Category Archives: कोकण

कोकणातील १२ रेल्वे स्थानकांच्या विकासकामांचे भूमिपूजन संपन्न

रत्नागिरी |कोकणातील पर्यटनाला चालना देण्याकरिता रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण रेल्वे स्थानकांच्या पोहोच मार्गाची देखभाल दुरुस्ती व परिसराचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे त्यासाठी कोकण रेल्वे महामंडळ मर्यादित KRCL आणि सार्वजनिक बांधकाम विभाग PWD यांच्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला होता. या करारानुसार प्रवाशांची वर्दळ असणाऱ्या महत्त्वाच्या १२ रेल्वे स्थानकांचे काम पहिल्या टप्प्यात हाती घेण्यात आले आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात या स्थानकांवरील कामांकरिता ५६.२५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून या कामांचे मुख्यमंत्री  यांच्या हस्ते भूमिपूजन ऑनलाईन पध्दतीने काल करण्यात आले.

खालील १२ रेल्वे स्थानकांचे होणार सुशोभिकरण :

✅रायगड जिल्हा- वीर, माणगाव आणि कोलाड

✅रत्नागिरी जिल्हा – चिपळूण, रत्नागिरी, संगमेश्वर, राजापूर आणि खेड

✅सिंधुदुर्ग जिल्हा – कणकवली, सिंधुदुर्गनगरी, कुडाळ आणि सावंतवाडी

Loading

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेमार्गावर चालविण्यात येणार्‍या गाड्यांच्या आरक्षणाची तारीख जाहीर…

Konkan Railway News | 09 Aug 2023 18:00
पाश्चिम रेल्वेने नुकत्याच जाहीर केलेल्या विशेष गाड्यांचे आरक्षणाची तारीख रेल्वे प्रशासनाने जाहीर केली आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार खालील गाड्यांचे आरक्षण दिनांक 12 ऑगस्ट रोजी अधिकृत संकेतस्थळ आणि तिकीट आरक्षण खिडक्यांवर चालू होणार आहे.
1) Train no. 09019 Madgaon  – Udhna Bi-Weekly Special on Special Fare
2) Train no. 09411 Kudal (Weekly) – Ahmedabad Jn. Special on Special Fare



Konkan Railway News | 08 Aug 2023 21:30 :रेल्वे प्रशासनाने दिलेल्या अधिक माहितीनुसार प्रवाशांच्या सोयीसाठी वेस्टर्न रेल्वे अहमदाबाद ते कुडाळ ही एक अजून एक विशेष गाडी चालविणार आहे. त्यामुळे या तिन्ही गाड्यांच्या एकूण २२ फेऱ्या होणार आहेत. या गाडीची अधिक माहिती खालीलप्रमाणे
3) Train no. 09412 / 09411 Ahmedabad Jn. – Kudal – Ahmedabad Jn. (Weekly) Special on Special Fare:
Train no. 09412 Ahmedabad Jn. – Kudal (Weekly) Special on Special Fare:
ही गाडी दि. सप्टेंबर महिन्याच्या १२,१९आणि २६ या तारखांना (मंगळवारी) अहमदाबाद या स्थानकातून सायंकाळी ०९:३० वाजता  सुटून दुसर्‍या दिवशी कुडाळ येथे पहाटे ०४ वाजून १० मिनिटांनी पोहचेल
Train no. 09411 Kudal (Weekly) – Ahmedabad Jn. Special on Special Fare:
ही गाडी दि. सप्टेंबर महिन्याच्या १३,२०आणि २७ या तारखांना (बुधवारी) कुडाळ या स्थानकातून सकाळी ०६:३० वाजता  सुटून दुसर्‍या दिवशी अहमदाबाद येथे पहाटे ०३:३० वाजता पोहचेल
ही गाडी खालील स्थानकांवर  थांबेल 
वडोदरा,सुरत, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा,माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा,आरवली रोड,  संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग.
डब्यांची स्थिती
2 Tier AC  – 02 Coach, 3 Tier AC – 06 Coaches, Sleeper – 08 Coaches,  Second Seating – 04 Coaches , SLR  – 01, Generator Van – 01 असे मिळून एकूण 22 LHB डबे



