नवी दिल्ली :मुंबई छत्रपती टर्मिनस स्टेशन आता नव्या स्वरूपात दिसणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने ह्या स्टेशनच्या दुरुस्ती आणि पुनर्बांधणीचा प्रस्ताव मंजूर केला गेला आहे. स्टेशन आणि आजूबाजूचा परिसरात आता पर्यटनाच्या दृष्टीने बांधकाम केले जाईल आणि पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण बनवण्यात येणार आहे.
एकूण १०,००० करोड मूल्याचे ३ प्रमुख स्टेशनचे पुनर्निर्माण आणि सुशोभीकरणाचा प्रस्ताव आज केंद्रीय मंत्री मंडळाने स्वीकृत केलेला आहे. त्यामध्ये मुंबई, अहमदाबाद आणि दिल्लीतील ३ प्रमुख स्टेशनची नावे आहेत. तसेच हि ३ स्टेशन आणि देशातील इतर १९० रेल्वे स्टेशनच्या पुर्नबांधणीला एकूण ६० हजार करोड रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत.
नवी दिली :शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाच्या सुनावणीवरची स्थगिती सुप्रीम कोर्टाने हटवली आहे. आजच्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला खरी शिवसेना कुणाची, याबाबतची कार्यवाही सुरू करायला परवानगी दिली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून निवडणूक आयोगाला पक्षचिन्हाबाबतचा निर्णय घेण्यापासून रोखावं, अशी मागणी करण्यात आलेली होती. मात्र कोर्टाने ही मागणी मान्य न केल्यान ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे
आता शिवसेना नेमकी कुणाची? शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह कोणाला मिळणार? याबाबतची सुनावणी निवडणूक आयोगात सुरू होणार आहे.या सुनावणीमध्ये शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.
निवडणूक आयोग पुढे काय करणार?
निवडणूक आयोग बहुमताच्या आधारावर निर्णय देणार आहे. शिवसेनेचे लोकप्रतिनिधी तसंच शिवसेना पक्षाचे पदाधिकारी कोणाच्या बाजूने आहेत, याची सगळ्यात आधी पडताळणी करेल. शिवसेनेचे लोकप्रतिनिधी म्हणजेच आमदार आणि खासदार हे सध्या तरी एकनाथ शिंदे यांच्याकडे बहुसंख्येने आहेत, पण पदाधिकारी कोणाच्या बाजूने आहेत हे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंना निवडणूक आयोगासमोर सिद्ध करावं लागणार आहे. यासाठी दोन्ही बाजूंकडून निवडणूक आयोगाला मोठ्या प्रमाणावर प्रतिज्ञापत्रही देण्यात येत आहेत. या सर्व कागदपत्रांची छाननी झाल्यानंतर निवडणूक आयोग शिवसेनेचे आमदार-खासदार तसंच पदाधिकाऱ्यांना सुनावणीसाठी प्रत्यक्ष बोलावण्याचीही शक्यता आहे. यानंतर ज्यांच्याकडे सर्वाधिक नेते, उपनेते, आमदार, खासदार, सचिव, जिल्हा संपर्क प्रमुख तसंच विभाग प्रमुख असतील, त्यांनाच खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली जाऊ शकते. या गोष्टींच्या सुनावणीची प्रक्रिया फारच किचकट असल्यामुळे निवडणूक आयोगाचा निर्णय येईपर्यंत शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलंही जाऊ शकतं. शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आलं तर मात्र ठाकरे गट आणि शिंदे गट यांना निवडणुका वेगळ्या चिन्हावर लढवाव्या लागू शकतात.
सध्याची परिस्थिती पाहता लोकप्रतिनिधींचे संख्याबळ शिंदे गटाच्या बाजूने जास्त असल्याचे दिसत आहे. पण गटाच्या पदाधिकाऱ्यांचे संख्याबळ जास्त दाखवणे हे ही महत्त्वाचे आहे.
मुंबई: अधून मधून कंपनी मध्ये जात जा, नाहीतर तुम्ही असाल वर्क फ्रॉम होम मध्ये आणि कंपनी गेली असेल दुसर्या राज्यामध्ये. अशा आशयाचा एक जोक अलीकडे सोशल नेटवर्किंग मेडिया वर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत होता. वेदांता फॉक्सकॉन कंपनी गुजरात मध्ये गेल्याने लोक ह्या प्रकारचे जोक्स करताना दिसत होते. पण ही गोष्ट आता गंभीर होत चालली आहे. कारण अजून एक कंपनी महाराष्ट्रातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत आहे.
‘फोनपे’ ही ऑनलाइन व्यवहारांसंदर्भातील कंपनीही आपले मुख्य कार्यालय मुंबई वरून चेन्नई येथे नेण्याच्या तयारीत आहे. त्या संदर्भात त्यांनी एक नोटिस एका वृत्तपत्रात प्रसिद्ध केली आहे.
