Category Archives: कोकण

तळकोकणात ‘बारसू-२’? दिल्लीतील मोठ्या उद्योगपतीकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जमिनीची पाहणी….

सिंधुदुर्ग – दिनांक १५ मे सोमवारी एका मोठ्या उद्योगपतीने दोडामार्ग तालुक्यातील शिरवल या भागास भेट देऊन तेथील जमिनीची पाहणी केल्याने अनेक चर्चांना ऊत आले आहे. या उद्योगपती नाव समजले नसले तरी तो एक दिल्लीतील मोठा उद्योगपती असलयाचे समजते. सुमारे १० ते १२ गाड्यांचा ताफा त्याच्याबरोबर होता, तसेच  स्थानिक प्रशासनाने त्याला या दौऱ्यासाठी सुरक्षा दिल्याचे समजते. पण याबाबत कोणतीही बातमी किंवा माहिती प्रशासनतर्फे प्रसिद्धीसाठी दिली नाही आहे, त्यामुळे जनतेला अंधारात ठेवून काहीतरी शिजवले जात आहे असे तर्क लावण्यात येत आहेत.
 
तळकोकणातील दोडामार्ग तालुका गोवा राज्याच्या सीमेला लागून आहे. अलीकडेच गोवा – महाराष्ट्र सीमेवर नवीन विमानतळ झाल्यामुळे दोडामार्ग तालुक्यातील जमिनींवर भूमाफियांची, परप्रांतीयांची वक्रदृष्टी पडली आहे. अलीकडेच या तालुकयातील काही जमिनीबाबत गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. बारसू येथील रिफायनरी प्रकल्पाच्या पार्श्ववभूमीवर जमिनीचे अनेक गैरव्यवहार झाले होते. तसाच प्रकार येथे होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे .मोठ्या उद्योगपतींनी पण येथे रस दाखविला असल्याने येथे पण एक प्रकल्प येईल का असे तर्क लावले जात आहेत.  






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.
Call on 9028602916 For More Details 

Loading

गणेशोत्सव २०२३ रेल्वे आरक्षण | ५ मिनिटात आरक्षण फुल्ल…

Konkan Railway News |गणेशोत्सवासाठी कोकणात गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची मेल-एक्स्प्रेससाठी तिकीट आरक्षणाची लगबग सुरू झाली आहे. यंदा गणरायाचे आगमन १९ सप्टेंबर रोजी होणार असून १६ मे २०२३ पासून रेल्वे प्रशासनाकडून गणेशोत्सवासाठी आरक्षण सुरु झाले आहे. परंतु रेल्वे गाड्यांचे आरक्षण अगदी काही मिनिटात फुल्ल होत आहे. त्यामुळे अनेकांच्या पदरात निराशा पडत आहे. तर काही प्रवासी प्रतीक्षा यादीत तिकीट काढत आहेत; त्यामुळे प्रतीक्षा यादी ३०० ते ४०० च्या घरात गेली आहे. तर काही गाड्यांची वेटिंग लिस्ट पण बंद होऊन Regret स्थिती दाखवत आहे.

कोकण मार्गावर सर्वाधिक लोकप्रिय असलेली कोकणकन्या एक्सप्रेस, मंगुळुरु एक्सप्रेस या गाड्यांच्या १५ सप्टेंबरची स्लीपर श्रेणीची कणकवली पर्यंतची आरक्षण स्थिती Regret दाखवत आहे. तर तुतारी, जनशताब्दी, एलटीटी-मडगाव या गाड्यांची आरक्षण प्रतीक्षा यादी २०० च्या वर गेली आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांची आरक्षण स्थिती Regret दाखवत आहे.

