सिंधुदुर्ग – इन्सुली घाटीत ओव्हरटेक करण्याच्या नादात टेम्पोने धडक दिल्याने पुणे-पणजी प्रवास करणार्या शिवशाही बसला अपघात झाला आहे. ही घटना आज रविवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली.मात्र सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.मात्र शिवशाही गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान अपघात झाल्यावर टेम्पो चालकाने अपघात स्थळावरून पळ काढला.याबाबतची माहिती सावंतवाडी आगाराचे प्रमुख नरेंद्र बोधे यांनी दिली. तशी तक्रार सावंतवाडी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग: गोवा राज्यात काजू शेतकऱ्यांच्या मागणीला अखेर न्याय मिळाला आहे. गोवा राज्यात काजूला १२५ रुपये प्रति किलो असा बाजारभाव चालला होता. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काजूची आधारभूत किमंत (हमीभाव) प्रतिकिलो १५० रुपये करण्यात आल्याचे जाहीर केले आहे. त्याचप्रमाणे जानेवारी पासून शेतकऱ्यांनी विकलेल्या काजूला पूर्वलक्षी प्रभावानुसार अनुदान मिळणार आहे. त्यामुळे यंदा पडलेल्या बाजारभावामुळे शेतकऱ्यांचे झाले नुकसान भरून निघणार आहे.
कोकणातील शेतकऱ्यांना न्याय कधी मिळणार?
महाराष्ट्र राज्यात कोकणात आणि त्याच्या लगतच्या जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात काजू उप्तादन होते. काजू हे पीक वर्षातून एकदा येते, कोकणात काजूपीकाकरिता वापरण्यात येणाऱ्या जमीन आणि उत्पादन खर्चाचा विचार करता काजूला चांगला भाव मिळणे अपेक्षित आहे. वेळी-अवेळी पडणारा पाऊस, वन्यप्राण्यांपासून होणारे नुकसान, उत्पादन खर्चापेक्षा कमी परतावा यामुळे कोकणातील शेतकरी पारंपरिक पिकांकडून काजू पिकाकडे वळला आहे. डोंगराळ भागात जेसीपीच्या साहाय्याने जमीन लागवडीयोग्य बनवून तिथे काजूची रोपे लावण्यात आली. पाण्याच्या सोयीसाठी विहिरी खोदल्या गेल्या. त्यावेळी मिळणारा भाव निश्चित आणि योग्य होता त्यामुळे योग्य परतावा मिळेल या हिशोबाने हा खर्च काण्यात आला. मात्र मागील २ ते ३ वर्षांपासून काजूला मिळणार भाव खूप कमी झाला आहे. आता तर तो १०० रुपये प्रति किलो होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे आता तर नफा तर सोडाच तर शेतकऱ्यांचा झालेला खर्च पण वसूल होत नाही आहे.
वारंवार मागणी करूनही सरकारद्वारे काही ठोस पावले उचलण्यात येत नाही आहेत. महाराष्ट्रातील इतर भागात होणाऱ्या पिकांना सरकार हमी भाव देत आहे मात्र कोकणात होणाऱ्या पिकांना कधी हमीभाव देऊन येथील शेतकऱ्यांना दिलासा का मिळत नाही असा प्रश्न विचारण्यात येत आहे. कोकणातील राजकीय नेते राजकारणातच जास्त व्यग्र असल्याचे दिसत आहे. येथील शेतकऱ्यांचा कोणी वाली नाही असे पुन्हा निदर्शनास येत आहे.
Vision Abroad
मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
सिंधुदुर्ग | सावंतवाडी तालुक्यातील मुंबईस्थित चाकरमानी गावी जाण्यासाठी रेल्वेला प्राधान्य देतात. सावंतवाडी स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या पण दिवसेंदिवस वाढत आहे. मागेच सावंतवाडी रेल्वे स्थानकाला टर्मिनस चा दर्जा पण देण्यात आला आहे. मात्र येथील प्रवाशांना रेल्वेच्या आरक्षणासंबंधी एक समस्या नेहमीच भेडसावत आहे.
सावंतवाडी रेल्वे स्थानक ते सावंतवाडी शहर हे अंतर जवळपास ८ किलोमीटर आहे.आरक्षण करण्यासाठी यायचे म्हंटले तर प्रवाशांच्या वेळेचा, श्रमाचा आणि पैशाचा अपव्यव होतो. त्यामुळे सावंतवाडी पोस्ट ऑफिस मध्ये रेल्वे टिकेट्स आरक्षणाची सुविधा चालू करावी अशी मागणी होत आहे.
