Category Archives: महाराष्ट्र

सावधान! राज्यात शांतता कालावधी सुरू; राजकीय प्रचार, प्रसारावर बंदी… नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होणार

   Follow us on        

मुंबई, दि. 18 : राज्यात 20 नोव्हेंबर 2024 रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी सोमवार, दि. 18 नोव्हेंबर 2024 रोजी संध्याकाळी 6 वाजल्यापासून शांतता कालावधी सुरू झाला आहे. मतदान संपेपर्यंतच्या 48 तासांमध्ये, लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 च्या कलम 126 अंतर्गत मतदारांवर प्रभाव टाकणारा प्रचार आणि सार्वजनिक सभा, मिरवणुका आयोजित करण्यास, उपस्थित राहण्यास अथवा सहभागी होण्यास मनाई आहे. या अटींचे उल्लंघन झाल्यास दोन वर्षापर्यंत तुरुंगवास अथवा दंड अथवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.

लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने निर्देश जारी केले आहेत. निवडणूक कालावधीत मुद्रित माध्यमांमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाच्या किंवा उमेदवाराच्या बाजूने किंवा विरोधात कोणतीही जाहिरात/ निवडणूकविषयक आशय- मजकूर दिला गेला असल्यास त्याबाबत संबंधित प्रकाशकाचे नाव आणि पत्ता, तसेच संबंधित आशय – मजकूर / जाहिरातीवर नमूद करावा. या निर्देशांसोबतच आयोगाने भारतीय दंड संहितेच्या कलम 171 एच विचारात घेण्याबाबतही निर्देशित केले आहे. या कलमाअंतर्गत उमेदवाराच्या अधिकृत परवानगीशिवाय संबंधित उमेदवाराच्या निवडणुकीचा प्रचार किंवा निवडणुकीसाठी खर्च करण्याच्या हेतूने इतर सर्व गोष्टींसह जाहिराती, प्रचार किंवा प्रकाशनासाठी खर्च करण्यास मनाई केली गेली आहे.

निवडणूक प्रचाराच्या शांतता काळामध्ये मुद्रीत माध्यमांमध्ये छापण्यात येणाऱ्या राजकीय जाहिरातीस जाहिरात पूर्व प्रमाणिकरण समितीची मान्यता असल्याशिवाय या जाहिराती वृत्तपत्रामध्ये छापू नये, अशा आयोगाच्या सूचना आहेत. दृकश्राव्ये माध्यमे (टेलिव्हिजन, केबल नेटवर्क, रेडिओ आणि सोशल मीडिया)  यावर प्रचाराच्या शांतता कालावधीत राजकीय जाहीरातींना मनाई आहे.

राजकीय जाहिरातीसाठी पूर्व-प्रमाणीकरणाबाबतचे निर्देश भारत निवडणूक आयोगाच्या दि.24 ऑगस्ट, 2023 च्या आदेशान्वये देण्यात आले आहेत. त्यामध्ये प्रचाराच्या शांतता कालावधीतील मुद्रित माध्यमे आणि त्यापूर्वीच्या कालावधीसाठी दृकश्राव्य माध्यमे (टेलिव्हिजन, केबल नेटवर्क, रेडिओ आणि सोशल मीडिया) ह्यावरील राजकीय जाहिरातींचा समावेश आहे.

पूर्व प्रमाणीकरणासाठीच्या निर्देशांचे उल्लंघन केल्यास होणाऱ्या कायदेशीर कारवाईबाबत स्पष्ट तरतूद आहे. सर्वोच्च न्यायालयाने किंवा केबल टेलिव्हिजन नेटवर्क (नियमन) कायदा, 1995 मधील कोणत्याही तरतुदींचे उल्लंघन झाल्यास, असे उल्लंघन करणाऱ्याने आपली उल्लंघन करणारी कृती तात्काळ थांबवावी. निवडणूक आयोगामार्फत असे उल्लंघन करणाऱ्याच्या उपकरणांची थेट जप्तीही केली जाऊ शकते. यासंदर्भात दिल्या गेलेल्या कोणत्याही सूचनांचे पालन न केल्यास तो सर्वोच्च न्यायालयाचा अवमान ठरतो व  तसे न्यायालयीन प्रकरण दाखल होऊ शकते.

