Category Archives: कोकण

Sawantwadi | अर्धा तास प्रवासी जखमी अवस्थेत; रेल्वे स्थानकावरच्या सुविधे आणि सुरक्षिततेबद्दल प्रश्न उपस्थित

सावंतवाडी: सावंतवाडी येथील रेल्वे स्थानकावर सोमवारी रात्री गाडी पकडत असताना एका प्रवाशाचा अपघात झाला. संदीप रामचंद्र वरक असे त्या प्रवाशाचे नाव असून तो ओवाळिये या गावाचा आहे. या अपघातात त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून उपचारासाठी त्याला बांबुळी येथे दाखल करण्यात आले आहे.
स्थानकावरच्या  प्रवाशांच्या सुविधे आणि सुरक्षिततेबद्दल प्रश्न उपस्थित
अपघात नक्की कसा झाला त्याची पूर्ण माहिती आजून आली नाही. मात्र एक गंभीर बाब सावंतवाडी स्थानकावरच्या  प्रवाशांच्या सुविधे आणि सुरक्षिततेबद्दल पुढे आली आहे. हा अपघात झाल्यानंतर जखमी प्रवासी प्लॅटफॉर्म वर अर्धातास तसाच मदतीशिवाय पडून होता. गाडी पास झाल्यावर प्लॅटफॉर्म वरच्या लाईट्स बंद झाल्या होत्या. त्यामुळे हा अपघात झाला हे तेथील रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले नाही. जखमी प्रवाशाने आपल्या मोबाईल फोन वरून स्थानका जवळच्या नातेवाईकांना संपर्क साधून मदत मिळवली.
त्यांनी जखमी युवकाला ताबडतोब उपजिल्हा रुग्णायालयात दाखल केले.
याप्रकरणी नातेवाईकांनी स्टेशन मास्तरांना जाब विचारला असता स्थानकावर फक्त स्टेशन मास्टर आणि गार्ड असे दोनच कर्मचारी रात्रीच्या वेळी होते, वरिष्ठांच्या आदेशामुळेच सर्व लाईट्स गाडी गेल्यावर बंद केल्या होत्या त्यामुळे या अपघाताची कोणतीही कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले.
सावंतवाडी एक महत्वाचे स्थानक असून त्याला टर्मिनसचा दर्जा देण्यात आला आहे. मात्र या स्थानकावर त्या दर्जाच्या सुविधा का नाही  देण्यात येत आहे असा प्रश्न प्रवाशांकडून विचारण्यात येत आहे.

Loading

स्वातंत्र्य दिना निमित्त कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघटनेच्या वतीने ठाणे स्थानकावर रेखाटण्यात आली भव्य दिव्य सुरेख रांगोळी

ठाणे :गुलामी छळाच्या जाचेतून, येणाऱ्या लोकशाही माणुसकीत ताठ मानेने जगण्यासाठी ज्या थोर वीरांनी आपल्या प्राणाची अहूती देत १५ ऑगस्ट १९४७* रोजी म्हणजेच आजच्या सुमारे ७६ वर्षापूर्वी माणसातल्या माणुसकीला स्वतंत्र्य मिळून दिले. या ७६ वर्षात लोकशाही कृषिप्रधान भारत देशाने प्रचंड प्रमाणात प्रगती केली. त्या वेळच्या घडामोडीच्या परंपरा काही अंशी भारत देशाने साथ करीत अधिकाधिक यशाची शिखरे गाठलीत.

