Category Archives: कोकण रेल्वे

मंगळवारी कोकण रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक; ३ गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम

Konkan Railway News: कोकण रेल्वे मार्गावर परवा मंगळवार दिनांक २३ जानेवारी रोजी कोकण रेल्वेच्या वीर ते अंजनी स्थानक या विभागां दरम्यान रेल्वेच्या मालमत्तेच्या देखभालीसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. एकूण अडीच तास हा मेगाब्लॉक चालणार आहे. दुपारी १३:१० ते १५:४० या वेळेत हा ब्लॉक असणार आहे. या मेगाब्लॉकमुळे कोंकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एकूण ३ गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
१) Train no. 16345 Lokmanya Tilak (T) – Thiruvananthapuram Central ‘Netravati’ Express 
दिनांक २३ जानेवारी रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी कोलाड ते वीर या स्थानकांदरम्यान ४० मिनिटे उशिराने चालविण्यात येणार आहे.
२) Train no. 10106 Sawantwadi Road – Diva Express
दिनांक २३ जानेवारी रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी रत्नागिरी ते चिपळूण या स्थानकांदरम्यान सुमारे १ तास उशिराने चालविण्यात येणार आहे.
३) Train no. 02197 Coimbatore Jn. – Jabalpur Express
दिनांक २२ जानेवारी रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी रत्नागिरी ते चिपळूण या स्थानकांदरम्यान ४५ मिनिटे उशिराने चालविण्यात येणार आहे.

Loading

कोकण रेल्वे मार्गावरील आणखी एक गाडी LHB कोचसहित धावणार

Konkan Railway News : कोकण रेल्वे मार्गावर धावणारी आणखी एक गाडी आता एलएचबी कोच सहित धावणार आहे. गाडी क्रमांक 12741/12742 वास्को द गामा – पटना सेमी फास्ट एक्सप्रेस ही गाडी दिनांक 24 जानेवारी पासून एलएचबी कोचसहित चालविण्यात येणार आहे. 

या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार वास्को द गामा ते पटना (12741) मार्गावर धावताना ही गाडी दिनांक 24 जानेवारी 2024 च्या फेरीपासून तर पटना ते वास्को (12742) मार्गावर धावताना ही गाडी दिनांक 27 जानेवारी 2024 च्या फेरीपासून एलएचबी कोचसहित चालवण्यात येणार आहे. आतापर्यंत ही गाडी 22 डब्यांची धावत होती मात्र या गाडीचा एक सेकंड स्लीपर डबा करून ती 21 एलएचबी डब्यांची करण्यात आलेली आहे. 

या साप्ताहिक गाडीला कोकणातील सावंतवाडी, रत्नागिरी आणि चिपळूण या स्थानकांवर थांबे आहेत. 

 

Loading

मडगाव – अयोध्या दरम्यान साप्ताहिक रेल्वे चालविण्याची मागणी

Konkan Railway News :अयोध्येत २२ जानेवारीला राममंदिर प्रतिष्ठापनेचा सोहळा होत आहे. त्यापूर्वी देशभरातून अनेक रामभक्त अयोध्येला भेट देत आहेत. अयोध्या जगातील एक मोठ तीर्थक्षेत्र म्हणून विकसित होत आहे. दरवर्षी देशभरातून हजारो रामभक्त अयोध्येला भेट देणार आहेत. हे लक्षात घेऊन कोकण रेल्वेमार्गावर अयोध्येत जाण्यासाठी रेल्वे आठवड्यातून एकदा सोडावी, अशी मागणी कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार समिती सदस्य सचिन वहाळकर केली आहे. याबाबत कोकण रेल्वेचे सीएमडी संजय गुप्ता यांच्यासह केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तसेच राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना निवेदन सादर केले आहे.

 

Loading

कोकण रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक; २ गाड्या उशिराने धावणार

Konkan Railway News: कोकण रेल्वे मार्गावर आज दिनांक  ०४ जानेवारी रोजी कोकण रेल्वे च्या कारवार ते भटकल  या विभागां दरम्यान रेल्वेच्या मालमत्तेच्या देखभालीसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. एकूण तीन तास हा मेगाब्लॉक चालणार आहे. दुपारी १२:०० ते १५:००  या वेळेत हा ब्लॉक असणार आहे. या मेगाब्लॉकमुळे कोंकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या २ गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
१) Train no. 06076 Panvel – Nagarcoil Jn. Special
दिनांक ०३ जानेवारी रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी मडगाव ते कारवार या स्थानकांदरम्यान  २ तास उशिराने चालविण्यात येणार आहे.
२) Train no. 22114 Kochuveli – Lokmanya Tilak (T) Express
दिनांक ०३ जानेवारी रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी भटकल स्थानकावर २० मिनिटे थांबवून  ठेवण्यात येणार आहे.