सर्व केबल नेटवर्क, टी.व्ही. चॅनल, रेडिओ, सोशल मीडिया याद्वारे राजकीय जाहिरातीचे प्रसारण करण्यापूर्वी या जाहिरातीचे प्रमाणीकरण असल्याचे खातरजमा करणे आवश्यक आहे. जाहिरातीचे प्रमाणिकरण असल्याशिवाय राजकीय जाहिराती प्रसारीत करण्यात येवू नये. तसेच कोणत्याही केबल नेटवर्क, टी.व्ही. चॅनल यांनी प्रत्यक्ष/ अप्रत्यक्ष किंवा छुप्या पद्धतीने राजकीय पक्षांच्या जाहिरातीचे प्रमाणिकरण नसल्यास या जाहिराती प्रसारित न करण्याची दक्षता घेण्यात यावी या निर्देशांचे उल्लंघन केल्यास न्यायालयाच्या आदेशाचा अवमान ग्राह्य धरून कार्यवाही करण्यात येईल, असेही मुख्य निवडणूक अधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.

Loading

Konkan Railway: मोठ्या थाटात सुरु केलेल्या या एक्सप्रेसच्या प्रवासी संख्येत घट; ‘ती’ आशाही ठरली फोल

   Follow us on        
Konkan Railway: पश्चिम रेल्वे मार्गावरून कोकणात जाण्यासाठी  एक गाडी सोडण्यात यावी या कोकणकरांच्या मागणीची दखल  घेऊन या मार्गावर एक गाडी सुरु करण्यात आली. बांद्रा – मडगाव -बांद्रा द्विसाप्ताहिक एक्सप्रेस ही पश्चिम रेल्वे मार्गावरून कोकणासाठी धावणारी ही एकमेव गाडी असल्याने तिला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद लाभणे अपेक्षित होते. दिनांक २९ ऑगस्टपासून सुरू झालेल्या या ट्रेनमधून सुरुवातीला क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत होते; परंतु आता मात्र प्रवासीसंख्या घटली आहे. गणेशोत्सवात या ट्रेनमधून तिच्या क्षमतेपेक्षा १० ते १५ टक्के अधिक प्रवासी प्रवास करत होते; मात्र आता प्रवासी संख्या कमी झाली आहे. आता प्रवासी संख्या ७० ते ७८ टक्के एवढ्यावर आल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
 मुंबईहून निघताना ही गाडी बांद्रा या स्थानकावरून सकाळी  ६:५० वाजता निघते ती तब्बल १२ तास १० मिनटे इतका अवधी घेऊन संध्याकाळी ७ वाजता सावंतवाडी टर्मिनस येथे पोहोचते. तर जवळपास एवढ्याच अंतराच्या प्रवासासाठी सकाळी ७:१० वाजता मुंबई सीएसएमटी वरून सुटणाऱ्या मांडवी एक्सप्रेसचा सावंतवाडी टर्मिनस येथील वेळ संध्याकाळी ४ वाजून २८ मिनिटे असा आहे. म्हणजे या प्रवासाला मांडवी एक्सप्रेस ९ तास १८ मिनिटे इतका अवधी घेते.
या गाडीला काही मोजकेच थांबे देण्यात आले आहेत. वसईमधून या गाडीला मध्य रेल्वेच्या ट्रॅकवर वळवावे लागत असल्याने अधिकची लागणारी ३० ते ४५ मिनिटे सोडली तरी ही गाडी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत तरी सावंतवाडी स्थानकावर पोहोचणे अपेक्षित आहे. तळकोकणात ही गाडी उशिरा पोचत असल्याने पुढील प्रवासासाठी मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याने येथील प्रवासी या गाडीला पसंदी देताना दिसत नाहीत.
ती आशाही ठरली फोल 
यावर्षीच्या ऑगस्ट महिन्यात सुरु झालेल्या या गाडीला एखाद्या पॅसेंजर गाडीचे वेळापत्रक दिल्याने प्रवाशांनी  नाराजी व्यक्त केली होती. मात्र  सध्या कोकण रेल्वेचे ‘मान्सून वेळापत्रक’ चालू असल्याने या गाडीला असे वेळापत्रक देण्यात आले असून ‘बिगर मान्सून’ वेळापत्रकात बदल करण्यात येऊन या गाडीचा प्रवास अवधी कमी  करण्यात येईल असे रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते. मात्र कोकण रेल्वेने दिनांक ०१ नोव्हेंबर पासून अंगिकारलेल्या ‘बिगर मान्सून’ वेळापत्रकात या गाडीच्या वेळेत काहीही बदल करण्यात आला नाही. त्यामुळे प्रवाशांचा हिरमोड झाला आहे.