Loading

गावावरुन परतणाऱ्या चाकरमान्यांसाठी महत्त्वाची बातमी; कोकण रेल्वेमार्गावर चालविण्यात येणार आहे एक विशेष गाडी; एकूण ४ फेर्‍या…

Konkan Railway News: उन्हाळी सुट्टीत गावी गेलेल्या चाकरमान्यांसाठी  एक महत्वाची बातमी आहे. कोकण रेल्वे दक्षिण रेल्वेच्या सहकार्याने एक लांब पल्ल्याची वीकली समर स्पेशल गाडी चालविणार आहे. या गाडीच्या दोन्ही बाजूने एकूण ४ फेर्‍या होणार आहेत.

Train No. 06055 / 06056 Tambaram – Jodhpur Jn. – Tambaram Superfast Special (Weekly):

Train No. 06055 /Tambaram – Jodhpur Jn. Superfast Special (Weekly):
दिनांक २५/०५/२०२३ आणि ०१/०६/२०२३ गुरुवारी ही गाडी ताम्बरम स्थानकावरुन दुपारी ०३:०० वाजता सुटेल ती तिसऱ्या दिवशी संध्याकाळी १७:२० वाजता जोधपूर या स्थानकावर पोहोचेल.
Train No. 06056 /Jodhpur Jn. – Tambaram Superfast Special (Weekly):
दिनांक २८/०५/२०२३ आणि ०४/०६/२०२३ रविवारी ही गाडी जोधपूर स्थानकावरुन संध्याकाळी १७:३० वाजता सुटेल ती तिसऱ्या दिवशी संध्याकाळी १९:१५ वाजता ताम्बरम या स्थानकावर पोहोचेल.
या गाडीचे कोकणातील थांबे
वसई रोड, पनवेल, रोहा,चिपळूण, रत्नागिरी, मडगाव
डब्यांची संरचना
फर्स्ट एसी – 01 + थ्री टायर एसी – 08  + इकॉनॉमी थ्री टायर एसी – 11 + जेनेरेटर व्हॅन  -02 असे मिळून एकूण 22LHB  डबे

Loading

हापूस आंब्याची आवक वाढली; दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात

Mangos Rates Update : वातावरणातील उष्मा वाढत आहे. त्यामुळे फळे लवकर तयार होत आहेत. याच पार्श्वभूमीवर बाजारात आंब्यांची आवकही वाढत आहे. परिणामी बाजारात सर्वच ठिकाणांच्या आंब्यांचे दर घसरले आहेत. 

वातावरणातील उष्मा वाढला आहे. त्यामुळे फळे लवकर तयार होत आहेत. बाजारात आंब्यांची आवकही वाढत आहे. अगदी हापूस आंब्यापासून दक्षिण भारत, गुजरातकडील आंब्यांचे दरही कमी झाले. त्यामुळे खवय्यांना मनसोक्त आंब्याचा आस्वाद घेता येणार आहे. 

मागील आठवड्यापासून सर्वच ठिकाणांच्या आंब्यांची आवक बाजारात वाढू लागली आहे. यात प्रामुख्याने कोकणातील हापूस आंब्यांची आवक वाढली आहे. त्यामुळे हापूसचे दर कमी झाले असून, त्यांच्यापाठोपाठ इतर आंब्यांच्या दरात घसरण झाली आहे. आंबा आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात आला आहे.

पूर्वी १०००-१२०० रुपये प्रति डझन एवढा भाव असलेला हापूस आता ६०० ते ८०० रुपयांत मिळत आहे. 

 

 

