Author Archives: Kokanai Digital

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करण्यासाठी हालचाली सुरु; तीन टप्प्यांत होणार दुहेरीकरणाचे काम

   Follow us on        

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गाच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या दुहेरीकरणाच्या कामाला आता गती मिळत असून, भविष्यात या मार्गावर धावणाऱ्या रेल्वेगाड्यांची संख्या दुप्पट होणार आहे. नैसर्गिक अडचणींवर मात करत कोकण रेल्वेने टप्प्याटप्प्याने दुहेरीकरणाचा निर्णय घेतला आहे.

रेल्वे प्रशासनाने टप्प्याटप्प्याने दुहेरीकरण करण्याचा मार्ग स्वीकारला आहे. सपाट मार्गांवर दर किलोमीटर १५ ते २० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे, तर बोगद्यांच्या भागात हा खर्च ८० ते १०० कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकतो. यापूर्वी रोहा ते वीर दरम्यानच्या दुहेरीकरणासाठी ५३० कोटी रुपये खर्च झाले होते.

यापुढील टप्पे कोणते?

कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार खालील तीन टप्प्यांत कोकण रेल्वे मार्गाचे दुपारदरीकरण करण्यात येणार आहे.
१)खेड–रत्नागिरी,
२) कणकवली–सावंतवाडी
३) मडगाव–ठोकुर

या तीन प्रमुख टप्प्यांमध्ये दुहेरीकरणाची योजना आहे. या टप्प्यांचा सविस्तर अहवाल लवकरच रेल्वे मंडळाकडे सादर करण्यात येणार आहे. या योजनेला मंजुरी मिळाल्यानंतर राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात येईल आणि निधी मंजूर होताच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.

दुहेरीकरणासोबतच कोकण रेल्वे मार्गावरील ११ स्थानकांचा विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुमारे ९९ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना अधिक सुविधा आणि सोयी-सवलती मिळण्याची शक्यता आहे.

Chiplun: श्री क्षेत्र टेरव येथे भवानी मातेचा गोंधळ शुक्रवार १३ जून, २०२५ रोजी संपन्न होणार.

   Follow us on        

चिपळूण : श्री क्षेत्र टेरव येथे कुलस्वामिनी श्री भवानी मातेचा मंगलमय गोंधळ सोहळा रूढी परंपरेनुसार शुक्रवार दिनांक १३ जून, २०२५ रोजी मृग नक्षत्रात जल्लोषात व आनंदान संपन्न होणार आहे. भवानी माता ही महाराष्ट्राचे व कदम कुळांचे कुलदैवत असून ही देवता सुख, समृद्धी, सौभाग्य व स्वास्थ देणारी असून दुःखाचा नाश करणारी तसेच इच्छापूर्ती करणारी देवता आहे. श्री क्षेत्र तुळजापूर येथे भवानी मातेच्या पूजेचा मान कदम कुळाचा असून त्यांना भोपे असे संबोधले जाते.

 

जसे वैष्णवाच्यांत भजन – कीर्तन, हरिनाम सप्ताह साजरे होतात, तसेच देवीचा, खंडोबाचा, ज्योतिबाचा गोंधळ, जागर करण्याचा अनेक कुळांचा कुलाचार आहे. ९६ कुळांपैकी ७२ कुळांची कुलस्वामिनी श्री भवानी माता आहे. गोंधळ हा भवानी मातेचा मुख्य व महत्वाचा धार्मिक विधी आहे.

 

देवस्थानच्या पुजाऱ्यानी पूजेची मांडणी व घट स्थापित केल्यावर मानकऱ्यांच्या हस्ते पूजा करण्यात येईल. त्या नंतर दिवट्या पाजळून घटाच्या भोवती पाच प्रदक्षिणा घालून *’भैरी – भवानीचा गोंधळ मांडीला, गोंधळाला यावे, उदो -उदो -उदो’* असा उदघोष करण्यात येईल. परंपरेनुसार हा गोंधळ, गोंधळी न घालता श्री क्षेत्र टेरव गावातील कदम घालतील.

 

कुलस्वामिनी श्री भवानी मातेस गाऱ्हाणे घालून मंदिराच्या पूर्वेस आवाराबाहेर दक्षिणेकडे तोंड करून देवीचे देणे-मागणे देण्यात येईल. विधिवत पूजा-अर्चा संपन्न झाल्यावर महाप्रसादाचे वाटप करण्यात येईल.

