Author Archives: Kokanai Digital

बारसु येथील प्रस्तावित रिफायनरी पाकिस्तानात जाणार?

मुंबई :बारसु येथील प्रस्तावित रिफायनरीबाबत एक महत्वाची  बातमी  आहे. बारसु येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प पाकिस्तानला जाणार असल्याचं वृत्त समोर आले आहे . कोकणातील नाणार येथे होणारा देशातील सर्वात मोठा रिफायनरी प्रकल्प आपल्याला मिळावा म्हणून पाकिस्तान प्रयत्न करत आहे. या प्रकल्पात सर्वात मोठी गुंतवणूक असलेल्या सौदी अराम्कोने या तेल कंपनीने आता पाकिस्तानातील ग्वादर शहराची निवड केली आहे. 10 अब्ज डॉलर्स गुंतवणुकीच्या सामंजस्य करारावर पाकिस्तान आणि सौदी अरेबियाने स्वाक्षरी केल्याची बातमीही प्रसिद्ध झाल्याचे समजते. याबाबत भारतातील सत्ताधारी पक्षाने अधिकृतरीत्या काहीही जाहीर केले नसले तरी भाजपचे आशिष शेलार यांनी याबाबत महत्वाचे वक्तव्य केले आहे.
आशिष शेलार यांचे आरोप
कोकणात प्रस्तावित असणारी रिफायनरी पाकिस्तानात चालली आहे यासाठी आशिष शेलार यांनी विरोधी पक्षाला या बाबत जबाबदार धरले आहे. गेली सहा वर्षे नाणार येथे रिफायनरीला विरोध करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी कोकण, महाराष्ट्र आणि देशाचे कोट्यवधीचे नुकसान केले आहे.  प्रकल्प भारताला मिळू नये म्हणून ज्या आंतरराष्ट्रीय शक्ती काम करतात त्या नाणार विरोधी आंदोलनात सहभागी तर नव्हत्या? देश विरोधी आंतरराष्ट्रीय शक्तींशी प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांची हातमिळवणी तर नव्हती? उद्धव ठाकरे नाणारला विरोध करुन सरळ सरळ पाकिस्तानला मदत केली?, असा आरोपच शेलार यांनी केला.

Loading

ब्रेकिंग | सावंतवाडी तालुक्याला भूकंपाचे धक्के | भूकंपाच्या अधिक माहितीसाठी ‘हे’ ॲप डाऊनलोड करा

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील सह्याद्री पट्ट्यात रात्री ८ वाजून ५१ मिनीटाच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. सह्याद्री पट्ट्यातील सांगेली सह माडखोल, कलंबिस्त, सरमळे, ओटवणे, कारिवडे, कोनशी, भालावल, ओवळीये, धवडकी, विलवडे आदी गावांमध्ये मोठा आवाज होऊन सौम्य धक्के जाणवल्याची माहिती स्थानिकांनी दिली. मोठा आवाज होऊन जमीन हादरली.
तहसीलदार श्रीधर पाटील  यांनी  हा भूकंपाचाच प्रकार असल्याचे  सांगितले. हा ३ रिस्टर स्केल चा हा भूकंप होता. मात्र, त्याचा केंद्रबिंदू नेमका कुठे आहे ते निश्चित झाले नसल्याची माहिती त्यांनी सांगितली. हा भूकंप असल्याचे अधिकृत रित्या प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेला आहे
भूकंपाच्या अधिक माहितीसाठी https://play.google.com/store/apps/details?id=gov.in.seismo.riseq  हे ॲप डाऊनलोड करावे.

Loading

दरडीचा धोका टाळण्यासाठी एक्सप्रेस कोकण रेल्वे मार्गे वळवली आणि ४५ प्रवाशांना न घेताच पुढे गेली; नेमका प्रकार काय ?

Express Missed to Passengers : तुमच्या कडे एका गाडीचे आरक्षित तिकीट आहे. गाडी पकडण्यासाठी अर्धा किंवा एक तास आधी तुम्ही स्थानकावर पोहोचता आणि तुम्हाला समजते की तुमची गाडी दीड तास अगोदर निघून गेली. किती मनस्ताप होईल तुमचा? असाच मनस्ताप गुरुवारी मनमाड स्थानकावर 45 प्रवाशांना सहन करावा लागला. कारण त्यांची गाडी त्यांना न घेता दीड तास अगोदरच स्थानकावरून रवाना झाली होती.