Loading

कोल्हापूर – वैभववाडी रेल्वे मार्गाच्या कामाच्या प्रक्रियेस आरंभ…

कोल्हापूर :कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या कोल्हापूर – वैभववाडी रेल्वे मार्गाची प्रकिया सुरू असल्याचे मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक राम करण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. कोल्हापूर रेल्वे स्थानकाची पाहणी करण्यासाठी ते सोमवारी कोल्हापूर स्थानकावर आले होते.

कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्गाचे काम गती शक्ति योजनेतून केले जाणार आहे. त्याकरिता डीपीआर काढण्याचे काम चालू आहे. डीपीआर मंजूर झाल्यावर निधी उपलब्ध होईल आणि ताबडतोब भूसंपादन प्रक्रियेस सुरवात होईल असे ते यावेळी म्हणालेत.

वैभववाडी-कोल्हापूर मार्गाची पीएम गतीशक्ती अंतर्गत शिफारस करण्यात आली आहे. या मार्गासाठी 3411.17 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. सन 2015 मध्ये वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण झाल्यानंतर 2016 मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या मार्गाची घोषणा केली. त्यानंतर आठ वर्षांपासून कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे हा रेल्वेमार्गाबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. पश्चिम महाराष्ट्रातील शेती उत्पादित मालाची रस्ते मार्गाने कोकणात वाहतूक केली जाते. कोकणातील खनिजांची वाहतूकही रस्ते मार्गानेच होते. कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यास पश्चिम महाराष्ट्रातील शेतीमालाची बंदरापर्यंत वाहतूक कमी खर्चिक आणि सुलभ होणार आहे. कोकणातील मालही मालवाहतूक करणे सोयीस्कर ठरणार आहे.

Loading

कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या पहिल्या प्रवासीसेवा गाडीची दयनीय अवस्था; प्रवाशांकडून नाराजी

Konkan Railway News :कोकण रेल्वेच्या रोहा ते ठोकूर दरम्यान 741 किमी पूर्ण नेटवर्कवर धावणारी पहिली प्रवासीसेवा गाडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या  मत्स्यगंधा एक्सप्रेसने याच वर्षी आपले रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे केले आहे. ट्रेन क्रमांक १२६१९/६२० मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस-मंगळुरु सेंट्रल-मुंबई एलटीटी मत्स्यगंधा एक्सप्रेसला १ मे १९९८ रोजी हिरवा झेंडा दाखवण्यात आला होता, तेव्हा तत्कालीन पंतप्रधान ए.बी. वाजपेयी आणि रेल्वे मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनी ही गाडी कोकण रेल्वे कॉर्पोरेशनला समर्पित केली होती.
मात्र जो रेक या गाडीसाठी चालवला जात आहे तो तिच्या गौरवाला साजेशा वाटत नाही आहे. तिच्या रेकची स्थिती बिघडत चालली असून त्याकडे कोणाचे लक्ष नाही आहे. मत्स्यगंधा एक्स्प्रेसला या आधुनिक रेक मध्ये LBH रेक मध्ये अपग्रेड करण्याची नितांत गरज आहे अशा मागणीचा एक ई-मेल रेल्वे अभ्यासक श्री. अक्षय म्हापदी यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री श्री आश्विनी वैष्णव आणि रेल्वेबोर्ड आणि संबंधित आस्थापनांना केला आहे. असे केल्याने या लांब पल्ल्याच्या गाडीचा प्रवास आरामदायक होईलच आणि सुरक्षित सुद्धा होईल. आशा आहे त्यांच्या या मागणीची दखल घेतली जाऊन लवकरच या गाडीला अत्याधुनिक LHB रेक दिला जाईल.
Copy of Letter 
To:ADRM,ADRMTVC SR,DD/PG SR,GM SR,[email protected],Ashwini Vaishnaw,EDPGMR RailwayBoard,[email protected]
Sun, 24 Dec at 1:57 pm
Dear Sir, 
I hope this email finds you well. I am writing to express my concern and disappointment regarding the current state of the 12619/12620 Matsyagandha Express, a prestigious service along the West Coast and an integral part of the transportation network in Coastal Karnataka. 
Despite its significance, the condition of the train’s rakes has been deteriorating, causing inconvenience to passengers and raising safety concerns. The Matsyagandha Express has been a lifeline for commuters, tourists, and traders in the region for many years. However, the train’s current rolling stock, which has served faithfully but is now showing signs of wear and tear, is in dire need of an upgrade. 
The introduction of modern Linke Hofmann Busch (LHB) rakes is long overdue, and I urge you to expedite the process of allocating brand new LHB rakes for this vital service. The benefits of LHB rakes, including enhanced passenger comfort, improved safety features, and reduced maintenance costs, are well-documented. 
Upgrading the Matsyagandha Express with these modern rakes will not only enhance the overall travel experience but also contribute to the safety and efficiency of this critical service. I kindly request that Southern Railway take immediate action to prioritize the allocation of new LHB rakes for the Matsyagandha Express. This would not only demonstrate your commitment to passenger satisfaction but also boost the reputation of the Southern Railway as a forward-thinking and customer-centric organization. 
I understand that the process of acquiring new rakes can be complex, but I urge you to expedite it as much as possible to ensure that the Matsyagandha Express continues to serve the people of Coastal Karnataka effectively and safely. 
Thank you for your attention to this matter, and I look forward to hearing about the progress in this endeavor. 
Regards,

