कणकवली: कोंडये येथील फांदीचा माळ येथे काजू बागेत सोमवारी सायंकाळच्या सुमारास बिबट्याचे दर्शन घडले. विशेष म्हणजे बिबट्या अगदी शांत स्थितीत होता. बिबट्या दिसल्याचे कळताच ग्रामस्थांनीही तेथे धाव घेतली. ग्रामस्थ अगदी काही फुटांवर असून देखील बिबट्या शांत होता. याचा फायदा घेत काही ग्रामस्थांनी स्टंटबाजी केली आणि व्हिडीयो बनवलेत. बिबट्याच्या काही फूट जवळ जाऊन फोटो सुद्धा काढले गेलेत. ही स्टंटबाजी जीवघेणी ठरली असती.
मात्र तो बिबट्या एवढा शांत का होता? याचे उत्तर अजूनही भेटले नाही. कदाचित तो जखमी असेल असा अंदाज बांधला जात आहे. जवळपास पंधरा मिनिटे बिबट्या तेथे होता. त्यानंतर तो जंगलच्या दिशेने निघून गेला. घटनेची माहिती समजताच वनविभागाचे वनक्षेत्रपाल अमित कटके आपल्या सहकाऱ्यांसह दाखल झाले. वनविभागाने परिसरात ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. दरम्यान, बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी कोंडये ग्रामपंचायतीतर्फे वनविभागाकडे करण्यात आली आहे
मुंबई: मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील दादर हे सर्वात मोठे आणि मध्यवर्ती स्थानक आहे. मात्र, मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील दादर स्थानकातील फलाट क्रमांकावरून प्रवाशांचा काहीसा गोंधळ उडतो. फलाटांचा हा गोंधळ पाहता मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातील सध्याचे फलाट क्रमांक बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ८ ते १४ पर्यंत फलाटांचे क्रमांक निश्चित करण्यात आले असून, उद्या शनिवारी ९ डिसेंबरपासून त्याची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. मात्र, या बदलांमुळेही सुरुवातीला प्रवाशांमध्ये काहीसा गोंधळ उडण्याची शक्यता आहे.
येत्या शनिवारपासून पश्चिम आणि मध्य रेल्वेवरील फलाटांना एका रांगेतील क्रमांक दिले जाणार आहेत. पश्चिम रेल्वेवरील फलाटांचे क्रमांक हे एक ते सातपर्यंतच राहतील. मात्र, मध्य रेल्वेवरील फलांटांना ८ पासून ते १४ पर्यंत क्रमांक दिले जातील.
सध्या मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातील एक क्रमांकाचा फलाट हा ९ डिसेंबरपासून आठ नंबर फलाट म्हणून ओळखला जाणार आहे. तर दोन क्रमांकाचा फलाट सध्या बंदच असून, तेथे रेल्वेचे काम सुरू आहे. तीन क्रमांकाचा फलाट हा नऊ क्रमांकाने, चार क्रमांकाचा फलाट दहा, पाच क्रमांकाचा फलाट हा ११ क्रमांकाचा फलाट, सध्याचा सहा क्रमांकाचा फलाट हा १२, सात क्रमांकाचा फलाट हा १३ आणि दादर टर्मिनसचा आठ क्रमांकाचा फलाट १४ क्रमांकाने ओळखला जाणार आहे. फलाट क्रमांकाच्या बदलामुळे केंद्रीयकृत रेल्वे सूचना प्रमाणालीमधील उद्घोषणा यंत्रणेतही बदल केले जाणार आहे. तर मध्य रेल्वेच्या पादचारी पुलांवर पूल आणि स्थानकात असलेल्या दिशादर्शक फलकांवरील क्रमांकातही बदल केले जाणार आहे. पश्चिम रेल्वेच्या फलाटांच्या क्रमांकात कोणतेही बदल केले जाणार नसल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.