Konkan Railway News | 08 Aug 2023 19:30: गणेशोत्सवासाठी गावी जाणार्‍या चाकरमान्यांसाठी एक खुशखबर आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी वेस्टर्न रेल्वेने अजून काही गाड्या कोकण रेल्वेमार्गावर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार खालील गाड्या गणेशोत्सवासाठी विशेष गाड्या म्हणून चालविण्यात येतील.
1) Train No. 09020 / 09019 Udhna – Madgaon Jn. – Udhna  (Bi-Weekly) Special on Special Fare:
09020 Udhna – Madgaon  Bi-Weekly Special 
ही गाडी सप्टेंबर महिन्याच्या १६,२०,२३, २७,३० (बुधवार आणि शनिवार) या दिवशी  उधना येथून दुपारी ३.२५ वाजता सुटेल ती मडगाव स्टेशन ला दुसऱ्यादिवशी सकाळी ०९:३० ला पोहचेल.
09019 Madgaon  – Udhna Bi-Weekly Special 
ही गाडी सप्टेंबर महिन्याच्या १७,२१,२४, २८ आणि ओक्टोम्बर महिन्याच्या १ तारखेला (गुरुवार आणि रविवार) या दिवशी मडगाव येथून सकाळी १०:२० वाजता सुटेल ती उधना स्टेशनला दुसऱ्यादिवशी सकाळी ०५:०० ला पोहचेल.
ह्या गाड्या  नवसारी, वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिर, राजापूर रोड, वैभववाडी रोड,कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रॊड, थिवीम, करमाळी ह्या सर्व स्थानकांवर थांबतील.
डब्यांची स्थिती
Composite ( First AC + 2 Tier AC)  – 01 Coach, 2 Tier AC – 02 Coaches, 3 Tier AC – 06 Coaches,  Sleeper – 08 Coaches, General – 03 Coaches, SLR – 01, Generator Car – 01. असे मिळून एकूण 22  LHB डबे

2) Train No. 09057 / 09058 Udhna  – Mangaluru Jn. – Udhna (Weekly) Special on Special Fare:

Train no. 09057 Udhna Jn. – Mangaluru Jn. Weekly Special 
ही गाडी दि. सप्टेंबर महिन्याच्या १३,२०आणि २७ या तारखांना (बुधवारी) उधाणा येथून सायंकाळी ८ वाजता  सुटून दुसर्‍या दिवशी मंगळरू येथे संध्याकाळी ०६ वाजून ३० मिनिटांनी पोहचेल
Train no. 09058 Mangaluru Jn. – Udhna Jn. Weekly Special 
ही गाडी दि. सप्टेंबर महिन्याच्या १४,२१ आणि २८ या तारखांना (गुरुवारी)  मंगळरू येथून रात्री २०:४५ वाजता सुटून दुसर्‍या दिवशी संध्याकाळी ८  वाजता ती उधणा येथे पोहचेल.
ही गाडी खालील स्टेशन वर थांबेल 
वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, कामण, पनवेल, रोहा,माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रॊड, थिवीम, करमाळी, मडगाव, कानकोना, कारवार, अंकोला ,गोकर्णा रोड,कुमता, होन्नावर, मुरुडेश्वर,भटकल,मूकाम्बिका रोड, कुंदापुरा, उडपी, मुलकी, सुरथकाल  स्थानकावर थांबणार आहे.
डब्यांची स्थिती
Composite (First AC + 2 Tier  AC) – 01 Coach,  2 Tier AC – 02 Coaches,, 3 Tier AC – 06 Coaches,  Sleeper – 08 Coaches,  General – 03 Coaches, Generator Car – 01,  SLR  – 01. असे मिळून एकूण 22  LHB डबे
या गाड्यांच्या आरक्षणाची तारीख अजून जाहीर करण्यात आली नसून लवकरच ती जाहीर करण्यात येणार आहे.

Loading

कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या इंदोर-कोचुवेली एक्सप्रेसच्या डब्यांच्या संरचनेत बदल

   Follow us on        

Konkan Railway News :पश्चिम रेल्वेने कोंकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या ट्रेन क्र 20932 / 20931 इंदूर – कोचुवेली – इंदूर साप्ताहिक एक्सप्रेस या गाडीच्या डब्यांच्या संरचनेत बदल केला आहे. या गाडीचे 02 स्लीपर कोच बदलून त्याऐवजी 02 इकॉनॉमी थ्री टायर एसी डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे.

