Category Archives: कोकण

Sawantwadi: रुग्णालयात टाक्यांसाठी लागणारा धागा नाही; रात्री २ वाजता नातेवाईकांची पळापळ. रुग्णालय प्रशासनाचा गलथान कारभार समोर

सावंतवाडी: तळकोकणात सरकारी आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा वाजले असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. काल गरजेच्या वेळी उपजिल्हा रुग्णालयात टाके घालण्या साठी लागणारा धागा उपलब्ध नसल्यामुळे जखमी रुग्णास जवळपास सव्वा तास रखडवल्याचा प्रकार येथे घडला. एवढेच नव्हे तर कर्मचाऱ्यांनी हा धागा आणण्यासाठी नातेवाईकांना पळापळ करण्यास लावली.
सविस्तर वृत्त असे की सावंतवाडी शहरात काल रात्री पावणे एक वाजता एक व्यक्ती गाडी रस्त्यावर स्लिप होवून अपघात झाला होता. व अपघात झालेल्या व्यक्तीला हाताला,पायाला डोक्याला चांगल्याच जखमा झाल्या होत्या. त्या नंतर अपघातातील जखमी रुग्णाला सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णाला मोठ्या जखमा झाल्याने त्याला टाके पडले मात्र टाके घालण्या साठी लागणारा धागा रुग्णालयात उपलब्ध नाही तो बाहेरून घेवून या असे तेथील डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर तो धागा शोधण्यासाठी नातेवाईक वेलनेस मध्ये गेले तेथे देखील सापडला नाही त्या नंतर त्यांनी जे जे मेडीकल गाठले तेथे देखील धागा सापडला नाही. अश्या अनेक ठिकाणी धाग्या साठी हेलपाट्या मारल्या नंतर शेवटी सर्वोदय नगर मध्ये धागा सापडला. व त्यानंतर नातेवाईक रुग्णालयात आले व नंतर टाके घालण्यात आले. तोपर्यंत सव्वा तास रुग्ण रक्त बंबाळ परिस्थितीत तसाच रुग्णालयात होता. असा भयंकर अनुभव रुग्णाच्या नातेवाईकांना आला.
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या मतदार संघातील हा प्रकार आहे. एकीकडे येथे मल्टि स्पेशालिटी रुग्णालय सुरु करण्याच्या गोष्टी केल्या जात असताना असे प्रकार घडत असतील तर सामान्य नागरिकांनी शासनाकडून कोणती अपेक्षा करावी असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

Loading

Kashedi Tunnel: नियम तोडून चुकीच्या दिशेने होणाऱ्या वाहतुकीमुळे अपघाताची शक्यता वाढली

Kashedi Tunnel :मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यात मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणार्‍या हलक्या वजनाच्या एकेरी वाहतुकीसाठी खुला झाल्याने प्रवास वेगवान अन आरामदायी झाला आहे. मात्र रात्रीच्या सुमारास मुंबईच्या दिशेनेही जाणारी वाहने बोगद्यातून मार्गस्थ होत असल्याने वाहनचालकांची फसगतच होत आहे. विरूद्ध दिशेने धावणार्‍या वाहनांमुळे बोगद्यात एकेरी वाहतुकीची पायमल्ली सुरू आहे. नियोजनाच्या अभावामुळे अपघातांचा धोका कायम असून वाहनचालकांची सुरक्षितता ऐरणीवरच आली आहे.
एकेरी वाहतुक चालू केली असली तरीही हा नियम धाब्यावर बसवून सर्रासपणे विरोधी बाजूने म्हणजे गोव्यावरून मुंबईच्या दिशेने सुद्धा काही वाहनचालक वाहने चालवताना दिसत आहे. एखादा अपघात झाल्यावरच प्रशासन जागे होणार आहे का? अशा वाहनचालकांवर कारवाई करण्यात यावी  तसेच वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यात यावे अशी मागणी होत आहे.
शिमगोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर कशेडी बोगदा वाहतुकीसाठी खुला करण्याच्या दृष्टीने बोगद्यातील अंतर्गत कामांनी वेग घेतला होता. त्यानुसार २४ फेब्रुवारीपासून कशेडी बोगदा एकेरी वाहतुकीसाठी खुला झाला आहे.