Loading

कोकण रेल्वेमार्गावर लवकरच वंदे भारत एक्सप्रेस धावणार;आज चाचणी

Konkan Railway News : बहुप्रतिक्षित मुंबई – गोवा वंदे भारत रेल्वे लवकरच सुरु होण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत. आज मंगळवारी या गाडीसाठी रुळांची चाचणी TRIAL घेतली जाणार आहे. ही गाडी चालू झाल्यावर मुंबई वरून सुटणारी ती चौथी गाडी ठरणार आहे. या आधी मुंबई सेंट्रल – अहमदाबाद – गांधीनगर, मुंबई – साईनगर शिर्डी आणि मुंबई – सोलापूर या तीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्या सध्या मुंबईवरून सोडण्यात येणार आहे. 
मार्च महिन्यात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी मुंबई ते गोवा वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानंतर आता भारतीय रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावर सीएसएमटी – मडगांव दरम्यान वंदे भारत ट्रेन सुरु करण्याच्या नियोजन केले आहेत. वंदे भारत ट्रेनचे आज मंगळवारी (ता.१६) चाचणी घेण्यात येणार आहे. आज  सकाळी ५.३५ मिनिटांनी सीएसएमटीवरून सोळा डब्याची वंदे भारत ट्रेन मडगांवसाठी रवाना होणार आहे. या चाचणी दरम्यान रेल्वे बोर्डाचे आणि मध्य आणि कोकण रेल्वेचे अधिकारी उपस्थितीत असणार आहेत.
कोकण रेल्वेमार्गावर झालेल्या १००% विद्युतीकरणामुळे या मार्गावर आता वंदे भारत एक्सप्रेस चालवणे शक्य होणार आहे. या प्रस्तावित गाडीमुळे मुंबई गोवा या  दरम्यान वाहतुकीचा एक जलद पर्याय उपलब्ध होणार आहे. ही गाडी काही महत्वाचे आणि मोजकेच थांबे घेणार आहे. रुळांची चाचणी यशस्वी झाल्यावर इतरही तांत्रिक बाजू तपासून ही गाडी लवकरच सुरु करण्यात येणार आहे.  






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Loading

बारसू परिसरातील मातीचे नमुने घेण्याचे काम पूर्ण; प्रकल्प विरोधकांचे मनाई आदेश रद्द

राजापूर, ता. १५: रिफायनरी प्रकल्पासंदर्भातील काही आंदोलनकर्त्यांना रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रवेश करण्यास व संचार करण्यास मनाई आदेश रद्द केल्याची माहिती पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी दिली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी जारी केलेल्या मनाई आदेशान्वये रिफायनरी प्रकल्पासंदर्भातील काही आंदोलनकर्त्यांना रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रवेश करण्यास व संचार करण्यास मनाई आदेश जारी करण्यात आला होता. 
बारसू परिसरात ग्रीन रिफायनरी प्रकल्पासाठी नमुने घेण्याचे काम हाती घेण्यात आले होते.जमीन सर्वेक्षण करण्याचे काम हाती घेतले होते त्याला विरोध होऊ लागला होता. प्रशासकीय कार्यवाहीत आंदोलनकर्त्यांकडून अडथळे आणले जात होते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (२) अन्वये मनाई आदेश काढले होते. त्यामध्ये काही व्यक्तींना जिल्ह्यात प्रवेश नाकारण्यात आला होता. बारसू परिसरातील पाणी नमुने घेण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यानुसार ज्या व्यक्तींना मनाई आदेश जारी करण्यात आले होते ते आता रद्द करण्यात आले आहेत. त्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार देवाप्पा अण्णा शेट्टी ऊर्फ राजू शेट्टी (रा. अर्जुनवाड रोड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर), स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जनार्दन गुंडू पाटील (रा. परिते, ता. करवीर, जि. कोल्हापूर), अशोक केशव वालम (रा. नाणार, ता. राजापूर), जालिंदर गणपती पाटील (रा. राशिवडे बुद्रुक, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर), स्वप्नील सीताराम सोगम (रा. पन्हळेतर्फे राजापूर, ता. राजापूर), सत्यजित विश्वनाथ चव्हाण (रा. राम आंनदनगर, हाउसिंग सोसायटी, दहिसर पूर्व-मुंबई) यांचा समावेश आहे. या संबंधित रद्द आदेश निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी जारी केले आहेत.

