Category Archives: ठाणे
दिवा दि.२२ फेब्रु | काल बुधवारी दिवा स्थानकावर झालेल्या एका अपघातात कणकवली तालुक्यातील भिरवंडे येथील सचिन बाळकृष्ण सावंत ( वय ४५ रा. भिरवंडे मुरडयेवाडी ) यांचे मुंबईकडे जाताना रेल्वे प्रवासादरम्यान अपघाती निधन झाले.
या अपघाताची सविस्तर माहिती अशी की कणकवली येथे स्थायिक असलेले सचिन हे काही कामानिमित्त मुंबई येथे मंगळवारी कोकण कन्या एक्सप्रेसने जाण्यास निघाले. दिवा स्टेशन येथे पोहोचल्यावर कोकण कन्या एक्सप्रेसचा वेग कमी झाला.याचा अंदाज घेऊन सचिन यांनी दिवा स्टेशन येथे उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न त्यांच्या जीवावर बेतला. रेल्वेतून उतरताना सचिन हे बाहेर फेकले गेले. त्यांना गंभीर स्वरूपाची इजा झाली. रेल्वे पोलिसांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती देखील मिळाली. मात्र अतिरक्तस्त्राव झाल्याने सचिन यांची उपचारांना साथ मिळत नव्हती. अशातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
घडलेली घटना हा निव्वळ अपघात असला तरी घटनेमुळे कोकणच्या प्रवाशांची एक जुनी मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. ती मागणी म्हणजे कोकणात जाणाऱ्या गाड्यांना दिवा स्थानकावर थांबा मिळावा ही होय.
दिवा स्थानकांत सध्या आठ प्लॅटफॉर्म असून, या स्थानकात दिवा-सावंतवाडी, दादर-रत्नागिरी या पॅसेंजर गाड्या, दिवा-रोहा मेमू, दिवा-वसई अशा गाड्या चालविण्यात येतात. दिवा स्थानकात जर कोकण रेल्वेच्या सर्वच गाड्यांना थांबा दिला तर दिवा, डोंबिवली व कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, टीटवाळा तसेच आजूबाजूच्या परिसरातील चाकरमान्यांचा ठाणे, कुर्ला, दादर, सीएसएमटी टर्मिनसवर जाण्यासाठी लागणारा वेळ वाचला जाईल. परतीच्या प्रवासातही ठाण्याला उतरल्यानंतर पुन्हा सामानासह लोकल पकडणे अडचणीचे ठरत असल्याचे प्रवाशांचे म्हणने आहे.
तर हे अपघात टाळता येणे शक्य
वा येथे गाडी आल्यावर ठाण्याच्या दिशेने जाताना रूळ बदलताना गाडीचा वेग कमी होतो. त्याचा फायदा घेऊन अनेक प्रवासी चालत्या गाडीतून उतरण्याचा प्रयत्न करताना दिसतात. त्यामुळे कित्येकदा अपघातही होतात. येथे थांबे दिल्याने असे अपघात टाळता येतील.
पहाटे सुटणार्या आणि उशिरा परतणाऱ्या गाड्यांना थांबा मिळावा
जनशताब्दी एक्सप्रेस सारख्या गाड्या मुंबईहुन पहाटे सुटतात आणि परतीच्या प्रवासात उशिराने ठाण्या- मुंबईत येतात. या गाडीला दिवा येथे थांबा दिल्यास या परिसरातील कोकणातील प्रवाशांची खूप मोठी सोय होईल. त्याचप्रमाणे कोकण-कन्या, तुतारी एक्सप्रेस, मांडवी एक्सप्रेस या नियमित आणि ईतर काही गाड्यांना येथे थांबा देण्यात यावा अशी मागणी होत आहे.
ठाणे :गुलामी छळाच्या जाचेतून, येणाऱ्या लोकशाही माणुसकीत ताठ मानेने जगण्यासाठी ज्या थोर वीरांनी आपल्या प्राणाची अहूती देत १५ ऑगस्ट १९४७* रोजी म्हणजेच आजच्या सुमारे ७६ वर्षापूर्वी माणसातल्या माणुसकीला स्वतंत्र्य मिळून दिले. या ७६ वर्षात लोकशाही कृषिप्रधान भारत देशाने प्रचंड प्रमाणात प्रगती केली. त्या वेळच्या घडामोडीच्या परंपरा काही अंशी भारत देशाने साथ करीत अधिकाधिक यशाची शिखरे गाठलीत.
