




मुंबई : वरीष्ठ नागरिकांना देण्यात आलेली मोफत एसटी प्रवासाची सुविधा आता दिव्यांगांना पण दिली जाणार आहे. राज्य परिवहन महामंडळातर्फे एका परिपत्रकाद्वारे दिव्यांगांना देखील आता एसटी ने मोफत प्रवास करता येणार असल्याचे जाहीर केले आहे.
७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरीकांना मोफत एसटी प्रवास, महिलांना सरसकट अर्धे तिकीट हे दोन निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतले होते, त्यानंतर दिव्यांगांना देखील राज्यभर मोफत प्रवास करता येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दिव्यांगत्वाचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यात काही प्रकारासाठी सातत्याने उपचार करावे लागतात. त्यामध्ये सिकलसेल, एचआयव्ही बाधित, डायलेसिस व हिमोफेलिया यासारख्या प्रकारांचा समावेश होतो. राज्यातील अशा रुग्णांना विविध आरोग्य सेवा आणि उपचारासाठी नियमितपणे जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय तसेय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये जावे लागते. त्यामुळे त्यांचा प्रवास खर्च वाढतो. याचा विचार करून या रुग्णांना मदतीचा हात मिळावा म्हणून राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बस मार्फत मोफत प्रवासाची योजना लागू केली आहे.


Bus Accident :समृद्धी महामार्गावरील अपघातांचे सत्र सुरूच आहे. शुक्रवारी मध्यरात्री बुलढाण्याजवळ समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात झाला. अपघातानंतर बसने पेट घेतल्याने 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त विदर्भ ट्रॅव्हल्सची लक्झरी बस नागपूर येथून पुण्याच्या दिशेने निघाली होती. या बसमधून अंदाजे 33 प्रवाशी प्रवास करीत होते. मध्यरात्रीच्या सुमारास बुलढाण्याजवळीच सिंदखेडराजा परिसरात बसचे टायर फुटले.टायर फुटल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि ही अनियंत्रित बस थेट डिव्हायरला धडकली. अपघातानंतर बसने क्षणात पेट घेतला. त्यामुळे प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही. बसमध्ये अडकून पडल्याने 25 प्रवाशांचा कोळसा झाला. मृतांमध्ये तीन लहान मुलांचा समावेस आहे. सध्या मृत प्रवाशांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. मृतदेह पूर्ण जळले असल्याने त्यांची ओळख पटविण्यात अडचणी येत आहेत. या भीषण अपघातामध्ये चालकासह 8 जणांचा जीव वाचला आहे.
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेनंतर दुःख व्यक्त केले असून मृत प्रवाशांचा नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत जाहीर केली आहे. तसेच जखमीं प्रवाशांच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार उचलणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.


Rain updates : राज्यात उद्या आषाढी एकादशीला काही जिल्ह्यांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
पुणे हवामान विभागप्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विटर दिलेल्या माहितीनुसार उद्या दिनांक 29 जून रोजी रायगड, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, सातारा आणि पुणे या जिल्ह्यांना हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट देवून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि इतर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
अलर्ट आणि त्यांचे अर्थ
⊗ ग्रीन अलर्ट – धोका नाही Green Alert
⊗ यलो अलर्ट – सतर्क रहा Yellow Alert
⊗ ऑरेंज अलर्ट – तयार रहा Orange Alert
⊗ रेड अलर्ट – कृतीची वेळ Red Alert
28 Jun: Heavy rainfall warnings for 29 June.
राज्यात उद्यासाठी मुसळधार ते अती मुसळधार पावसाचे इशारे.
आज ही मुसळधार ते अती मुसळधार पावसाचे इशारे आहेत.
IMD pic.twitter.com/c7kUniFv0B— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 28, 2023
Talathi Recruitment : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या अंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण ४६४४ पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
तलाठी पदांच्या एकूण ४६४४ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेद्वार किमान पदवीधारक आसावा. (अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.)
वेतन – वेतनमान रु. ५२०० ते रु. २०२०० + ग्रेड पे रु. २४०० राहील.