20932 इंदूर-कोचुवेली साप्ताहिक एक्सप्रेस या गाडीसाठी हा बदल दिनांक १९ डिसेंबर २०२३ पासून करण्यात येणार आहे.

20931कोचुवेली – इंदूर साप्ताहिक एक्सप्रेस या गाडीसाठी हा बदल दिनांक २२ डिसेंबर २०२३ पासून करण्यात येणार आहे.

श्रेणी सध्याची संरचना
सुधारित संरचना बदल
टू टियर एसी0202बदल नाही
थ्री टायर एसी0606बदल नाही
इकॉनॉमी थ्री टायर एसी 0002२ डबे वाढवले
स्लीपर 0806२ डबे कमी केले
जनरल 0303बदल नाही
जनरेटर कार 0101बदल नाही
एसएलआर0101बदल नाही
पेन्ट्री कार0101बदल नाही
एकूण 2222बदल नाही

Loading

आंबडवे-मंडणगड-नालासोपारा एसटी बसला अपघात; वाहकासह १२ प्रवासी जखमी

रत्नागिरी, दि. ०८ : रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड-आंबडवे रस्त्यावर आज सकाळी पावणेदहाच्या सुमारास सावरे फाटा ते घोसाळे फाटा यादरम्यान आंबडवे-मंडणगड-नालासोपारा एसटीला अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवितहानी झाली नाही आहे मात्र वाहकासह 12 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर आंबडवे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले आहेत.

चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला आहे.या अपघातात एसटी बस पलटी झाली आहे. मंडणगड-आंबडवे या रस्त्याचे अपूर्ण कामामुळे येथे अपघात होत असल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

Loading

राजापूर तालुक्यात आढळले दुर्मिळ जातीचे पिसोरी हरीण

राजापूर : राजापूर तालुक्यातील मौजे.कोदवली साईनगर येथे  दुर्मिळ जातीचा पिसोरी  हरीण हा वन्यप्राणी आढळून आला आहे. येथील श्री राजन मधुसूदन गोखले यांचे राहत्या घराच्या पडवीत हा वन्यप्राणी आढळून आला आहे.

या प्राण्याची माहिती प्रशांत करांडे यांनी वनविभागाला दिल्या वर  वनपाल राजापूर सदानंद घाटगे, वनरक्षक विक्रम कुंभार तसेच रेस्कूटीमचे दिपक चव्हाण,प्रथमेश म्हादये,निलेश म्हादये, विजय म्हादये, गणेश गुरव, दिपक म्हादये जागेवर जाऊन सदर पिसोरीस पकडून पिंजऱ्यात सुरक्षित केले. त्यानंतर पशू वैद्यकिय अधिकारी राजापूर श्री. प्रभात किनरे यांच्याकडून त्याची तपासणी करून घेण्यात आली. सदरचा पिसोरी वन्यप्राणी हा नर जातीचा असुन त्याचे वय 7 ते 8 महिने असून तो सुस्थितीत असल्याची खात्री करून पशुवैद्यकीय अधिकारी राजापूर व मा. परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी यांचे आदेशा नुसार वन्यप्राण्यास नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले आहे.

Loading

जिल्हा परिषद सिंधुदुर्ग अंतर्गत विविध पदांसाठी सरळसेवा भरती 2023 जाहीर! अर्ज कसा कराल?

जिल्हा परिषद सिंधुदुर्ग भरती 2023: सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अंतर्गत गट-क संवर्गातील विविध पदांच्या 334 जागांसाठी सरळसेवा भरती 2023 जाहीर झाली आहे.