फलाट क्रमांकाच्या बदलामुळे केंद्रीयकृत रेल्वे सूचना प्रमाणालीमधील उद्घोषणा यंत्रणेतही बदल केले जाणार आहे. तर मध्य रेल्वेच्या पादचारी पुलांवर पूल आणि स्थानकात असलेल्या दिशादर्शक फलकांवरील क्रमांकातही बदल केले जाणार आहे. पश्चिम रेल्वेच्या फलाटांच्या क्रमांकात कोणतेही बदल केले जाणार नसल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.
नोकरी :सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवरील लघुलेखक (ग्रेड-3), कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल या पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून त्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
⇒ पदाचे नाव : लघुलेखक (ग्रेड-3), कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल.
⇒ एकूण रिक्त पदे: 62 पदे.
⇒ नोकरी ठिकाण: सिंधुदुर्ग.
⇒ वेतन/ मानधन: रु. 15,000/- ते रु. 1,22,800/- पर्यंत.
⇒ वयोमर्यादा: १८ – ३८ वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट).
⇒ अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 4 डिसेंबर 2023.
सिंधुदुर्ग: मालवणात सध्या नौसेना दिनाची धामधूम सुरू आहे. नौदलाच्या कवायती पाहण्यासाठी तारकर्ली समुद्रकिनारी लोकांची मोठी गर्दी होते आहे. गुरूवारी रात्री ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यावर लेझर शोला प्रारंभ झाला. लेझर शोमुळे किल्ल्यासमोरील परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघाला होता.
रत्नागिरी : आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रसिद्ध बेव्हरेज कंपनी ‘कोका कोला’ चे उद्घाटन रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे- परशूराम औद्योगिक वसाहतीमध्ये पार पडलं. या प्रकल्पातील सर्व अडचणी दूर झाल्या असून चांगली सुरुवात कोकणच्या भूमीत होत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
हिंदुस्तान कोको कोला ब्रेव्हरेज कंपनीनं सुरुवातीला २५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहोत. विविध प्रकारची ६० उत्पादनं या कंपनीची देशभरात आहेत. या कंपनीनं हजारो कर्मचारी काम करतात. या कंपनीनं २०२३ मध्ये भारतात एकूण १२८४० कोटी रुपयांचा व्यवसाय केला. अशी एक मोठी कंपनी इथं उभी राहत आहे त्यामुळं लोकांना चांगला रोजगार उभा राहिलं. व्यवस्थापनानं स्थानिक लोकांना प्राधान्य कारखान्यात दिलं पाहिजे, असा आग्रह यावेळी मुख्यंमत्र्यांनी धरला.
फडणवीस मुख्यमंत्री असताना २०१५ अमेरिका दौऱ्यातच याबाबत बोलणी झाली होती. पण नंतर सरकार बदलल्यानंतर ते काम थांबलं. कोकणानं नेहमीच बाळासाहेबांवर प्रेम केलं आहे. त्यामुळं कोकणी माणला वापरुन घ्यायचं काम आमचं सरकार कधी करणार नाही. इथल्या भूमिपुत्रांना मोठी स्वप्न दाखवायची आणि एखादा चांगला प्रकल्प आला की त्याला विरोध करायचं हे आम्हाला कधी शिकवलं नाही. त्यामुळेच आता हा प्रकल्प इथं सुरु होत आहे.
प्रतिनिधी: रेल्वे सुरक्षा दलाच्या RPF ‘जिवन रक्षक अभियानांतर्गत’ रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी एप्रिल ते ऑक्टोबर या काळादरम्यान विविध विभागांमध्ये साहस आणि प्रसंगावधान दाखवून चुकीच्या पद्धतीने गाडी पडणाऱ्या ६६ प्रवाशांचे प्राण वाचविले आहेत.
यात मुंबई विभागातील १९, भुसावळ विभागातील १३, नागपूर विभागातील १४,पुणे विभागातील १५ तर सोलापूर विभागातील ५ प्रवाशांचा समावेश आहे.