Loading

“कॅलिफोर्निया बनवता बनवता कोकणचा यूपी-बिहार कधी बनवला?….” सावंतवाडीतील ‘त्या’ बँनरमुळे स्थानिक नाराज

   Follow us on        
सावंतवाडी:उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा होणारा छटपूजा उत्सव शहरातील सावंतवाडी येथे उत्साहात साजरा झाला. मात्र सावंतवाडीत मोती तलावाच्या काठाला  या निम्मित लावलेल्या एका बॅनरमुळे येथील स्थानिक नाराज झाले असून विविध माध्यमातून आपली नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत.
या बँनरमुळे ‘एक्स’ या सोशल माध्यमावर सुद्धा यूझर्सनी आपली नाराजी  व्यक्त केली आहे. या कार्यक्रमाला परवानगी कोणी दिली असा प्रश्न थेट येथील स्थानिक आमदार आणि शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना विचारण्यात आला आहे.
सावंतवाडी परप्रांतीयांचा टक्का दिवसेंदिवस वाढत चालला आहे. येथील जमिनीही त्यांच्याकडून खरेदी केल्या जात आहेत. याला सर्वस्वी जबाबदार येथील जमीन विकणारा स्थानिकच असल्याचा आरोप होत आहे.
तर काहींच्या मते थेट युपी – बिहार ला कनेक्टिव्हिटी असलेल्या रेल्वे गाड्यांमुळे सावंतवाडीत उत्तर भारतीयांची संख्या वाढत आहे. तर काहींनी यासाठी येथील स्थानिक लोकप्रतिनिधींना दोषींच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. याचबरोबर काही उपरोधिक तसेच नाराजी व्यक्त कंमेंट सुद्धा यूझर्सनी दिल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे
कोकणचा कॅलिफोर्निया बनवता बनवता कोकणचा यूपी बिहार कधी बनवला?? – विवेक 
आता कोकणचा सुद्धा युपी बिहार करून सोडणार का ? स्थानिक प्रतिनिधी कधी लक्ष घालणार या गोष्टीकडे ? उद्या कोकणचा सण छटपूजा जाहीर व्हायच्या अगोदरच आवर घालावे. – हेमंत! मराठी एकीकरण समिती
स्थानिक माणसांना जमिनी विकताना काहीच वाटत नाही? पालघर ला सुद्धा असेच सातबारे पाहिल्यास दिसून येते की मोठ्या प्रमाणात परप्रांतीय व इतरधर्मीयांती जमिनी घेतल्या आहेत. Visa

Loading

रेल्वे प्रवासात खाद्यपदार्थ विकत घेत असाल तर हा विडिओ पहाच; खाद्यपदार्थ विक्रेत्यांचा प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ

   Follow us on        

Viral Video:रेल्वेने प्रवास करताना अनेकदा  लहान मुले  चटपटीत अशी भेळीची मागणी करतात. कांदा, मिरची, मसाला, चिवडा, शेव, कुरमुरे टाकून बनवलेली भेळ त्यांना हवी हवीशी वाटते. मात्र तुम्ही अशा प्रकारे रेल्वेस्थानकावरील दुकानातील चटपटीत भेळ खात असाल, तर व्हायरल होणारा हा व्हिडीओ तुम्ही पाहाच. कारण- या व्हिडीओतून असा काही किळसवाणा प्रकार दाखविला आहे. अनेकांनी हा व्हिडीओ पाहून संताप व्यक्त केला आहे.