जिल्हा परिषद सिंधुदुर्ग भरती पदाचे नाव/ पदानुसार जागा:

1) आरोग्य पर्यवेक्षक- 01

2) आरोग्य सेवक (पुरूष)- 55

3) आरोग्य परिचारिका/ आरोग्य सेवक (महिला)- 121

4) औषध निर्माण अधिकारी- 11

5) कंत्राटी ग्रामसेवक- 45

6) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.)- 29

7) कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)- 02

8) कनिष्ठ लेखा अधिकारी- 02

9) कनिष्ठ सहाय्यक लेखा- 04

10) मुख्य सेविका/ पर्यवेक्षिका- 02

11) पशुधन पर्यवेक्षक- 18

12) प्रयोगशाळा तंत्रज्ञ- 02

13) तारतंत्री- 01

14) वरिष्ठ सहाय्यक- 04

15) वरिष्ठ सहाय्यक लेखा- 07

16) विस्तार अधिकारी (कृषि)- 03

17) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे)- 27

अर्ज कसा कराल? शैक्षणिकदृष्टीने पात्र उमेदवारांनी दिनांक 25 ऑगस्ट 2023 पर्यंत अधिकृत वेबसाईट zpsindhudurg.maharashtra.gov.in ला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा असे आवाहन शासनाने केले आहे.

जाहिरात

[pdf-embedder url=”https://kokanai.in/wp-content/uploads/2023/08/सिंधुदुर्ग-जिल्हा-जिल्हापरिषद-भरती-2023.pdf” title=”सिंधुदुर्ग जिल्हा जिल्हापरिषद भरती 2023″]

जाहिरातीची पीडीएफ फाईल येथे डाऊनलोड करा 👇🏻

Loading

‘अमृत भारत’ योजनेच्या यादीत कोकणातील एकाही स्थानकाचे नाव का नाही?

Konkan Railway News : केंद्र सरकार ‘अमृत भारत’ योजनेद्वारे देशातील ५०८ रेल्वेस्थानकांचे पुनर्वसन करणार आहे. त्यात महाराष्ट्रातील ४४ स्थानकांचा समावेश आहे. आच्छर्याची गोष्ट म्हणजे सर्वात जास्त गरज असताना कोकणातील एकाही रेल्वे स्थानकाचा समावेश नसल्यामुळे कोकणावर पुन्हा अन्याय झाल्याची भावना कोकणवासीयांत निर्माण झाली आहे.
‘अमृत भारत’ या रेल्वे स्थानक विकास योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात तब्बल २५ हजार कोटी रुपये खर्चून देशातील ५०८ स्थानकांचा विकास विमानतळाच्या धर्तीवर केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी या प्रकल्पाचे भूमिपूजन केले; मात्र विकास प्रकल्पांतही कोकणाला नेहमीप्रमाणे वगळले आहे. पहिल्या यादीत कोकण रेल्वेच्या एकाही स्थानकाचा समावेश नसल्याने कोकणातील प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.
कोंकण रेल्वेचे विलीनीकरण करणे आवश्यक
संपूर्ण देशात फक्त कोकण रेल्वेच्या मडगाव या एकमेव स्थानकाचा यामध्ये समावेश केलेला आहे. ही यादी बनवताना कोणते निकष वापरले याबाबत हे पाहणे पण महत्वाचे आहे. एक गोष्ट नेहमीच  प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे कोंकण रेल्वेला अर्थसंकल्पात स्थान न देणे किंवा केंद्र सरकारच्या अशा योजनांपासून वगळण्यात येणे . कोकण रेल्वे KRCL एक स्वतंत्र आस्थापना Companyआहे. ती बांधा- वापरा- हस्तांतरित करा (बीओटी) तत्त्वावर सुरू केली होती. त्यातील ‘बांधा’ हा टप्पा १९९८ ला पूर्ण झाला व तेव्हापासून ‘वापरा’ टप्पा सुरू आहे. सर्व कोकणवासीय आता ‘हस्तांतरित करा’ या टप्प्याची वाट पाहत आहेत. सोयीसुविधा व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पात स्थान मिळण्याच्या दृष्टीने या महामंडळाचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळेच कोकण रेल्वेच्या रोहा-मडगाव मार्गाचे मध्य रेल्वेच्या मुंबई मंडळात व मडगाव-मंगळुरू मार्गाचे नैर्ऋत्य रेल्वेत विलीनीकरण करणे गरजेचे आहे, असे जाणकारांचे मत आहे. सध्याची स्थिती पाहता कोंकण रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करणे आवश्यक आहे. दुहेरीकरणासाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज आहे, त्यासाठी केंद्रसरकारच्या अंदाजपत्रकात तरतूद करणे आवश्यक असल्याने कोंकण रेल्वेचे विलीनीकरण करणे ही काळाची गरज आहे.