अर्ज करण्याची तारीख – दिनांक २६ जून २०२३ ते दिनांक १७ जुलै २०२३ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात वाचा
[pdf-embedder url=”https://kokanai.in/wp-content/uploads/2023/06/तलाठी-पदभरती-2023.pdf” title=”तलाठी पदभरती -2023″]
Ashadhi Vari 2023 |आषाढी वारी हा संपूर्ण महाराष्ट्राचा उत्सव असून या काळात सर्वत्र उत्साह आणि चैतन्याचे वातावरण असते. मात्र आळंदीत आज वारकरी आणि पोलीसांमध्ये झटापट झाल्याची माहिती मिळाली आहे. वारकऱ्यांची गर्दी झाल्यानं पोलिसांना वारकऱ्यांना आवरणं कठीण झालं. पोलिसांनी वारकऱ्यांवर सौम्य लाठीमार केला. आळंदीच्या मंदिराबाहेर हा प्रकार घडला आहे. पालखी सोहळ्यावेळी मानाच्या वारकऱ्यांनाच मंदिरात प्रवेश दिला जातो. मात्र इथं वारकऱ्यांची गर्दी झाली होती. त्यामुळे पोलीस आणि वारकरी आमने सामने आल्याचं चित्र पाहायला मिळालं. मात्र पुणे पोलिसांनी परिस्थिती संयमाने नियंत्रणात घेतल्याने कोणताही मोठा प्रकार घडला नाही.
मंदिर परिसरातील वाद मिटला मात्र ज्ञानेश्वर मंदिरासमोर आता पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि वारीला गालबोट लागू नये, यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहे. मात्र, घडलेल्या या प्रकरणामुळे सरकारवर ताशेरे ओढले जात आहेत.
दरम्यान, आळंदीत (Pune Newsमोठ्या संख्येने वारकरी दाखल झालेत. स्नान करून हे वारकरी माऊलींच्या प्रस्थान सोहळ्यात सहभागी होतात. त्यामुळे इंद्रायणीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी एनडीआरएफची टीम ही तैनात करण्यात आली आहे.
Mumbai Goa Highway | मुंबई गोवा महामार्गाचे रखडलेले आणि सुमार काम याविरोधात विविध उपक्रमातून आवाज उठवणाऱ्या मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीने जनजागृती करण्यासाठी एक विशेष अभियान हाती घेतले आहे. या अभियानांतर्गत मुंबई गोवा महामार्गावर महामार्गाच्या रखडलेल्या कामा विरोधात जनजागृती करणारे घोषणा फलक लावण्यात येणार आहेत. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात पळस्पे ते महाड महामार्गाच्या दुतर्फी ५० बॅनर लावले गेले आहेत.
”पळस्पे ते महाड महामार्गाच्या दुतर्फी ५० बॅनर लावण्यात येत आहेत.झोपेचा सोंग घेऊन झोपलेल्याना आमच्या कोकणकरांच्या समस्या कळाव्यात व जास्तीत जास्त कोकणकर या आंदोलनात जोडले जावेत व स्थानिक जनतेपर्यंत जनजागृती व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. सर्वाना विनंती आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी वरील बॅनर आपल्या विभागात फोटोसहित लावले तर एक सहकार्य मिळेल.” असे समितीचे सचिव रुपेश दर्गे म्हणाले आहेत.
या अभियानाची दखल प्रसारमाध्यमांनी घेतली असून जनजागृती होवून अधिक चांगला परिणाम मिळणार आहे त्यामुळे दुसर्या टप्प्यात या अभियानाचे मुंबईत ठाणे व नवी मुंबई पालघर जिल्हा येथे ही नियोजन करण्याचे समितीने ठरवले आहे. जे प्रतिनिधी स्व-योगदानाने हे बॅनर आपल्या परिसरांत लावु इच्छित असतील त्यांना आपले नाव व फोटोसकट आपल्या घोषणाफलक लावु शकतात. त्यासाठी 8652505542 संपर्क साधण्याचे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.