कंपनीच्या नोटीसमध्ये काय आहे? ‘फोनपे’चे संचालक आदर्श नहाटा यांनी कंपनीच्या वतीने जारी केलेल्या या नोटीसमध्ये, “कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय महाराष्ट्र राज्यातून कर्नाटक राहण्यात बदलण्यासाठी कंपनी कायदा, २०१२ च्या कलम १३ अंतर्गत केंद्र सरकारकडे अर्ज करण्यात आला आहे. ज्यासाठी कंपनी मेमोरँडम ऑफ असोसिएशनमध्ये फेरफार करण्यासंदर्भात १६ ऑगस्ट २०२२ रोजी घेण्यात आलेल्या आमसभेत विशेष ठराव मंजूर करण्यात आला आहे,” अशी माहिती दिली आहे.तसेच, “कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाच्या प्रस्ताविक बदलामुळे कोणत्याही व्यक्तीचे हित प्रभावित होण्याची शक्यता असेल तर ती व्यक्ती एमसीए-२१ वर गुंतवणूकदार तक्रार फॉर्म दाखल करु शकते. विरोधाच्या कारणासाठीचे पत्र प्रादेशिक संचालक, पश्चिम विभागाकडे एव्हरेस्ट पाचवा मजला १०० मरीन ड्राइव्ह, मुंबई येथील कार्यालयावर पाठवावे. ही सूचना प्रकाशित झाल्याच्या १४ दिवसांच्या आत अर्जदार कंपनीला त्याचा प्रतिसहीत नोंदणीकृत कार्यालयाच्या पत्त्यावर पाठवू शकते,” असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.
पुणे :आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक जयंती निमित्त मंगळवार दिनांक २० सप्टेंबर २०२२ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, डॉ बाबासाहेब आंबेडकर चाैक, मंगळवार पेठ,पुणे, महाराष्ट्र येथे महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई आयोजित “आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जीवन कार्यावर सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात आले. या कार्यक्रमात शाहीर श्रीकांत रेणके आणि सहकारी यांनी सांस्कृतिक कार्यक्रम केला,गणेशवंदना,तालवाद्य वादन,उमाजी नाईक यांच्यावर आधारीत गीत आद्यक्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या जिवनपटावर आधारीत अंगावर शहारे आणणारा पोवाडा सादर झाला कार्यक्रमाची सांगता महाराष्ट्र गीताने झाली,ढोलकी – राहूल कुलकर्णी सिंथेसायझर- दिपक पवार भरत शर्मा,राहूल पवार यांनी साथसंगत केली. या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री ज्ञानेश्वर शिंदे यांच्या कडून झाले.
आलेले पाहुणे श्री.संदीप ओव्हाळअॅड. राजेश म्हामुणकर रोहिदास दादा मदने,गंगाराम जाधव,सुभाष जाधव,शेखर गोरगले ,सुरेश चव्हाण,शांताराम गोपने,प्रशांत गोपने,महेश म्हसुडगे,आरती ताई साठे, हिरा जी बुवा , संदीप शेळके, भूषण कांबळे, राजाराम निकम, सामाजिक कार्यकर्ते व मान्यवरां कडून दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम करून त्यांना पुषपगुच्छ व श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.विकास सोनवणे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमासाठी संत असंख्य रसिक गणांनी कार्यक्रमाचा आनंद घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली.कार्यक्रमाचे संयोजन आरयन देसाई यांनी केले.
मुंबई :महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी आज दहावी व बारावीच्या परीक्षेसंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. फेब्रुवारी-मार्च२०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी -बारावीच्या परीक्षांचे त्यांनी जाहीर केले आहे. त्यानुसार बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीला, तर दहावीची परीक्षा २ मार्चला सुरू होणार आहे.
मंडळाने जाहीर केलेले सविस्तर संभाव्य वेळापत्रक ‘www.mahahsscboard.in’ या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे वेळा पत्रक अंतिम नसेल त्यामध्ये काही प्रमाणात बदल केले जातील. विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांना परीक्षे संदर्भात कल्पना दिली तर ते त्या प्रमाणे नियोजन करू शकतात आणि ताण कमी करू शकतात ह्या हेतूने हे प्राथमिक स्वरूपाचे वेळापत्रक प्रसिद्ध केले गेले आहे असे मंडळाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
मुंबई – आता जवळचे भाडे नाकारणाऱ्या टॅक्सी चालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. मुंबई च्या ताडदेवच्या प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) विभागाने आपली विशेष टीम सक्रिय केली आहे. ही विशेष टीम ह्या झोनच्या महत्त्वाच्या भागांत गस्त घालणार आहे. तसेच एक नियंत्रण विभाग बनविण्यात आला आहे. ह्या विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना विशेष ट्रेनिंग देण्यात आली आहे. तक्रार करण्यासाठी एक हॉटलाइन नंबर जारी करण्यात आला आहे, तसेच whatsapp चाटद्वारे आणि ईमेलद्वारे तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
कशी कराल तक्रार?