ही बातमी वाचल्यानंतर तुम्ही कधीच रेल्वेमध्ये विकायला येणारी भेळ खाणार नाही. कारण या प्रवासात तुम्ही जी भेळ आवडीने खाता ती कशी बनवली जातं, याचं एक उदाहरण समोर आलं आहे. याचा किळसवाना व्हिडीओ पाहून तुमचीही झोप उडेल.रेल्वेवर तयार होणाऱ्या अन्नातून अनेकांना बाधा झाल्याचे समोर आले आहे. अतिशय अस्वच्छ पद्धतीने व गलिच्छ प्रकाराने खाद्य पदार्थ तयार केले जातात. सध्या रेल्वेमधील भेळ विक्रेत्याचा एक असाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये त्यानं भेळमध्ये असणारा कांदा चक्क टॉयलेटच्या बाजूला जमीनीवर कापला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

Video 👇🏻

Loading

“यापुढे मी मराठी बोलण्यास…..” नालासोपाऱ्यात टीसीने प्रवाशाकडून लिहून घेतला धक्कादायक माफीनामा  

   Follow us on        
मुंबई:मराठी भाषेला अलीकडेच अभिजात भाषेचा दर्जा भेटला असताना तिची खुद्द महाराष्ट्रातच अवहेलना होण्याचे प्रकार घडताना दिसत आहे. असाच एक प्रकार मुंबई उपनगरीय रेल्वेच्या नालासोपारा स्थानकावर घडला आहे.
एका हिंदी भाषिक टीसीने एका प्रवाशांकडून तो प्रवासी यापुढे मराठी भाषेचा आग्रह धरणार नाही असे लिहून घेतल्याचा प्रकार घडला आहे.  या प्रकारची एक पोस्ट सोशल मीडियावर प्रमाणावर व्हायरल होत आहे.  अमित पाटील या नावाच्या प्रवाशाला नालासोपारा रेल्वेस्थानकावर कर्तव्यावर असलेल्या रितेश मोरया नावाच्या एका टीसीने तिकीट दाखवण्यास सांगितले. मात्र त्या प्रवाशाने आपल्याला हिंदी भाषा समजत नसल्याने मराठीत बोला असा आग्रह धरला. मात्र त्या तिकीट तपासनीसाने मराठीत बोलण्यास नकार दिला आणि बाचाबाची केली, एवढेच  नव्हे  तर त्याने तेथे कर्तव्यावर असलेल्या रेल्वे पोलिसांच्या मदतीने त्या प्रवाशाकडून यापुढे तो मराठीचा आग्रह धरणार नाही असे लिहून घेतले.
काय लिहून घेतले? 
“नाव- अमित पाटील…..रितेश मोरया मला नालासोपारा  स्टेशन वर भेटले असता मला तिकीट दाखवायला सांगितले. मी त्यांना बोललो कि मला स्थानिक भाषा येते त्यामुळे माझ्याशी मराठीत बोला, हिंदी मला फारशी येत नाही. तर त्यांनी मराठी भाषा बोलण्यास नकार दिला. यापुढे मी मराठी भाषा बोलण्यास प्रेशर देणार नाही.”

