वर्षी उन्हाळी हंगामात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी पाश्चिम रेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वे मार्गावर एक विशेष द्वि-साप्ताहिक गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
गाडी क्रमांक ०९०५७/०९०५८ उधना जंक्शन. – मंगळुरू जं. – उधना जं. द्वि-साप्ताहिक विशेष
गाडी क्र. ०९०५७ उधना जं. – मंगळुरू जं. ही  द्वि-साप्ताहिक स्पेशल ही गाडी उधना जंक्शन येथून दिनांक  ०२/०३/२०२५  ते २९/०६/२०२५ पर्यंत दर बुधवारी आणि रविवारी रात्री ८ वाजता निघेल आणि मंगळुरू जंक्शनला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ७.४५ वाजता पोहोचेल. या गाडीच्या एकूण ३५ फेर्‍या होणार आहेत.
गाडी क्र. ०९०५८ मंगळुरु जं. – उधना जं. द्वि-साप्ताहिक स्पेशल  ही गाडी मंगळुरु जंक्शन येथून दिनांक  ०३/०३/२०२५  ते ३०/०६/२०२५ पर्यंत गुरुवारी आणि सोमवारी रात्री १०.१० वाजता मंगळुरु जं. येथून निघून ती उधना जंक्शनला दुसऱ्या दिवशी २३:०५ वाजता पोहोचेल. या गाडीच्या एकूण ३५ फेर्‍या होणार आहेत.
ही गाडी वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव जं., कानाकोना, कारवार, अंकोला, गोकर्ण रोड, कुमता, मुर्डेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड बयंदूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की आणि सुरतकल स्टेशन येथे थांबेल.
डब्यांची रचना : एकूण २२ आयसिएफ कोच = टू टियर एसी –  ०१ कोच, थ्री टियर एसी – ०५ कोच, स्लीपर – १२ कोच, जनरल – ०२ कोच,  एसएलआर – ०२.
प्रवाशांनी कृपया सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Konkan Railway: होळीसाठी कोकणरेल्वे मार्गावर अजून एका गाडीची घोषणा

   Follow us on        
Konkan  Railway: होळीसाठी कोकणात जाणाऱ्या  प्रवाशांसाठी खुशखबर आहे. होळी सण २०२५ दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने मध्य रेल्वेच्या समन्वयाने अजून एक विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीचा तपशील खालीलप्रमाणे आहे,
गाडी क्र. ०१०६३/०१०६४ लोकमान्य टिळक (टी) – तिरुवनंतपुरम उत्तर लोकमान्य टिळक (टी) साप्ताहिक विशेष: 
गाडी क्र. ०१०६३ लोकमान्य टिळक (टी) – तिरुअनंतपुरम उत्तर वीकली विशेष ही विशेष गाडी लोकमान्य टिळक (टी) येथून गुरुवार दिनांक  ०६/०३/२०२५ आणि १३/०३/२०२५ रोजी १६;०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २२:४५ वाजता तिरुअनंतपुरम उत्तरला पोहोचेल.
गाडी क्र. ०१०६४ तिरुवनंतपुरम उत्तर – लोकमान्य टिळक (टी) साप्ताहिक विशेष ही विशेष गाडी  तिरुअनंतपुरम उत्तर येथून शनिवार, दिनांक ०८/०३/२०२५ आणि १५/०३/२०२५ रोजी १६:२० वाजता सुटेल आणि  लोकमान्य टिळक (टी) येथे तिसऱ्या दिवशी ००:४५  वाजता पोहोचेल.
ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी , थिविम, करमाळी, मडगाव, कारवार, गोकर्ण रोड, कुमठा, मुर्डेश्वर, भटकळ, मुकांबिका, सुरेंद्र रोड, सुरेंद्र रोड, उंबरनाथ रोड मंगळुरू जं, कासरगोड, कन्नूर, कालिकत, तिरूर, शोरानूर जं., त्रिसूर, एर्नाकुलम टाउन, कोट्टायम, तिरुवल्ला, चेंगन्नूर, मावेलीकारा, कायनकुलम आणि कोल्लम जं. या स्थानकावर थांबणार आहे.
डब्यांची रचना: एकूण 22 एलएचबी कोच: टू टायर एसी –  ०१ कोच, थ्री टायर एसी – ०६ कोच, स्लीपर – ०९  कोच, जनरल – ०४ कोच, जनरेटर कार – ०१, एसएलआर – ०१
प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.