जसे शरीरातील रक्तवाहिन्या डोक्यापासून पायापर्यंत जात शरीराला जगण्यासाठी चालना देतात; त्याचप्रमाणे भारतातील रेल्वे हा दळणवळणाचा अत्यंत महत्त्वाचा दुवा मानला जाणारा भारतीय रेल्वे मार्ग कन्याकुमारी ते जम्मू-काश्मीर पर्यंत पसरलेला आहे. तोच महाराष्ट्रातील २६ जानेवारी १९९८ रोजी मराठी कोकणवासीय खेडेगावतल्या जनतेची शहराशी नाळ जोडावी यासाठी प्राध्यापक मधू दंडवते साहेबांनी महाराष्ट्र राज्यातील राजधानी मुंबई ते सावंतवाडी रोड यादरम्यान वा पार कर्नाटक पर्यंत सुखकर आणि सुरक्षित कमी खर्चिक वेळ असा कोकण रेल्वे मार्ग* प्रवास सुरू केला.

त्याच कोकणातल्या मातीतल्या कोकण वासियांनी आपला खेडेगाव जपत; कोकणाई जगत, आपल्या सहबंधूंना एकत्र करीत कोकणवासी यांच्या समस्या आणि अडीअडचणी, सूचना यावर कार्य करण्यासाठी कोकणवासी यांचा आवाज शहरी करणापर्यंत पोहोचेल याकरीता प्रवासी बंधूंची सन २००९ साली कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ (रजि.) ठाणे संघटना अस्तित्वात नव्हे प्रत्यक्षात आणून मोठ्या प्रमाणात कार्यशील राहात आहे. या संघटनेने  भारतीय स्वातंत्र्य दिनाचे ७६ वे अमृत महोत्सव साजरा करीत सालाबाद प्रमाणे १५ ऑगस्ट २०२३ चा स्वातंत्र्य दिन सोहळा रांगोळी प्रदर्शित करीत ठाणे स्थानकात मधल्या महत्त्वाच्या प्रवासी पुलावर भव्यदिव्य सुटसुटीत रांगोळी काढीत भारतीय स्वतंत्र दिनाचा ७६ वा अमृत महोत्सवाचा प्रदर्शनीय सोहळा छोटे खानी साजरा केला. या संघटनेस ठाणे स्थानकातील स्थानक निर्देशक श्री अरुण प्रताप सिंह, स्थानक मुख्यप्रबंधक श्री तावडे साहेब, स्थानक उपप्रबंधक, रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलीस ठाणे येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि सर्व कर्मचारी वर्ग, मुख्य तिकीट तपासनीस आणि सर्व कर्मचारी वर्ग यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले. त्यावेळी तसेच खालील आवर्जून उपस्थिती असलेले संघटनेचे सभासद आणि कार्यकारी पदाधिकारी यांचे मोलाचे योगदान लाभले.

संघटनेचे सदस्य श्री राजू कांबळे (प्रमुख सल्लागार) यांच्या अधिपत्याखाली श्री . दर्शन कासले (सचिव), श्री. सुजित लोंढे (अध्यक्ष) श्री. संभाजी ताम्हणकर (खजिनदार), श्री. संतोष पवार,/श्री संतोष निकम (मा. अध्यक्ष/मा. उपाध्यक्ष) श्री. यशवंत बावदाणे (सल्लागार), श्री. तुषार साळवी (सल्लागार), श्री. महेश धाडवे (सल्लागार), श्री. विजय जगताप (सल्लागार), श्री. सुहास तोडणकर (संपर्क प्रमुख), श्री. विकास कांबळे, श्री.राजू कदम, श्री. प्रमोद घाग, श्री. नामदेव चव्हाण, श्री. गोविंद आमडोसकर, श्री. अमित चव्हाण, श्री. अनंत लोके, श्री. नागेश गुरव, श्री.गोपीचंद गुरव, श्री. विजय चव्हाण, श्री. सुजित नार्वेकर, श्री. रूपेश शिंदे, श्री. शरद धाडवे, श्री. साहील सकपाळ, श्री. वेदांत सावंत, श्री परेश गुरव, श्री. जितेंद्र बाईत (सर्व सभासद) आदि, त्याचबरोबर रांगोळी कला रेखाटक श्री. विलास सावंत आणि दिलीप सावंत यांचे अनमोल सहकार्य मिळाले.