Loading

Kokan railway | तेजस एक्सप्रेसमध्ये मराठी वृत्तपत्रे उपलब्ध का नाहीत? प्रवाशांकडून नाराजी व्यक्त

मुंबई:जलद प्रवास आणि अत्याधुनिक सुविधांचा लाभ मिळावा यासाठी प्रवासी तेजस आणि वंदे भारत एक्सप्रेसंना प्राधान्य देतात. या गाड्यांचा जवळपास 90% मार्ग Route महाराष्ट्र राज्यात असल्याने या दोन्ही गाड्यांतून मोठ्या प्रमाणावर मराठी भाषक प्रवास करीत असतात. परंतु प्रवाशांना मराठीऐवजी इंग्रजीच वृत्तपत्र उपलब्ध करण्यात येते. याबद्दल प्रवासी खंत व्यक्त करू लागले आहेत.

मनसेचे नेते नितीन सरदेसाई दादरवरून बुधवारी तेजस एक्स्प्रेसने रत्नागिरीला जात होते. यावेळी त्यांना मराठी वृत्तपत्र वाचण्यास हवा होता. मात्र तेजस एक्स्प्रेसमध्ये फक्त इंग्रजी वृत्तपत्र उपलब्ध होते. मराठी वृत्तपत्र उपलब्ध नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

मंगळवारी ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा केला आणि बुधवारी मराठी भाषेची कशाप्रकारे गळचेपी होते, त्याचा अनुभव आला. आपल्याच राज्यातून सुरू होणार्‍या तेजस एक्स्प्रेसमध्ये मराठी वर्तमानपत्र नसणे. फक्त इंग्रजी वर्तमानपत्र असणे ही नक्कीच गौरवाची बाब नाही. यापुढे रेल्वेगाड्यांमध्ये मराठी वर्तमानपत्र मिळेल याची महाराष्ट्र नवनिर्माण सेना खात्री करेलच. परंतु प्रवाशांनी सुद्धा या गोष्टींकडे दुर्लक्ष न करता सगळीकडेच मराठीचा आग्रह धरावा, असे मत मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी व्यक्त केले. त्यांनी या आवाहनाचा एक विडिओ प्रसारमाध्यमांवर प्रसिद्ध केला आहे.

 

Loading

गोव्याच्या धर्तीवर काजू उद्योगाला चालना देण्यात येईल – रवींद्र चव्हाण

मुंबई दि. २८ फेब्रु.: आज विधानभवनात अल्पसंख्यांक विकास आणि औकाफ मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत काजू प्रक्रिया उद्योगासंदर्भात तसेच काजू बियांना अनुदान देण्यासंदर्भात आपण भूमिका मांडली असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.
गोवा राज्य सरकारने काजू प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतले आहेत, या निर्णयांच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील काजू उद्योग प्रक्रियेला चालना देण्यासाठी व काजूला चांगला भाव देण्याच्या दृष्टीने प्रस्ताव तयार करावा, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.
गोवा राज्य सरकारने काजू प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतले आहेत, या निर्णयांच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील काजू उद्योग प्रक्रियेला चालना देण्यासाठी व काजूला चांगला भाव देण्याच्या दृष्टीने प्रस्ताव तयार करावा, अशी मागणी देखील यावेळी केली.
या सर्व मागण्या आणि सूचनांवर सखोल विचार करून त्या दृष्टीने प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश पणन, अल्पसंख्यांक विकास आणि औकाफ मंत्री अब्दुल सत्तार यांनी कृषी विभागातील उपस्थित अधिकाऱ्यांना दिले आहेत. महायुती सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार असून या संदर्भात गतिमानतेने कृती करून कोकणातील शेतकऱ्यांचे हित जपेल, असा विश्वास आहे.
या बैठकीला आमदार नितेश राणे, आमदार निरंजन डावखरे, आमदार योगेश कदम,  आमदार राजेश पाटील, माजी आमदार प्रमोद जठार, माजी आमदार राजन तेली, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.