एखादा टॅक्सी ड्रायवर जवळचे भाडे नाकारत असेल तर सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत
9076201010 ह्या नंबर वर संपर्क साधून आपली तक्रार नोंदवू शकता. ह्या वेळा व्यतिरिक्त जर तक्रार करायची असेल तर whatsapp चाट, टेक्स्ट मेसेज द्वारे किंवा ईमेल द्वारे आपली तक्रार नोंदविता येईल. त्यासाठी [email protected] हा ईमेल आयडी देण्यात आला आहे. अशा तक्रारी इंस्पेक्टर दर्जाच्या अधिकाऱ्याकडून हाताळल्या जातील.
ताडदेवच्या प्रादेशिक परिवहन अधिकारी या उपक्रमामुळे नक्किच टॅक्सी चालकांच्या मनमानीवर आळा बसेल. जवळचे भाडे नाकारण्याचे प्रकार मुंबईत सर्रास घडत आहेत. अगदी अर्जंट जायचे आहे अशी गयावया करूनही टॅक्सी चालक तयार होत नव्हते.
या प्रकारचा उपक्रम मुंबईच्या इतर विभागात राबविण्यात यावा अशी अपेक्षा आहे.
फॅाक्सकॅान-वेदांताच्या सेमिकंडकटर बनवण्याचा प्रकल्पाच्या जागा निवडीसाठी कंपनीने बनवलेला अहवाल समोर आला आहे. ह्या अहवालात गुजरात मधील ढोलेरा आणि पुण्यातील तळेगाव ह्या दोन्ही जागांची तुलना
गुजरातमधील ढोलेरापेक्षा तळेगाव हे योग्य ठिकाण होतं असे या अहवालानुसार दिसत आहे. ह्या अहवालात नमूद केलेल्या 6 मुद्द्यांपैकी 4 मुद्दे गुजरात राज्याला ह्या प्रकल्पासाठी प्रतिकूल दाखवतात तर तळेगाव साठी सर्व मुद्दे अनुकूल दाखवत आहेत.
ह्या प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्यातील तत्कालीन सरकारने 39 हजार कोटी रुपयांची सुट दिली होती तर गुजरात सरकारने 29 हजार कोटी रुपयांची सुट दिली आहे.
मविआ सरकारच्या सूत्रांनुसार ह्या प्रकल्पाला खालील सुट दिली जाणार होती.
तळेगाव येथील सुमारे 400 एकर जागा सरकारतर्फे मोफत दिली जाणार होती.
700 एकर जागा 75% दराने दिली जाणार होती.
1200 मेगावॅट चा अखंडित वीज पुरवठा 20 वर्षासाठी 3 रुपये प्रति युनिट दराने देण्यात येणार होता.
विजेच्या दरात दहा वर्षासाठी 7.5% सुट देण्यात येणार होती.
5% स्टॅम्प डय़ुटी मध्ये सवलत दिली जाणार होती.
पाणीपट्टी मध्ये 337 कोटी रुपयांची सुट दिली जाणार होती.
घनकचरा प्रक्रियेसाठी 812 कोटी रुपयांची सुट दिली जाणार होती
ही सर्व परिस्थिती पाहता कंपनीने हा प्रकल्प गुजरात का नेला ह्याबाबत एक मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पुणे : ‘वेदांता’ ग्रुपचा सेमीकंडक्टर व डिस्पले फॅब्रीकेशनचा प्रकल्प गुजरातमध्ये नेण्यासाठी करण्यात येणार्या हालचालींवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी खालील शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण, दोन लाख कोटींची गुंतवणूक आणि दीड लाख जणांना रोजगार उपलब्ध करुन देणारा ‘वेदांता’ ग्रुपचा सेमीकंडक्टर व डिस्पले फॅब्रीकेशनचा प्रकल्प गुजरातमध्ये नेण्याच्या हालचाली सुरु आहेत. हा निर्णय अत्यंत दुर्दैवी असून राज्याच्या औद्योगिक प्रगतीला बाधा आणणारा आहे
महाराष्ट्राच्या औद्योगिक धोरणावर याचा दीर्घकालीन परिणाम होणार असून महाराष्ट्राच्या हितासाठी राज्य सरकारनं यात तातडीनं हस्तक्षेप करत महाराष्ट्राबाहेर जाणारी गुंतवणूक थांबवत प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी मुख्यमंत्री यांना भेटून केली.