Loading

Mumbai Local: पुन्हा पुन्हा तिकीट काढायची गरज नाही; मुंबई लोकलचं ‘हे’ तिकीट काढा आणि दिवसभर फिरा

   Follow us on        
मुंबई: सध्या सणासुदीचे दिवस असल्याने बहुतेकजण नातेवाईकांकडे जायला बाहेर पडत आहेत. मुंबई लोकल गाड्यांतून अनेक ठिकाणी प्रवास करायचा असल्यास पुन्हा पुन्हा तिकीट काढणे गैरसोयीचे असते. मात्र यावर उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाने एक सुविधा दिली आहे. मुंबईमध्ये पर्यटनासाठी किंवा आपल्या कामासाठी जर तुम्हाला मोजक्या दिवसांसाठी फिरायचे असेल तर उपनगरीय रेल्वे स्थानकांवरील तिकीट खिडक्यांवर खास ‘पर्यटन तिकीट’ ( Tourist Tickets ) विकत मिळते. या तिकीटांद्वारे लोकल ट्रेनच्या सेंकडक्लासमधून मुंबईत मध्य रेल्वेवर Central Railway सीएसएमटी ते कर्जत-कसारा-पनवेल आणि पश्चिम रेल्वेवर Western Railway चर्चगेट ते डहाणूपर्यंत कितीही वेळा प्रवास करण्याची सोय आहे.
मुंबईत नवख्या आलेल्या व्यक्तींकडे जर रेल्वेचा पास नसेल तर त्यांच्यासाठी एक रेल्वेची सुविधा आहे. अशा व्यक्तींना जर मुंबई फिरायची असेल किंवा काही कामानिमित्त विविध ठीकाणांना भेट द्यायची असेल किंवा प्रवास करायचा असेल तर उपनगरीय रेल्वेची ‘पर्यटन तिकीट’ ही सुविधा अत्यंत उपयोगाची आहे. त्यामुळे वारंवार तिकीट काढण्याची काही गरज उरत नाही. शिवाय रेल्वेचा पास नसलेल्या व्यक्तींसाठी रेल्वे मोजक्या दिवसांच्या मुंबई आणि उपनगरातील प्रवासासाठी हे ‘पर्यटन तिकीट’ अत्यंत उपयुक्त आहे.
किंमत आणि वैधता…
मुंबईत पर्यटन करणाऱ्यांसाठी पर्यटन तिकीट विकत मिळते. एक दिवसाचे तिकीट 80 रूपयांना तिकीट खिडक्यांवर विकत मिळते. परंतू या तिकीटांतून रात्री 12 वाजेपर्यंतच प्रवास करता येतो. तसेच केवळ रेल्वेच्या द्वितीय दर्जातूनच प्रवा करता येतो. तसेच हे पर्यटन तिकीट एक दिवसाचे ( 80 रूपये ), तीन दिवसाचे ( साधारण 170 रूपये ) आणि पाच दिवसांचे ( 210 रूपये ) अशा किंमतीत ही पर्यटन तिकीटे मिळतात. आपल्याला ज्या तारखे पासून प्रवास करायचा असेल त्या तारखेपासूनही आगाऊ ही तिकीटे काढण्याची देखील सोय उपलब्ध असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली आहे.

Loading

रायझिंग सन क्रीडा उत्सव मंडळ आयोजित वार्षिक उत्सव जल्लोषात संपन्न

   Follow us on        

मुंबई:- रायझिंग सन क्रीडा उत्सव मंडळ (रजि.) चारकोप सेक्टर एक यांच्या वतीने आयोजित केलेल्या वार्षिक उत्सवात क्रिकेट, होम मिनिस्टर, वेश भूषा, चित्रकला, पाक कला स्पर्धा, कोजागिरी, रास गरबा – दांडिया तसेच श्री सत्यनारायणाची महापूजा इ. कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम आर.एस.सी. १५ मधील बाळ-गोपाळ, बंधू – भगिनी व रहिवाश्यांनी जल्लोषात व उत्साहात साजरा केला. उत्सवा दरम्यान रस्ता क्रमांक १५ विद्युत रोषणाईने झगमगला होता.

क्रिकेट स्पर्धेच्या अटीतटीच्या लढतीत साईकुंज संस्थेनेच्या महिला व पुरुष या दोन्ही संघांनी उत्कृष्ट खेळ करत विजेते पद पटकविले. या स्पर्धेचे अप्रतिम नियोजन केतन धाटावकर व गिरीश दहीबावकर यांनी केले होते.

