Author Archives: Kokanai Digital

हिल गँग कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे कसारा-इगतपुरी घाटात संभाव्य दरड दुर्घटना टळली

   Follow us on        

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागांतर्गत येणाऱ्या अतिशय मोक्याच्या आणि आव्हानात्मक मानल्या जाणाऱ्या कसारा-इगतपुरी (थाळ घाट) विभागात एक मोठी दुर्घटना टळली आहे. या भागात नियमित गस्त आणि सुरक्षा तपासणी करणाऱ्या ‘इगतपुरी हिल गँग’च्या सतर्कतेमुळे मोठा रेल्वे अपघात टळला असून, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

​धोकादायक खडकाचा शोध आणि तत्परता

थाळ घाट विभागातील टीजीआर २ ते टीजीआर १ दरम्यानच्या डोंगराळ भागात नियमित तपासणी सुरू असताना हिल गँगच्या कर्मचाऱ्यांना एक मोठा धोका निदर्शनास आला. मुख्य खडकापासून अंदाजे ३.९ मीटर लांब, १.८ मीटर रुंद आणि १.६ मीटर उंच आकाराचा एक प्रचंड खडकाचा ढीग सुटा होऊन वेगळा झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. हा महाकाय खडक रेल्वे ट्रॅकच्या थेट १५ मीटर उंचीवर कटिंगच्या कडेवर अत्यंत धोकादायक स्थितीत लटकलेला होता.

​नियोजित ट्रॅफिक ब्लॉक आणि सुरक्षित कारवाई

डोंगराच्या कडेवर असलेला हा भलामोठा खडक कधीही खाली कोसळून मोठी जीवित वा वित्तहानी घडवू शकला असता. याची गांभीर्याने दखल घेत इगतपुरी हिल गँगच्या टीमने कोणत्याही विलंब न करता तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. त्यानंतर सुरक्षिततेची सर्व उपाययोजना करून एका नियोजित ट्रॅफिक ब्लॉकदरम्यान अत्यंत कौशल्याने व काळजीपूर्वक हा मोठा खडक ट्रॅकवर सुरक्षितपणे खाली सोडण्यात आला.

​पोकलेन ब्रेकरच्या साहाय्याने ट्रॅक मोकळा

खडक खाली पाडल्यानंतर तो रेल्वे मार्गावर अडथळा ठरत होता. हा महाकाय खडक तातडीने बाजूला सारण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून विशेष पावले उचलण्यात आली. ‘बाऊलडर स्पेशल ट्रेन’वरील आधुनिक पोकलेन ब्रेकरच्या साहाय्याने या भल्यामोठ्या खडकाचे तुकडे करण्यात आले आणि संपूर्ण ट्रॅक तातडीने साफ करून पूर्ववत मोकळा करण्यात आला.

हिल गँगच्या कार्याचे कौतुक

इगतपुरी हिल गँगच्या या अत्यंत साहसी, समयसूचक आणि कौतुकास्पद कार्यामुळे रेल्वे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित झाला आहे. कर्मचाऱ्यांच्या या तत्परतेची आणि उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत केंद्रीय रेल्वेच्या मुंबई विभागाच्या मंडल रेल्वे व्यवस्थापकांनी (DRM) संपूर्ण हिल गँग टीमची उघडपणे प्रशंसा केली असून त्यांच्या पाठीवर कौतुुकी थाप दिली आहे.

धक्कादायक! शाळेत वर्ग सुरू असतानाच छतावरील कौले कोसळली

   Follow us on        

बांदा: बांदा-सटमठवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत वर्ग सुरू असतानाच छतावरील कौले विद्यार्थ्यांसमोर अचानक खाली कोसळली, मात्र सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. मुख्याध्यापिका आत्लेषा कांबळी या विद्यार्थ्यांना शिकवत असताना ही घटना घडली असून, काही क्षणांसाठी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