Loading

वाशी : सिंधुदुर्गातून हापूसची आवक वाढली; पेटीला मिळत आहे ‘एवढा’ दर

वाशी : नवी मुंबईतील वाशी येथील ए.पी.एम.सी. बाजारात साेमवारी काेकणातून पाच हजार  पेट्या विक्रीसाठी उपलब्ध झाल्या. यामध्ये सर्वाधिक (६० टक्के) हापूस पेट्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तर ४० टक्के रत्नागिरी  व रायगड जिल्ह्यातील आहेत. बाजारात दाखल झालेल्या आंबा पेटीला सध्या दोन ते पाच हजार रुपये इतका भाव मिळत आहे.
 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा मोठ्या प्रमाणावर बाजारात येत आहे. त्या तुलनेने रत्नागिरीचे प्रमाण अल्प आहे. सध्या रात्री गारठा व दिवसा उष्मा, असे तापमान असले तरी शेतकरी तयार आंबा काढून विक्रीला पाठवू लागले आहेत सध्या बाजारात कर्नाटक हापूस, बदामी, लालबाग, तोतापुरी आंबा विक्रीसाठी येत आहे. हापूस ८० ते १७५ रुपये किलो, बदामी ६० ते १२० रुपये किलो, लालबाग १०० ते १४० रुपये किलो, तोतापुरी ६० ते ७० रुपये किलो दराने विकला जात आहे गेल्या दोन आठवड्यांपासून हापूस विक्रीसाठी येत आहे. या आठवड्यापासून आवक वाढली आहे. त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हापूसचे प्रमाण ६० टक्के आहे. उर्वरित ४० टक्के आंबा रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील आहे. आंब्याच्या वर्गवारी, दर्जानुसार दर आकारण्यात येत आहेत.

Loading

कोकण रेल्वे मार्गावरील स्थानकावर लुटमारीचा प्रकार

गोवा वार्ता : कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांमध्ये आणि स्थानकांवर लुटमारीचे प्रकार वाढले आहेत. कोकण रेल्वे मार्गावरील मडगाव रेल्वे स्थानक परिसरातील प्लॅटफॉर्म क्रमांक सहावर ४ अज्ञात युवकांकडून मारहाण करत एका युवकाला लुटण्याचा प्रकार घडला. त्यानंतर एटीएममधूनही पैसे काढायला भाग पाडून त्यांना लुटले. तक्रारीनंतर कोकण रेल्वे पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.
मडगाव रेल्वेस्थानक परिसरात परराज्यांतून आलेले अनेक लोक वस्ती करतात. याचाच त्रास आता प्रवाशांना होत असून प्लॅटफॉर्मवर कुणीही नसल्याचे पाहून रात्रीच्या वेळेला लुटमारीचा प्रकार घडला आहे. वरीर चोरीची घटना २५ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली होती. तक्रारदार मिथुन राज के. के. (३३, रा. केरळ) हे मडगाव रेल्वेस्थानकावरून स्वामी विवेकानंद रेल्वे हॉलिडे होम या ठिकाणी जात होते. प्लॅटफॉर्म क्रमांक ६ वरून जात असताना फलाटावर कुणीही नसल्याची संधी साधून चार २० ते ३० वयोगटांतील युवकांनी त्यांना अडवले. त्यांनी मिथुन यांच्याकडे पैशांची मागणी केली. त्यांनी देण्यास नकार दिल्याने हाताच्या बुक्क्यांनी व थापटांनी त्यांना मारहाण करत त्यांच्या पाकिटातील १ हजार रुपये व रेल्वे ईमरजन्सी पास जबरदस्ती काढून घेतला. त्यानंतर मिथुनला बँक ऑफ इंडियाच्या एटीएमकडे नेत ५ हजार रुपये काढायला लावत त्या पैशांसह पाठीवरील पिशवी व त्य‍ातील ६५० रुपये काढून घेतले.
वरील प्रकारानंतर मिथुन राज के. के. यांनी तक्रार नोंद केली. या तक्रारीला अनुसरून कोकण रेल्वे पोलिसांनी चार अज्ञातांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक सुनील गुडलर यांच्यासह कोकण रेल्वे पोलीस तपास करत आहेत.

Loading

मंडणगड | होळीसाठी परळ ते डौली एस् .टी. बससेवा सुरू

मुंबई, दि. २६ फेब्रु.: कोकणातील सर्वात मोठा सण म्हणून शिमगा सण साजरा केला जातो. चाकरमानी हा चाकरीसाठी महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबईत जाऊन आपला उदरनिर्वाह करीत असतो. पण शिमगोत्सवानिमित्त चाकरमानी हा आपोआपच गावातील ओढीमुळे गावाकडे जाण्यास तयार होतो पण जाण्यासाठी गाडीचे काय? हे ओळखून पालवणी एसटी प्रेमी सुभाष गुजर व सामाजिक कार्यकर्ता गणेश नवगरे यांनी परेल एस.टी. आगारात जाऊन परळ डौली सुरु करण्याचे पञ परळ येथील वरीष्ट आगार प्रमुख नितीन चव्हाण यांची प्रत्यक्षात कार्यालयात भेट घेऊन दिले.

