मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आज मंगळवारी पार पडली. या बैठकीत मुलींसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. मार्च 2023 च्या आर्थसंकल्पीय अधिवेशनात लेक लाडकी योजनेची (Lek Ladki Yojana) घोषणा झाली होती, या योजनेला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली आहे. या योजनेनुसार, मुलगी जन्माला आल्यापासून ते मुलगी सज्ञान होईपर्यंत तिला आर्थिक मदत केली जाणार आहे. या योजनेनुसार, राज्यात मुलीच्या जन्मानंतर 5000 रुपये देण्यात येणार आहेत. तर मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर मुलीला रोख 75 रुपये देण्यात येतील.
या ‘लेक लाडकी’ योजनेचा लाभ राज्यातील पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांतील मुलींना मिळणार आहे.
अशी मिळणार मुलींना आर्थिक मदत
मुलगी जन्माला आल्यानंतर 5,000 रुपये
मुलगी पहिलीत गेल्यावर 6,000 रुपये
मुलगी सहावीत गेल्यावर 7,000 रुपये
मुलगी अकरावीत गेल्यावर 8,000 रुपये
मुलगी 18 वर्षांची झाल्यावर 75,000 रुपये
अशा रितीने मुलीला एकूण 1 लाख 1 हजार रुपये एवढा लाभ राज्य सरकारकडून मिळणार आहे.
Facebook Comments Box