Loading

फक्त १५१५ रुपयांमध्ये मुंबई ते गोवा विमानप्रवास; विमान कंपनीची स्वातंत्र्य दिनानिमित्त विशेष ऑफर

Spice jet Offer: स्वातंत्र्य दिनानिमित्त Spice Jet या विमान कंपनीने स्वस्तात विमान तिकीट बुकिंगची सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसांत तुमचाही विमानाने प्रवास करण्याचा विचार असेल, तर स्पाइसजेटच्या या ऑफरचा तुम्ही देखील फायदा घेऊ शकता.
स्पाइसजेटच्या या ऑफरअंतर्गत तुम्ही 14 ऑगस्ट ते 20 ऑगस्टपर्यंत तिकीट बुक करू शकता. एवढेच नव्हे तर फक्त 15 रूपये जास्त देऊन तुम्ही आवडीची सीट देखील बुक करू शकता.
स्पाईसजेटने दिलेल्या माहितीनुसार, प्रवासी फक्त रु.1515 मध्ये हवाई प्रवासाचे तिकीट बुक करू शकतात. या तिकिटाच्या रकमेत सर्व कर समाविष्ट आहेत. तसेच, फक्त 15 रुपयांमध्ये आवडती सीट देखील प्रवाशाला निवडता येणार आहे. यासोबतच प्रवाशाला 2000 रुपयांचे तिकीट व्हाउचर देखील मिळणार आहे.
या तिकीट बुकिंग अंतर्गत तुम्ही 15 ऑगस्ट 2023 ते 30 मार्च 2024 पर्यंत प्रवास करू शकता. म्हणजेच या ऑफरअंतर्गत मार्चपर्यंतच्या प्रवासासाठी तुम्हाला तिकीट बुक करता येईल. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर तिकीट दिले जाणार आहे. असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.
ही ऑफर जाणून घेण्यासाठी आमच्या प्रतिनिधीने Spice Jet (www.spicejet.com) च्या अधिकृत बुकिंग पोर्टलवर चेक केले असता दिनांक 20 ऑगस्ट रोजीची मुंबई ते मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट MOPA या शहरांदरम्यानचे विमानभाडे 1515 असल्याचे दिसून आले.

Loading

सणासुदीच्या काळात कोकण रेल्वे मार्गावर विशेष फेर्‍या; आरक्षण १८ ऑगस्ट पासून सुरू

Konkan Railway News:  दक्षिणेकडील राज्यात साजरा होणारा ओणम सण, वार्षिक वेलांकनी महोत्सव आणि या महिन्यात महाराष्ट्र राज्यात साजरे होणार्‍या सणांच्या निमित्ताने कोकण रेल्वे मार्गावर नागरकोईल ते पनवेल अशी विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. दि. 22 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर 2023 या कालावधीत या विशेष गाडीच्या दोन्ही बाजूने एकूण ६ फेऱ्या होणार आहेत. या गाड्यांचे आरक्षण 18 ऑगस्ट रोजी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर आणि आरक्षण तिकीट खिडक्यांवर चालू होणार आहे.

Train No. 06071 / 06072 Nagercoil – Panvel – Nagercoil Special (Weekly):
Train No. 06071  Nagercoil – Panvel  Special (Weekly):
ही गाडी मंगळवार दिनांक 22/08/2023, 29/08/2023 आणि 06/09/2023 या दिवशी नागरकोइल येथून सकाळी 11 वाजून 35 मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या वेळेला दिवशी 10 वाजून 45 मिनिटांनी ती पनवेलला पोहोचेल.
Train No. 06072  Panvel – Nagercoil Special (Weekly):
ही गाडी गुरुवार दिनांक 24/08/2023, 31/08/2023 आणि 07/09/2023 या दिवशी पनवेल येथून ही गाडी रात्री 12 वाजून 10 मिनिटांनी सुटेल आणि नागरकोईल ला ती दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी 10 वाजता पोहचेल.
पनवेल मडगाव दरम्यान ही विशेष गाडी रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी तसेच थिवीला थांबणार आहे.
डब्यांची स्थिती
 2 Tier AC – 01 Coaches, 3 Tier AC – 05 Coaches,  Sleeper – 11 Coaches, General – 02 Coaches, SLR – 02,  असे मिळून एकूण 21 डबे