यावेळी वरिष्ठ आगारप्रमुख नितीन चव्हाण म्हणाले गाडी सुरू होईल परंतु प्रवासी कमी मिळतात, पुरेसा भारमान नाही त्याचे काय? त्यावर सुभाष गुजर म्हणाले गाडी सुरू करा पुढच आम्ही बघु प्रवाशांची संख्या आम्ही वाढवण्यास समर्थ आहोत आणि ही गाडी आमच्यासाठी फायदेशिर आहे. सकाळी सहा वाजता गावी जाण्यासाठी गाडीत बसलो तर मुबंईला येण्यासाठी तर सोमवारी कामावर जाण्यासाठीही फायद्याची आहे. हे ऐकुन वरीष्ट आगार प्रमुख नितीन चव्हाण यांनी २२ मार्च पासुन सिमगा सुरू होण्यापुर्वी एस.टी. पुर्व नियोजित आरक्षणासहीत एस.टी. सुरू होणार आहे. याची खात्रीच दिली आहे. त्यामुळेच पालवणी एसटी प्रेमी सुभाष गुजर व सामाजिक कार्यकर्ता गणेश नवगरे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Loading

पहा कोकणात निर्माण केलेली, ओले काजू बी सोलायची जगातील पहिली मशीन…विडिओ पाहण्यासाठी ईथे क्लिक करा

सिंधुदुर्ग : बाजारात ओल्या काजूगरांची मागणी खूप आहे आणि चांगला दर सुद्धा आहे. सुरुवातीला तर चक्क 500 रुपये शेकडा एवढा दर ह्या ओल्या काजू गरांना मिळतो. मुंबई पुण्यात तर ओल्या काजूगरांची प्रचंड मागणी असते. पण काजूमधुन गर बाहेर काढण्याची प्रक्रिया खूप कंटाळवाणी आणि वेळखाऊ आहे. डिंक लागून शरीराला इजा पण होते. त्यामुळे चांगला दर मिळत असूनही कोकणातील काजू उत्पादक ओले काजूगर विकण्यास निरुत्साही दिसतो.

यावर उपाय म्हणुन युवा उद्योजक मिथिलेश देसाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लांजा येथे ओले काजू बी सोलायच्या मशिनची  निर्मिती केली आहे. त्यांचा विश्वास आहे की हे उपकरण काजू उत्पादकांच्या उत्पादन हमखास वाढ घडवून आणेल. हे मशीन ग्राहकांसाठी कोकणातील उद्योजकांसाठी सदैव आघाडीवर असलेल्या अभिनव उद्योग प्रबोधिनी ने कुडाळ येथे उपलब्ध  करून दिली आहे.

बुकिंग साठी किंवा अधिक माहितीसाठी 8767473919 या क्रमांकावर Cashew Machine असा व्हॉट्स ॲप मेसेज पाठवावा असे आवाहन अभिनव उद्योग प्रबोधिनी तर्फे करण्यात आले आहे.

 

Loading

Konkan Railway | “….तर लवकरच मुंबई ते कोकण दुसरी वंदे भारत एक्सप्रेस धावताना दिसेल .”

