पुणे-गेल्या २० दिवसांपासून मृत्यूशी झुंज देणार्या मराठी चित्र आणि नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ कलाकार विक्रम गोखले यांचे आज शनिवारी पुण्यात निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. गेल्या २० दिवसांपासून विक्रम गोखले यांच्यावर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. यादरम्यान त्यांच्या प्रकृतीत अनेक चढ-उतार पाहायला मिळाले. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. मात्र, आज दुपारी १ वाजून ४५ मिनिटांनी विक्रम गोखले यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी वृषाली आणि कन्या असा परिवार आहे.
आज संध्याकाळी वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.
दिल्ली: केंद्र शासनाच्या रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने मोटर वाहनांच्या जीवघेण्या अपघातात अपघातग्रस्त झालेल्या व्यक्तीस तात्काळ मदत करणाऱ्या आणि अपघाताच्या गोल्डनअवर मध्ये अपघातग्रस्तांना हॉस्पिटल ट्रामा केअर सेंटरमध्ये वैद्यकीय उपचािासाठी घेऊन जाणाऱ्या ‘गुड समेरिटनला’ अपघातात बळी पडलेल्या व्यक्तीचे प्राण वाचवल्याबद्दल त्या व्यक्तीस पुरस्कार देण्याची योजना जाहीर केली आहे.
रस्त्यावरील होणाऱ्या अपघातातील अपघातग्रस्तांना आपत्त्कालीन परिस्स्थतीत मदत किण्याकरिता सामान्य जनतेस प्रवृत्त करणे व निष्पाप जीव वाचविण्यासाठी इतरांना प्रवृत्त / प्रेरित करण्याच्या उद्देशाने हि योजना सुरू करण्यात येणार आहे.सदर पुरस्काराची अंबलबजावणी करण्याच्या दृष्टीने राज्यस्तरीय देखरेख समिती बनविण्यात येणार आहे. हि समिती या योजनेच्या प्रभावी व कार्यक्षम अंबलबजावणीचा आढावावेळोवेळी त्रैमासिक बैठकीद्वारे घेईल आणि नामांकने रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाकडे पाठवून अंतिम पुरस्कार जाहीर करण्यात येईल.
मुंबई :पहिली, दुसरीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेण्याचा तर तिसरी ते आठवीच्या कोणत्याही विद्यार्थ्यांला नापास न करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली मुंबईत पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. याशिवाय महाराष्ट्रात केरळ मॉडेल आधारित शिक्षण पद्धती राबविण्याचे सुतोवाचही केसरकर यांनी केले.
राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले, संपूर्ण देशातील अशी जी काही राज्य आहेत, ज्यांनी शिक्षणात प्रगती केली आहे, त्यांचं नाव आहे, अशा राज्यात आमच्या शिक्षणामध्ये विभागाने दौरे केले. त्यात केरळने शिक्षण विभागात अनेक प्रयोग केले, अनेक इनिशिएटिव्ह केरळने शिक्षणात घेतले आहेत. काही मॉडेल जे यशस्वी झालेत ते पुढे न्यावे लागतात. केरळ आणि महाराष्ट्राची तशी तुलना करता येणार नाही. पण केरळसोबत पंजाब, राजस्थानमधून सुद्धा आम्ही मॉडेल घेणार आहोत, विद्यार्थी फोकस सुधारणा आम्ही राज्यात करणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं.
दप्तराचे ओझे कमी विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले जात आहेत. त्याचा एक भाग म्हणून आता यापुढे पुस्तकांमध्ये सरावासाठी कोरी पाने जोडली जाणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत वेगळ्या वह्या घेऊन जाण्याची गरज भासणार नाही.
पुणे : बुधवारी संध्याकाळपासून विक्रम गोखले यांच्या निधनाच्या अफवा सोशल मीडियावर पसरत आहेत. त्यावर आता त्यांची पत्नी वृषाली गोखले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “बुधवारी दुपारी ते कोमात गेले आणि तेव्हापासून ते स्पर्शाला प्रतिसाद देत नाहीयेत. ते व्हेंटिलेटरवर आहेत. पुढे काय करायचं हे सकाळी डॉक्टर ठरवतील. त्यांची प्रकृती सुधारतेय का, ते प्रतिसाद देत आहेत का, यावरून डॉक्टर पुढील निर्णय घेतील”, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
विक्रम गोखले हे 5 नोव्हेंबरपासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल असल्याचंही त्यांनी सांगितलं. “त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. मात्र आता पुन्हा ती बिघडली. हृदयाशी आणि किडनीशी संबंधित समस्या त्यांना जाणवत आहेत. त्यांचे अनेक अवयव निकामी झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे”, असं वृषाली गोखले यांनी सांगितलं. विक्रम गोखले यांची एक मुलगी परदेशी राहते. ती सॅन फ्रान्सिस्कोहून पुण्याला परतली आहे. तर दुसरी मुलगीही सध्या पुण्यातच आहे.