Traffic block at CSMT: कोकण रेल्वेमार्गावर धावणार्‍या १० गाड्यांवर परिणाम होणार

   Follow us on        

Megablock on Central Railway: मुंबई सीएसएमटी येथील फलाट क्रमांक १२ आणि १३ च्या कामासाठी मध्यरेल्वे या स्थानकावर या आठवड्यात एक ब्लॉक घेणार आहे. त्यामुळे या स्थानकावरून सुटणार्‍या काही गाड्यांच्या आरंभ आणि अंतिम स्थानकांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्यात आला आहे. यामध्ये कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या गाड्यांचा समावेश असून याबाबतचा तपशील खालीलप्रमाणे.

आरंभ स्थानकांमध्ये बदल करण्यात आलेल्या गाड्या

दिनांक ०१ मार्च रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक २०१११ सीएसएमटी-मडगाव कोकणकन्या एक्सप्रेस ही गाडी आपला प्रवास पनवेल या स्थानकावरून या स्थानकावरील नियोजित वेळेत सुरु जाणार आहे.

दिनांक ०२ मार्च रोजी सुटणारी गाडी क्रमांक १२०५१ मुंबई मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस, गाडी क्रमांक २२२२९ मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेस, गाडी क्रमांक २२११९ मुंबई मडगाव तेजस एक्सप्रेस या गाड्या दादरवरून या स्थानकावरील नियोजित वेळेत आपला प्रवास सुरु करणार आहेत. तर गाडी क्रमांक १०१०३ सीएसएमटी-मडगाव मांडवी एक्सप्रेस ही गाडी आपला प्रवास पनवेल स्थानकावरून पनवेल स्थानकावरील नियोजित वेळेत सुरु करणार आहे.

 

अंतिम स्थानकांत बदल करण्यात आलेल्या गाड्या

गाडी क्रमांक २२१२० मडगाव मुंबई तेजस एक्सप्रेस, गाडी क्रमांक १२०५२ मुंबई मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस या गाड्यांचा प्रवास दिनांक २६ फेब्रुवारी ते ०१ मार्च दरम्यान दादरला तर  गाडी क्रमांक १२१३४ मंगलोर मुंबई एक्सप्रेस या गाडीचा प्रवास ठाण्याला संपविण्यात येणार आहे.

दिनांक ०१ मार्च रोजी गाडी क्रमांक २०११२ मडगाव -सीएसएमटी कोकणकन्या एक्सप्रेस, गाडी क्रमांक १०१०४ मडगाव -सीएसएमटी मांडवी एक्सप्रेस-या गाड्यांचा प्रवास पनवेल स्थानकावर संपविण्यात येणार आहे.

Konkan Railway: दिवा स्थानकावरून कोकणरेल्वेच्या गाड्या सोडणे नियमबाह्य़ आणि गैरसोयीचे

   Follow us on        
Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या ५०१०३/५०१०४ रत्नागिरी फास्ट पॅसेंजर आणि १०१०५/१०१०६ दिवा सावंतवाडी दिवा एक्सप्रेस या दोन गाड्या दिवा स्थानकावरून सोडण्यात येतात. मात्र कोकण रेल्वे मार्गावर चालविण्यात येणाऱ्या या दोन गाड्यांसाठी सुरवातीचे स्थानक म्हणुन दिवा स्थानक गैरसोयीचे असून नियमबाह्य़ही आहे. या गाड्या दादर किंवा मुंबई सीएसएमटी या स्थानकांवरून सोडण्यात याव्यात अशी मागणी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे सेक्रेटरी अक्षय महापदी यांनी केली आहे.

