


सिंधुदुर्ग: कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गुढीपूर येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई करायला गेलेले नायब तहसीलदार प्रतीक आढाव व तलाठी ओंकार केसरकर यांच्यावर डंपर घालून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन डंपर चालकांविरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे यांच्या आदेशानुसार नायब तहसीलदार प्रतीक आढाव यांच्या नेतृत्वाखाली पथक अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईसाठी नियुक्त केले आहे. वालावल मंडळ अधिकारी धनंजय चंद्रकांत सिंगनाथ, चेंदवणचे ग्राम महसूल अधिकारी भरत नेरकर, तुळसुली तर्फ माणगावचे ओंकार संजय केसरकर, घाटकरनगरचे नीलेश गौतम कांबळे, माणकादेवीचेच्या स्नेहल जयवंत सागरे, सोनवडे तर्फ कळसुलीचे शिवदास राठोड, पणदूरचे रणजित कदम, शिवापूरचे सूरज भांदिगरे या कर्मचार्यांचा या पथकात समावेश आहे.
दरम्यान अवैध वाळू उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी महसूल विभागाने आता कंबर कसली आहे. यासाठी नेमलेले अधिकार्यांचे पथक सर्वत्र फिरत असताना शुक्रवार १७ जानेवारी रोजी रात्री ११ वाजता या पथकाला पिंगुळी गुढीपूर येथील शिक्षक कॉलनी जवळ डंपर लागल्याचे आढळून आले.
या ठिकाणी चार डंपर होते. या डंपरांची तपासणी केली असता यामध्ये अनधिकृत अवैध वाळू भरल्याचे दिसून आले. हे डंपर कोणाचे आहेत किंवा याचे चालक कोण आहेत याची पडताळणी करण्यासाठी या ठिकाणी वाट अधिकाऱ्यांनी पाहिली. मात्र उशिरापर्यंत कुणी आले नाही त्यानंतर रात्री १ वाजता डंपर क्रमांक (एमएच- ०७- एक्स- ०२६७) चा चालक येथे उपस्थित झाला. त्याने आपले नाव मिलिंद नाईक असे सांगितले. त्या ठिकाणी पंच यादी केल्यानंतर हा डंपर कुडाळ तहसील कार्यालय येथे तलाठी निलेश कांबळे यांच्यासह पाठवून देण्यात आला.
उर्वरित तीन डंपरचे चालक यांची वाट पाहिल्यानंतर पथकातील काही कर्मचारी गस्तीसाठी गेले. त्यानंतर पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास त्या ठिकाणच्या डंपर सुरू झाल्याचा आवाज आल्यामुळे नायब तहसीलदार प्रतीक आढाव हे पाहण्यासाठी गेले (एमएच-०६- एक्यू ७०९७) या डंपरच्या चालकाला आवाज देऊन थांबण्यासाठी सांगितले. मात्र त्यांनी काही न ऐकता डंपर अंगावर घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा नायब तहसीलदार प्रतीक आढाव हे बाजूला गेल्यामुळे वाचले. हा डंपर वेगाने निघून गेला त्याच्या पाठलाग नायब तहसीलदार यांनी केला मात्र तो मिळाला नाही. दरम्यान नायब तहसीलदार आढाव पुन्हा पिंगुळी येथे आले.
तर पकडलेल्या डंपर पैकी (एमएच -०७- सी- ६६३१) या डंपरच्या चालकांनी तलाठी ओंकार केसरकर यांच्या अंगावर डंपर घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दुसऱ्या बाजूला उडी मारल्यामुळे ते वाचले. याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात नायब तहसीलदार प्रतीक आढाव यांनी तक्रार दाखल केली असून दोन डंपर चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील इतर दोन डंपर महसूल विभागाने कुडाळ तहसील कार्यालय येथे आणले आहेत.
मुंबई: प्रशासन सुलभ होण्याच्या दृष्टीने आणि स्थानिक विकासाला गती मिळण्यासाठी महाराष्ट्रातील सध्या अस्तित्वात असलेल्या जिल्ह्यांतून नवीन 21 जिल्ह्यांची निर्मिती करण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे. येत्या २६ जानेवारी रोजी या निर्णयाची अधिकृत घोषणा करण्यात येण्याची शक्यता आहे अशा आशयाची बातमी समाज माध्यमांतून मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. मात्र ही बातमी खरी नसून अशा प्रकारचा कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याची माहिती समोर येत आहे.
या बातमी नुसार राज्यात नवीन २१ जिल्ह्यांची निर्मिती प्रस्तावित करण्यात आली आहे. राज्याच्या प्रशासकीय सोयीसाठी आणि स्थानिक विकासाला गती देण्यासाठी या २१ नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या अस्तित्वात असलेल्या ३५ जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्यांचे विभाजन करून हे नवीन जिल्हे तयार होणार आहेत. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन करून मंडणगड हा स्वतंत्र जिल्हा घोषित होण्याची शक्यता आहे. तर रायगड जिल्हय़ाचे विभाजन होऊन महाड हा जिल्हा अस्तित्वात येणार आहे. २६ जानेवारीला या संदर्भात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मात्र या बातमीला कोणताही आधार नसून जुन्या संदर्भाचा वापर करून ही फेक बातमी पसरविण्यात येत आहे.