वेदांत ग्रुपच्या वतीनं या प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्यालाच प्रथम पसंती देण्यात आली होती. तळेगांव येथील कंपनीच्या उभारणीसाठी आवश्यक असणारे इकोसिस्टिम, ऑटोमोबाईल व इलेक्ट्रीक हब, रस्ते, रेल्वे व एअर कनेक्टीव्हिटी ‘जेएनपीटी’ बंदराशी असणारी कनेक्टीव्हिटी, उपलब्ध असणारे तांत्रिक मनुष्यबळ व महाराष्ट्र राज्याचे गुंतवणूक धोरण हे पोषक असल्यानं वेदांत ग्रुपनं तळेगांव येथील एक हजार एकर जागेची निवड केली होती. मात्र राज्यात सत्तांतर होताच महाराष्ट्राच्या हिताचा असणारा हा प्रकल्प राजकीय दबावापोटी गुजरातमध्ये नेण्याचा घाट घातला जात आहे.महाराष्ट्राची गुंतवणूक गुजरातकडे नेण्याचा प्रयत्न असून महाराष्ट्राला आर्थिक मागास करण्याचा प्रयत्न आहे.यामुळे राज्याचे ‘जीएसटी’चे सुध्दा मोठे नुकसान होईल.
हा प्रकल्प गुजरातमधील धोलेरा येथे प्रस्तावित केला असून महाराष्ट्रातील तळेगांवच्या तुलनेत ही जागा प्रकल्पाच्या उभारणीसाठी अगदीच सामान्य आहे. गुजरातचे मुख्यमंत्री व वेदांतचे प्रमुख हे सामंजस्य करार (एमओयू) करणार आहेत, असं कळतंय. महाराष्ट्रासाठी हा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे.
गरबा दांडिया उत्सवास रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी द्यावी अशी विनंती मुंबई मागठाणे विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी केली आहे. त्यांनी त्या आशयाचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले आहे.
इतर राज्यात म्हणजे गुजरात, राजस्थान मध्ये दांडिया साठी रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी आहे. त्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात अशी परवानगी मिळावी असे त्यांचे म्हणणे आहे.
शिंदे आणि फडणवीस सरकार आल्यावर दहीहंडी आणि गणेशोत्सवांवर असलेले अनेक निर्बंध हटविल्यामुळे कोरोना मारामारीच्या दोन वर्षानंतर अतिशय उत्साहात हे सण साजरे केले गेले. त्यामुळे आताचे सरकार गरबा उत्सवास रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी देवून भाविकांचा उत्साह वाढवतील अशी त्यांनी आशा केली आहे.
अंतोदय / प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना जाहीर आवाहन करण्यात आले आहे.
ज्या लाभार्थ्यांचे उत्त्पन्न जास्त आहे त्यांनी ह्या योजनेतून बाहेर पडा असे आवाहनवजा इशारा देण्यात आला आहे, त्यासाठी ३१ ऑगस्ट २०२२ हि अंतिम तारीख दिली आहे. ह्या लाभार्थ्यांनी दिनांक ३१/०८/२०२२ पूर्वी ह्या योजनेतून बाहेर पडा GIVE IT UP फॉर्म स्वइच्छेने भरून देणे गरजेचे आहे. हा अर्ज भरून तो तहसीलदार, पुरवठा निरक्षण अधिकारी किंवा पुरवठा निरीक्षक ह्यांच्याकडे जमा करायचा आहे.
सदरचा फॉर्म दिनांक ३१.०८.२०२२ भरून देणार नाहीत अशा लाभार्थी बाबत दिनांक ०१.०९.२०२२ पासून तलाठी व मंडल अधिकारी शहनिशा करून अपात्र लाभार्थीवर आजपर्यंत उचल केलेल्या धान्याची बाजारभावाप्रमाणे रक्कम वसूल करून फौजदारी स्वरूपाचा गुन्हाही दाखल होऊ शकतो असे जाहीर करण्यात आले आहे.
खालील लाभार्थ्यांना हा अर्ज भरणे गजरेचे आहे असे पत्रकात प्रसिद्ध करण्यात आले आहे.
१.शासकीय नोकर, निमशासकीय नोकर,
२. व्यावसायिक, किराणादुकानदार,
३. पेन्शन धारक,
४. ट्रॅक्टर असणारे बागायतदार शेतकरी,
५. मोठ मोठ्या कंपनीमध्ये काम करणारे,
६. साखर कारखान्यात Permenant असणारे कामगार.
७. आयकर भरणारे
८. पक्के (स्लॅपचे) घर असणारे .
९. चार चाकी वाहन (घरगुती किंवा व्यायसायिक) धारक
१०. घरात एअर कंडिशनर (AC ) असणारे
११. कुटुंबातील सर्व सदस्यांचे मिळून ५९,००० हजारापेक्षा जास्त असल्यास.