Loading

कशेडी घाटात टँकर आणि एसटी बस मध्ये अपघात; ८ प्रवासी जखमी

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातील खेड हद्दीमधील कशेडी घाटात आज सकाळी ११:५० वाजता टँकर आणि एसटी बस मध्ये अपघात झाला.  या अपघातात ८ प्रवासी जखमी झाले असून त्यांना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कशेडी महामार्ग पोलीस मदत केंद्रापासून सुमारे ३ किलोमीटर अंतरावर कशेडी घाटात ठाणे ते चिपळूण जाणारी एसटी बसक्र. MH-14-BT-2635 वरील चालक योगेश दादाजी देवरे वय ३५ वर्षे हे कशेडी घाट उतरत असताना समोरुन वाकवली तालुका दापोली ते मुंबई जाणारा टँकर क्रमांक UP-70-HT-7551 वरील चालक दिनानाथ हिरालाल यादव वय ५५ वर्षे राहणार घाटकोपर, मुंबई यांना डोळआ लागल्याने गाडी चुकीच्या साईडला जाऊन समोरून येणाऱ्या एसटी बसला धडकली. या अपघातामध्ये सहाय्यक फौजदार यशवंत बोडकर आणि पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत महामार्गावरील वाहतूक सुरळीत करत अपघात ग्रस्तांना मदत केली.
अपघातामधील एसटी बसमध्ये एकूण २५ प्रवासी होते. त्यापैकी ८ प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. या जखमींपैकी अनंत दत्तात्रेय विंचू यांना जास्त प्रमाणात दुखापत झाल्याने खेड कळंबणी उपजिल्हा रुग्णालय इथे प्राथमिक उपचार करून जिल्हा रुग्णालय रत्नागिरी इथे पाठविण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या अपघाताची नोंद खेड पोलीस ठाण्यात करण्याची कार्यवाही संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू होती.

Loading

बेकायदा जमाव व महामार्ग रोखल्याप्रकरणी शिवसेनेच्या २७ कार्यकत्यांवर गुन्हे दाखल; विडिओ येथे पहा

चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणातील रखडल्या प्रकरणी  शिवसेना (ठाकरे गट) कार्यकर्त्यांनी कोंडमळा येथे महामार्ग रोखत शुकवारी आंदोलन केले होते. याप्रकरणी बेकायदा जमाव केला व महामार्ग रोखल्याचा ठपका ठेवत तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांच्यासह २७ कार्यकर्त्यांवर सावर्डे पोलिस  ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महामार्गावरील कोंडमळा येथे भुयारी मार्ग बंद असल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. शिवाय शेतकरी, जनावरे, विद्यार्थी, तसेच बाजारपेठ व रेशन दुकानावर ये-जा करताना महामार्गाचा अडथळा निर्माण होत आहे. येथे वारंवार अपघाताच्या घटना घडल्या आहेत; तसेच सावर्डे, असुर्डे, वहाळफाटा आदी ठिकाणी स्थानिक ग्रामस्थ आणि वाहनचालकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
या प्रश्नी राष्ट्रीय महामार्ग (Mumbai-Goa National Highway) विभागाकडे, तसेच ठेकेदार कंपनीकडे वारंवार तक्रारी केल्या, मात्र पाठपुरावा करूनही दाद घेतली गेली नाही. त्यामुळे याबाबात शिवसेना (ठाकरे गट) तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी कोंडमळा येथे महामार्ग रोखत ठेकेदार कंपनीविरोधात जोरदार घोषणा केली.
याप्रकरणी बेकायदेशीर जमाव करून महामार्ग अडवून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण केल्याप्रकरणी तालुकाप्रमुख सावंत यांच्यासह अन्य २७ कार्यकर्त्यांवर सावर्डे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद विनोद सहदेव आंबेरकर यांनी पोलिस ठाण्यात दिली होती. संदीप शिवराम सावंत (वय ५१), प्रीतम नंदकुमार वंजारी (३२), सागर सुशील सावंत (५६), साहिल संजय शिर्के (२३), संदीप सीताराम राणे (४२), शैलेश पांडुरंग कांबळी (३८), प्रशांत संजय सावंत (२९) या सात जणांसह अन्य २० कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

Loading

रेल्वेने आणि राजकारण्यांनी ‘वाऱ्यावर’ सोडलेले सावंतवाडी (टर्मिनस?)