 

दुसऱ्या दिवशी मंदिर स्वच्छ करून उद्यापनासह देवीला अभिषेक करण्यात येईल व अशा प्रकारे गोंधळ ह्या धार्मिक विधीची सांगता होईल.

 

गोंधळ या भवानी मातेच्या मुख्य व आवडत्या मंगल उत्सवात सर्वांनी अगत्याने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा व उत्सवाचा आनंद द्विगुणित करावा अशी विनंती टेरव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.

 

१२ जून पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग 

  • दिनांक : 12 जून 2025
  • वार : गुरुवार
  • माह (अमावस्यांत) : ज्येष्ठ
  • माह (पूर्णिमांत) : आषाढ
  • ऋतु : ग्रीष्म
  • आयन : उत्तरायण
  • पक्ष : कृष्ण पक्ष
  • तिथी : प्रथम तिथी (दुपारी 02:27 पर्यंत) त्यानंतर द्वितीया तिथी
  • नक्षत्र : मूळ नक्षत्र (रात्री 09:56 पर्यंत) त्यानंतर पूर्वाषाढा नक्षत्र
  • योग : शुभ योग (दुपारी 02:04 पर्यंत) त्यानंतर शुक्ल योग
  • करण : कौलव करण (दुपारी 02:27 पर्यंत) त्यानंतर तैतुला करण
  • चंद्र राशी : धनु राशी
  • सूर्य राशी : वृषभ राशी
  • अशुभ मुहूर्त:
  • राहु काळ : दुपारी 02:18 ते दुपारी 03:57 पर्यंत
  • शुभ मुहूर्त:
  • अभिजित : दुपारी 12:12 ते दुपारी 01:05
  • सूर्योदय : सकाळी 06:03
  • सूर्यास्त : सायंकाळी 07:14
  • संवत्सर : विश्वावसु
  • संवत्सर(उत्तर) : सिद्धार्थी
  • विक्रम संवत: 2082 विक्रम संवत
  • शक संवत: 1947 शक संवत
जागतिक दिन :
  • जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस
  • रशिया दिवस
महत्त्वाच्या घटना :
  • 1896 : जे.टी. हर्न प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 100 बळी घेणारा पहिला खेळाडू ठरला.
  • 1898 : फिलीपिन्सने स्पेनपासून स्वातंत्र्य घोषित केले.
  • 1905 : गोपाळकृष्ण गोखले यांनी सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना केली.
  • 1913 : जॉन ब्रे या अमेरिकन माणसाची जगातील पहिली कार्टून फिल्म रिलीज़ झाली.
  • 1940 : दुसरे महायुद्ध – 13,000 ब्रिटिश आणि फ्रेंच सैनिकांनी मेजर जनरल रोमेलला शरणागती पत्करली.
  • 1944 : दुसरे महायुद्ध – जर्मन सैन्याने वापरलेला पहिला फ्लाइंग बॉब लंडनला धडकला.
  • 1964 : वर्णभेद विरोधी नेते नेल्सन मंडेला यांना जन्मठेपेची शिक्षा झाली.
  • 1975 : अलाहाबाद न्यायालयाने इंदिरा गांधींची निवडणूक रद्द केली आणि त्यांना 6 वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास बंदी घातली.
  • 1993 : पृथ्वीक्षेपणास्त्राची 11 वी चाचणी यशस्वी.
  • 1996 : भारताचे पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांच्या संयुक्त आघाडी सरकारने लोकसभेत आपले बहुमत सिद्ध केले.
  • 2001 : कोनेरु हंपी ही बुद्धीबळातील वूमन ग्रॅंडमास्टर बनली. हा पराक्रम करणारी ती भारताची सर्वात कमी वयाची व एकुणात दुसरी खेळाडू आहे.
  • 2002 : जागतिक बालकामगार विरोधी दिनाला सुरुवात झाली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 499 : 499ई.पुर्व : ‘आर्यभट्ट’ – भारतीय गणिती व खगोलशास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1894 : ‘पुरुषोत्तम बापट’ – बौद्ध धर्म ग्रंथांचे भाषांतरकार आणि संपादक यांचा जन्म. (मृत्यू: 4 नोव्हेंबर 1991)
  • 1917 : ‘भालचंद्र दत्तात्रय खेर’ – लेखक व पत्रकार यांचा जन्म. (मृत्यू: 21 जून 2012)
  • 1924 : ‘जॉर्ज बुश’ – अमेरिकेचे 41 वे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म.
  • 1917 : ‘भालचंद्र दत्तात्रय खेर’ लेखक पत्रकार यांचा जन्म.
  • 1957 : ‘जावेद मियाँदाद’ – पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू प्रशिक्षक यांचा जन्म.
  • 1972 : ‘भालचंद्र कदम’ – लोकप्रिय महाराष्ट्रीयन मराठी हास्य विनोदी रंगमंच कलाकार व चित्रपट अभिनेता यांचा जन्म.
  • 1985 : ‘ब्लॅक रॉस’ –  मोझीला फायरफॉक्स चे सहसंस्थापक यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1964 : ‘कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी’ – मराठी भाषेचे गाढे अभ्यासक यांचे निधन. (जन्म: 5 जानेवारी 1892 – इस्लामपूर, सांगली)
  • 1976 : ‘गोपीनाथ कविराज’ – भारतीय तत्त्वज्ञ आणि विद्वान यांचे निधन.
  • 1978: ‘गुओ मोरुओ’ – चिनी भाषेमधील कवी, लेखक आणि इतिहासकार यांचे निधन.
  • 1981 : ‘प्र. बा. गजेंद्रगडकर’ – भारताचे 7 वे सरन्यायाधीश यांचे निधन. (जन्म: 16 मार्च 1901)
  • 1983 : ‘नॉर्मा शिअरर’ – कॅनेडियन – अमेरिकन अभिनेत्री यांचे निधन. (जन्म: 10 ऑगस्ट 1902)
  • 2000 : ‘पु.ल. देशपांडे’ – मराठी लेखक, कवी, नाटककार आणि अभिनेता यांचे निधन. (जन्म: 8 नोव्हेंबर 1919)
  • 2003 : ‘ग्रेगरी पेक’ – हॉलीवूड अभिनेता यांचे निधन. (जन्म: 5 एप्रिल 1916)
  • 2015 : ‘नेकचंद सैनी’ – भारतीय मूर्तिकार यांचे निधन.(जन्म: 15 डिसेंबर 1924)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