Loading

गोवा बनावटीच्या दारूच्या तस्करीची ‘पुष्पा स्टाईल’; मुंबई – गोवा महामार्गाच्या तपासणी नाक्यावर २२ लाखांची दारू जप्त

गोवा – गोव्याहून मुंबईच्या दिशेने ट्रक मधून बेकायदा होणाऱ्या दारू वाहतुकीवर गोवा अबकारी खात्याच्या पथकाने पत्रादेवी तपासणी नाक्यावर कारवाई करत २२ लाख रुपये किमतीच्या दारुसह एकूण ३७ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

या बद्दल सविस्तर वृत्त असे की काल सायंकाळी उशिरा पत्रादेवी तपासणी नाक्यावर गोव्यातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकला (एमएच ११ बीएल ९८८४) तपासणीसाठी थांबविण्यात आला. कागदपत्रे तपासताना वैयक्तिक चौकशीवेळी चालक गांगरला. ते पाहून ट्रकची प्रत्यक्ष तपासणी करण्याचे ठरवून अधिकारी बाहेर आले. तेवढ्यात चालकाने तेथून पळ काढला.

या ट्रकची तपासणी करताना या ट्रक च्या पाठीमागील हौद्यात सिमेंटचे ब्लॉक आढळून आलेत. या कारवाईत पेडणे अबकारी निरीक्षक कमलेश माजीक, विभूती शेट्ये यांच्यासह विनोद सांगडेकर, नितेश नाईक, दिनकर गवस, रामचंद्र आचार्य, रामनाथ गावस, सत्यवान नाईक, नितेश मळेवाडकर, विठोबा नाईक, स्वप्नेश नाईक, चालक दीपक परुळेकर यांनी सहभाग घेतला.

सिमेंट लाद्यांखाली  दारूचे बॉक्स

ट्रकच्या बाहेरील भागात सिमेंट काँक्रीटच्या लाद्या रचून ठेवल्या होत्या. अबकारी कर्मचाऱ्यांनी त्या खाली उतरवल्या असता त्यात दारूचे लपवलेले बॉक्स आढळले. वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत कर्मचाऱ्यांनी कळविले.सर्व बॉक्सचा पंचनामा करून ट्र्क ताब्यात घेतला यात आँरेंज ,ग्रीन ॲपल,रॉयल ब्ल्यू ,किंग फिशर बीअर , डारवेज व्हीस्की, बाँम्बे कस्क या प्रकारचे बॉक्स मिळाले. सदर गाडी फोंड्याहून मुंबईला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

Loading

मुंबई-गोवा महामार्गामुळे सर्वात कमनशिबी ठरले ‘हे’ शहर; पर्यटनावर झाला परिणाम

 रस्ते, महामार्ग हे विकासाला हातभार लावत असतात. रस्त्यांमुळे कनेक्टिव्हिटी वाढते, व्यापाराची मोठी संधी निर्माण होते. अविकसित असलेल्या खेड्यांचे रूपांतर शहरात होते. मात्र मुंबई गोवा महार्गावरील एका शहराच्या बाबतीत उलट झाले आहे.
मुंबई-गोवा महामार्गामुळे तळकोकणातील सावंतवाडी या शहराला फायदा न होता तोटा झाला आहे. पूर्वी मुंबई गोवा मार्ग सावंतवाडी शहरातून जात होता. मात्र नवीन महामार्ग सावंतवाडी शहराच्या बाहेरून जात आहे. सावंतवाडी शहरापासून सुमारे १२ ते १४ किलोमीटर अंतरावरून झाराप येथून हा मार्ग मळगाववरून गोव्याला जातो. त्यामुळे नव्या मुंबई गोवा महामार्गामुळे सर्वात जास्त नुकसान या शहराचे झाले आहे.
मुंबईतुन गोव्याला जाणारा मोठा प्रवासवर्ग या मार्गावरून प्रवास करतो. जेव्हा हा मार्ग सावंतवाडी शहरातून जात होता तेव्हा आपोआपच येथील पर्यटनाची जाहिरात होत असे. जुना राजवाडा, नयनरम्य मोती तलाव आणि आजूबाजूची पर्यटन स्थळे पर्यटकांना येथे थांबा घेण्यास भाग पाडत असत. पर्यटक येथे थांबून येथील बाजारपेठेतील लाकडी खेळणी, कोकणी मेवा आणि इतर वस्तू आवर्जून खरेदी करायचे. त्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळत असे. 
मात्र आता चित्र पालटले आहे. महामार्ग शहराच्या बाहेरून गेल्यामुळे येथील पर्यटनाची पीछेहाट होत आहे. त्यामुळे या नवीन महामार्गामुळे सर्वात जास्त नुकसान या शहराला झाले आहे. सावंतवाडी शहरातील हॉटेल व्यावसायिकांना सुद्धा याचा मोठा फटका बसला आहे. मुंबईहून गोव्याकडे जाणार्‍या बसेस सुद्धा बायपास मार्गावरून जात असल्याने मुंबई आणि गोव्यात जाण्यास उपलब्ध असणार्‍या पर्यायांत घट झाली आहे. 
 हे नुकसान भरून काढण्यासाठी किमान प्रस्तावित संकेश्वर – बांदा महामार्ग तरी या शहरातून जावा अशी जोरदार मागणी होत आहे.    