सावंतवाडी | सागर तळवडेकर : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची गेल्याच आठवडय़ात दिल्लीत भेट घेत कोकण रेल्वे संदर्भातील मागण्यांबाबत चर्चा केल्यानंतर नांदगाव रेल्वे स्थानकावर तुतारी एक्सप्रेसला थांबा देण्यात आला आहे. अवघ्या 24 तासांत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंजुरी दिली आहे. दरम्यान, गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचा प्रश्नासह स्थानकावर एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा म्हणून आवाज उठवणाऱ्या सावंतवाडीकरांच्या मागण्यांच काय झालं ? हा प्रश्न तसाच आहे. की सावंतवाडीकरांना कुणी वाली उरलं नाही ? असा सवाल उपस्थित होत आहे.

पर्यटन जिल्हा सिंधुदुर्गसह महाराष्ट्राच शेवटच रेल्वे स्थानक हे सावंतवाडी आहे. परंतु सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचं रखडलेलं काम पूर्णत्वास यावं तसंच मोजक्याच गाड्यांना थांबा असल्यानं अधिकच्या रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा‌. या प्रवासी संघटनांच्या मागण्यांना रेल्वे प्रशासनकडून आजवर केवळ केराची टोपलीच दाखवली गेली आहे. सावंतवाडी स्थानक हे शहराबाहेर असूनही उत्पन्नाच्या बाबतीत अग्र क्रमांकावर आहे. मात्र, तरीही केवळ ९ रेल्वे गाड्यांना इथे थांबा दिला गेलाय. तर सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच फेज-वन च काम होऊन फेज-टू चं काम अद्याप पूर्ण झालेल नाही आहे. ते कधी पूर्णत्वास येईल याबाबत अवाक्षरही कुणी काढत नाही. टर्मिनस तर लांबची गोष्ट रेल्वे गाड्यांना थांबे सुद्धा मिळत नाहीत. रेल्वेनं ये-जा करायला सावंतवाडीकरांना कुडाळवारी करावी लागत आहे. शहरातील नागरिकांना नाहक अर्धा तास यासाठी बायरोड प्रवासात घालवावा लागत आहे. तालुक्यातील इतर गावांतील प्रवाशांबद्दल न बोलेल चांगलं. जर स्वतःची चारचाकी किंवा दुचाकी असेल तर ठीक अन्यथा सरकारी वाहनांचा विचार केला तर प्रवाशांचे होणारे हाल ? ‘अतिथी देवो भव’ म्हणून पाहुण्या चाकरमान्यांना स्थानकापर्यंत सोडायला जाणाऱ्या तासनतास स्थानकावर बसून राहणाऱ्या कोकणीमाणसाचा विचार आमचे लोकप्रतिनिधी, स्थानिक आमदार दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, पालकमंत्री रविंद्र चव्हाण, केंद्रीय मंत्री नारायण राणे कधी करणार ? हा एक यक्षप्रश्न बनून राहिला आहे.

कोंकण रेल्वे प्रशासनाला इथल्या स्थानिक जनतेबद्दल, चाकरमानी, तसेच प्रवाशांबद्दल आस्था आहे का ? सावंतवाडी स्थानक हे शहराबाहेर असून ही या स्थानकाचे उत्पन्न हे १३.४ करोड व प्रवासी संख्या ही ३.५ लाख एवढी आहे. उत्पन्नाच्या बाबतीत १० व्या क्रमांकावर असताना येथे ५ दैनिक व ४ साप्ताहिक अशा एकूण ९ रेल्वे गाड्या थांबतात. सावंतवाडी स्थानकावर असा अन्याय का ? उत्पन्न , प्रवासी संख्या असून ही कमी थांबे का ? वारंवार सावंतवाडीवर हा अन्याय कशासाठी? की सावंतवाडीकरांना कुणी वाली राहीलेला नाही ?

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search