Railway Updates: महत्वाची बातमी! वेबसाइट असो वा काउंटर….तात्काळ तिकिटांसाठी आता ‘आधार ओटीपी’ अनिवार्य

   Follow us on        
Tatkal Ticket:  रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. जुलै महिन्यापासून तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये बदल केला जाणार आहे. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, 15 जुलैपासून आधार व्हेरिफिकेशन झालेल्या प्रवाशांनाच केवळ तत्काळ तिकीटचे बुकिंग करता येईल. तर रेल्वेचे एजंट अर्ध्या तासानंतर तिकीट बुक करू शकतील. आतापर्यंत तत्काळ तिकिटे आरक्षणात मोठे गैरव्यवहार होत होते.मात्र, रेल्वेच्या या नवीन नियमामुळे नागरिकांची सोय होणार आहे.
रेल्वेचे प्रसिद्धी पत्रक
रेल्वे मंत्रालयाने 10 जून 2025 रोजी एक पत्रक प्रसिद्ध केले. या पत्रकानुसार सर्व झोन्सना यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. तसेच, तत्काळ सुविधेचा लाभ सामान्य नागरिकाला मिळेल, याची काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे. रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे की, ज्यांचे आधार कार्डाचे व्हेरिफिकेशन झाले आहे, असे प्रवाशीच 1 जुलै 2025 पासून आयआरसीटीसी संकेतस्थळ किंवा ऍपच्या माध्यमातून तिकीट बुक करू शकतील. यासोबतच 15 जुलै 2025 पासून तत्काळ बुकिंगसाठी आधारवर आधारित ओटीपी देखील अनिवार्य करण्यात आला आहे.
प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, भारतीय रेल्वेच्या संगणकीकृत पीआरएस काऊंटर्स तसेच अधिकृत एजंट्सच्या माध्यामातून आरक्षणासाठी तेव्हाच उपलब्ध होतील, जेव्हा यंत्रणेने दिलेल्या ओटीपीचे व्हेरिफिकेशन होईल. प्रवाशांना आरक्षण अर्जात मोबाईल आधार कार्डशी लिंक असलेला नंबर देणे बंधनकारक असणार आहे. काउंटर वरून आरक्षित तिकिटे बुक करताना या नंबर वर ओटीपी येणार आहे. हा ओटीपी काउंटर वर तिकीट बुक करण्यासाठी बसलेल्या कर्मचाऱ्याला द्यावा लागणार आहे. या ओटीपीची पडताळणी झाल्यावरच तिकीट बुक होणार आहे.
तत्काळ रेल्वे तिकीटसाठी सकाळी 10 वाजेपासून आरक्षण करता येते. यावेळी केवळ एसी तिकिटांचे बुकिंग होते. तर 11 वाजेपासून अन्य तिकिटांचे बुकिंग करता येते. या सगळ्या प्रक्रियेत सामान्य प्रवाशाला हमखास तिकीट मिळणे कठीण होते.
तत्काळ बुकिंगसाठी सामान्य प्रवाशांना सर्वाधिक त्रास होतो. तर दुसरीकडे एजंट आरामात तिकीट बुक करू शकतात. आणि त्यानंतर एजंट या तिकिटांची विक्री करताना ग्राहकांकडून अवाच्या सवा किंमत वसूल करतात. आता रेल्वेच्या या नवीन पत्रकानुसार, एजंट्स सकाळी 10 ते 10.30 पर्यंत एसी आणि सकाळी 11 ते 11.30 पर्यंत स्लीपर तिकिटे काढण्यास मनाई करण्यात आली आहे. यामुळे प्रवासी या वेळेत तिकीट काढू शकतात.