कुडाळ, कणकवली रेल्वे स्थानके त्या त्या शहरांच्या जवळ असल्याने तेथील प्रवाशांना हा त्रास कमी प्रमाणात होतो पण सावंतवाडीतील प्रवाशांना या त्रासाला मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागत आहे. इंटरनेट वर आरक्षण करताना अनेक अडचणी येतात. इंटरनेट वर रेल्वे तिकीट आरक्षित करता येते पण तिकीट प्रतीक्षा यादीत राहिल्यास ते रद्द होते या नियमामुळे प्रवाशांना आणीबाणीच्या Emergency वेळी तिकीट खिडकीवर येऊन आरक्षित टिकेट्स मिळवावे लागते.
आमच्या प्रतिनिधींनी याबाबत अधिक चौकशी केली असता यापूर्वी सावंतवाडी शहर येथील पोस्ट ऑफिस मध्ये रेल्वे टिकेट्स आरक्षणाची सुविधा होती; पण कोरोना लॉकडाउन नंतर ही सुविधा बंद करण्यात आली त्यानंतर ही सुविधा पुन्हा सुरु झाली नाही अशी माहिती मिळाली. मात्र ही सुविधा पुन्हा चालू करावी अशी मागणी होत आहे.
Konkan Railway News: एप्रिल महिन्यात कोकणात गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. कोकण रेल्वेने मध्य रेल्वेच्या सहकार्याने एलटीटी ते थिवीम दरम्यान एक विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
Train no. 01185 Lokmanya Tilak (T) – Thivim Special
दिनांक १५/०४/२०२३ ते २९/०४/२०२३ दरम्यान आठवड्यातून तीन दिवस म्हणजे सोमवार,बुधवार आणि शनिवार या दिवशीं ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकावरुन रात्री २२:१५ वाजता सुटेल आणि सकाळी ११:३० वाजता थिवीम या स्थानकावर पोहोचेल.
Train no. 01186 Thivim – Lokmanya Tilak (T) Special
दिनांक १६/०४/२०२३ ते ३०/०४/२०२३ दरम्यान आठवड्यातून तीन दिवस म्हणजे मंगळवार,गुरुवार आणि रविवार या दिवशीं ही गाडी थिवीम स्थानकावरुन संध्याकाळी १६:०४ वाजता सुटेल आणि पहाटे ०४:०५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावर पोहोचेल.
Konkan Railway News:कोकण रेल्वेने ऑनलाइन प्रणालीचा अवलंब करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल उचलले आहे. कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या सर्वच गाड्यांमधील तिकीट पर्यवेक्षकांना एचएचटी (हॅन्ड हेल्ड टर्मिनल) मशिन देण्यात येणार असल्याची माहिती कोकणरेल्वेने दिली आहे. याआधी मंगलोर, कन्याकुमारी, नेत्रावती, राजधानी एक्स्प्रेस, दुरोतो, एर्नाकुलम या गाड्यांसाठी ही सुविधा वापरली जात होती.
कोकण रेल्वेतील तिकीट परीक्षकांना (टीटीई) कागदावर छापलेला आरक्षण तक्ता बाळगावा लागणार नाही. आरक्षण स्थिती तपासण्यासाठी आणि पुढील आरक्षण स्थितीची माहिती देण्यासाठी, तिकीट तपासण्यासाठी आणि सीट वाटप करण्यासाठी आता कागदी तक्त्याची गरज भासणार नाही. या मशिन रेल्वे सर्व्हरशी जोडल्या जाणार आहेत. ज्यामध्ये एक 4G सिम कार्ड असणार आहे. याद्वारे तिकीट, सीट संदर्भातील प्रत्येक अपडेट कळण्यास मदत होणार आहे.
एचएचटी उपकरण हे रेल्वे प्रवाशांसाठी फायदेशीर ठरणारे आहे. एचएचटी उपकरणात फक्त एका क्लिक वर किती रिकाम्या सीट आहेत याची माहिती होणार आहे. त्यामुळे प्रतीक्षा यादीच्या आणि RAC च्या प्रवाशांना तिथे सीट मिळणे शक्य होणार आहे.
एचएचटी (हॅन्ड हेल्ड टर्मिनल) मशिनची वैशिष्ट्ये
रेल्वे सुटल्यानंतर, कोणतेही तिकीट रद्द झाल्यास, पर्यवेक्षकांना माहिती मिळेल.
रत्नागिरी– गुहागर समुद्र किनारी स्पोर्ट फिशिंग असोसिएशन, महाराष्ट्र तर्फे ”सर्फ फिशिंग” टूर्नामेंट स्पर्धेचे आयोजन केले आहे. सदर स्पर्धा गुहागर समुद्र किनाऱ्यावर होणार आहे. या टूर्नामेंटला जिल्ह्याचे पालक मंत्री माननीय उदयजीं सामंत साहेब प्रमुख पाहुणे तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.स्पर्धेचे उद्घाटन सकाळी ६.०० वा. होणार असून बक्षीस वितरण सोहळा सायंकाळी ७.०० वा. होणार आहे.