पालघर:- रविवार दि. १२ जानेवारी २०२५ रोजी स्वराज्य जननी, राजमाता जिजाबाई भोसले व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त “बेस्ट शिव हनुमान मंदिर ट्रस्ट” च्या वतीने “एकलव्य आश्रम शाळा” हिरडपाडा, ता. जव्हार, जि. पालघर या आदिवासी शाळेस सदिच्छा भेट देण्यात आली. सदर प्रसंगी “बेस्ट शिव हनुमान मंदिर ट्रस्ट” कडून या शाळेस राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, संत तुकाराम महाराज, राजश्री शाहू महाराज, स्वामी विवेकानंद अशा अनेक थोर व्यक्तींचे फ्लेक्स फोटो व नकाशे वेगवेगळ्या वर्गात लावण्यासाठी भेट देण्यात आले. शिवाय शाळेतील सर्व मुलांना खाऊचे वाटप सुद्धा करण्यात आले….
सदर कार्यक्रमासाठी ट्रस्टचे अध्यक्ष श्री. नंदकुमार राणे, सचिव श्री. नारायण चव्हाण, उपाध्यक्ष श्री. ओमप्रकाश सिंह, खजिनदार श्री. सूरज सिंह, तसेच विश्वस्त श्री. सतिश राणे व सुनिल सिंह उपस्थित होते. शाळेतर्फे शाळेचे संचालक श्री . दिलिप पटेकर, मुख्याध्यापक श्री. मेदगे, शिक्षक श्री. राजेश विंचूरकर, श्री. नागरगोजे, श्री.जरे, श्री. पाटील , श्री. इंगळे, श्री. बडगुजर उपस्थित होते.
ट्रस्टच्या वतीने ट्रस्टचे अध्यक्ष श्री. नंदकुमार राणे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व ट्रस्ट तर्फे केली जाणारी मदत योग्य ठिकाणी पोहचत आहे याबद्दल समाधान व्यक्त केले आणि उज्ज्वल भविष्यासाठी विद्यार्थ्यांना शूभेच्छा दिल्या……

मुंबई: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) नवीन एक्सप्रेस वे बांधणार आहे. हा द्रुतगती मार्ग जेएनपीटीजवळील पागोटे ते जुन्या पुणे महामार्गावरील चौक जंक्शनपर्यंत 30 किमी लांबीचा असेल. या प्रकल्पासाठी अंदाजे 3,700 कोटी रुपये खर्च येणार असून 30 महिन्यांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
यामुळे एमटीएचएल (अटल सेतू) ते गोव्याला जाणाऱ्या महामार्गापर्यंतचा प्रवास अवघ्या 20-30 मिनिटांत पूर्ण होणार आहे. या मार्गामुळे मुंबई ते गोवा या महामार्गावरील प्रवासाचा वेळ कमी होणार आहेहा द्रुतगती मार्ग उरण-चिरनेर महामार्ग, गोवा महामार्ग आणि पुणे द्रुतगती महामार्ग अशा अनेक महत्त्वाच्या महामार्गांना जोडेल. भविष्यात हा महामार्ग अलिबाग-विरार मल्टीमॉडल कॉरिडॉर, मुरबाड-जुन्नर महामार्ग, समृद्धी द्रुतगती महामार्ग आणि नाशिक महामार्गाशी देखील जोडला जाईल.
तसेच तो वडोदरा-मुंबई ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वेशी जोडला जाणार आहे. यामुळे बंदर आणि विमानतळ परिसरात मालवाहतूक सुलभ होईल आणि जेएनपीटी, गोवा, पुणे आणि मुंबई दरम्यानचा प्रवास वेळही कमी होईहा नवीन एक्स्प्रेस वे अटल सेतूच्या शिवडी टोकाला असलेल्या कोस्टल रोडला आणि वरळीजवळील सी लिंकला जोडेल. त्याचा पुढील विस्तार अलिबाग-विरार मल्टीमॉडल कॉरिडॉर, मुरबाड-जुन्नर महामार्ग, समृद्धी द्रुतगती महामार्ग आणि पडघाजवळील नाशिक महामार्ग (मोरबे, कर्जत, शेलू, वाघणी आणि बदलापूर मार्गे) यांना जोडतील. हा दिल्ली-मुंबई कॉरिडॉरच्या वडोदरा-मुंबई ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेचाही भाग असेल.NHAI लवकरच या कामाचा कार्यादेश जारी करुन, येत्या सात महिन्यांत बांधकाम सुरू होण्याची अपेक्षा आहे. या कॉरिडॉरमुळे 10,000 हून अधिक वाहनांसाठी वाहतूक सुरळीत होणार आहे. यामुळे मल्टी-एक्सल कंटेनर ट्रक यांचा प्रवास सुलभ होणार आहे.