​या गंभीर घटनेची माहिती मिळताच पंचायत समिती सदस्य ऋतिका नाईक, ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर, मनसे तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत, प्रसाद वीर, राकेश विरनोडकर, प्रदीप कळंगुटकर, राजदीप पावसकर आणि महेंद्र मांजेरकर यांनी शाळेला भेट देऊन पाहणी केली. गेल्या पंधरा दिवसांत बांदा परिसरातील जिल्हा परिषद शाळांच्या छातासंदर्भातील ही तिसरी गंभीर घटना असल्याने शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी खेळ करणाऱ्या या दुर्लक्षाबाबत स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

​शाळा व्यवस्थापन समितीने अनेकदा छप्पर दुरुस्तीचे प्रस्ताव संबंधित विभागाकडे सादर केले, मात्र त्याची दखल घेतली गेली नसल्याचा आरोप साईप्रसाद काणेकर यांनी केला. विद्यार्थ्यांच्या जीविताची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल उपस्थित करत त्यांनी तातडीने निधी मंजूर करून दुरुस्ती करण्याची मागणी केली. शिक्षण विभागाने तातडीने छप्पर दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत अन्यथा आंदोलन छेडावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच, मनसे तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत यांनी पिण्याच्या पाण्याच्या टाकीची दूरवस्था आणि खेळणी साहित्यांची झालेली मोडतोड निदर्शनास आणून दिली असून, ऋतिका नाईक यांनी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे पाठपुरावा करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

​आता फक्त ६० रुपयांत मिळणार डिजिटल भूनकाशा

   Follow us on        

कणकवली: मूळ जमाबंदीवेळी तयार झालेले भूमापनचे सर्व्हे नंबरचे नकाशे, एकत्रीकरण योजनेअंतर्गत तयार झालेले गट नंबरचे डिजिटल नकाशे, नगर भूमापन नकाशे, गावठाण भूमापन नकाशे तसेच स्वामित्व योजनेअंतर्गत तयार झालेले गावठाण भूमापन नकाशे एप्लीकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस (API) द्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठीचे शुल्कही निश्चित करण्यात आले असून, या अंतर्गत संगणकीकृत स्वाक्षरीचे पीडीएफ नकाशे सर्वसामान्य नागरिकांसाठी प्रिपेड स्वरूपात ६० रुपये दराने मिळणार आहेत.

​संगणकीकृत स्वाक्षरीचे .dwg स्वरूपातील नकाशे आणि .shp स्वरूपातील नकाशे १२० रुपयांच्या दरात उपलब्ध होणार आहेत. खासगी व सरकारी बँकांसाठीही हाच दर लागू असणार असून, त्यांच्यासाठी पोस्टपेड स्वरूपात एक महिना क्रेडिट उपलब्ध होईल. राज्य शासनाच्या प्रशासनिक विभागांसाठी असे नकाशे नि:शुल्क मिळणार आहेत. भारत सरकारचे सार्वजनिक उपक्रम, महामंडळे व स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यासाठी पोस्टपेड स्वरूपात पीडीएफ नकाशे ८४ रुपयात, तर संगणकीकृत स्वाक्षरीचे .dwg व .shp नकाशे ६० रुपये दराने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. संपूर्ण गाव नकाशाची मागणी केल्यास ५००० रुपये आकारणी करण्यात येणार असून, त्यात राज्य शासनाचा हिस्सा ३००० रुपये आणि जमाबंदी आयुक्त यांचा हिस्सा २००० रुपये असेल.

​संगणकीकृत स्वाक्षरीने मिळकत पत्रिकेसाठी अ, ब, क वर्ग नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रात नागरिकांसाठी ९० रुपये प्रति अभिलेख आणि ग्रामीण क्षेत्रासाठी ४५ रुपये प्रति अभिलेख दर असणार आहे. सरकारी व खासगी बँकांसाठीही हाच दर लागू आहे. सामान्य नागरिकांसाठी पीडीएफ स्वरूपातील सातबारा, आठ-अ आणि फेरफारसाठी प्रति अभिलेख १५ रुपये, सरकारी व खासगी बँकांसाठी एक महिन्याच्या क्रेडिटवर पोस्टपेड स्वरूपात १५ रुपये आणि प्रशासकीय विभागांसाठी हे अभिलेख नि:शुल्क देण्यात येणार आहेत.

​सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक महामंडळे, स्वायत्त संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यासाठी पोस्टपेड स्वरूपात प्रति अभिलेख १५ रुपये आकारले जातील. भारत सरकारचे जे विभाग महसूल अभिलेख देऊन स्वतःकडील डेटा शेअर करतात, अशा विभागांसाठी हे अभिलेख नि:शुल्क देण्यात येणार आहेत. मात्र, भारत सरकारचे जे विभाग अभिलेख घेऊन स्वविभागाकडे डेटा शेअर करत नाहीत, त्यांना १५ रुपये आकारण्यात येणार आहेत.

मुंबई लोकलमध्ये पत्त्यांचा डाव; रेल्वे प्रशासनाचे कडक कारवाई करण्याचे आदेश

   Follow us on        

मुंबई: मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांमार्फत नियमांचे उल्लंघन करण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. यातच आता धावत्या लोकल ट्रेनच्या गर्दीच्या डब्यात प्रवाशांनी पत्त्यांचा डाव (रम्मी) रंगवल्याचा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा आणि शिस्तीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

​व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लोकल ट्रेनचा एक डबा प्रवाशांनी पूर्णपणे भरलेला दिसत असून, काही जण अत्यंत निवांतपणे बसून कार्ड्स (पत्ते) खेळत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. डब्यातील इतर प्रवासी आणि खिडक्या या क्लिपमध्ये स्पष्ट दिसत असून, एका जागरूक प्रवाशाने आपल्या मोबाईलमध्ये हा संपूर्ण प्रकार रेकॉर्ड केला आणि तो सोशल मीडियावर अपलोड केला.

​हा व्हिडिओ अल्पावधीतच सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवासात आधीच प्रचंड गर्दी आणि डब्यांमधील गोंधळ यांसारख्या समस्या নিত্যच्या ठरल्या आहेत. अशातच प्रवाशांची ही हुल्लडबाजी आणि रेल्वे नियमांचे उघड उल्लंघन पाहून नेटकऱ्यांनी रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून प्रशासनाने अधिक सजग राहण्याची मागणी केली आहे.

​या गंभीर प्रकारची तात्काळ दखल घेत रेल्वे प्रशासनाने अत्यंत कडक आदेश जारी केले आहेत. रेल्वे सुरक्षा दल (RPF) आणि लोहमार्ग पोलीस (GRP) यांना अशा प्रकारच्या अनुचित आणि बेजबाबदार क्रियाकलापांवर कडक कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. चालत्या ट्रेनमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेला बाधा आणणाऱ्या कोणत्याही गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

​रेल्वे प्रशासनाने सर्व प्रवाशांना नियमांचे तंतोतंत पालन करण्याचे आणि प्रवासादरम्यान योग्य शिस्त राखण्याचे आवाहन केले आहे. भविष्यात अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आणि लोकल डब्यांवर कडक नजर ठेवण्यासाठी सुरक्षा यंत्रणांची गस्त मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

 

View this post on Instagram

 

२३ दिवसांच्या अथक परिश्रमानंतर मुंबई-पुणे रेल्वे मार्ग पूर्ववत

   Follow us on        

मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील कर्जत-लोणावळा घाट विभागातील बंद पडलेले तीनही रेल्वे मार्ग आता पूर्णपणे दुरुस्त करण्यात मध्य रेल्वेला मोठे यश आले आहे. या अत्यंत दुर्गम आणि कठीण भूप्रदेशात रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्यासाठी मध्य रेल्वेने अविरत परिश्रम घेतले आहेत.

​या कठीण मोहिमेत २३ दिवसांच्या अथक प्रयत्नांत तब्बल ११,७४५ रेल्वे कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. या कर्मचाऱ्यांनी एकूण १,४०,९४० मनुष्य-तास काम करत अहोरात्र मेहनत घेतली आणि या आव्हानात्मक परिस्थितीवर यशस्वीपणे मात केली.