सर्फ फिशिंग म्हणजे काय?
सर्फ मासेमारी किनाऱ्यावर उभे राहून मासे पकडण्याचा किवा सर्फ मध्ये विहार करण्याचा खेळ आहे. सर्फ फिशिंग ही एक सामान्य संज्ञा आहे. आणि त्यात आमिष किवा आमिष टाकणे समाविष्ट असू शकते किवा नसू शकते. सर्व प्रकारच्या किनाऱ्यावरील मासेमारीचा संदर्भ देते. वालुकामय आणि खडकाळ किनारे, रॉक जेटी किवा अगदी मासेमारीच्या घाटांपासून अटी सर्फ कास्टिंग किवा बीच कास्टिंग किनाऱ्यावर किवा त्याच्या जवळ सर्फ मध्ये टाकून समुद्र किनाऱ्यावरून सर्फ करण्यासाठी विशेषतः खारट पाण्यामध्ये सर्फ मासेमारी केली जाते. सर्फ मच्छीमार सहसा १२ ते १६ फुट लांब मासेमारी रॉड वापरतात आणि लांब रॉडणे लांब अंतर टाकण्यासाठी कौशल्य आणि अनुभव आवश्यक असतो.
जास्तीत जास्त स्पर्धकांनी या मध्ये सहभाग नोंदवावा तसेच जास्तीत जास्त पर्यटकांनी या सुवर्णसंधीचा गुहागर किनारी फिशिंग स्पर्धा पाहण्यासाठी अवश्य भेट द्या असे आव्हान पर्यटन व्यवसायिक महासंघ गुहागर तालुका अध्यक्ष श्री संतोष घुमे व उपाध्यक्ष श्री संजय भागवत यांनी केले आहे
रत्नागिरी| मुंबई – गोवा महामार्ग अपूर्ण असताना सरकारद्वारे पुन्हा पुन्हा या मार्गावर टोल वसुलीसाठी प्रयत्न केला जात आहे. दिनांक 11 एप्रिल 2023 ला सुद्धा राजापूर तालुक्यातील हातीवले टोलनाका सुरू करून टोल वसुली चालू झाली होती. महामार्ग अपूर्ण असताना टोल वसुली का असा प्रश्न प्रसारमाध्यमांतून पत्रकारांननी उठवला होता. पत्रकारांच्या दबावापुढे अखेर सरकारला नमावे लागले. मंगळवारी सुरू केला गेलेला राजापूर – हातिवले टोल नाका एका दिवसातच म्हणजे काल बुधवारी सायंकाळी बंद केला गेला.
हातीवले येथील टोलवसुली पूर्णपणे थांबवण्यात आल्याची माहिती काल पत्रकार परिषदेत पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. जोवर तेथील स्थानिकांचे समाधान होणार नाही तोपर्यंत तेथील टोल वसुली सुरू केली जाणार नाही अशी भूमिका त्यांनी मांडली.
कोल्हापूर नॅशनल हायवे अथॉरिटीच्या व्यवस्थापनाखाली हातीवले येथील टोल नाका मंगळवारी सकाळपासून सुरू करण्यात आला होता. मात्र मुंबई गोवा हाय-वे चे काम अपूर्ण अवस्थेत असतानाही हा टोलनाका सुरू करण्यात आला. याला पत्रकारांनी प्रसारमाध्यमांद्वारे मोठ्या प्रमाणावर विरोध केला होता. येथील स्थानिकांचा विरोधही होता, या सगळ्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री उदय सावंत यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
मुंबई : काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बी ला योग्य दर मिळत नाही आहे. लॉकडाऊन च्या आधी 150 रुपये किलो असा काजूला भाव होता. लॉकडाऊन नंतर तो उतरुन 90 रुपये किलो असा झाला. पण त्यानंतर हा भाव 150 च्या आसपास गेला नाही. यंदा सुरुवातीला 135 रुपये किलो असलेला भाव दिवसेंदिवस उतरून 100 रुपये किलो वर येवुन ठेपला आहे. बाजारातील व्यापारी हा भाव पडताना दिसत आहेत. काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी विरोधी पक्षनेते अजित पवार पुढे सरसावले आहेत. कच्च्या काजूला किमान 160 रुपये प्रति किलो भाव द्यावा अशी मागणी त्यांनी पत्राव्दारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