Loading

बांदा दाणोली मार्गावर कारला अपघात

सावंतवाडी: बांदा दाणोली मार्गावर वाफोली येथील अवघड वळणावर चालकाला अचानक डुलकी लागल्याने कारला अपघात झाला, सुदैवाने या अपघातात जीवित हानी झाली नाही आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि पुण्यातून गोव्याला गेलेले पर्यटक परत पुण्यासाठी जाण्यासाठी निघाले असताना  बांदा दाणोली मार्गावर वाफोली येथील अवघड वळणावर चालकाला डुलकी लागल्याने कार (MH 14 KS7291) रस्त्याच्या बाजूला जावून झाडीत कलंडली. आज सकाळी 11.30वाजताच्या सुमारास ही घटना घडली. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून क्रेनच्या साहाय्याने ही गाडी काढण्यात आली आहे.

Loading

”मडुरा स्थानकाचे रुपांतर ‘हॉल्ट स्टेशन’ मध्ये करावे अन्यथा”…मडुरा पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा इशारा

सिंधुदुर्ग : मडुरे स्थानकावर काही गाड्यांना थांबा द्यावा तसेच मडुरा स्थानकाचे रुपांतर “हॉल्ट स्टेशन” मध्ये करावे आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी 15 ऑगस्ट रोजी सावंतवाडी तहसीलदार कार्यालयासमोर मडुरा पंचक्रोशीतील ग्रामस्थ,सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व सहकाऱ्यांसह बेमुदत उपोषण छेडणार असल्याचा लेखी इशारा रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे यांनी सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांना दिला आहे.

सावंतवाडी स्थानका नंतर मडुरा हे स्थानक लागते. मात्र या स्थानकाकडे प्रशासनाने अनेक वर्ष दुर्लक्ष केले आहे. या स्थानकावर फक्त दिवा पॅसेंजर ही गाडी थांबत असून बाकी हे स्थानक फक्त नावालाच आहे. कोकण कन्या एक्सप्रेस, मांडवी एक्सप्रेस,तुतारी एक्सप्रेस त्याचप्रमाणे सणासुदीच्या आणि उन्हाळी सुट्टीच्या कालखंडामध्ये ज्या जादा गाड्या सोडल्या जातात त्यांना मडुरा स्थानकात थांबा मिळणेसाठी गेली अनेक वर्ष आम्ही सर्व स्थानिक निवेदनाद्वारे आणि प्रत्यक्ष भेटुन कोकण रेल्वे प्रशासनाकडे थांबा देणेसाठी वारंवार मागणी करीत आहोत मात्र आपल्या मागण्यांना नेहमी प्रशासनाकडून केराची टोपली दाखविली जात आहे, त्यामुळे आता उपोषण हाच पर्याय उपलब्ध असल्याने हे उपोषण करण्यात येत असल्याचे सुरेश गावडे यांनी सांगितले.

