Category Archives: कोकण
Konkan Railway News – कोकण रेल्वेने मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सीएसएमटी स्थानकावर घेण्यात येणार्या ब्लॉक मुळे मंगलोर जंक्शन ते सीएसएमटी, मुंबई दरम्यान धावणारी Majn Csmt Exp – 12134 गाडी 23 एप्रिल 2023 ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधी दरम्यान सीएसएमटी स्थानकापर्यंत न चालवता ती दादर स्थानकापर्यंत चालविण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 10 आणि 11 तसेच 12 आणि 13 वर रेल्वेच्या माध्यमातून काही आवश्यक कामे केली जाणार आहेत. त्यामुळे या दोन लाईनवर ब्लॉक घेण्यात आले आहेत. त्यामुळे 23 एप्रिल 2023 ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधी दरम्यान काही गाड्यांची सेवा दादर स्थानकापर्यंत असणार आहे असे रेल्वे प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
मुंबई – मुंबई ते कोकण हा प्रवास आता अधिक वेगवान होणार आहे. मुंबईतील ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून लवकरच हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. त्यामुळे मुंबई ते कोकण प्रवास अधिक गतीमान होणार आहे.
ट्रान्स हार्बर लिंक हा मुंबईतील प्रकल्प आहे. मुंबई आणि नवी मुंबई या दोन शहरांना हा मार्ग जोडतो. त्याचा बहुतांश लाभ मुंबईकरांना होणार असला तरी या मार्गामुळे मुंबई स्थित कोकणवासीयांचा फायदा होणार आहे.
हा सागरी पूल पूर्वेकडील मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाला पश्चिमेकडील कोस्टल रोडशी जोडतो. त्यामुळे मुंबईकरांना कोकणात जाणे सोपे होणार आहे. सध्या मुंबई ते नवी मुंबई हे अंतर पार करण्यासाठी दोन तासांहून अधिक वेळ लागतो, ट्रॅफिक जामची पण मोठी समस्या आहे.
मात्र या सागरी मार्गामुळे 25 मिनिटात मुंबई ते नवी मुंबई हे अंतर पार करता येणार आहे. त्यामुळे मुंबई ते कोकणातील आपल्या गावचा प्रवासातही जवळपास दोन तास वाचणार आहेत.


Vision Abroad

Konkan Railway News: दिनांक 23 एप्रिल 2023 रोजी कोंकण रेल्वे मार्गावर कासरगोड ते निजामुद्दीन दरम्यान एक एकमार्गी स्पेशल One Way गाडी चालविण्यात येणार आहे. .
कसारगोड निजामुद्दीन स्पेशल (06007) ही वनवे गाडी दिनांक 23 एप्रिल रोजी सायंकाळी 17:05 वाजता सुटेल आणि दिल्लीला हजरत निजामुद्दीन स्थानकावर ती तिसऱ्या दिवशी सायंकाळी 18:00 वाजता पोहोचेल.
डब्यांची संरचना
एसएलआर – 02 + सेकंड सीटिंग – 10 + स्लीपर – 10 + थ्री टायर एसी – 01 असे मिळून एकूण 23 डबे

Konkan Railway News | दक्षिणेकडील केरळ राज्यातील करुकुट्टी – चालाकुडी या रेल्वेस्थानकां दरम्यान दिनांक २७ एप्रिल रोजी एक दिवसीय ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक चा परिणाम कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांवर होणार आहे.
कोकण रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धिपत्रकानुसार खालील गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत.
12202 – कोचुवेली – एलटीटी एक्सप्रेस ही गाडी दिनांक २७/०४/२०२३ रोजी पूर्ण रद्द करण्यात आली आहे.
12201 – एलटीटी – कोचुवेली एक्सप्रेस ही गाडी दिनांक २८/०४/२०२३ रोजी पूर्ण रद्द करण्यात आली आहे.
तर गाडी क्रमांक 20923 तिरुनवेल्ली गांधीधाम एक्सप्रेस दिनांक २७/०४/२०२४ रोजी पर्यायी मार्गाने वळविण्यात आली असून तिच्या दक्षिणेकडील राज्यातील स्थानकांच्या थांब्यामध्ये बदल करण्यात आला आहे, कोकणातील स्थानकांच्या थांब्यामध्ये काही बदल केला गेला नाही आहे.
प्रवाशांनी याची नोंद घेऊन आपल्या प्रवासाच्या योजनेत बदल करावा असे आवाहन रेल्वे प्रशासनतर्फे करण्यात आले आहे.

Vision Abroad

सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील सर्व वाळू/रेती अन्य गौण खनिजाची वाहतूक करणा-या वाहनांमधून चालकांनी आज २१ एप्रिलपासून सकाळी ६ ते रात्री १० पर्यंतच वाळू/रेती तसेच अन्य गौण खनिजाची वाहतूक करावी, असे निर्देश देतानाच नियमांचे उल्लंघन झाल्यास सक्त कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी काल के. मंजूलक्ष्मी यांनी दिले आहेत.
जिल्हयातील वाळू/रेती व अन्य गौण खनिजाच्या वाहतुकीवेळी झालेल्या अपघातांमुळे काही नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. यावर उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली गौण खनिजाच्या अवैध उत्खनन व वाहतुकीवर आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत या वाहतुकीवर काही मर्यादा घालण्यात आल्या आहेत.
पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकुमार काळे, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, सदस्य सचिव जिल्हा खनिकर्म अधिकारी अजित पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे आदीसह उपविभागीय अधिकारी (महसूल) सावंतवाडी व कणकवली हे अधिकारी उपस्थित होते.
बेजबाबदारपणे, अतिजलदगतीने, मद्यप्राशन करुन, अनियंत्रितपणे वाळू/रेती तसेच अन्य गौण खनिजाची वाहतूक करणा-या वाहनांवर व वाहन चालकांवर सक्त कारवाई करण्याच्या सूचना सर्व संबंधित यंत्रणांना दिल्या.