



मुंबई : मध्य रेल्वे प्रशासनाच्या नवीन वेळापत्रकाप्रमाणे 5 ऑक्टोबर 2024 पासून चार गाडयांना थांबा देण्यात येणार आहे. दिवा शिवसेना उपशहरप्रमुख आणि दिवा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष आदेश भगत यांनी याबाबत मध्य रेल्वे प्रशासनाकडे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली होती.
कळवा आणि मुंब्रा येथून लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. या प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टीने प्रामुख्याने आता सकाळी आणि सायंकाळी या गर्दीच्या वेळेत 4 जलद गाडयांना थांबा देण्यात आला आहे. यामुळे कळवा आणि मुंब्रा येथील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या गाडयांना थांबा –
– अंबरनाथहुन-मुंबईच्या दिशेने जाणारी जलद लोकल कळवा रेल्वे स्थानकात सकाळी 8.56 वाजता थांबेल.
– आसनगावहुन-मुंबईच्या दिशेने जाणारी जलद लोकल मुंब्रा रेल्वे स्थानकात सकाळी 9.23 वाजता थांबेल.
– मुंबईहून बदलापूरच्या दिशेने जाणारी जलद लोकल कळवा रेल्वे स्थानकात सायंकाळी 7.29 वाजता थांबेल.
मुंबईहून टिटवाळ्याच्या दिशेने जाणारी जलद लोकल मुंब्रा रेल्वे स्थानकात सायंकाळी 7.47 वाजता थांबेल.