Akshay Mahapadi

 Kalwa, Thane
 +91 8097167987

Loading

कोंकण रेल्वे मार्गावर मंगळवारी मेगाब्लॉक; दोन गाड्या उशिराने धावणार

Konkan Railway News: कोकण रेल्वे मार्गावर येत्या मंगळवारी (२६ डिसेंबर) कळंबणी बुद्रुक ते कामथे या विभागां दरम्यान  रेल्वेच्या मालमत्तेच्या देखभालीसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सुमारे अडीच तास हा मेगाब्लॉक चालणार आहे. दुपारी १२:४० ते १५:१०  या वेळेत हा ब्लॉक असणार आहे. या मेगाब्लॉकमुळे कोंकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या २ गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
१) Train no. 02197 Coimbatore Jn. – Jabalpur Special
दिनांक २५ डिसेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी कणकवली ते संगमेश्वर रोड या स्थानकांदरम्यान  १ तास ४५ मिनिटे उशिराने चालविण्यात येणार आहे.
२) Train no. 10106 Sawantwadi Road – Diva Express
दिनांक २६ डिसेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी सावंतवाडी ते रत्नागिरी या स्थानकांदरम्यान १ तास १०  मिनिटे उशिराने चालविण्यात येणार आहे.

Loading

Konkan Railway | वंदे भारत एक्सप्रेसच्या सेवेचा मंगुळुरु पर्यंत विस्तार होणार

Konkan Railway News:  मडगाव – मंगळुरु सेंट्रल वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यासाठी दक्षिण रेल्वे सज्ज झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 डिसेंबर रोजी देशातील इतर पाच गाड्यांबरोबर  या गाडीला हिरवा झेंडा दाखवतील अशी माहिती समोर आली आहे. या आधी मुंबई ते मडगाव वंदे भारत कोकण रेल्वे मार्गावर चालत आहे. मडगाव – मंगळुरु सेंट्रल वंदे भारत एक्स्प्रेस सुरु केल्यानंतर वंदे भारत या प्रीमियम गाडीची सेवा दक्षिणेच्या मंगळुरु स्थानकापर्यंत विस्तारित होणार आहे.
दक्षिण रेल्वेच्या पलक्कड विभागाने या बातमीची  पुष्टी केली आहे. विभागीय रेल्वे व्यवस्थापक अरुण कुमार चतुर्वेदी यांच्या म्हणण्यानुसार, विभागाने मंगळुरू सेंट्रल येथील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर उदघाटनासाठी विस्तृत तयारी केली गेली आहे.
प्राथमिक माहितीनुसार,ज्याची विभागाकडून पुष्टी करण्यात आलेली नाही आहे, ही गाडी मंगळुरु सेंट्रल येथून सकाळी ८.३० वाजता निघून दुपारी १.०५ वाजता मडगावला पोहोचेल, परतीच्या प्रवासात वंदे भारत एक्सप्रेस मडगावहून संध्याकाळी 6.10 वाजता सुटून, मंगळुरु सेंट्रलला रात्री 10.45 वाजता पोहोचेल. या गाडीला दोन्ही स्थानकामध्ये फक्त उडपी आणि कारवार येथे थांबे असतील.
कनेक्टेड सेवेचा लाभ
मडगाव साठी ही गाडी मंगळुरु सेंट्रल येथून सकाळी ८.३० वाजता निघून दुपारी १.०५ वाजता मडगावला पोहोचणार आहे. सध्याच्या २२२३० मडगाव – मुंबई या गाडीची मडगाव वरून मुंबईसाठी निघण्याची वेळ दुपारी १४:४० अशी आहे. त्यामुळे मंगुळुरु येथून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक सोयीची कनेक्टेड सेवा उपलब्ध होणार आहे. वेळेमध्ये काहीसा बदल केल्यास मुंबई ते मंगुळुरु साठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सुद्धा ही गाडी  एक कनेक्टेड सेवेचा पर्याय बनू शकते.