महिलांचा आवडता कार्यक्रम “होम मिनिस्टर” म्हणजेच खेळ पैठणीचा पाऊस असूनही खूपच रंगतदार ठरला. आपल्या खास शैलीत निवेदक प्रशांत प्रिंदावनकर आणि सुधाकर वस्त यांनी एकामागून एक रंगतदार खेळांचे सादरीकरण करून खेळाडूंसोबतच प्रेक्षकांनादेखील या खेळांची भुरळ पाडली. या स्पर्धेच्या विजेत्या रंगावली संस्थेतील श्वेता सतिश कदम यांना पैठणी भेट देण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आपला माणूस भूषण अनंत विचारे यांनी पैठणी, सोन्याची नथ, स्मार्ट घड्याळे आणि एअर पौडस्, तसेच सहभगी भगिनिंस पारितोषिके देवून मंडळास मोलाचे सहकार्य केले.

सत्यनारायण पूजा दिनी बाळ गोपलांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, त्यात १३६ स्पर्धकांनी भाग घेऊन स्पर्धेत चुरस निर्माण केली. तसेच महिलांसाठी आयोजलेल्या पाककला स्पर्धेत देखील अनेक भगिनींनी भाग घेवून एकापेक्षा एक सरस पदार्थांची मेजवानी सादर केली. साई कुंज संस्थेतील सुजाता नाईक यांच्या ‘कडबू’ या पारंपरिक पदार्थाने बाजी मारून प्रथम क्रमांक पटकावला. डी.जे.जग्गु यांच्या तालावर रास – गरब्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यात विविध वेशभूषा करून अबाल वृद्धांनी सहभाग घेवून आनंद व्यक्त केला.

उत्सव मंडळाच्या वतीने विभागात कला, क्रीडा, सांस्कृतिक, वैद्यकीय व शैक्षणिक उपक्रम राबविण्याचा मंडळाचा मानस आहे असे राजेश सोरप अध्यक्ष व अमित पालांडे, चिटणीस यांनी सांगितले.

कार्यक्रमांची सांगता भूषण विचारे, निखिल गुढेकर, राजन निकम , दिनेश साळवी, सुधाकर कदम या व इतर मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे वितरण करून करण्यात आली.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष राजेश सोरप, उपाध्यक्ष सुधाकर वस्त, चिटणीस अमित पालांडे, उपचिटणीस राहूल केदारी, खजिनदार सुनीत कदम, उपखजिनदार निलेश धावडे तसेच प्रशांत प्रिदांवनकर, हरीश सूर्यवंशी, राजेश सोनवणे प्रवीण सावंत, कुणाल विश्वकर्मा, विशाल पांड्या, राजू परब, चेतन चौलकर, डॉक्टर मकरंद गावडे, कमलाकर सक्रे या व इतर अनेक कार्यकर्त्यांनी विशेष प्रयत्न केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रशांत प्रिदांवनकर यांनी केले. तसेच सर्व रहिवाशी, मान्यवर, हितचिंतक, देणगीदार यांच्ये आभार सुधाकर वस्त यांनी व्यक्त केले.

Loading

जनरल आणि स्लीपर कोचेस डब्यांची कमतरता ठरत आहे धोकादायक

   Follow us on        

संपादकीय: वांद्रे टर्मिनस येथे काल पहाटे गाडीमध्ये चढताना चेंगराचेंगरी होऊन प्रवासी गंभीररीत्या जखमी होण्याचा प्रकार घडला होता. घटनास्थळी पडलेला रक्ताचा सडा घटनेचे गांभीर्य दाखवते.

वांद्रे-गोरखपूर एक्सप्रेस पूर्ण अनारक्षित स्वरुपाची होती. या गाडीच्या आसन क्षमतेपेक्षा तिकीटविक्री झाली होती. गाडी प्लॅटफॉर्म येत असताना जागा पकडण्यासाठी प्रवाशांची झुंबड उडाली. या वेळी चेंगराचेंगरी होऊन 9 प्रवासी जखमी झाले. त्यात 2 दोघे जण गंभीररीत्या जखमी झाले.