Liquor Rates Hiked: ‘झिंगणे’ महागले! महाराष्ट्रात मद्याच्या दरांत वाढ; नेमकी किती वाढ झाली? ईथे वाचा

   Follow us on        
मुंबई: काल मंगळवारी (10 जून) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत दारू विक्रीवरील करात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारच्या महसूल वाढीच्या दृष्टीकोनातून उत्पादन शुल्क विभाग मद्यविक्रीवरील कर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आता मद्यप्रेमींच्या खिशाला मोठी झळ बसणार असून, त्यांचे ‘सेलिब्रेशन’ देखील महागणार आहे.
राज्य शासनाच्या या निर्णयामुळे, मद्यावरील शुल्क वाढीमुळे राज्याच्या तिजोरीत तब्बल 14,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल वाढणार आहे. राज्य सरकारच्या महसूल वाढीच्या उद्दिष्टासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे दिसते.
काय असतील नवे दर? 
भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याच्या (IMFL) रू. २६०/- प्रति बल्क लिटर पर्यंत निर्मिती मूल्य घोषित केलेल्या मद्यावरील उत्पादन शुल्काचा दर निर्मिती मूल्याच्या ३ पट वरुन ४.५ पट करण्यात येणार. देशी मद्यावरील उत्पादन शुल्काचा दर प्रति प्रुफ लिटर रुपये १८०/- वरुन रुपये २०५/- करण्यात येणार.
महाराष्ट्र मेड लिकर (MML) हा धान्याधारित विदेशी मद्याचा नवीन प्रकार तयार करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये फक्त महाराष्ट्रातील मद्य उत्पादक असे उत्पादन करु शकतील. त्यांना या नव्या प्रकारातील उत्पादनाची (ब्रँड) नवीन नोंदणी करुन घेणे आवश्यक राहील.
उत्पादन शुल्काच्या दरातील वाढ व अनुषंगिक एमआरपी सूत्रातील बदल यामुळे १८० मि.ली. बाटलीची किरकोळ विक्रीची किमान किंमत मद्य प्रकारनिहाय पुढीलप्रमाणे :- देशी मद्य ८० रूपये, महाराष्ट्र मेड लिकर (MML) – १४८ रूपये, भारतीय बनावटीचे विदेशी मद्य- २०५ रूपये, विदेशी मद्याचे प्रिमियम ब्रँड – ३६० रूपये. ही वाढ थेट ग्राहकांच्या खिशावर परिणाम करणार आहे.
राज्याच्या महसुलात वाढ करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्यविक्रीवरील कर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावर (IMFL) दीड टक्क्याने वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर, विदेशी मद्यावरही हा कर वाढविण्यात आल्याने आता मद्यप्रेमींसाठी हा निर्णय खिशाला झळ देणारा ठरणार आहे.