रेल्वे मालमत्तेचे रक्षण करण्याच्या मुख्य कर्तव्याव्यतिरिक्त, “अमानत” या ऑपरेशन अंतर्गत आरपीएफने त्यांच्या कर्तव्याच्या पलीकडे जाऊन गरजू प्रवाशांना मदत केली आहे. त्यांचे हरवलेले किंवा मागे राहिलेले सामान, रोख, दागिने, मोबाईल फोन, लॅपटॉप, यासारख्या मौल्यवान वस्तू परत मिळवून दिल्या आहेत.
यंदा एप्रिल ते ऑक्टोबर २०२३ दरम्यान, ऑपरेशन ‘अमानत’ अंतर्गत, आरपीएफने ८५७ प्रवाशांचे सामान परत मिळवले आहे. त्याची किंमत २.७७ कोटी रुपये आहे. इतर विभागांवर परत मिळवलेल्या प्रवाशांच्या सामानाचे मूल्य आहे. भुसावळ विभाग १८२ प्रवाशांचे ५०.४५ लाख किमतीचे सामान नागपूर विभाग १६८ प्रवाशांचे ३६.९७ लाख किमतीचे सामान, पुणे विभाग ५८ प्रवाशांचे १३.९४ लाख किमतीचे सामान तर सोलापूर विभागात ७२ प्रवाशांचे १३.९९ लाख किमतीच्या सामानाचा सामावेश आहे.
मध्य रेल्वेचे आवाहन
रेल्वे संरक्षण दलाच्या जवानांना प्रवासी आणि रेल्वे मालमत्तेवरील गुन्हे, ट्रेनच्या वाहतुकीत अडथळा इत्यादी सुरक्षा आव्हानांचा सामना करावा लागतो. प्रवाशांनी त्यांना सहकार्य करावे तसेच प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून चढू किंवा उतरू नये असे आवाहन केले आहे.
कुडाळ: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात आंजिवडे येथे प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांचा साडेआठ हजार कोटी रुपये गुंतवणुकीच्या हायड्रो इलेक्ट्रिक वीजनिर्मिती प्रकल्प आणण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. या भागात काही प्रमाणात यंत्रसामग्री आणण्याचीही तयारी सुरू असल्याचे स्थानिकांनी सांगितले. मात्र, जिल्हा प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांकडून या संदर्भात कमालीची गुप्तता पाळली जात असल्याने येथील स्थानिक ग्रामस्थांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
आंजिवडे गावाचाच भाग असलेल्या वाशी येथे हा प्रकल्प होणार असून यासाठी १४० हेक्टर जमीन संपादित करणार असल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. पाटगाव (जि. कोल्हापूर) येथील धरणाचे पाणी खाली आंजिवडे येथे आणून यातून २१०० मेगावॅट क्षमतेची वीजनिर्मिती होणार आहे. १४० हेक्टर क्षेत्रांपैकी ७० हेक्टर क्षेत्रात जलसाठा केला जाणार आहे.येत्या पाच वर्षांत या प्रकल्पाचे काम पूर्ण होणार असून, त्यानंतर प्रत्यक्ष वीजनिर्मितीस सुरुवात होणार आहे. सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठीही या ठिकाणी प्रयत्न होणार असल्याचे समजते. त्यामुळे प्रकल्पाला कोणतीही आडकाठी आलेली नाही. अदानी समूहाने दिल्लीत आपली ताकद वापरून वनखात्याकडून ७०४ हेक्टर जमीनदेखील मिळवली असून, या प्रकल्पाला लागणारी १४० हेक्टर जमीन पूर्णतः संपादित करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे. महाराष्ट्राच्या एका अग्रगण्य वर्तमान पत्राने सुद्धा याबाबत बातमी प्रसिद्ध केली आहे. मात्र इतकी गोपनियता का पाळली जात आहे? याचे कोडे मात्र कायम आहे.
