Category Archives: कोकण रेल्वे
वेळापत्रकामध्ये पुढील बदल करण्यात आलेले आहेत.
Station | सध्याची वेळ | सुधारित वेळ (०९/०६/२०२३ पर्यंत) | सुधारित वेळ (१०/०६/२०२३ पासून- पावसाळी वेळापत्रक) |
Diva Jn. | 15:20 | 17:50 | 17:50 |
Panvel | 15:50 | 18:30/18:33 | 18:30/18:33 |
Apta | 16:12 | 18:55/18:56 | 18:55/18:56 |
Jite | 16:24 | 19:08/19:09 | 19:08/19:09 |
Pen | 16:37 | 19:19/19:20 | 19:19/19:20 |
Kasu | 16:50 | 19:30/19:31 | 19:30/19:31 |
Nagothane | 17:03 | 19:43/19:44 | 19:43/19:44 |
Roha | 17:25 | 20:07/20:12 | 20:07/20:12 |
Kolad | 17:47 | 20:24/20:25 | 20:24/20:25 |
Indapur | 17:59 | 20:35/20:36 | 20:35/20:36 |
Mangaon | 18:12 | 20:45/20:46 | 20:45/20:46 |
Goregaon Road | 18:24 | 20:56/20:57 | 20:56/20:57 |
Veer | 18:36 | 21:05/21:06 | 21:05/21:06 |
Sape Wamne | 18:46 | 21:15/21:16 | 21:18/21:19 |
Karanjadi | 18:56 | 21:25/21:26 | 21:30/21:31 |
Vinhere | 19:11 | 21:34/21:35 | 21:44/21:45 |
Diwankhavati | 19:29 | 21:42/21:43 | 21:58/21:59 |
Kalambani Budruk | 19:39 | 21:53/21:54 | 22:12/22:13 |
Khed | 19:59 | 22:03/22:04 | 22:23/22:24 |
Anjani | 20:15 | 22:15/22:16 | 22:41/22:42 |
Chiplun | 20:40 | 22:30/22:35 | 23:00/23:05 |
Kamathe | 21:00 | 22:49/22:50 | 23:21/23:22 |
Sawarda | 21:12 | 22:58/22:59 | 23:34/23:35 |
Aravali Road | 21:25 | 23:09/23:10 | 23:49/23:50 |
Kadavai | 21:35 | 23:19/23:20 | 23:55/23:56 |
Sangameshwar Road | 21:45 | 23:33/23:34 | 00:20/00:21 |
Ukshi | 22:10 | 23:45/23:46 | 00:50/00:51 |
Bhoke | 22:40 | 00:08/00:09 | 01:20/01:21 |
Ratnagiri | 00:35 | 00:35 | 02:00 |

रत्नागिरी| होळीसाठी रेल्वेने गावी जाणार्या चाकरमान्यांचा त्रास वाढवणारी एक बातमी आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने होळीसाठी या मार्गावर सोडण्यात आलेल्या 2 गाड्या रद्द केल्या आहेत.
पुढील दोन गाड्या दिनांक 09/03/2023 ते 12/03/2023 दरम्यान रद्द करण्यात आलेल्या आहेत.
01597 मेमू ट्रेन रोहा येथून चिपळूण साठी सुटणारी रोहा – चिपळूण अनारक्षित मेमू
01598 मेमू चिपळूण येथून रोहा या स्थानकासाठी सुटणारी चिपळूण – रोहा अनारक्षित मेमू
दिवा स्थानकावरून रोहा स्थानकापर्यंत चालविण्यात येणार्या गाडीचा विस्तार करून या गाड्या चालविल्या जात होत्या. या गाड्यांमुळे कोकण रेल्वे मार्गावरील ईतर गाड्यांमध्ये होणारी गर्दी विभागली जात असताना रेल्वे प्रशासनाने अचानक या गाड्या रद्द केल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे.