त्यांनी या पत्रात म्हटले आहे, तळ कोकणातील बहुतांश शेतकरी काजू उत्पादक शेतकरी आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत काजू बीचे दर सुमारे 25 ते 30 टक्के खाली घसरले आहेत. काजू गराचे दर वाढत असताना काजू बी चे दर कमी होत आहेत. गेल्या वर्षी मिळालेला 135 ते 140 रुपयांचा दर या वर्षी 100 ते 105 रुपयांवर आला आहे. काजू बी खरेदीचे व्यापाऱ्यांचे धोरण हे शेतकऱ्यांवर अन्यायकारक आहे. वातावरणातील बदल, मजुरीचे वाढलेले दर, खतांचे वाढलेले दर, कीड रोगासाठी करावा लागणारा खर्च, वन्य प्राण्यांसह आग व चोरांपासून होणारे नुकसान ही आव्हाने पेलत काजू उत्पादक काजूचे उत्पादन घेत असतात. परंतु, मनमानीपणे काजू बी चे दर व्यापारी पाडत असल्यामुळे काजू उत्पादकांना उत्पानाची शाश्वती देण्यासाठी सरकारने 160 रुपयांचा हमीभाव जाहीर करावा, अशी मागणी कोकणतील काजू उत्पादक शेतकऱ्यांची आहे. तरी शासनाने काजू उत्पादकांचे शोष थांबवण्यासाठी तातडीने काजू बी साठी हमीभाव जाहीर करावा अशी मागणी पत्राव्दारे करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी च्या कोंकण विभागीय अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना आज भेटून याबद्दल लक्ष वेधले होते. त्यांच्या भेटीनंतर ताबडतोब अजित पवार यांनी हे पत्र लिहिले आहे.
Konkan Railway News: प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन आता मध्य रेल्वेने सीएसएमटी-मडगाव तेजस एक्स्प्रेसला आणखी एक व्हिस्टाडोम कोच जोडण्याचा निर्णय घेतला आहे. दिनांक १४ एप्रिलपासून अतिरिक्त व्हिस्टाडोम डबा जोडण्यात येणार आहे.
कोकणात जाताना लागणारे धबधबे , नद्या, दऱ्या, बोगदे, हिरवीगार शेतं यांचे विहंगम दृश्य व्हिस्टाडोममधून बघत प्रवास करणे लोकांच्या जास्त पसंतीस उतरले आहेत. त्यामुळेच तेजसला व्हिस्टाडोमचा अतिरिक्त डबा लावण्याची मागणी वाढली होती.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये मुंबई-मडगाव तेजस एक्स्प्रेसमध्ये व्हिस्टाडोम कोच जोडण्यात आला होता. या बदलानंतरतेजस एक्स्प्रेसमध्ये दोन विस्टाडोम कोच, ११ एसी चेअर कार, एक एसी एक्झिक्युटिव्ह चेअर कार कोच आणि दोन लगेज कोच आणि एक जनरेटर-कम-ब्रेक व्हॅन अशी रचना असेल.
मध्य रेल्वेने २०१८ मध्ये मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये पहिल्यांदा विस्टाडोम कोच जोडला . प्रवाशांची प्रचंड मागणी लक्षात घेऊन १५ सप्टेंबर २०२२ रोजी मध्य रेल्वेने मुंबई-मडगाव मार्गावर धावणाऱ्या तेजस एक्स्प्रेसमध्ये दुसरा विस्टाडोम जोडला. विस्टाडोम डब्यांना मिळालेल्या भरघोस प्रतिसादामुळे मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेसमध्ये हा डबा जोडण्यात आला. त्यानंतर डेक्कन क्वीन, प्रगती एक्स्प्रेस ,पुणे-सिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेसमध्ये विस्टाडोम कोच सुरू करण्यात आला.
व्हिस्टाडोम कोचमध्ये एलईडी दिवे, फिरता येण्याजोग्या सीट आणि पुशबॅक खुर्च्या, जीपीएस आधारित माहिती प्रणाली, विद्युतीयरित्या चालणारे स्वयंचलित स्लाइडिंग कंपार्टमेंट दरवाजे, विशेष दिव्यांगांसाठी रुंद बाजूचे सरकते दरवाजे आणि सिरेमिक टाइल फ्लोअरिंग असलेली शौचालये हि वैशिष्ट्ये आहेत. तीन बाजूंना मोठ्या काचेच्या खिडक्या असलेली व्ह्यूइंग गॅलरी हे या डब्यांचे सर्वात मोठे आकर्षण आहे, रेल्वे अधिकार्यांच्या मते, आणि प्रवाशांना त्यातून छायाचित्रे आणि सेल्फी काढणे आवडते.