Loading

सावधान: कोकण रेल्वे मार्गावर चोऱ्यांचे प्रमाण वाढले; संपर्क क्रांती एक्स्प्रेसमध्ये साडेपाच लाखांच्या मुद्देमालाची चोरी

Konkan Railway News: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांमध्ये होणाऱ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढत चालले असून, किमती वस्तू बरोबर घेऊन प्रवास करणे आता मोठे जिकिरीचे झाले आहे.. कोचिवली-चंदीगड संपर्क क्रांती एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या झोपेचा फायदा घेऊन चोरट्याने ५ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल पळवला. शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटना मंगळवारी (ता. १२) सकाळी सव्वासहाच्या सुमारास रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शाईन कुन्नेल दिवाकरण (वय ४९, रा. सुरत, गुजरात) हे संपर्क क्रांती एक्स्प्रेसमधून प्रवास करत होते. ते झोपेत असल्याचा फायदा घेऊन चोरट्याने त्यांच्याकडील ४ लाख ७७ हजार ९०० रुपयांचे सोन्याचे दागिने, ३३ हजारचे डायमंड इअररिंग, २ हजार ६०० रुपयांचे चांदीचे दागिने, ३० हजारांची पाच घड्याळे, ४ हजार ५०० रुपये रोख व कागदपत्रे असा सुमारे ५ लाख ४८ हजारांचा मुद्देमाल चोरला. या प्रकरणी दिवाकरण यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. अधिक तपास शहर पोलिस अमलदार करत आहेत.

Loading

कोकण रेल्वेची ‘फुकट्या’ प्रवाशांवर कारवाई; एका महिन्यात तब्बल २ कोटींचा दंड वसूल

Konkan Railway News :कोकण रेल्वेमार्गावर गर्दीचा फायदा घेऊन फुकट प्रवास करणाऱ्‍यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत असून, एका नोव्हेंबर महिन्यात २ कोटी ५ लाख ५२ हजार ४४६ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

कोकणकन्या, मांडवी, दिवा-सावंतवाडी, तुतारी यासारख्या गाड्या दररोज हाऊसफुल्ल असतात. गर्दीचा फायदा घेऊन अनेकजणं फुकट प्रवास करतात. यामध्ये कोकण रेल्वेचे नुकसान होते. हे टाळण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने तिकीट तपासणी मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी पथके निश्‍चित केली आहेत. काहीवेळा अर्धे तिकिट काढून पुढे प्रवास केला जातो. काहीजण जनरल तिकिट काढून आरक्षित डब्यामधून प्रवास करतात. काहीवेळा तर आरक्षित डब्यातील तिकीटच न काढता प्रवास केला जातो.

विनातिकीट प्रवास करताना कोणी प्रवास सापडला तर त्या त्या परिस्थिनुसार दंडाची रक्कम आकारली जाते. नोव्हेंबर महिन्यात गाड्यांची गर्दी लक्षात घेऊन केलेल्या तपासणीमध्ये ७ हजार १३ जणांनी विनातिकीट प्रवास केल्याचे उघड झाले. त्यांच्याकडून २ कोटी ५ लाख ५२ हजार ४४६ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये काही प्रवाशांना तिकिटाच्या तिप्पट रक्कमही भरणा करावी लागली आहे. भविष्यातही संपूर्ण मार्गावर या पद्धतीने तिकीट तपासणी मोहीम तिव्रतेने राबवण्यात येणार आहे.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search