वास्को-निजामुद्दीन गोवा एक्स्प्रेस (12779) वास्को येथून हुबळी, मिरज, पुणे, दौंड, मनमाडमार्गे ती दिल्लीसाठी मार्गस्थ होते. दरम्यान या गाडीची मनमाड रेल्वे स्थानकात येण्याची वेळ सकाळी 10.30 ही आहे. मात्र, गुरुवारी ही रेल्वे मनमाड रेल्वे स्थानकात सकाळी 9.30 वाजता आली व पाच मिनीटे थांबून पूढे मार्गस्थ झाली.

रेल्वे गाडी नियोजीत वेळेच्या दीड तास आधीच मार्गस्थ झाल्याने या गाडीच्या प्रवासाचे आरक्षण करणारे 45 पेक्षा अधिक प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली. त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

झालेला प्रकार लक्षात येताच रेल्वे प्रशासनाने मुंबईहून हावडाला जाणाऱ्या गितांजली एक्सप्रेसला मनमाड रेल्वे स्थानकात विशेष थांबा देवून गोवा एक्सप्रेसचे आरक्षण केलेल्या 45 हून अधिक प्रवाशांना गीतांजली एक्सप्रेसमध्ये बसविण्यात आले. यावेळी गोवा एक्सप्रेसला जळगाव रेल्वे स्थानकात थांबविण्यात आले होते. गीतांजली एक्सप्रेसने आलेल्या प्रवाशांना गोवा एक्सप्रेसमध्ये बसविण्यात आले.

दरडी कोसळत असल्याने मार्गात बदल

सतत पडणाऱ्या पावसामुळे कर्नाटकातील हुबळी भागातीलल रेल्वे मार्गावर दरडी कोसळत आहेत. त्यामुळे प्रवासी रेल्वे गाड्या नियमीत मार्गाने न जाता रत्नागिरी-रोहा-पनवेल-कल्याणमार्गे वळविण्यात आल्या आहेत. मार्ग बदलण्यात आल्यामुळे गोवा एक्सप्रेस दीड तास आधीच मनमाड रेल्वे स्थानकात पोहचली.

“गोवा एक्सप्रेस नियोजित वेळेआधीच पोचल्याने प्रवाशांचा गोंधळ उडाला. मार्ग बदलण्यात आल्याने वास्को-निजामुद्दीन गोवा एक्स्प्रेस मनमाड रेल्वे स्थानकात दीड तास आधीच पोचली. ही रेल्वेच्या संबंधित विभागाची चूक असल्याचे लक्षात आले असून याबाबत चौकशी करून कारवाई करण्यात येईल” अशी माहिती शिवराज मानसपुरे एका वृत्तवाहिनीला दिली.

Loading

Mumbai Goa Highway | कंत्राटदाराचे निकृष्ट दर्जाचे काम; परशुराम घाटातील नवनिर्मित रस्त्याला भेगा

चिपळूण | मुंबई गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे समोर येत आहे. महामार्गावरील परशुराम घाटात नव्याने केलेल्या काँक्रीटीकरणाला जागोजागी तडे गेले असून, काही ठिकाणच्या भेगाही रूंदावल्या आहेत. विशेष म्हणजे हे काँक्रीट नुकतेच घातले होते. यावरून या महामार्गावरील काम किती निकृष्ट दर्जाचे होत आहे हे समोर आले आहे

परशूराम घाट वाहतुकीसाठी खूपच धोकादायक बनत चालला आहे. रस्त्यांना पडलेल्या भेगा वाढताना दिसत आहेत. घाटातील प्रत्येक टप्प्यावर दरडी कोसळल्या आहेत.एकेरी मार्गावर मोठ्या प्रमाणात डोंगराची माती आली असून, ती अद्याप हटवलेली नाही. त्यामुळे दुसऱ्या मार्गावरून वाहतूक सुरू असून, वाहतूकदारांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