आंजिवडे येथून पाटगावमार्गे कोल्हापूरला जोडणाऱ्या घाटरस्त्याची अनेक वर्षे मागणी होत आहे. हा रस्ता झाल्यास कोल्हापूर-सिंधुदुर्ग अंतर कमी होणार आहे. फार कमी घाट फोडून हा मार्ग होऊ शकतो; मात्र वनजमिनीच्या प्रश्नामुळे हा घाट रस्ता लोकांची मागणी होऊनही प्रत्यक्षात आला नव्हता; मात्र अदानींच्या या नियोजित प्रकल्पासाठी शेकडो एकर वनजमीन संपादित करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे.
Konkan Railway News: केरळ राज्यातील प्रसिद्ध सबरीमाला उत्सवासाठी येणाऱ्या भाविकांची सोय व्हावी या हेतूने कोकण रेल्वे मार्गावर पनवेल ते नागरकोईल दरम्यान एक साप्ताहिक विशेष गाडी चालविण्याचा निर्णय कोकण रेल्वे आणि दक्षिण रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
Train No. 06075 Nagarcoil – Panvel Special (weekly) :
ही गाडी दिनांक २८/११/२०२३ ते १६/०१/२०२३ पर्यंत दर मंगळवारी नागरकोईल या स्थानकावरुन सकाळी ११:४० वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी रात्री २२:२० वाजता पनवेल या स्थानकावर पोहोचेल.
Train No. 06076 Panvel – Nagarcoil Special (weekly) :
ही गाडी दिनांक २९/११/२०२३ ते १७/०१/२०२३ पर्यंत दर बुधवारी पनवेल या स्थानकावरुन रात्री २३:५० वाजता सुटेल व ती तिसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता नागरकोईल या स्थानकावर पोहोचेल.
सावंतवाडी : मुंबई गोवा महामार्गाच्या झाराप पत्रादेवी बायपास वर एक अपघात झाला आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या झाराप पत्रादेवी बायपासवरून कणकवलीच्या दिशेने वेगात जाणारी कार ब्रिजवरून थेट महामार्गा वरून खाली कोसळली. या अपघातात रुपेश पांडुरंग तांबे ( ३५, रा. जिल्हा कारवार, कर्नाटक ) हा जखमी झाला असून त्याला उपचारार्थ येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कारवार येथून तो कणकवली येथे जात असताना मळगांव हायवे ब्रीज वर हा अपघात घडला.
पनवेल: पनवेल तालुक्यासह कामोठे शहरात आज सकाळी 9 वाजून 50 मिनिटांच्या आसपास सौम्य हादरे होऊन कंप झाल्याचं समोर आलं आहे. यावेळी अनेक इमारती हालल्याचं बोललं जात आहे. तसंच घरातील समानदेखील काहीसं हलताना दिसून आल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितलं आहे. भूकंपाच्या 2.9 रिश्टर स्केलच्या सौम्य धक्क्याने नवी मुंबई व पनवेल परिसर हादरुन गेला होता.
हादरे येण्यापूर्वी एक मोठा आवाज झाला आणि आणि काही सेकंदासाठी कंप झाल्याचं जाणवलं. मात्र हा धक्का सौम्य असल्याने कोणतंही नुकसान झालेलं नाही. अरबी समुद्रात भूकंपाचं केंद्र होतं. दुपारी वेधशाळेने माहिती दिल्यानंतर पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी हा भूकंपाचा सौम्य धक्का असल्याचे अधिकृतरीत्या जाहीर केले.
मुंबईच्या समुद्र किनारपट्टीतील भूगर्भात काही सेकंदांसाठी झालेल्या भूकंपाच्या धक्क्यामुळे नवी मुंबई व पनवेल परिसर हादरुन गेला होता. काही सेकंदासाठी भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिक घाबरले होते. काहींना हा नक्की भूकंप होता का अशी शंका आल्याने त्यांनी खिडक्याही उघडून पाहिल्या. दरम्यान प्रशासनालाही नेमकं काय झालं होतं याची माहिती मिळवण्यासाठी वेळ लागला. अखेर वेधशाळेने खात्रीशीर माहिती दिल्यानंतर पालिकेने अधिकृतपणे भूकंप आल्याचं जाहीर केलं.