मुंबई |दि.३०.०५.२०२३ रोजी पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, नारायण देसाई फाऊंडेशन व मेगा रिक्रेयशन तर्फे ‘आ॑तरराष्ट्रीय लघुपट महोत्सव” चे आयोजन रविंद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे करण्यात आले होते. या महोत्सवमध्ये बहुभाषिक लघुपटांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी काही निवडक लघुपट प्रेक्षकांसाठी दाखविण्यात आले. या विनामूल्य लघुचित्रपट पाहण्याचा आनंद असंख्य मायबाप रसिक प्रेक्षकांनी घेतला. संपूर्ण थिएटर खचाखच भरले होते. महोत्सवामध्ये सर्वोत्कृष्ट लघुपटांना तसेच सर्वोत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री, दिग्दर्शक, कथा, पटकथा, संवाद, छायांकन, संकलक ईत्यादी गटांप्रमाणे सन्मानचिन्ह देवून पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी चे संचालक संतोष रोकडे सर, सुप्रसि्दध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक विजय पाटकर, दिग्दर्शक आरयन देसाई, शिरीष राणे, दिलीप दळवी, सर्वणकर, सांडवे,इ. मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले. पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी चे संचालक तथा उपसचिव महाराष्ट्र शासन, मंत्रालय,मुंबई संतोष रोकडे सरांनी शासकीय योजना तसेच पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या उपक्रमांची माहिती दिली. सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक विजय पाटकर यांनी चित्रपट आणि लघुपट ई. विषयी बहुमुल्य मार्गदर्शन केले.
महोत्सवाचे आयोजक, दिग्दर्शक आरयन देसाई यांनी सर्व मान्यवर व मायबाप रसिक प्रेक्षक यांच्या उपस्थितीत नविन उपक्रम म्हणजेच मराठी चित्रपटांचा गौरव सोहळा “मातृभाषा चित्रपट सन्मान पुरस्कार सोहळा” सुरू करण्याचे जाहीर केले. सिनेमा संस्कृतीचे जतन, संवर्धन व विकास तसेच सिनेमा कलाकारांना, कलागुणांना वाव देण्यासाठी सदर उपक्रम राबविण्यात येत आहे.
Maharashtra SSC Result 2023 l 2022- 23 या शैक्षणिक वर्षासाठी घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षांचा निकाल जाहीर. निकालाची एकूण टक्केवारी 93.86 टक्के. निकालामध्ये कोकण विभागानं मारली बाजी. नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागल्याची बोर्डाची माहिती. निकालांमध्ये मुलींनी मारली बाजी.
पुणे: 95.64 टक्के
नागपूर: 92.05 टक्के
औरंगाबाद: 93.23 टक्के
मुंबई: 93.66 टक्के
कोल्हापूर: 96.73 टक्के
अमरावती: 93.22 टक्के
नाशिक: 92.22 टक्के
लातूर: 92.67 टक्के
कोकण: 98.11 टक्के
कोकण विभाग 98.11 टक्के
नागपूर विभाग 92.05 टक्के
राज्याचा निकाल 93.83 %
SSC Result 2022-23| यंदा दहावीत बसलेल्या विद्यार्थी आणि पालकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीचा SSC निकाल उद्या दिनांक ०२ जूनला जाहीर होणार आहे.
दहावीच्या मार्च – एप्रिल २०२३ परीक्षेत बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होणार आहेत.
पुढील वेबसाइटवर पाहता येईल निकाल –
या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.
स्टेप १) दहावी बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर जा.
स्टेप २) दहावी निकालाच्या लिंकवर क्लिक करा
स्टेप ३) तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख आणि आवश्यक माहिती भरा.
स्टेप ४) दहावीचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
राज्य राज्यातून एकूण १५,७७ लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली असून ५३३ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. माध्यमिक बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार दहावीच्या परीक्षेसाठी एकूण १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यामध्ये ८४ हजार ४१६ मुले असून ७३ हजार ६२ मुली आहेत.
Content Protected! Please Share it instead.