संगमेश्वर रोड रेल्वे स्थानक फलाट क्रमांक २ वरील गैरसोयींना रामराम! पेव्हर ब्लॉक, सुशोभीकरण कामाला लवकरच होणार सुरूवात

   Follow us on        

संगमेश्वर: गेल्या अनेक दिवसांपासून निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर (रेल्वे) फेसबुक ग्रुपच्या वतीने संगमेश्वर स्थानकात फलाट क्रमांक २ वरील गैरसोयींचा मुद्दा उचलून धरण्यात आला होता. सतत पाठपुरावा आणि वेळोवेळी अधिकारी वर्गाशी केलेल्या चर्चेतून हे सकारात्मक चित्र साकार होत आहे.

फलाट क्रमांक २ वरील गैरसोयींचा पाढा निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर (रेल्वे) फेसबुक ग्रुप सतत वाचून दाखवतात. फलाटावरील पेव्हर ब्लॉक, पादचारी पूल, आसनव्यवस्था, स्वच्छ पाणी, पंखे, दिवे , सांडपाण्याची व्यवस्था, तिकीट आरक्षणाची सुविधा, प्रवाशांच्या सोयीसाठी नव्याने तीन एक्स्प्रेसला संगमेश्वर स्थानकात थांबा मिळावा म्हणून निवेदन,आंदोलन असे अनेक विषय हाताशी घेऊन ते सफल करण्यात आले.

हे भगिरथ प्रयत्न करण्यासाठी या संघटनेचे प्रमुख संदेश जिमन आणि त्यांचे सर्व सहकारी आवर्जून झटताना दिसतात.

लोक प्रतिनिधींच्या गाठीभेटी, त्यांच्या शिफारशी यांच्या जोरावर कित्येक किचकट विषय मार्गी लावण्यात संघटनेला यश आले आहे. फलाट क्रमांक २ वरील पेव्हर ब्लॉक, सुशोभीकरण या कामात आमदार शेखर निकम यांनी मौलिक सहकार्य केले आहे. जातीने या गंभीर विषयावर लक्ष केंद्रित करुन सर्वतोपरी सहाय्य केले. या कामासाठी २३ लाख ३६ हजार ५५४ रुपये इतका भरघोस निधी उपलब्ध याबद्दल निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर (रेल्वे) फेसबुक ग्रुप आणि तमाम संगमेश्वर तालुक्यातील रेल्वे प्रवाशी, सामान्य जनता यांच्यावतीने आमदार महोदयांना धन्यवाद देण्यात येत आहेत.

संगमेश्वर तालुक्याचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करीत इथे पर्यटनाची संधी निर्माण व्हावी. केरळ गोवा यांच्या धर्तीवर कोकणातील गाव खेड्यातील लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा.
इथल्या कोकणी माणसाचे जीवन समृद्ध व्हावे यासाठी कायमच निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर (रेल्वे) फेसबुक ग्रुप प्रयत्नशील असतों.

रुपेश मनोहर कदम/ सायले

११ जून पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग 

  • तिथि-पौर्णिमा – 13:15:52 पर्यंत
  • नक्षत्र-ज्येष्ठा – 20:11:18 पर्यंत
  • करण-भाव – 13:15:52 पर्यंत, बालव – 25:56:01 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-साघ्य – 14:02:49 पर्यंत
  • वार- बुधवार
  • सूर्योदय- 06:03
  • सूर्यास्त- 19:14
  • चन्द्र-राशि-वृश्चिक – 20:11:18 पर्यंत
  • चंद्रोदय- 19:33:00
  • चंद्रास्त- चंद्रोस्त नहीं
  • ऋतु- ग्रीष्म