Loading

Mumbai Goa Highway | “सरकारकडे रस्ता पूर्ण करण्यासाठी पैसे नाहीत, एक दोन रुपये तरी द्या” म्हणत आंदोलकांचे ‘भीक मांगो’ आंदोलन

Mumbai Goa Highway News: महामार्गावरील खड्ड्यांमुळे प्रवाशांचा जीव जाऊ नये या उद्देशाने खड्डे भरण्यासाठी तसेच शासनाला व निद्रस्त असलेल्या प्रशासनाल जागे करण्यासाठी आज मुंबई गोवा महामार्गावर ‘भीक मागो’ आंदोलन करण्यात आले. सह्याद्री प्रतिष्ठान, सोबती संस्था व पेण पत्रकारांनी मुंबई गोवा महामार्गावर आज रविवारी (ता.१३) रोजी वाशी नाका येथे ‘भीक मागो’ आंदोलन केले. या आंदोलनाला शिवसेनेने पाठिंबा देत सहभाग नोंदविला.
मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालक आणि प्रवाशांकडून भीक मागून सामाजिक कार्यकर्ते व प्रवासी वर्गाने शासानाबद्दल असणारा रोष गांधीगीरी करीत व्यक्त केला. भीक दो भीक दो महामार्गासाठी भीक दो अशी घोषणा देत आणि रस्त्यासाठी एक दोन रुपये तरी द्या अशी विनंती करत मुंबई – गोवा महामार्गावरील खड्डे भरण्यासाठी तसेच महामार्ग पुर्ण करण्यासाठी भिकेचे दान मागण्यात आले.
या आंदोलनात सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष समीर म्हात्रे, सह्याद्री प्रतिष्ठानचे शेकडो मावळे, सोबती संस्थेचे बापू साहेब नेने, ॲड. मंगेश नेने, सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे, पेण पत्रकार, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख विष्णुभाई पाटील, उपतालुकाप्रमुख अविनाश म्हात्रे, तालुकाप्रमुख जगदिश ठाकुर, तालुका समन्वयक दिलिप पाटील, शिवदूत रविंद्रनाथ पाटील, जिवन पाटील, प्रवीण पाटील, कांचन थळे, चेतन मोकल, राकेश मोकल, राहुल पाटील, वसंत म्हात्रे, विनोद म्हात्रे, प्रदीप वर्तक, सोबती संस्थेचे सदस्य आणि विविध सामजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता. भीक मागून जमा झालेलु रक्कम नॅशनल हायवे कार्यालयांत जमा करण्यात येणार असल्याचे समीर म्हात्रे यांनी जाहीर केले.

Loading

आंबोली | मंत्री येण्याअगोदरच ग्रामस्थांनी केले धबधब्याचे उदघाटन; नेमका प्रकार काय?

आंबोली |काल आंबोली येथील ‘बाहुबली’ या धबधब्याचे उदघाटन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र मंत्री दीपक केसरकर आणि इतर पाहुणे मंडळी  येण्याच्या अगोदरच पारपोली येथील ग्रामस्थांनी या धबधब्याचे उदघाटन करून आपली नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी पारपोली गावचे सरपंच कृष्णा नाईक,इतर सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
याबाबत पारपोली गावचे सरपंच कृष्णा नाईक यांच्याशी संवाद साधला आता त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. हा धबधबा आंबोली गावच्या हद्दीत न येत पारपोली या गावच्या हद्दीत येत असून सुद्धा उदघाटनपत्रिकेवर पारपोली गावचे किंवा या गावच्या सरपंचाचे नाव कुठेही नमूद केले नाही आहे किंवा उदघाटनाचे आमंत्रण दिले नाही. दुसरी गोष्ट म्हणजे पारपोली ग्रामपंचायतीने उदघाटनाला शुभेच्छा देणारा बॅनर आंबोलीकरांनी फाडून टाकण्याचा निंदनीय प्रकार पण घडला आहे. जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी या विषयात आंबोली ग्रामपंचायच्या बाजूने असून हा पारपोली ग्रामस्थांवर अन्याय करताना दिसत आहेत. मतांच्या राजकारणामुळे परपोली गावावर अन्याय होत आहे हा अन्याय आम्ही खपवून घेणार नाही आहे. धबधबा आमच्या गावाच्या हद्दीत येत असून त्याची संगोपनाची जबाबदारी आणि इतर हक्क आमच्या गावचे असायला पाहिजेत. अशा शब्दात त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

