Category Archives: महाराष्ट्र

ज्येष्ठ मराठी अभिनेते जयंत सावरकर पडद्याआड

मुंबई: कोकणात मूळ असलेले ज्येष्ठ मराठी अभिनेते जयंत सावरकर यांचे आज २४ जुलै रोजी ठाणे येथे निधन झाले. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.   त्यांच्या पार्थिवावर उद्या दिनांक २५ जुलै रोजी अंत्यसंस्कार होणार आहेत.

गेल्या चार दशकांहून अधिक काळ त्यांनी सिनेसृष्टीत आपला दबदबा निर्माण केला होता. लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत सर्वांना आपलीशी करतील अशी विविध पात्र त्यांनी साकारली. त्यांच्या जाण्याने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली असून, चाहते आणि मनोरंजन विश्वातील मंडळी या घटनेनंतर शोक व्यक्त करत आहेत.

०३ मे १९३६ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमध्ये जन्मलेल्या सावरकरांनी वयाच्या विसाव्या वर्षापासून अभिनय कारकिर्दीस सुरुवात केली. त्यांनी अनेक वर्ष बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणूनही काम पाहिले होते. सावरकर यांनी शंभरहून मराठी नाटकांमध्ये भूमिका केल्या, शिवाय त्यांनी ३० हून अधिक हिंदी सिनेमातही काम केले. सावरकर ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते. याकरता त्यांची निवड बिनविरोध झाली होती. त्यांच्या अलीकडच्या काही दिवसांमधील कामाविषयी बोलायचे झाल्यास ते काही महिन्यांपूर्वीच ‘आई कुठे काय करते’ मालिकेत दिसले होते. या मालिकेत त्यांनी कांचन आजींच्या भावाची भूमिका साकारली. शिवाय ‘समांतर’ या स्वप्निल जोशीच्या वेब सीरिजमध्ये त्यांनी केलेली भूमिकाही विषेश गाजली

 

Loading

ब्रेकिंग | कोल्हापुरात पंचगंगा नदीने ओलांडली धोक्याची पातळी; नागरिकांना सतर्कतेचा इशारा


कोल्हापूर : राज्यात अनेक ठिकाणी पावसाने धुमाकूळ घातला असून काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाने जोर धरला असून पंचगंगा नदीने धोक्याची पातळी गाठली आहे.आता ती धोका पातळीकडे हळूहळू सरकत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. पुराचे सावट असलेल्या भागातील नागरिकांना सतर्कतेच इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे नदीची पाणी पातळी वाढत चालली आहे. रविवारी पंचगंगा नदी इशारा पातळीकडे वाटचाल करत होती. पहाटे तीन वाजता ३९ फूट ही इशारा पातळी पंचगंगेने गाठली. जिल्ह्यातील पाण्याखालील एकूण बंधाऱ्यांची संख्या ८२ इतकी झाली आहे. पुराचे पाणी आल्यामुळे शिवाजी पूल – गंगावेश रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमन आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत सुतारवाडा, उलपे मळा, कसबा बावडा येथील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Loading

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर दरड कोसळली; पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या तिन्ही लेन वाहतुकीसाठी बंद

Mumbai Pune Expressway Landslide |पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावरील आडोशी बोगद्याजवळ रविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. दरम्यान, पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या तिन्ही लेन वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्या आहेत.

महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावरील आडोशी गावाच्या हद्दीत रविवारी रात्री दरड कोसळली. त्यामुळे डोंगरभागातून मातीचा लगदा महामार्गावरील तिन्ही लेनवरती पडला. त्यामुळे पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या तिन्ही लेन वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्या आहेत.

पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाताना बोगद्याजवळ दरड कोसळली आहे. पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर दररोज लाखो वाहनांची वर्दळ असते. सुदैवाने दरड कोसळली तेव्हा त्यामध्ये कोणतेही वाहन सापडले नाही. दरड बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

Loading

Weather Forecast | पुढील ४ दिवस कोकणात पावसाचा जोर कायम राहणार

Weather Forecast Updates: हवामान विभागाने काळ पुढील ५ दिवसांचे पावसाचे भाकीत जाहीर केले असून कोकणासह राज्याच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज दिनांक २३ जुलै रोजी  मुंबईसह 9 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आज 23 जुलै रोजी कोकणासह काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलेला असून, यात मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर विदर्भात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज असून, यलो अलर्ट दिला गेला आहे. राज्याच्या उर्वरित भागात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
कोकणात पावसाचा जोर कायम राहणार
24, 25 आणि 26 जुलै पर्यंतचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आलेला आहे. यात कोकणात मुसळधार पाऊस कायम राहणार असल्याचा इशारा दिला गेला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरूच राहणार आहे. या जिल्ह्यांना तीनही दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. विदर्भात मुसळाधर ते मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज असून उर्वरित भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी बरसण्याचा अंदाज आहे.
Ad -