जागतिक दिन :
  • आंतरराष्ट्रीय खेळाचा दिवस
  • आंतरराष्ट्रीय सूत बॉम्बिंग दिवस
महत्त्वाच्या घटना :
  • 1665 : मिर्झाराज जयसिंग आणि शिवाजी महाराज यांच्यात पुरंदरचा तह झाला.
  • 1776 : अमेरिका देशाला स्वातंत्र्य घोषित करण्यासाठी घोषणापत्र तयार करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली.
  • 1866 : अलाहाबाद उच्च न्यायालयाची स्थापना.
  • 1895 : पॅरिस-बॉर्डोक्स-पॅरिस ही इतिहासातील पहिली ऑटोमोबाईल रेस पहिली मोटर रेस झाली.
  • 1901 : न्यूझीलंडने कूक बेटांचा समावेश केला.
  • 1921 : ब्राझील देशांतील महिलांना मतदान करण्याचा अधिकार प्राप्त झाला.
  • 1937 : जोसेफ स्टॅलिनने स्वतःच्या 8 लष्करी अधिकाऱ्यांची हत्या केली.
  • 1970 : ॲनामे हेस, एलिझाबेथ पी. हॉइसिंग्टन या यूएस लष्करातील पहिल्या महिला जनरल बनल्या.
  • 1972 : दारू पिऊन गाडी चालवल्यामुळे एल्थम वेल हॉल येथे झालेल्या रेल्वे अपघातात 6 ठार आणि 126 जखमी.
  • 1987 : 160 वर्षाच्या कालखंडात ब्रिटीश पंतप्रधान पदावर सलग तिसऱ्यांदा विराजमान होणाऱ्या पंतप्रधान मार्गारेट थॅचर या पहिल्या ब्रिटीश नागरिक ठरल्या.
  • 1997 : रशियन बनावटीचे सुखोई-30K विमान भारतीय हवाई दलात सामील झाले.
  • 1998 : कॉम्पॅक कॉम्प्युटर कंपनीने डिजिटल इक्विपमेंट कॉर्पोरेशन 9 अब्ज अमेरिकी डॉलर मध्ये विकत  घेण्यासाठी इतिहासातील सर्वात मोठा करार केला.
  • 2007 : बांगलादेशातील चितगावमध्ये भूस्खलनामुळे 130 लोक ठार झाले.
  • 2024 : पहिला आंतरराष्ट्रीय खेळ दिवस साजरा.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1815 : ‘जुलिया मार्गारेट कॅमेरॉन’ – भारतीय-श्रीलंकन छायाचित्रकार यांचा जन्म. (मृत्यू: 26 जानेवारी 1879)
  • 1894 : ‘काइचिरो टोयोडा’ – टोयोटा मोटर कंपनीचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 27 मार्च 1952)
  • 1897 : ‘रामप्रसाद बिस्मिल’ – क्रांतिकारक यांचा जन्म. (मृत्यू: 19 डिसेंबर 1927)
  • 1942 : ‘पॉल रत्नसामी’ – हे भारतीय उत्प्रेरक शास्त्रज्ञ, INSA श्रीनिवास रामानुजन संशोधन प्राध्यापक आणि वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे माजी संचालक यांचा जन्म.
  • 1948 : ‘लालूप्रसाद यादव’ – बिहारचे (वर्ष 1990)मुख्यमंत्री यांचा जन्म.
  • 1982 : ‘मार्को आर्मेंट’ – टंबलर चे सहसंस्थापक यांचा जन्म.
  • 1990 : ‘सविता पुनिया’ – अर्जुन पुरस्कार सन्मानित भारतीय हॉकी पटू यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 323: 323ई.पुर्व : ‘अलेक्झांडर द ग्रेट’ – मॅसेडोनियाचा राजा यांचे निधन. (जन्म: 20 जुलै ख्रिस्त पूर्व 356)
  • 1727: ‘जॉर्ज (पहिला)’ – इंग्लंडचा राजा यांचे निधन. (जन्म: 28 मे 1660)
  • 1924: ‘वासुदेव वामन’ तथा ‘वासुदेवशास्त्री खरे’ – इतिहासाचार्य, लेखक, नाटककार व कवी यांचे निधन. (जन्म: 5 ऑगस्ट 1858)
  • 1950: ‘पांडुरंग सदाशिव साने’ ऊर्फ ‘सानेगुरुजी’ – बालसाहित्यिक यांचे निधन. (जन्म: 24 डिसेंबर 1899)
  • 1983: ‘घनश्यामदास बिर्ला’ – भारतीय उद्योगपती यांचे निधन. (जन्म: 10 एप्रिल 1894)
  • 1903: ‘अलेक्झांडर (पहिला)’ – सर्बियाचा यांचे निधन. (जन्म: 14 ऑगस्ट 1876)
  • 1903: ‘ड्रगा माशिन’ – सर्बियाचा अलेक्झांडर (पहिला) यांची सर्बियन पत्नी यांचे निधन. (जन्म: 11 सप्टेंबर 1864)
  • 1997: ‘मिहिर सेन’ – इंग्लिश खाडी पोहुन जाणारे पहिले भारतीय यांचे निधन. (जन्म: 16 नोव्हेंबर 1930)
  • 2000: ‘राजेश पायलट’ – कॉँग्रेस नेता केंद्रीय मंत्री यांचे निधन. (जन्म: 10 फेब्रुवारी 1945)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