Loading

कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवासाठी चालविण्यात येणाऱ्या मेमू विशेष गाड्यांच्या वेळापत्रकांत आणि थांब्यामध्ये बदल

Konkan Railway News: कोकणरेल्वे मार्गावर गणेशोत्सवासाठी चालविण्यात येणाऱ्या मेमू गाड्यांच्या वेळापत्रकांत आणि थांब्यामध्ये काहीसा बदल करण्यात आला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी हा बदल केला गेला असून प्रवाशांनी या बदलांची नोंद घेऊन आपल्या प्रवासाची योजना आखावी असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे काण्यात आले आहे.
अतिरिक्त थांबे 
०११५३/०११५४ दिवा रत्नागिरी दिवा संपूर्ण अनारक्षित गणपती विशेष मेमू वीर ते खेड ह्या ५१ किलोमीटर अंतरात कुठेही थांबत नसल्याने या गाडीला किमान दोन वाढीव थांबे देण्याची मागणी कोकण विकास समितीने तसेच इतर संघटनांनी मागणी केली होती. त्यानुसार या गाडीला करंजाडी आणि अंजनी या दोन स्थानकांवर प्रत्येकी २ मिनिटांचे थांबे देण्यात आले आहेत.
०११५३ दिवा रत्नागिरी मेमू या गाडीची करंजाडी या स्थानकावर येणायची वेळ सकाळी १०:४० असून अंजनी स्थानकावरची वेळ ११:४५ आहे.
०११५४ रत्नागिरी दिवा मेमू या गाडीची करंजाडी या स्थानकावर येणायची वेळ सायंकाळी  १८:३० असून अंजनी स्थानकावरची वेळ १७:३२ आहे.
हा बदल या गाडीच्या सुरवातीपासून म्हणजे १३/०९/२०२३ पासून अमलात आणला जाणार आहे.
वेळापत्रकात बदल 
०११५६ चिपळूण दिवा मेमू या गाडीच्या चार स्थानकांच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे.
सुधारित वेळापत्रकानुसार ही गाडी
  • चिपळूण या स्थानकावर १३:१० वाजता (पूर्वीची वेळ १३:००),
  • अंजनी स्थानकावर १३:२६ (पूर्वीची वेळ १३:१५),
  • खेड स्थानकावर १३:३९ (पूर्वीची वेळ १३:३१)
  • कळंबणी बुद्रुक १३:४७ (पूर्वीची वेळ १३:४३)
या वेळेस या स्थानकांवर येणार आहे. हा बदल दिनांक १४ सप्टेंबर २०२३ पासून अमलांत आणला जाणार आहे.

Loading

Mumbai Goa Highway | सहनशील कोकणवासियांना अजून किती त्रास देणार? आदित्य ठाकरे यांचा सवाल…..

मुंबई: अनेक वर्ष रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाविषयी शिवसेना (UBT) नेते आणि विधानसभा आमदार आदित्य ठाकरे यांनी आपली नाराजी ट्विटरमध्ये व्यक्त केली आहे. आपल्या या पोस्टमध्ये ते म्हणत आहेत …..
गणेशोत्सव जवळ आलाय, कोकणचा चाकरमानी बांधव कोकणात जायला निघणार आणि रस्त्यांची अवस्था मात्र चंद्रावर पडलेल्या खड्ड्यांसारखी! प्रवास सुखकर होणं अशक्य!
पालकमंत्री पदासाठी आपापासात भांडत बसलेल्या आणि अहंकाराने फुगलेल्या खोके सरकारमधल्या आमदारांना स्वतःच्या मतदारसंघातून जाणाऱ्या महामार्गाचा प्रश्न सोडवता येत नाही? पाठीशी असलेली महाशक्तीही मदतीला येत नाही? अश्या भामट्यांना कोकणी माणूस इंगा दाखवणार!

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search