MAHAGENCO RECRUITMENT NEWS : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी ने असिस्टंट इंजिनीयर व ज्युनियर इंजिनीयर या पदांसाठी ५९० जागांची भरती प्रक्रिया सुरु केलीय. या परीक्षेसाठी सर्व उमेदवारांना महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य करणं आवश्यक असतानाही खुल्या प्रवर्गासाठी अधिवास प्रमाणपत्राची अट टाकण्यात आलेली नाही. परिणामी खुल्या प्रवर्गाच्या २३९ जागांसाठी सर्व देशभरातून अर्ज येतील आणि राज्याच्या युवकांना मर्यादित संधी मिळेल. एकीकडं राज्यातील उद्योग बाहेर जात असल्याने युवांना आधीच नोकऱ्या नाहीत, अशा स्थितीत राज्याच्या हक्काच्या भरती प्रक्रियेत तरी किमान राज्यातील युवांना न्याय मिळायला हवा.
त्यामुळं शासनाने या परीक्षेसाठी अधिवास प्रमाणपत्र सर्वांना अनिवार्य करण्याबाबत महाजेनकोस निर्देश द्यावेत, अशी विनंती राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांनी शासनाकडे केली आहे.
Grampanchayat Election News : राज्यातील विविध जिल्ह्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 18 डिसेंबर 2022 रोजी मतदान होणार आहे. ह्या निवडणुकीसाठी आपण जर नवीन नाव नोंदणी केली असेल तर ते चेक करण्यासाठी तसेच मतदान केंद्रात बदल झाला आहे कि नाही हे चेक करता येण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य तर्फे ऑनलाईन सुविधा उपल्बध करून देण्यात आली आहे.
इथे तुम्हाला दोन पर्याय भेटतील. एक पर्याय म्हणजे पहचान-पत्र क्र. द्वारा खोज, ह्या पर्यायात आपल्याकडे मतदार ओळखपत्र नंबर असेल तर तुम्हाला इथे शोधता येईल. जर तुमच्याकडे हा नंबर नसेल तर आपले नाव , वय आणि इतर माहितीद्वारे आपली माहिती शोधू शकता. जेवढी जास्त माहिती तुम्ही इथे भराल तेवढे तुम्हाला तुमची माहिती शोधणे सोपे जाईल.
आपल्या नावाच्या समोरील VIEW DETAILS बटण वर क्लिक करून आपली डिटेल्स पहा
मुंबई :राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्या दरात वाढ होणार आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी ह्या वाढीस मान्यता दिली आहे. महामंडळाचे सुमारे ९२ हजार अधिकारी-कर्मचार्यांना याचा फायदा होणार आहे.
ह्या आधी मिळणारा २८ टक्के महागाई भत्ता आता ३४ टक्के दराने मिळणार आहे.सुमारे १५ कोटी रुपयांची मासिक वाढ वेतनखर्चात होणार आहे. एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या सन २०१६-१७ ते २०२१-२२ या सहा वर्षांसाठीच्या वेतनसुधारणेच्या प्रस्तावास देखील यावेळी मंजुरी देण्यात आली.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संचालक मंडळाची ३०२ वी बैठक सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन- नैनोटिया, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चेन्ने, कामगार आयुक्त सुरेश जाधव, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांचेसह एसटी महामंडळ, परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी बैठकीस उपस्थित होते.
मुंबई :राज्यात विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्याच्या मोठा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचा लाभ राज्यातील 60 हजार शिक्षकांना होणार आहे अशी माहिती शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.
राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी या संदर्भात सांगितल्याप्रमाणे, 20 ते 40 टक्के आणि 40 ते 60 टक्के अनुदानासाठी पात्र ठरलेल्या शिक्षकांना या अनुदानाचा लाभ मिळणार आहे. दरम्यान याचा शासन निर्णय लवकरच निघणार असल्याचेही दीपक केसरकर यांनी संगीतले.