 

 

Loading

४ महीन्यांत फक्त १४ किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण; जनआक्रोश समिती ‘धरणे’ आंदोलनाचे अस्त्र बाहेर काढणार…

मुंबई | गणेश नवघरे : मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण करण्याची फक्त आश्वासने भेटत असून त्याची पूर्तता केली जात नसल्याने जनआक्रोश समितीने सरकारला धारेवर धरण्यासाठी धरणे आंदोलन करण्याचे निश्चित केले आहे. दिनांक 2 ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानावर हे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

खरडलेल्या मुंबई गोवा महामार्गाची एक मार्गिका दिनांक 31 मे पर्यंत पूर्ण करणे अपेक्षित होते मात्र हे आश्वासन पाळले गेले नाही. दररोज किमान 1 किलोमीटर रस्त्याचे काम अपेक्षित असताना गेल्या 4 महिन्यात 14 किलोमीटर रस्त्याचे काम सुद्धा झालेले नाही आहे. गणेशचतुर्थी दीड महिन्यावर आली आहे पण रस्ता वाहतुकीसाठी योग्य झाला नाही आहे. अनेक ठिकाणी काम अपूर्ण आहे. त्यामुळे कोकणात गावी जाणार्‍या चाकरमान्यांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. प्रशासन याबाबत गंभीर दिसत नाही या कारणाने हे धरणे आंदोलन करण्यात येणार असून जास्तीत जास्त कोकणवासीयांनी यात प्रत्यक्ष हजर राहून आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन जनआक्रोश समिती तर्फे शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आलेले आहे.

Loading

कोईमतुर-हिसार एक्सप्रेसला महिनाभरासाठी अतिरिक्त डबे

Konkan Railway News  – प्रवाशांचा प्रतिसाद वाढल्यामुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या कोईमतुर-हिसार एक्सप्रेसला गाडीला तात्पुरत्या स्वरूपात डबे वाढवण्यात आले आहेत . 

कोकण रेल्वेकडून प्राप्त माहितीनुसार हरियाणा राज्यातील हिसार जंक्शन ते तामिळनाडूमधील कोयमतुर दरम्यान धावणाऱ्या 22475/ 22476 या गाडीला सप्टेंबर पहिल्या महिन्याभरासाठी  वातानुकलीत टू टायर श्रेणीचे दोन अतिरिक्त कोच जोडले जाणार आहेत. त्यामुळे या गाडीच्या डब्यांची संख्या 21 होणार आहे. 

या संदर्भात रेल्वे कडून प्राप्त माहितीनुसार हिसार जंक्शन ते कोईमतुर या मार्गावर धावताना  गाडी क्रमांक 22475 ला 02 ऑगस्ट  ते 31 ऑगस्ट 2023 तर कोईमतुर ते हिसार जंक्शन या मार्गावर धावताना गाडी क्रमांक 22476 ला 5 ऑगस्ट ते 02 सप्टेंबर 2023 या कालावधीत गाडीला वाढीव दोन डबे जोडले जातील

 

Loading

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार; अर्ज कसा कराल? जाणून घ्या स्पर्धंच्या नियम व अटी