संबंधित बातमी >खुशखबर| होळीसाठी कोकण रेल्वेमार्गावर मेमू ट्रेनसह अजून ६ विशेष गाड्या…
सिंधुदुर्ग |शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोवा बनावटीच्या अवैध दारूची महाराष्ट्रात छुप्या पद्धतीने वाहतूक होत असल्याने पोलीस यंत्रणा अलर्ट झाली असून गोवा बनावटीची बेकायदा दारु वाहतूक केल्याप्रकरणी आंबोली पोलिसांनी बेळगाव येथील एकाला ताब्यात घेतले आहे.मंगळवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत १ लाख ८ हजारांच्या दारुसह ४ लाखाची गाडी मिळून तब्बल ५ लाख ८ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर अवैध दारू वाहतूक प्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. कलमेश अल्लाप्पा मुलाबट्टी (३६, रा.अदालट्टी, ता. अथणी, बेळगांव ) असे त्याचे नाव आहे. ही कारवाई सावंतवाडी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल दीपक शिंदे, हेड कॉन्स्टेबल दत्ता देसाई व होमगार्ड जंगले यांनी आंबोली तपासणी नाक्यावर केली. यात गोवा बनावटीच्या इम्पेरियल ब्ल्यू ब्रँडच्या बाटल्यांचे नऊ बॉक्स जप्त करण्यात आले. तर या प्रकरणी वापरण्यात आलेली पांढऱ्या रंगाची शेवरलेट एन्जॉय ( के ए – २३ एन ३६३५) ही कार देखील पोलिसांनी जप्त केली आहे.
मुंबई : देशामध्ये महत्त्वाच्या काही शहरां दरम्यान सुरू केलेली वंदे भारत एक्सप्रेस आता कोकण रेल्वे मार्गावर मुंबई गोवा या दोन शहरांदरम्यान लवकरच सुरू होणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत. मुंबई- गोवा या मार्गावरील विद्युतीकरणाची कामे अंतिम टप्प्यात असून, कामे पूर्ण झाल्यानंतर मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात येईल, असे आश्वासन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज येथे दिल्याची माहिती भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी दिली.
कोकणासह ठाणे जिल्ह्यातील रेल्वेच्या विविध प्रश्नांसंदर्भात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे-पाटील यांची मुंबईत भाजपाच्या आमदारांनी भेट घेतली. या आमदारांमध्ये सर्वश्री प्रविण दरेकर, निरंजन डावखरे, गणपत गायकवाड, प्रसाद लाड आदींचा समावेश होता. त्यावेळी त्यांनी कोकणातील प्रवाशांसाठीचे विविध मुद्दे मांडले.
कोकणातील प्रवाशांचा प्रवास वेगाने होण्यासाठी शिर्डी व सोलापूरप्रमाणेच गोव्यापर्यंत वंदे भारत एक्सप्रेस सुरू करावी, अशी आग्रही मागणी आमदारांनी केली. त्यावेळी रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाल्यावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचे आश्वासन राज्यमंत्री दानवे यांनी दिले.
रेल्वे राज्यमंत्रि रावसाहेब दानवे यांच्याकडे केलेल्या इतर काही मागण्या.
- `वन प्रॉडक्ट, वन स्टॉल’ प्रकल्पानुसार कोकण रेल्वेतील प्रकल्पग्रस्त व्यक्ती वा त्यांच्या वारसांना स्टॉल द्यावेत
- शेतकऱ्यांसाठी प्रत्येक स्थानकात फिरता स्टॉल असाव
- कोकण रेल्वेमार्गावरील सर्व स्थानकांतील प्लॅटफॉर्म व गाडीमधील उंची समान ठेवावी.
- रेल्वे पुलामुळे महाड येथे पूरस्थिती निर्माण होत असल्याबद्दल उपाययोजना करावी.
- सावंतवाडी-दिवा ट्रेन दादरपर्यंत न्यावी.
- रेल्वेमार्गालगत रेल्वेच्या जागेवर वसलेल्या घरांमधील रहिवाशांचे एसआरए प्रकल्पात पुनर्वसन करण्यात यावे.
- कोकणातील लोटे परशुरामसह विविध एमआयडीसी ते रेल्वेस्थानकापर्यंत लाईनसाठी प्रस्ताव तयार करावा
- वीर ते रानवाडी स्थानकापर्यंत दुहेरीकरण करावे
- जनशताब्दी, तेजस आणि गरीब रथ गाड्यांना खेड रेल्वे स्थानकाचा थांबा द्यावा,
- आदी मागण्या रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे करण्यात आल्या. त्यावर त्यांनी सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

Holi Special Trains News | 01 Mar 2023 | शिमगोत्सव साजरा करण्यासाठी कोकणात जाणार्या भाविकांना एक खुशखबर आहे. प्रवाशांची वाढती प्रतिसाद लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रशासनाने मध्यरेल्वे च्या सहाय्याने अजून काही विशेष गाड्या कोकण रेल्वे मार्गावर चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
1) Train No. 01187 / 01188 Lokmanya Tilak (T) – Karmali – Lokmanya Tilak (T) Special (Weekly)
ही गाडी एसी स्पेशल गाडी आहे.