रेल्वे बोर्डाच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन

दिवा स्थानकावर सध्या गाड्यांमध्ये पाणी भरण्याची सोय नाही आहे. रेल्वे बोर्डाने दिनांक १६.०४.२०१० रोजी जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुढील प्रवासात गैरसोय टाळण्यासाठी गाडयांना सुरवातीच्याच स्थानकावर पाणी भरणे बंधनकारक केले आहे. असे असताना येथून सुटणाऱ्या या दोन गाड्यामध्ये पाणी पुढील स्थानकावर म्हणजे पनवेल स्थानकावर भरण्यात येते. यावरून विभागीय रेल्वे प्रशासन रेल्वे बोर्डाच्या सुचना पाळत नसल्याचे स्पष्ट होत आहे. या गाड्यांना पनवेल स्थानकावर पाणी भरावे लागत असल्याने पनवेल स्थानकावर नियमित थांब्याच्या कालावधीपेक्षा अधिक कालावधीपर्यंत गाडी थांबवून ठेवावी लागत असल्याने प्रवाशांच्या वेळेचा अपव्यव होतो.
फक्त दोन गाड्यांसाठी दिवा स्थानकावर पाणी भरण्याची व्यवस्था करणे अव्यवहार्य आहे. दिवा परिसरात पाण्याची कमतरता पाहता अशी सोय केली तरी गाड्यांसाठी पाण्याची टंचाई भासू शकते. त्यापेक्षा या गाड्या पुढे दादर, सीएसएमटी नेल्यास त्यांच्यासाठी लागणारे पाणी आणि देखभालीचा प्रश्न राहणार नाही.

प्रवाशांसाठी गैरसोयीचे

मांडवी, जनशताब्दी, वंदे भारत, तेजस, नेत्रावती, मत्स्यगंधा, कोकणकन्या, मडगाव वांद्रे, लोकमान्य टिळक टर्मिनस मडगाव या गाड्या कोकणातील बहुतांश स्थानकांवर थांबत नाहीत. त्या स्थानकांवर केवळ सावंतवाडी एक्सप्रेस आणि रत्नागिरी पॅसेंजर या किंवा यांपैकी कोणतीतरी एकच गाडी थांबते. त्यामुळे या ठिकाणी प्रवास करणार्‍या प्रवाशांना इतर पर्यायच नाही. हे प्रवासी ठाणे, भांडुप, घाटकोपर, मुंबई, बोरिवली, मीरा-भायंदर, वसई  विरार येथील आहेत. या गाड्या दिवा स्थानकापर्यंत मर्यादित असल्याने या गाड्यांचा लाभ घेताना त्यांना खासकरून आबालवृद्धांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागतो त्यामुळे या गाड्या दादर किंवा मुंबई सीएसएमटी पर्यत विस्तारित केल्यास त्यांचा त्रास बर्‍यापैकी वाचेल.

फलाटाची कमी लांबी

दिवा स्थानकावरील फलाटांची लांबी पुरेशी नसल्याने या गाडयांना अधिक डबे जोडण्यावर मर्यादा येत आहेत. १०१०५/१०१०६ दिवा सावंतवाडी दिवा ही गाडी एलएचबी स्वरूपात चालविण्यात येत असून सध्या ती १६ डब्यांच्या चालविण्यात येत आहे. कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची गर्दी पाहता ही गाडी २२ डब्यांची करणे आवश्यक आहे. दिवा स्थानकांवरील कमी लांबीच्या प्लॅटफॉर्ममुळे ते शक्य होणार नाही.

दिवा स्थानकासाठी ५ डबे राखीव असावेत

सध्या या गाड्यादिवा स्थानकावरून सोडण्यात येत असल्याने कल्याण डोंबिवली आणि  दिवा भागातील प्रवाशांना ही गाडी सोयीची आहे. ही गाडी दादर किंवा मुंबई  सीएसएमटी स्थानकापर्यंत विस्तारित झाल्यास येथील प्रवाशांच्या सोयीसाठी किमान ५ जनरल डबे दिवा स्थानकाला राखीव ठेवावे, जेणेकरून या प्रवाशांना प्रवास करणे सोयीचे होईल.
या मुद्द्यांवर श्री.अक्षय महापदी यांनी रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले असून या गाड्या दादर किंवा मुंबई सीएसएमटी स्थानकापर्यंत विस्तारित कराव्यात अशी इमेलद्वारे मागणी केली आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search