जसे शरीरातील रक्तवाहिन्या डोक्यापासून पायापर्यंत जात शरीराला जगण्यासाठी चालना देतात; त्याचप्रमाणे भारतातील रेल्वे हा दळणवळणाचा अत्यंत महत्त्वाचा दुवा मानला जाणारा भारतीय रेल्वे मार्ग कन्याकुमारी ते जम्मू-काश्मीर पर्यंत पसरलेला आहे. तोच महाराष्ट्रातील २६ जानेवारी १९९८ रोजी मराठी कोकणवासीय खेडेगावतल्या जनतेची शहराशी नाळ जोडावी यासाठी प्राध्यापक मधू दंडवते साहेबांनी महाराष्ट्र राज्यातील राजधानी मुंबई ते सावंतवाडी रोड यादरम्यान वा पार कर्नाटक पर्यंत सुखकर आणि सुरक्षित कमी खर्चिक वेळ असा कोकण रेल्वे मार्ग* प्रवास सुरू केला.
त्याच कोकणातल्या मातीतल्या कोकण वासियांनी आपला खेडेगाव जपत; कोकणाई जगत, आपल्या सहबंधूंना एकत्र करीत कोकणवासी यांच्या समस्या आणि अडीअडचणी, सूचना यावर कार्य करण्यासाठी कोकणवासी यांचा आवाज शहरी करणापर्यंत पोहोचेल याकरीता प्रवासी बंधूंची सन २००९ साली कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ (रजि.) ठाणे संघटना अस्तित्वात नव्हे प्रत्यक्षात आणून मोठ्या प्रमाणात कार्यशील राहात आहे. या संघटनेने भारतीय स्वातंत्र्य दिनाचे ७६ वे अमृत महोत्सव साजरा करीत सालाबाद प्रमाणे १५ ऑगस्ट २०२३ चा स्वातंत्र्य दिन सोहळा रांगोळी प्रदर्शित करीत ठाणे स्थानकात मधल्या महत्त्वाच्या प्रवासी पुलावर भव्यदिव्य सुटसुटीत रांगोळी काढीत भारतीय स्वतंत्र दिनाचा ७६ वा अमृत महोत्सवाचा प्रदर्शनीय सोहळा छोटे खानी साजरा केला. या संघटनेस ठाणे स्थानकातील स्थानक निर्देशक श्री अरुण प्रताप सिंह, स्थानक मुख्यप्रबंधक श्री तावडे साहेब, स्थानक उपप्रबंधक, रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलीस ठाणे येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि सर्व कर्मचारी वर्ग, मुख्य तिकीट तपासनीस आणि सर्व कर्मचारी वर्ग यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले. त्यावेळी तसेच खालील आवर्जून उपस्थिती असलेले संघटनेचे सभासद आणि कार्यकारी पदाधिकारी यांचे मोलाचे योगदान लाभले.
संघटनेचे सदस्य श्री राजू कांबळे (प्रमुख सल्लागार) यांच्या अधिपत्याखाली श्री . दर्शन कासले (सचिव), श्री. सुजित लोंढे (अध्यक्ष) श्री. संभाजी ताम्हणकर (खजिनदार), श्री. संतोष पवार,/श्री संतोष निकम (मा. अध्यक्ष/मा. उपाध्यक्ष) श्री. यशवंत बावदाणे (सल्लागार), श्री. तुषार साळवी (सल्लागार), श्री. महेश धाडवे (सल्लागार), श्री. विजय जगताप (सल्लागार), श्री. सुहास तोडणकर (संपर्क प्रमुख), श्री. विकास कांबळे, श्री.राजू कदम, श्री. प्रमोद घाग, श्री. नामदेव चव्हाण, श्री. गोविंद आमडोसकर, श्री. अमित चव्हाण, श्री. अनंत लोके, श्री. नागेश गुरव, श्री.गोपीचंद गुरव, श्री. विजय चव्हाण, श्री. सुजित नार्वेकर, श्री. रूपेश शिंदे, श्री. शरद धाडवे, श्री. साहील सकपाळ, श्री. वेदांत सावंत, श्री परेश गुरव, श्री. जितेंद्र बाईत (सर्व सभासद) आदि, त्याचबरोबर रांगोळी कला रेखाटक श्री. विलास सावंत आणि दिलीप सावंत यांचे अनमोल सहकार्य मिळाले.
मुंबई: मुंबई येथून सुटणाऱ्या सीएसएमटी ते शिर्डी आणि सोलापूर या वंदे भारत गाड्यांना उद्या दिनांक ४ ऑगस्टपासून कल्याण आणि ठाणे येथे 2 मिनिटे थांबा देण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.
शिर्डी साईनगर एक्सप्रेस सीएसएमटीहून सुटल्यानंतर सकाळी ७.११ वाजता कल्याणला थांबेल. सीएसएमटीला परतताना ही गाडी कल्याणला रात्री ९.४५ वाजता थांबेल.
मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस सीएसएमटीहून सोलापूरसाठी निघाल्यानंतर दुपारी ४.३३ वाजता ठाणे स्थानकावर थांबेल. दुपारी ४.५३ वाजता कल्याणला पोहोचेल. परतीच्या प्रवासादरम्यान ती ठाणे येथे सकाळी 11.50 वाजता थांबेल.
ठाणे :मध्य रेल्वेच्या ठाणे आणि कळवा ह्या दोन स्टेशन दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने या मार्गावरील वाहतुक विस्कळीत झाली आहे. दोन्ही जलद आणि धीम्या मार्गावरील लोकल्स खूप धीम्या गतीने चालविण्यात येत आहेत. सर्व गाड्या सुमारे एक ते दीड तास उशिराने चालत आहेत. लोकल्स च्या एका मागोमाग रांगा लागल्या आहेत. काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत
आज सध्याकाळी ऑफिस सुटण्याच्या वेळात वाहतुक विस्कळीत झाल्याने प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. सर्व स्टेशनवर प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत आहे.
मध्य रेल्वेकडून वाहतुक सूरळीत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. लवकरात लवकर वाहतुक पूर्वपदावर आणली जाईल अशी संबधित रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
कल्याण : कल्याण वरून सिएसमटीला जाणारी सकाळी 08.09 च्या महिला विशेष गाडी मध्ये बदल करण्याची मागणी ह्या लोकलने प्रवास करणार्या महिला प्रवाशांकडून होत आहे. तशा आशयाची लेखी विनंती प्रवाशांच्या सहींसहित मंडल रेल प्रबंधक (DRM), सिएसमटी केली गेली आहे.
ह्या अर्जात खालील मागण्यांचा समावेश आहे.
-
ह्या गाडीचे वेळापत्रक पूर्वीप्रमाणे करावे. पूर्वी ही गाडी कल्याण स्थानकावरून सकाळी 08.01 वाजता सुटत होती.
-
ही गाडी वेळेत यावी.
-
ही गाडी 15 डब्यांची करावी किंवा,
-
एक महिला विशेष गाडी ऑफिस च्या वेळेत (peak hours) मध्ये वाढवावी. (सकाळ आणि संध्याकाळ)
महिला प्रवाशांची वाढणार्या संख्ये प्रमाणात गाड्या वाढवल्या गेल्या नाहीत त्यामुळे महिला प्रवाशांना खास करुन वयस्कर महिलांना प्रवास करणे खूप त्रासाचे होत असल्याने या मागण्या केल्या गेल्या आहेत.
ठाणे: AC लोकल चे दरवाजे न उघडल्याने प्रवाशांना नाहक त्रास होण्याचे प्रकार उपनगरीय मध्यरेल्वे मार्गावर घडत आहेत.
लोकलचे दरवाजे न उघडल्याने प्रवाशांना चक्क कारशेडला जावे लागण्याची घटना मध्य रेल्वेच्या ठाणे स्टेशनवर काल घडली. हि लोकल कळवा कारशेड ला गेली आणि सर्व प्रवाशांना अंधारात रुळावरून पायपीट करत यावे लागले.
अशा प्रकारच्या घटना मध्य रेल्वेवर २ ते ३ वेळा घडल्या आहेत. मागे कल्याण सीएसमटी AC लोकल चे दरवाजे दादर स्टेशनला न उघडता ती पुढच्या स्टेशन ला गाडी गेली होती. त्यावेळी रेल्वे प्रशासनाने हि गोष्ट मान्य केली नाही होती. पण त्या संदर्भातील विडिओ ट्विटर वर एका प्रवाशाने अपलोड केला होता.
काही दिवसांपूर्वी सीएसमटी स्थानकावर पण असाच प्रकार घडला होता.ठाणे सीएएमसटी एसी लोकल सीएसएमटी स्थानकात पोहोचली. थांबली. पण लोकलचे दरवाजे काही उघडलेच नाहीत. आता दरवाजे का बरं उघडत नाहीत? हे कळायला काही मार्ग नव्हता. लोकल स्थानकात आल्यानंतर मोटरमन खाली उतरला आणि चालू लागले. पण थोड्याच वेळात त्याला घडलेला प्रकार लक्षात आला आणि पुन्हा येऊन त्यानं अखेर लोकलचे दरवाजे उघडले.
मोटारमनच्या चुकीमुळे दरवाजे ओपन होत नाही आहेत. गाडी थांबल्यावर गाडीचे दरवाजे उघडणे आणि बंद करणे हे सर्व मोटरमन च्या नियंत्रणामध्ये असते. पण ह्या मध्ये होणाऱ्या हलगर्जीपणामुळे AC लोकल्स मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनां त्रास सहन करावा लागत आहे.
- 1
- 2