Train No. 01187 Lokmanya Tilak (T) – Karmali – Special (Weekly)
दिनांक ०२/०३/२०२३ व ०९/०३/२०२३ (गुरुवार) या दिवशी ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावरुन रात्री २२:१५ वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी सकाळी १०:०० वाजता करमाळी या स्थानकावर पोहोचेल.
Train No. 01188 Karmali – Lokmanya Tilak (T) Special (Weekly)
दिनांक ०३/०३/२०२३ व १०/०३/२०२३ (शुक्रवार) या दिवशी ही गाडी करमाळी टर्मिनस या स्थानकावरुन संध्याकाळी १६:२० वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी पहाटे ०३:४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावर पोहोचेल.
या गाडीचे थांबे
ठाणे, पनवेल, रोहा (RN), माणगाव,वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम
डब्यांची संरचना
पॅंट्री कार – 01 + जेनेरेटर वॅन – 02 + थ्री टायर एसी – 15 + टू टायर एसी – 03 + फर्स्ट एसी – 01 असे मिळून एकूण LHB 22 डबे
2) Train No. 01165 / 01166 Lokmanya Tilak (T) – Mangaluru Jn. – Lokmanya Tilak (T) Special (Weekly)
ही गाडी पण पूर्णपणे एसी सुपरफास्ट स्वरूपाची आहे.
Train No. 01165 Lokmanya Tilak (T) – Mangaluru Jn.
दिनांक ०७/०३/२०२३ (मंगळवार) या दिवशी ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावरुन रात्री २२:१५ वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी संध्याकाळी १७:२० वाजता मंगळूरु या स्थानकावर पोहोचेल.
Train No. 01166 Mangaluru Jn. – Lokmanya Tilak (T)
दिनांक ०८/०३/२०२३ (बुधवार) या दिवशी ही गाडी मंगळूरु या स्थानकावरुन संध्याकाळी १८:४५ वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी ११:४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावर पोहोचेल..
या गाडीचे थांबे
ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगांव, कारवार, गोकरण रोड, कुमठा, मुरुडेश्वर, भटकळ, मूकांबिका रोड बैंदूर, कुंदापूर, उडुपी, मुल्की, सुरतकल
डब्यांची संरचना
पॅंट्री कार – 01 + जेनेरेटर वॅन – 02 + थ्री टायर एसी – 15 + टू टायर एसी – 03 + फर्स्ट एसी – 01 असे मिळून एकूण LHB 22 डबे
3) Train No. 01597 / 01598 Roha – Chiplun – Roha MEMU Special
Train No. 01597 Roha – Chiplun MEMU Special
दिनांक ०४/०३/२०२३ व १२/०३/२०२३ या दिवशी ही गाडी रोहा या स्थानकावरुन सकाळी ११:०५ वाजता सुटेल व ती त्याच दिवशी दुपारी १३:२० वाजता चिपळूण या स्थानकावर पोहोचेल.
Train No. 01598 Chiplun – Roha MEMU Special
दिनांक ०४/०३/२०२३ व १२/०३/२०२३ या दिवशी ही गाडी चिपळूण या स्थानकावरुन दुपारी १३:४५ वाजता सुटेल व ती त्याच दिवशी संध्याकाळी १६:१० वाजता रोहा या स्थानकावर पोहोचेल.
या गाडीचे थांबे
माणगाव, वीर, सापे वामने, कारंजाडी, विन्हेरे, आणि खेड
डब्यांची संरचना
12 मेमू कोच
प्रवाशांनी या अतिरिक्त फेर्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन कोकण रेल्वे तर्फे करण्यात आले आहे.
Train no. 01446 Karmali – Pune Jn या गाडीचे आरक्षण दिनांक २३/०२/२०२३ पासून, तर Train no. 01448 Karmali – Panvel आणि Train no. 01460 Madgaon Jn – Lokmanya Tilak (T) या गाड्यांचे आरक्षण २४/०२/२०२३ पासून रेल्वेच्या सर्व तिकीट खिडक्यांवर आणि अधिकृत संकेत्स्थानवर उपलब्ध होईल अशी माहिती कोंकण रेल्वेतर्फे देण्यात आली आहे.