​दुरुस्तीच्या या कामासाठी ११० हून अधिक साहित्याच्या रेकींचा (माती, खडक व ढिगारा हटवणाऱ्या विशेष गाड्या) प्रभावी वापर करण्यात आला. या साहाय्याने दरडी कोसळलेल्या भागातील रेल्वे रुळांवरून माती आणि दरडीचे अवशेष तातडीने बाजूला सारण्यात आले.

​निसर्गाच्या या भीषण संकटाला धैर्याने तोंड देत भारतीय रेल्वेने आपले उच्चस्तरीय इंजिनिअरिंग कौशल्य पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. यामुळे मुंबई-पुणे दरम्यानची बहुप्रतिक्षित रेल्वे वाहतूक पूर्ववत झाली असून, या अभूतपूर्व कामगिरीबद्दल मध्य रेल्वेच्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

भारतीय रेल्वेच्या लॉजिस्टिक्स क्रांतीचा नवा अध्याय: वंदे भारत कार्गो ट्रेनने गाठला विक्रमी वेग

   Follow us on        

भारतीय रेल्वेच्या मालवाहतूक क्षेत्रात एका ऐतिहासिक पर्वाची सुरुवात झाली आहे. देशातील पहिल्या वंदे भारत फ्रेट ईएमयू (Vande Bharat Freight EMU) ट्रेनने नुकतीच एका महत्त्वपूर्ण मैलाचा दगड पार केला आहे. पश्चिम मध्य रेल्वेच्या कोटा विभागात सुरू असलेल्या हाय-स्पीड चाचण्यांदरम्यान (Speed Trials) या अत्याधुनिक ट्रेनने तब्बल १४५ किलोमीटर प्रति तास इतका उच्चांकी वेग गाठला आहे.

​या महत्त्वकांक्षी ट्रेनची निर्मिती चेन्नई येथील प्रसिद्ध इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये (ICF) करण्यात आली आहे. या संपूर्ण १६ कोचांच्या रेकमध्ये मालवाहतूक सुलभ व्हावी यासाठी विशेष पार्सल कोच आणि नाशवंत मालासाठी रेफ्रिजरेटेड व्हॅन्सची (Refrigerated Vans) रचना करण्यात आली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली ही ट्रेन रेल्वे लॉजिस्टिक्सच्या प्रवासात एक नवी दिशा देणारी ठरणार आहे.

​ई-कॉमर्स उत्पादने, जीवनावश्यक औषधे, तसेच भाजीपाला आणि फळे यांसारख्या नाशवंत वस्तूंची वाहतूक अधिक जलद गतीने करण्यासाठी ही ट्रेन विशेष डिझाइन करण्यात आली आहे. या संपूर्ण रॅकची पेलोड क्षमता ३९७ टन एवढी प्रचंड आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मालाची वाहतूक कमी वेळेत करणे आता शक्य होणार असून यामुळे व्यापारी वर्गाला मोठा फायदा होणार आहे.

​सध्या कोटा-नागदा-सवाई माधोपुर रेल्वे खंडावर या ट्रेनची कसून चाचणी सुरू आहे. आगामी एक महिना चालणाऱ्या या चाचण्यांच्या टप्प्यात या ट्रेनचा वेग आणखी वाढवून १८० किमी/तास पर्यंत नेण्याचे नियोजन भारतीय रेल्वेने केले आहे. या उच्चांकी चाचण्यांमुळे ट्रेनच्या विविध तांत्रिक क्षमतांची कसून परीक्षा घेतली जात आहे.

​या सर्व स्पीड ट्रायल्स यशस्वी ठरल्यास ही देशातील सर्वात वेगवान मालगाडी म्हणून इतिहास रचेल. या प्रकल्पामुळे भारतीय रेल्वेची एक्सप्रेस पार्सल सेवा अधिक वेगवान, सुरक्षित आणि कार्यक्षम होईल, ज्यामुळे देशाच्या लॉजिस्टिक्स क्षेत्रात एक अभूतपूर्व क्रांती घडवून येईल यात शंका नाही.