मुंबई: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सध्याच्या मुंबई – मडगाव एक्सप्रेसला प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून ही एक्सपेस अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे. दुसऱ्या बाजूला मडगाव ते मंगुळुरु या मार्गावर दुसरी वंदे भारत एक्सपेस हल्लीच सुरु झाली असून कोकण रेल्वेच्या पूर्ण पट्ट्यात वंदे भारत एक्सप्रेस ची सेवा सुरु झाली आहे. मात्र दक्षिणेकडील एका खासदाराने रेल्वे मंगुळुरु ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्यात यावी अशी पत्राद्वारे मागणी केली आहे. ही मागणी पूर्ण झाल्यास लवकरच मुंबई ते कोकण रेल्वे मार्गावर दोन एक्सप्रेस धावताना दिसतील.
दक्षिण कन्नडचे खासदार नलीन कुमार कटील यांनी ही मागणी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना केली आहे. कोकण रेल्वे सुरु झाल्यापासून मंगुळुरु ते मुंबई हे अंतर दिवसात (१२ तासात) गाठेल अशी एक्सप्रेस मिळावी असे आमचे स्वप्न होते. आता ते स्वप्न पूर्ण करेल अशी अतिजलद गाडी वंदे भारत आता मुंबई ते मडगाव तसेच दुसरी गाडी मडगाव ते मंगळुरु या मार्गावर चालविण्यात येत आहे. मात्र मुंबई ते मंगुळुरु अशा अखंड  गाडीची सर्वात जास्त गरज आहे. अशी गाडी चालू झाल्यास दक्षिणेकडील प्रवाशांना दिवसात मुंबई गाठणे सोपे होईल असे खासदार नलीन कुमार कटील यांनी या पत्रात म्हंटले आहे.
याशिवाय त्यांनी रेल्वेस याबाबत २ पर्याय असल्याचे निदर्शनास आणूनही दिले आहे. त्यातील पहिला पर्याय म्हणजे सध्या मुंबई ते मडगाव दरम्यान चालविण्यात येणारी वंदे भारत एक्सप्रेस क्रमांक २२२२९/३० जी आठ डब्यांची चालविण्यात येत आहे ती १६ डब्यांची करून तिचा विस्तार मंगुळुरु पर्यंत करण्यात यावा. जर या गाडीचा मंगुळुरुपर्यंत विस्तार करण्यात काही अडचणी असतील दुसरा पर्याय म्हणजे सध्या मंगुळुरु ते मडगाव  दरम्यान चालविण्यात येणारी वंदे भारत एक्सप्रेस क्रमांक २०६४५/४६ या गाडीचा मुंबई पर्यंत विस्तार करण्यात यावा. डब्यांची संख्या तीच ठेवून आठवड्यातून ३ दिवस ही गाडी चालविण्यात यावी असे त्यांनी या आपल्या मागणीत म्हंटले आहे.
खासदार साहेबाची ही मागणी पूर्ण झाली तर लवकरच मुंबई ते कोकण २ वंदे भारत एक्सप्रेस धावताना दिसतील हे मात्र नक्की

Loading

Sindhudurg: आंबोली चौकुळ भागात ब्लॅक पॅन्थरचा वावर; फोटो कॅमेरात कैद

आंबोली दि.२५ फेब्रु; पश्चिम घाटात अजूनही  जैविविधता टिकून आहे. तळकोकणात आंबोली – चौकुळ ही गावे  जैवविविधतेतेसाठी प्रसिद्ध आहेत. या भागातील जंगलात अजूनही वन्यप्राण्यांच्या जाती अस्तित्वात आहेत आणि हे प्राणी कित्येकवेळा येथील ग्रामस्थांच्या आणि  पर्यटकांच्या नजरेस पडताना दिसतात. असेच काही पर्यटक येथे पर्यटनास आले असता  त्यांना येथे काळा बिबट्याचे Black Panther दर्शन झाले. यातील काही पर्यटकांनी धाडस करून या बिबट्याचे फोटोही काढलेत. फोटोस दुरून काढल्याने ते काहीसे अस्पष्ट आले आले तरी या भागात या काळ्या बिबट्याचा वावर असल्याचे अधोरेखित झाले आहे.
येथील जैवविविधतेला धोका
येथील ग्रामस्थांनी जरी येथील जैवविविधतेचे आणि निसर्गाचे रक्षण केले असले तरी बाहेरील लोकांकडून त्याला धोका निर्माण झाला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. येथे येणारे काही पर्यटक शिकारीच्या हेतूने येत आहेत. गेल्याच आठवड्यात सावंतवाडी शहर आणि बांद्यातून काही युवकांनी येथे येऊन साळींदर ची शिकार केली होती. ग्रामस्थांनी जागरुकपणा दाखवून त्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. दुसरी गोष्ट म्हणजे येथे मोठ्या प्रमाणात जमिनी गैरमार्गाने विकत घेऊन तेथे बांधकामे केली जात आहेत. त्याचा परिमाण येथील निसर्गाला, जैवविविधतेला आणि ग्रामस्थांना भोगावा लागत आहे. याविरोधात येथील ग्रामस्थांनी आवाज उठवला असून आंदोलनाचा मार्ग अंगिकारला आहे.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search