नव्या एक्स्प्रेस वेमुळे रस्त्यांवरील गर्दी कमी होणार असून प्रवासाचा वेळही वाचणार आहे, असे NHAI च्या प्रादेशिक व्यवस्थापक अंशुमाली श्रीवास्तव यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली.
Ratnagiri bus accident: रत्नागिरीच्या शेनाळे घाटात एका एसटी बसचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. ही एसटी बस रविवारी रात्री दाभोळवरुन मुंबईच्या दिशेने येत होती. त्यावेळी शेनाळे घाटातील एका तीव्र उतारावर चालकाचे एसटी बसवरील नियंत्रण सुटले आणि ही बस दरीत घरंगळत गेली. मात्र, त्याठिकाणी असणाऱ्या एका झाडाला धडकून बस तिथेच थांबली. ही बस आणखी पुढे घरंगळत गेली असती तर ती धरणात कोसळून मोठा अनर्थ घडला असता. मात्र, सुदैवाने आणि प्रवाशांचे दैव बलवत्तर असल्याने प्रवाशांचे जीव वाचले.
प्राथमिक माहितीनुसार, हा अपघात झाला त्यावेळी एसटी बस रविवारी रात्री मंडणगड शेनाळे घाटातून जात होती. या घाटात अतितीव्र उताराचा रस्ता आहे. यापैकी एका उतारावर एसटी बसवरील नियंत्रण सुटून ती दरीत कोसळली. दरीतील झाडाझुडपांमधून ही एसटी बस खाली घरंगळत जात होती. बस दरीत कोसळताना प्रवाशांना जाग आली तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. या दरीच्या खालच्या बाजला धरण होते. ही एसटी बस आणखी खाली घरंगळत गेली असती तर थेट धरणात कोसळली असती आणि अनेक प्रवाशांचा जीव जाण्याची शक्यता होती. मात्र, दरीतील एका झाडला धडकून एसटी बस तिथेच अडकून पडली. यानंतर बचावपथकांनी घटनास्थळी धाव घेऊन एसटी बसमधील प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले. रात्रीची वेळ असल्यामुळे बसपर्यंत मदत पोहोचण्यास विलंब झाला. तोपर्यंत अनेक प्रवाशी बसमध्ये जीव मुठीत धरुन बसले होते.
Nagpur Goa Shaktipeeth Expressway: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील शक्तीपीठे, काही महत्त्वाची तीर्थक्षेत्रे आणि तीर्थक्षेत्रे यांना जोडणारा नागपूर आणि गोवा दरम्यान द्रुतगती मार्ग बांधण्याच्या महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला आता गती मिळू लागली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) नागपूर-गोवा शक्तीपीठ द्रुतगती मार्गासाठी पर्यावरण मंजुरीसाठी नवीन अर्ज सादर केला आहे.
ऑगस्टच्या सुरुवातीला, स्थानिक शेतकऱ्यांसह शिष्टमंडळाने कोल्हापुरात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची भेट घेऊन प्रकल्प रद्द करण्याची मागणी केल्यानंतर, एमएसआरडीसीने प्रकल्पासाठी पर्यावरण मंजुरी घेण्याची योजना मागे घेतली होती.मात्र MSRDC ने आता पुन्हा अर्ज केला आहे. या सुधारित अर्जात वर्धा ते सिंधुदुर्ग पर्यंतच्या सर्व पॅकेजेससाठी काही संरेखन पर्याय सादर केले आहेत.
प्रस्तावित सहा-लेन प्रवेश-नियंत्रित शक्तीपीठ एक्सप्रेसवे लांबीमध्ये नागपूर-मुंबई द्रुतगती महामार्गापेक्षा लांबीला (802 किलोमीटर) मोठा असणार आहे. शक्तीपीठ द्रुतगती मार्ग वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून सुरू होईल आणि महाराष्ट्र-गोवा राज्य सीमेवरील पत्रादेवी येथे संपेल. हा महामार्ग वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, कोल्हापूर आणि सिंधुदुर्गमधून जाण्याचा प्रस्ताव आहे. एक्स्प्रेस वेमुळे नागपूर आणि गोवा दरम्यानचा प्रवास वेळ 18-20 तासांवरून 8-10 तासांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे. वृत्तानुसार, विदर्भ आणि मराठवाड्यातील जमीन मालक या प्रकल्पाला पाठिंबा देत आहेत, तर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून याला मोठा विरोध होत होता.
या विरोधामुळे प्रकल्पासाठी एकापेक्षा जास्त संरेखन पर्याय सादर करण्यात आलेले आहेत. हे पर्याय ठरविताना हा मार्ग सुपीक जमिनी नाश करणारा नसेल आणि पर्यावरणाला जास्त हानी पोहोचवणारा नसेल याची दक्षता यावेळी घेतली असल्याचे संबधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
At dawn from the gateway to Mars, the launch of Starship’s second flight test pic.twitter.com/ffKnsVKwG4
— SpaceX (@SpaceX) December 7, 2023
Content Protected! Please Share it instead.