या घटनेनंतर या घटनेस जबाबदार कोण? कारणे काय? हे प्रश्न उठले. अन्य कारणे अनेक असतीलच मात्र मागणी – पुरवठा यातील तफावत हेच या घटने मागचे मुख्य कारण म्हणता येईल. देशातील प्रवाशांची मागणी कोणती आहे हेच ओळखणे प्रशासनाला जमले नाही; किंवा ते जाणूनबुजून त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. देशातील प्रवाशांचा मोठा गट सामान्य आणि गरीब या प्रकारात मोडतो. या प्रवाशांना एसी आणि प्रिमीयम श्रेणीतून प्रवास प्रवास करणे परवडत नाही. एकतर जनरल नाहीतर स्लीपर या श्रेणीची तिकिटे त्यांना परवडतात. त्यामुळे प्रीमियम वंदे भारत, तेजस, राजधानी या सारख्या पूर्णपणे प्रिमीयम त्यांच्यासाठी नाहीच आहेत. आता राहिल्या बाकीच्या रेग्युलर गाड्या. या गाड्यांना फक्त 2 ते 4 जनरल डबे जोडलेले असतात, तर साधारणपणे 8 ते 10 सेकंड स्लीपर डबे या प्रवाशांसाठी असतात. ही संरचना प्रत्येक गाडीपरत्वे कमी अधिक असल्याने आपण ती आपण साधारणपणे 50% पकडून चालू. देशातील मोठ्या प्रवासगटाला ही क्षमता नक्किच कमी आहे.

रेल्वे प्रशासनाने अलीकडेच स्लीपर श्रेणीच्या डब्यांतून प्रवास करणाऱ्या प्रतीक्षा यादीतील प्रवाशांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना आरक्षित डब्यातून प्रवास करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. कालची घटना याच निर्णयाचा एक परीणाम आहे. यापूर्वी प्रवाशांना वेटिंग तिकीटावरून स्लीपर डब्यांतून प्रवास करण्याचा पर्याय उपलब्ध होता. तो आता नाहीसा झाल्याने जनरल डब्यातील गर्दी वाढली. प्रशासनाने यावर तोडगा न काढल्यास, हे चित्र असेच राहिल्यास भविष्यातही अशा घटना घडतच राहणार.

रेल्वे प्रशासन सध्या उत्पन्न वाढीवर भर देताना दिसत आहे. त्यामुळे वंदे भारतसारख्या प्रिमीयम गाड्या रूळांवर आणण्यास भर देत आहे. तर देशातील लोकप्रतिनिधींना आधुनिक आणि प्रगत भारत घडवायचा आहे. मात्र या आधुनिक भारतात वंदे भारत एक्सप्रेस रिकाम्या जात असतिल आणि सामान्य प्रवासी असे चिरडले जात असतिल तर अश्या आधुनिकतेचा काय उपयोग?

Loading

वांद्रे टर्मिनस येथे एक्सप्रेसमध्ये चढताना चेंगराचेंगरी; ९ प्रवासी जखमी, दोघे गंभीर

   Follow us on        
Bandra Terminus : मुंबईमधील वांद्रे रेल्वे स्थानकातील आज पहाटे गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाल्याची माहिती समोर आली आहे. या चेंगराचेंगरीमध्ये ९ प्रवासी जखमी झाले आहेत. तसेच यातील दोण जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती सांगण्यात आली आहे. जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
वांद्रे रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर पहाटे 5 वाजताच्या सुमारास ही घटना घडली असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. रेल्वेत चढण्यासाठी प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. रेल्वेत चढत असतानाच झालेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली आणि यामध्ये काही प्रवाशी प्लॅटफॉर्मवर पडले. त्यामुळे चेंगराचेंगरी होऊन ९ प्रवासी जखमी झाले आहेत. वांद्रे – गोरखपूर ही गाडी पूर्णपणे अनारक्षित डब्यांची चालविण्यात येते. सामान्यपणे ही गाडी दोन तास अगओड्र प्लॅटफॉर्म वर लागते मात्र आज या गाडीला थोडा उशीर झाला होता. त्यामुळे रेल्वे आल्यानंतर प्रवाशांनी रेल्वेत चढण्यासाठी मोठी गर्दी केली आणि या गर्दीमुळे चेंगराचेंगरीची घटना घडली.
वांद्रे ते गोरखपूर या रेल्वेने प्रवास करण्यासाठी गर्दी केलेले बहुतांश प्रवाशी हे छट पुजेसाठी उत्तर प्रदेशात आपल्या गावी जात होते, अशी प्राथमिक माहिती सांगितली जात आहे. यावर अद्याप रेल्वे प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. सध्या वांद्रे स्थानकातील प्लॅटफॉर्म परिस्थिती व्यवस्थित असून प्लॅटफॉर्मवर पोलीस उपस्थित असल्याची माहिती देण्यात येत आहे.