Loading

शेतकर्‍यांचा नाद करायचा नाही; एकट्याने केले मुंबई गोवा महामार्गावर ‘रास्ता रोको’ आंदोलन..

चिपळूण – माझ्या जमिनीत अतिक्रमण झाले आहे. आपल्याला न्याय जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत मी हे आंदोलन थांबवणार असे म्हणत एका प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांने मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूणच्या कामथे येथे चक्क लोळण घातली आणि महामार्ग अर्धा तास अडविला. भर उन्हात काल सकाळी तब्बल वीस ते पंचवीस मिनिटे तो रस्त्यावर झोपून होता. यामुळे दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

अधिक माहितीनुसार, मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूणच्या कामथे येथे हे आंदोलन करण्यात आले आहे. सदर शेतकरी प्रकल्पग्रस्त असून त्याने आपल्याला मोबदला मिळाला नसल्याचा आरोप केला आहे. जोपर्यंत मला याचा मोबदला मिळत नाही तोपर्यंत मी रस्त्यावर बसून राहणार आहे असं त्याने सांगितलं आहे.

चिपळूण पोलिसांना याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि नैनीश दळी नामक त्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेत महामार्ग मोकळा केला. 

Loading

रत्नागिरी रेल्वेस्टेशनवर १२ किलो ब्राउन हेरॉईन जप्त; एकाला अटक

रत्नागिरी : रत्नागिरी रेल्वेस्टेशनवर ब्राउन हेरॉईन ची तस्करी करणाऱ्या एका तरुणाला शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने काल अटक केली, त्याच्याकडून 12.8 ग्रॅम ब्राउन हेरॉईन हा अंमली पदार्थ मिळून  आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलिस उपनिरीक्षक आकाश साळुंखे व पोलिस अंमदलार शहरातील विविध भागांमध्ये पेट्रो लिंग करत होते.तेव्हा रत्नागिरी रेल्वेस्टेशन परिसरातील प्लॅटफॉर्म नं.1 वरुन पार्सल गेटने पार्किंगकडे एक तरुण जाताना त्यांना दिसून आला.त्याच्या पाठीवर एक सॅक होती आणि त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने या पथकाने त्याला थांबवून त्याची चौकशी केली.तेव्हा त्याच्या जिन्स पॅन्टच्या उजव्या खिशात 5 पारदर्शक प्लास्टिक पिशव्या ज्यात 450 टर्की पावडर असलेल्या कागदी पुड्या मिळून आल्या.त्याच्याकडील सर्व मुददेमाल जप्त करण्यात आला असून त्याच्यावर शहर पोलिस ठाण्यात एन.डी.पी .एस अ‍ॅक्ट कलम 8 (क),22 (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलिस उपिनिरीक्षक आकाश साळुंखे,पोलिस हेड काँस्टेबल प्रसाद घोसाळे,गणेश सावंत,प्रविण बर्गे,अमोल भोसले,पोलिस नाईक आशिष भालेकर,विनय मनवाल आणि रत्नकांत शिंदे यांनी केली असून अधिक तपास सुरु आहे.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search