Mumbai Local : हार्बरवर लोकलसेवा ठप्प! तांत्रिक बिघाडामुळे पनवेल-सीएसएमटी अप-डाऊन दोन्ही बंद

   Follow us on        

Mumbai Local: हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल सेवा तांत्रिक बिघाडामुळे पूर्णतः विस्कळीत झाली आहे. सीएसएमटी ते पनवेल दरम्यान अप आणि डाउन लोकलसेवा थांबवण्यात आली आहे. नेरुळ स्थानकातही गाड्या थांबवल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितलंय. बेलापूर ते सीवूड्स स्थानकादरम्यान अनेक गाड्या थांबवण्यात आल्या असून प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.

कामाच्या वेळेत अचानक लोकलसेवा सेवा बंद झाल्याने स्टेशन्सवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. काही ठिकाणी प्रवाशांनी संतापही व्यक्त केलाय. रेल्वेकडून तांत्रिक त्रुटी दूर करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. अद्याप हार्बरची लोकलसेवा सुरू झालेली नाही.

Loading

१० जून पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग 

  • दिनांक : 10 जून 2025
  • वार : मंगळवार
  • माह (अमावस्यांत) : ज्येष्ठ
  • माह (पूर्णिमांत) : ज्येष्ठ
  • ऋतु : ग्रीष्म
  • आयन : उत्तरायण
  • पक्ष : शुक्ल पक्ष
  • तिथी : चतुर्दशी तिथी (सकाळी 11:35 पर्यंत) त्यानंतर पौर्णिमा
  • नक्षत्र : अनुराधा नक्षत्र (सायंकाळी 06:01 पर्यंत) त्यानंतर ज्येष्ठा नक्षत्र
  • योग : सिद्ध योग (दुपारी 01:44 पर्यंत) त्यानंतर साध्य योग
  • करण : वाणीजा करण (सकाळी 11:35 पर्यंत) त्यानंतर विस्ती भद्रा करण
  • चंद्र राशी : वृश्चिक राशी
  • सूर्य राशी : वृषभ राशी
  • अशुभ मुहूर्त:
  • राहु काळ : दुपारी 03:56 ते सायंकाळी 05:35 पर्यंत
  • शुभ मुहूर्त:
  • अभिजित : दुपारी 12:12 ते दुपारी 01:04
  • सूर्योदय : सकाळी 06:03
  • सूर्यास्त : सायंकाळी 07:14
  • संवत्सर : विश्वावसु
  • संवत्सर(उत्तर) : सिद्धार्थी
  • विक्रम संवत: 2082 विक्रम संवत
  • शक संवत: 1947 शक संवत