मराठी मुलांमुलींना युरोप, पोर्तुगाल,माल्टा,इटली आणि पोलंड येथे नोकरीच्या संधी....
🔸Retail Jobs 🔸Malls 🔸Corporate Staff 🔸Sales 🔸Back Office 🔸Hotels
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Loading

दिव्यांगांना सुद्धा आता एसटी ने मोफत प्रवास करता येणार

मुंबई : वरीष्ठ नागरिकांना देण्यात आलेली मोफत एसटी प्रवासाची सुविधा आता दिव्यांगांना पण दिली जाणार आहे. राज्य परिवहन महामंडळातर्फे एका परिपत्रकाद्वारे दिव्यांगांना देखील आता एसटी ने मोफत प्रवास करता येणार असल्याचे जाहीर केले आहे.

७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरीकांना मोफत एसटी प्रवास, महिलांना सरसकट अर्धे तिकीट हे दोन निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतले होते, त्यानंतर दिव्यांगांना देखील राज्यभर मोफत प्रवास करता येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दिव्यांगत्वाचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यात काही प्रकारासाठी सातत्याने उपचार करावे लागतात. त्यामध्ये सिकलसेल, एचआयव्ही बाधित, डायलेसिस व हिमोफेलिया यासारख्या प्रकारांचा समावेश होतो. राज्यातील अशा रुग्णांना विविध आरोग्य सेवा आणि उपचारासाठी नियमितपणे जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय तसेय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये जावे लागते. त्यामुळे त्यांचा प्रवास खर्च वाढतो. याचा विचार करून या रुग्णांना मदतीचा हात मिळावा म्हणून राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बस मार्फत मोफत प्रवासाची योजना लागू केली आहे.

Loading

समृद्धी महामार्गावर खासगी बसला भीषण अपघात; २५ प्रवासी ठार.

Bus Accident :समृद्धी महामार्गावरील अपघातांचे सत्र सुरूच आहे. शुक्रवारी मध्यरात्री बुलढाण्याजवळ समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात झाला. अपघातानंतर बसने पेट घेतल्याने 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त विदर्भ ट्रॅव्हल्सची लक्झरी बस नागपूर येथून पुण्याच्या दिशेने निघाली होती. या बसमधून अंदाजे 33 प्रवाशी प्रवास करीत होते. मध्यरात्रीच्या सुमारास बुलढाण्याजवळीच सिंदखेडराजा परिसरात बसचे टायर फुटले.टायर फुटल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि ही अनियंत्रित बस थेट डिव्हायरला धडकली. अपघातानंतर बसने क्षणात पेट घेतला. त्यामुळे प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही. बसमध्ये अडकून पडल्याने 25 प्रवाशांचा कोळसा झाला. मृतांमध्ये तीन लहान मुलांचा समावेस आहे. सध्या मृत प्रवाशांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. मृतदेह पूर्ण जळले असल्याने त्यांची ओळख पटविण्यात अडचणी येत आहेत. या भीषण अपघातामध्ये चालकासह 8 जणांचा जीव वाचला आहे.

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेनंतर दुःख व्यक्त केले असून मृत प्रवाशांचा नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत जाहीर केली आहे. तसेच जखमीं प्रवाशांच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार उचलणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Loading

आषाढीला राज्यात मुसळधार पाऊस; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी…

Rain updates : राज्यात उद्या आषाढी एकादशीला काही जिल्ह्यांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. 

पुणे हवामान विभागप्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विटर दिलेल्या माहितीनुसार उद्या दिनांक 29 जून रोजी रायगड, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, सातारा आणि पुणे या जिल्ह्यांना हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट देवून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि इतर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. 

 

अलर्ट आणि त्यांचे अर्थ 

ग्रीन अलर्ट – धोका नाही Green Alert 

यलो अलर्ट – सतर्क रहा Yellow Alert

ऑरेंज अलर्ट – तयार रहा Orange Alert

रेड अलर्ट – कृतीची वेळ Red Alert

 

Loading

Talathi Bharti | एकूण ४६४४ पदांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली

Talathi Recruitment : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या अंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण ४६४४ पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

तलाठी पदांच्या एकूण ४६४४ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेद्वार किमान पदवीधारक आसावा. (अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.)