मुंबई : यंदा गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून पुरस्कार देण्यात येणार आहेत. राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकांना अनुक्रमे पाच, अडीच आणि एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार असून या स्पर्धेत अधिकाधिक मंडळांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.
राज्यात सन २०२२ मधील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्यात आले होते. त्या अनुषंगाने सन २०२३ मध्ये राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून पारितोषिक देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठीचा निधी आणि या पुरस्कारसाठीचे निकष याबाबतीत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे, असेही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.
या पुरस्कारासाठीच्या २४ लाख ६० हजार रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या पुरस्कारांसाठी निवड होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी विविध निकष असतील. त्यांना गुण दिले जातील. या स्पर्धेत धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलिसांकडे परवानगी घेतलेल्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येईल, असे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.
पुरस्कार निवडीसाठी १० निकष
सहभागी होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची पुरस्कारासाठी निवड दहा निकषांच्या आधारे करण्यात येईल. १० निकषांसाठी एकूण १५० गुणांक आहेत. पर्यावरणपूरक मूर्ती, पर्यावरणपूकर सजावट, ध्वनीप्रदुषणविरहीत वातावरण, समाजप्रबोधनात्मक सजावट/देखावा, स्वातंत्र्याच्या चळवळीसंदर्भात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त सजावट,देखावा, मंडळामार्फत करण्यात येणारे सामाजिक कार्य, शैक्षणिक, आरोग्य आदीसंबंधी कार्य, पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धांचे आयोजन, पारंपरिक, देशी खेळांच्या स्पर्धा, गणेश भक्तांना पुरविण्यात येणाऱ्या प्राथमिक सुविधा आदी निकषानुसार गुण देण्यात येणार आहेत.संबधित अर्जाचा नमुना पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या [email protected] या ईमेलवर ५ सप्टेंबरपर्यंत अर्ज ऑनलाईन सादर करणे अपेक्षित आहे. ८ सप्टेंबरपूर्वी अकादमीमार्फत जिल्हानिहाय अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयास उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
जिल्हास्तरीय समिती स्थापन होणार
जिल्हास्तरीय विजेत्यांची निवड करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात येणार असून उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी अध्यक्ष, जिल्हा नियोजन अधिकारी सदस्य सचिव तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, शासकीय कला महाविद्यालयातील कला प्राध्यापक, जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्ह्यातील पोलीस अधिकारी हे सदस्य असतील.
प्रत्येक जिल्ह्यातून ३ गणेशोत्सव मंडळाची निवड व शिफारस समितीमार्फत राज्य शासनाकडे करण्यात येईल. राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची निवड करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय पहिल्या क्रमांकास ५ लाख रुपये, द्वितीय क्रमांकास २ लाख ५० हजार रुपये आणि तृतीय क्रमांकास १ लाख रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झालेल्या तीन मंडळांशिवाय अन्य गणेशोत्सव मंडळांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येईल.

Loading

SSC बोर्डाचा शुक्रवारी (ता.२८) होणारा दहावीचा पेपर पुढे ढकलण्यात आला

मुंबई : दहावी पुरवणी परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे शुक्रवारी (ता.२८) होणारा दहावीचा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे.गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच काही जिल्ह्यांमध्ये येत्या २४ तासांत मुसळणार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
त्या पार्श्वभूमीवर दहावीचा शुक्रवारी होणारा सामाजिक शास्त्रे पेपर-एक, इतिहास व राज्यशास्त्र हा पेपर पुढे ढकलला आहे. आता हा पेपर आता ३ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा ते दुपारी एक या वेळेत होईल, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे.

Loading

रत्नागिरी | उद्या दिनांक 28 जुलै रोजी अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व प्राथमिक 1 ली ते 7 वी पर्यंत विद्यालयांना सुट्टी जाहीर

रत्नागिरी:हवामान विभागाने उद्या दिनांक 28 जुलै रोजी जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये, यासाठी शाळा (अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व प्राथमिक 1 ली ते 7 वी पर्यंत) विद्यालयांना उद्या शुक्रवार दि. 28 जुलै रोजी सुट्टी जाहीर केल्याचा आदेश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी आज दिला आहे.

हवामान खात्याने जिल्ह्यात उद्या शुक्रवार दिनांक 28 जुलै रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. जिल्ह्यात अनेक भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये यासाठी उद्या 28 जुलै रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

 

Loading

ब्रेकिंग | दरड कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्ग ठप्प

रत्नागिरी : मुंबई गोवा महामार्गा बाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. मुंबई गोवा महामार्गाची वाहतुक ठप्प झाली आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील निवळी येथे मोठी दरड कोसळल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा कोणी जखमी झालेले नाही.

याबाबत अधिक माहिती अशी की, निवळी येथे दरड कोसळण्याची घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास घडली आहे. ही दरड हटवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, दरड कोसळल्याने हा मार्ग तूर्तास वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून जिल्ह्यातील चार नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. तर खेड येथील जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आज पावसाचा रेड अलर्ट असून प्रशासनाकडून  शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search