जागतिक दिन :
  • दृष्टी दिवस
महत्त्वाच्या घटना :
  • 1768 : माधवराव पेशवे आणि राघोबादादा यांच्यात धोडपची लढाई झाली. त्यात राघोबादादांचा पराभव झाला.
  • 1924 : इटालियन समाजवादी नेते जियाकोमो मॅटिओटी यांची हत्या.
  • 1935 : ॲक्रोन, ओहायो येथे बॉब स्मिथ बिल विल्सन यांनी अल्कोहोलिक्स एनोनिमसची स्थापना केली.
  • 1940 : दुसरे महायुद्ध – नॉर्वेने जर्मनीला शरणागती पत्करली.
  • 1940 : दुसरे महायुद्ध – इटलीने फ्रान्स आणि इंग्लंडविरुद्ध युद्ध पुकारले.
  • 1944 : ओराडू-सुर-ग्लेनचे हत्याकांड, स्त्रिया आणि मुलांसह 642 लोक मारले गेले.
  • 1960 : नाशिकमध्ये रशियन युद्धविमान मिगचे उत्पादन सुरू झाले.
  • 1977 : ऍपल कॉम्प्युटर्सचा ऍपल-II संगणक रिलीज झाला.
  • 1982 : महाराष्ट्र राज्यात दृष्टी दिवस साजरा करण्यास सुरवात.
  • 1994 : चीनने लोकनोर भागात गुप्तपणे अणुचाचणी केली.
  • 1999 : उस्ताद झाकीर हुसेन यांची अमेरिकेतील प्रतिष्ठाप्राप्त नॅशनल हेरिटेज गौरववृत्तीसाठी निवड झाली.
  • 2003 : स्पिरिट्रोव्हर मंगळावर जाण्यास उड्डाण भरले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1213 : ‘फख्रुद्दीन’ – इराकी पर्शियन तत्त्वज्ञ यांचा जन्म.
  • 1908 : ‘जयंतीनाथ चौधरी’ – भारताचे लष्करप्रमुख, हैदराबादचे लष्करी प्रशासक व भारताचे कॅनडातील राजदूत, पद्‌मविभूषण जनरल यांचा जन्म. (मृत्यू: 6 एप्रिल 1983)
  • 1916 : ‘विल्यम रोसेनबर्ग’ – डंचिन डोनट्स चे स्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 22 सप्टेंबर 2002)
  • 1924 : ‘डॉ. आर. ए. भालचंद्र’ – नेत्रशल्यविशारद यांचा जन्म.
  • 1938 : ‘राहुल बजाज’ – भारतीय उद्योगपती यांचा जन्म.
  • 1938 : ‘एन. भाट नायक’ – भारतीय गणितज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 12 फेब्रुवारी 2009)
  • 1955 : ‘प्रकाश पदुकोण’ – भारतीय बॅडमिंटनपटू यांचा जन्म.
  • 1972 : ‘सुंदर पिचाई’ – भारतीय-अमेरिकन उद्योगपती यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1836 : ‘आंद्रे अ‍ॅम्पिअर’ – फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 20 जानेवारी 1775)
  • 1903 : ‘लुइ गीक्रेमॉना’ – इटालियन गणितज्ञ यांचे निधन.
  • 1906 : ‘गुलाबदास हरजीवनदास ब्रोकर’ – गुजराती लेखक व समीक्षक, पद्मश्री यांचा जन्म. (जन्म: 20 सप्टेंबर 1909)
  • 1955 : ‘मार्गारेट अ‍ॅबॉट’ – भारतीय-अमेरिकन गोल्फर यांचे निधन. (जन्म: 15 जून 1878)
  • 1976 : ‘अ‍ॅडॉल्फ झुकॉर’ – पॅरामाउंट पिक्चर्स चे सहसंस्थापक यांचे निधन. (जन्म: 7 जानेवारी 1873)
  • 2001 : ‘फुलवंतीबाई झोडगे’ – सामाजिक कार्यकर्त्या यांचे निधन.


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

सावंतवाडी टर्मिनसवर गाडयांना थांबे मिळवून देण्यासाठी कल्याणच्या आमदारांचे प्रयत्न

   Follow us on    

 

 

तळकोकणातील एक महत्वाचे स्थानक म्हणून ओळखले जाणाऱ्या सावंतवाडी टर्मिनस या स्थानकावर गाडी क्रमांक १२१३३/३४ मंगलोर एक्सप्रेसला थांबा देण्यासाठी कल्याण पूर्व क्षेत्रातील आमदार सुलभा गायकवाड पुढे सरसावल्या आहेत. या गाडीला सावंतवाडी टर्मिनस या स्थानकावर थांबा मिळवून देणे आणि कोरोना काळात ZBBT च्या नावाने या स्थानकावरील काढून घेतलेले गाड्यांचे थांबे पूर्ववत करावेत या मागण्यांसाठी त्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना निवेदन पाठवले आहे.

मंगलोर एक्सप्रेसच्या कणकवली थांब्यानंतर महत्त्वाच्या स्थानकांदरम्यान या गाडीच्या नॉन-स्टॉप ऑपरेशनमुळे सावंतवाडीहून आणि सावंतवाडीला जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. या गाडीला सावंतवाडी टर्मिनसवर थांबा दिल्यास अनेक प्रवाशांना फायदा होईल, ज्यामुळे प्रवास सुलभ होईल आणि रेल्वे सेवेची सुलभता वाढेल. तसेच सावंतवाडी टर्मिनस स्थानकावरील कोरोना काळात ZBBT च्या नावाखाली काढून घेतलेले थांबे पूर्ववत करण्यात यावेत, तसे केल्याने या प्रदेशातील प्रवाशांना अधिक सुरळीत प्रवास करता येईल. मी विनंती करते की संबंधित अधिकाऱ्यांनी प्रवाशांच्या सोयी आणि कल्याणाचा विचार करून लवकरात लवकर हा थांबा जोडण्याचा आणि कोरोना काळात काढून घेतलेले तांबे पूर्ववत करण्याचा विचार करावा. असे त्यांनी या निवेदनात लिहिले आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search