वेतन –  वेतनमान रु. ५२०० ते रु. २०२०० + ग्रेड पे रु. २४०० राहील.

 

 

अर्ज करण्याची तारीख – दिनांक २६ जून २०२३ ते दिनांक १७ जुलै २०२३ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.

अधिक माहितीसाठी खालील जाहिरात वाचा

[pdf-embedder url=”https://kokanai.in/wp-content/uploads/2023/06/तलाठी-पदभरती-2023.pdf” title=”तलाठी पदभरती -2023″] 

Loading

आषाढी वारी | पोलिसांचा वारकऱ्यांवर लाठीमार

Ashadhi Vari 2023 |आषाढी वारी हा संपूर्ण महाराष्ट्राचा उत्सव असून या काळात सर्वत्र उत्साह आणि चैतन्याचे वातावरण असते. मात्र आळंदीत आज वारकरी आणि पोलीसांमध्ये झटापट झाल्याची माहिती मिळाली आहे. वारकऱ्यांची गर्दी झाल्यानं पोलिसांना वारकऱ्यांना आवरणं कठीण झालं. पोलिसांनी वारकऱ्यांवर सौम्य लाठीमार केला. आळंदीच्या मंदिराबाहेर हा प्रकार घडला आहे. पालखी सोहळ्यावेळी मानाच्या वारकऱ्यांनाच मंदिरात प्रवेश दिला जातो. मात्र इथं वारकऱ्यांची गर्दी झाली होती. त्यामुळे पोलीस आणि वारकरी आमने सामने आल्याचं चित्र पाहायला मिळालं. मात्र पुणे पोलिसांनी परिस्थिती संयमाने नियंत्रणात घेतल्याने कोणताही मोठा प्रकार घडला नाही.

मंदिर परिसरातील वाद मिटला मात्र ज्ञानेश्वर मंदिरासमोर आता पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि वारीला गालबोट लागू नये, यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहे. मात्र, घडलेल्या या प्रकरणामुळे सरकारवर ताशेरे ओढले जात आहेत.

दरम्यान, आळंदीत (Pune Newsमोठ्या संख्येने वारकरी दाखल झालेत. स्नान करून हे वारकरी माऊलींच्या प्रस्थान सोहळ्यात सहभागी होतात. त्यामुळे इंद्रायणीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी एनडीआरएफची टीम ही तैनात करण्यात आली आहे.

 

Loading

”… येथून जीवघेणा मुंबई गोवा महामार्ग सुरू होतो… ” मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीची घोषणा फलकांद्वारे जनजागृती. 

 

Mumbai Goa Highway | मुंबई गोवा महामार्गाचे रखडलेले आणि सुमार काम याविरोधात विविध उपक्रमातून आवाज उठवणाऱ्या मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीने जनजागृती करण्यासाठी एक विशेष अभियान हाती घेतले आहे. या अभियानांतर्गत मुंबई गोवा महामार्गावर महामार्गाच्या रखडलेल्या कामा विरोधात जनजागृती करणारे घोषणा फलक लावण्यात येणार आहेत. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात पळस्पे ते महाड महामार्गाच्या दुतर्फी ५० बॅनर लावले गेले आहेत. 

”पळस्पे ते महाड महामार्गाच्या दुतर्फी ५० बॅनर लावण्यात येत आहेत.झोपेचा सोंग घेऊन झोपलेल्याना आमच्या कोकणकरांच्या समस्या कळाव्यात व जास्तीत जास्त कोकणकर या आंदोलनात जोडले जावेत व स्थानिक जनतेपर्यंत जनजागृती व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. सर्वाना विनंती आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी वरील बॅनर आपल्या विभागात फोटोसहित लावले तर एक सहकार्य मिळेल.” असे समितीचे सचिव रुपेश दर्गे म्हणाले आहेत.

या अभियानाची दखल प्रसारमाध्यमांनी घेतली असून जनजागृती होवून अधिक चांगला परिणाम मिळणार आहे त्यामुळे दुसर्‍या टप्प्यात या अभियानाचे मुंबईत ठाणे व नवी मुंबई पालघर जिल्हा येथे ही नियोजन करण्याचे समितीने ठरवले आहे. जे प्रतिनिधी स्व-योगदानाने हे बॅनर आपल्या परिसरांत लावु इच्छित असतील त्यांना आपले नाव व फोटोसकट आपल्या घोषणाफलक लावु शकतात. त्यासाठी 8652505542 संपर्क साधण्याचे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.

 

 

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search