अशातच पात्रता पूर्ण न करु शकलेल्या संस्थांना यातून वगळण्यात येईल. त्या शाळांव्यतिरिक्त सर्वच्या सर्व शाळांना या अनुदानाचा लाभ मिळणार आहे. जवळपास 1 हजार 160 कोटी रुपयांचे हे पॅकेज शिक्षकांसाठी जाहीर करत असल्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. दरम्यान ज्यांनी या अनुदासाठी मागणी केली नव्हती त्यांनाही या अनुदानाचा लाभ मिळणार आहे.
Agriculture Related News:शेतकर्यांना दिवसा 12 तास वीज मिळावी, या हेतूने प्रारंभ करण्यात आलेल्या “मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजने” साठी लागणार्या जागेसाठी शेतकर्यांना मोबदला देण्यात येणार आहे.प्रतिहेक्टर प्रतिवर्ष ₹75,000 इतके हे भाडे असेल. यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
सदर योजना दिनांक १४ जून,२०१७ च्या शासन निर्णयान्वे हि योजना संपूर्ण राज्यात सुरु करण्यात आली आहे. ह्या योजनेसाठी लागणारी खाजगी जमीन महावितरण/महानिर्मिती कंपनीला तसेच महाऊर्जा संस्थेस भाडेपडट्ट्याने उपलब्ध करून देताना जागेची त्या वर्षीच्या नोंदणी व मुद्रांक विभागाने निर्धारित केलेल्या किमतीच्या शासन परिपत्रकात नमूद केलेल्या ६ टक्के दरानुसार परागिणीत केलेला दर किंवा प्रतिवर्ष रु. ७५०००/- प्रति हेक्टर यापैकी जी जास्त रक्कम असेल त्या दराने वार्षिक भाडेपट्टीचा दर निश्चित करण्यात येणार आहे. तसेच प्रथमवर्षी आलेल्या पायाभूत वार्षिक भाडेपट्टी दरावर (base rate ) प्रत्येक वर्षी ३ टक्के सरळ पद्धतीने वाढ करण्यात येणार आहे.
ह्या योजनेसाठी लागणाऱ्या जागेची निवड महावितरण/महानिर्मिती/महाऊर्जा करेल आणि त्यांचा समावेश निविदा प्रक्रियेत करण्यात येईल. या निविदांमध्ये यशस्वी झालेल्या जमीनमालकांसोबत महावितरण/महानिर्मिती/महाऊर्जा एक करार करेल. त्या करारानुसार हा प्रकल्प कार्यान्वित होईपर्यंत आणि कार्यान्वित झाल्यानंतर करारात ठरलेल्या रक्कमेचे भाडे जमीनमालकाला भेटणार आहे.
ह्या योजनेंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातील ३०% कृषी वाहिन्या ह्या सौर उर्जेवर आणण्याबाबतचे निश्चित केलेले उद्धिष्ट साध्य करण्यासाठी लागणारी जमीन उपलब्ध करण्यासाठी सहाय्य करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात समिती गठीत करण्यात आलेली आहे.
ज्या जमीनमालकांना आपली जमीन ह्या योजनेसाठी भाडेपट्टीवर द्यायची आहे त्यांनी खालील लिंकवर क्लिक करून आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करता येईल
मुंबई :आपल्या मोबाईलवर कोणतेही ॲप डाउनलोड करताना सावधगिरी बाळगा असे आवाहन मुंबई पोलिसांनी ट्विटरच्या माध्यमातून केले आहे. खासकरून विश्वासार्ह स्रोत नसणारी ॲप डाउनलोड करू नयेत असे त्यांनी सांगितले आहे.
हि ॲप डाउनलोड केल्यास आपल्या मोबाईल मधील महत्वाच्या माहितीचा वापर केला जाऊन आपली फसवणूक होऊ शकते. त्याचबरोबर आपल्या मोबाईल मधील फोटो एडिट करून त्याद्वारे ब्लॅकमेल केले जाऊ शकते.
‘इन्स्टंट लोन ॲप’ हे ऍप्लिकेशन डाऊनलोड केल्यास आपल्या फोनमधील वैयक्तिक माहितीचा ताबा इतर कोणाला मिळू शकतो, त्यामुळे हे ऍप्लिकेशन डाउनलोड करू नये असे सांगण्यात आलेले आहे.
त्याचबरोबर इतर ॲप डाऊनलोड करताना स्त्रोताची विश्वासार्हता तपासा आवाहन करण्यात आलेले आहे.
‘इन्स्टंट लोन ॲप’ डाऊनलोड केल्यास आपल्या फोनमधील वैयक्तिक माहितीचा ताबा इतर कोणाला मिळू शकतो.