Loading

Bhumi Abhilekh: जमीन मोजणीच्या नियमांत १ नोव्हेंबरपासून बदल

   Follow us on        
Bhumi Abhilekh: भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून जमीन मोजणीची कामे गतिमान व्हावीत याकरिता जमीन मोजणी नियमांमध्ये बदल करण्यात आला असून यानुसार आता ग्रामीण भागात जमीन मोजणीच्या दरामध्ये सवलत देण्यात आली आहे व जमीन मोजणीचा कालावधी 130 दिवसांवरून 90 दिवसांवर आणला गेला आहे. तसेच जमीन मोजणीसाठी आता ऑनलाईन अर्ज भरण्याची  सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
त्यामुळे हा कालावधी कमी झाल्याने तातडीने जमीन मोजणीचे प्रकरणांचा निपटारा करता येणे शक्य होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे अगोदर भूमी अभिलेख विभागाकडून सिटीसर्वे आणि सर्वे नंबरच्या जमीन मोजणीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे शुल्क आकारले जायचे.
परंतु आता जमीन भाग आणि नगरपालिका हद्द असे दोन प्रकार करण्यात आले आहेत. तसेच अगोदर साधी मोजणी, तातडीची आणि अति तातडीची असे जमीन मोजणीचे तीन प्रकार होते. ते आता बंद करण्यात आले असून दोनच प्रकार त्यामध्ये आता निश्चित करण्यात आलेले आहेत.
या नियमाची अंमलबजावणी येत्या 1 नोव्हेंबरपासून करण्यात येणार असून जमीन मोजणीच्या कार्यप्रणालीमध्ये सुसूत्रता यावी व मोजणी सुलभ व्हावी याकरिता शासनाच्या भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून हे नवे धोरण निश्चित करण्यात आलेले आहे. याबाबत भूमी अभिलेख विभागाने परिपत्रक जारी केले आहे.
या नवीन धोरणानुसार जमीन मोजणीसाठी लागणारे शुल्क व कालावधी नव्याने निश्चित करण्यात आला असून यामध्ये ग्रामीण भागाला दिलासा मिळेल या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यात आला आहे.
यामध्ये सर्वे नंबर तसेच गट नंबर, पोटहिस्सा आणि सिटीसर्वे इत्यादी मधील एका भूखंडासाठी दोन हेक्टरपर्यंत नियमित मोजणी करिता 2000 रुपये, द्रूतगती मोजणीसाठी 8000 रुपये मोजणी शुल्क निश्चित करण्यात आलेले आहे.
तसेच नगरपालिका हद्दीतील मोजणी हा दुसरा प्रकार निश्चित करण्यात आला असून या प्रकारामध्ये एका भूखंडासाठी एक हेक्टर पर्यंत नियमित मोजणीस 3000 रुपये इतके शुल्क ठरवण्यात आलेले आहे.
त्याचप्रमाणे जमीन मोजणीसाठी आता ऑनलाईन अर्ज भरण्याची  सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे या सुविधेचा लाभ घेऊन अर्जदार https://bhumiabhilekh.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळास भेट देऊन अर्ज  करू शकतात.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search