‘सागरमाला २.०’ अंतर्गत राज्यातील प्रकल्पांच्या मंजुरीसाठी नितेश राणे यांचा केंद्राकडे पाठपुरावा

   Follow us on        

मुंबई : महाराष्ट्रातील बंदरे, मत्स्यव्यवसाय, किनारी पायाभूत सुविधा आणि सागरी पर्यटनाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. ‘सागरमाला २.०’ अंतर्गत राज्याने प्रस्तावित केलेल्या विविध प्रकल्पांना लवकरात लवकर मंजुरी मिळावी, यासाठी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी व जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची भेट घेऊन पत्र दिले आणि विशेष पाठपुरावा केला आहे.

​मंत्री नितेश राणे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, महाराष्ट्र सरकारने ‘सागरमाला २.०’ कार्यक्रमांतर्गत विविध प्रकल्पांना सर्वोच्च प्राधान्य दिले असून, हे प्रकल्प २.० अंतर्गत विविध घटकांचा समावेश असलेले सर्वसमावेशक प्रकल्प प्रस्ताव आहेत. हे प्रकल्प ‘विकसित भारत २०४७’ या राष्ट्रीय संकल्पनेशी सुसंगत असल्याने त्यांना प्राधान्याने मंजुरी देण्याची विनंतीही त्यांनी केली आहे.

​या प्रकल्पांमुळे राज्यातील बंदराधारित विकासाला चालना मिळणार असून बहुविध लॉजिस्टिक संपर्क व्यवस्था मजबूत होईल, मत्स्य बंदरांचे आधुनिकनीकरण होईल, किनारी भागातील पायाभूत सुविधा उन्नत होतील तसेच किनारी जलवाहतूक, अंतर्गत जलमार्ग आणि सागरी पर्यटनालाही मोठी चालना मिळेल. याशिवाय किनारी भागात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होण्यास मदत होईल, खाजगी गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल आणि राज्याच्या आर्थिक विकासाला नवी गती मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने केंद्र सरकारच्या सूचनांनुसार ‘सागरमाला २.०’ अंतर्गत विविध घटकांचा समावेश असलेले सर्वसमावेशक प्रकल्प प्रस्ताव सादर केले आहेत.

​केंद्र सरकारकडून या प्रस्तावांना लवकर मंजुरी मिळाल्यास महाराष्ट्रातील बंदर विकास, सागरी पायाभूत सुविधा, किनारी अर्थव्यवस्था आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्रात मोठी प्रगती होईल. असा विश्वास व्यक्त करत राज्य सरकार सागरी क्षेत्रात महाराष्ट्राला देशातील अग्रगण्य राज्य बनवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी म्हटले आहे.

चिरेकापणीच्या मशिनवर पडून कामगाराचा मृत्यू

   Follow us on        

देवगड:

तालुक्यातील लिंगडाळ येथील एका चिरेखाणीवर काम करणारा सुखदेव बड्डा टेकाम (३६, मूळ रा. कोडल, तेंडूखेडा, जि. दमोह, रा. मध्य प्रदेश) हा कामगार चिरे कापण्याच्या मशिनवर पडून गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना २७ जून, २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास घडली. लिंगडाळ येथील चिरेखाणीवर काम करत असताना तो अचानक मशिनवर पडल्याने त्याच्या गळ्याला गंभीर दुखापत होऊन तोंडातून रक्तस्राव झाला.

​ही बाब लक्षात येताच इतर कामगारांनी त्याला तातडीने देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचार सुरू करण्यापूर्वीच तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर त्याचा मृतदेह अंत्यविधीसाठी त्याच्या मूळ गावी नेण्यात आला.

​या प्रकरणी सुखदेव टेकाम (२६, रा. कोडल) यांनी २९ जून रोजी तेंडूखेडा पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून, सुरुवातीला तिथे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडल्याने, तेंडूखेडा पोलिसांनी हे प्रकरण तपासासाठी सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत देवगड पोलीस स्थानकाकडे वर्ग केले. त्यानुसार देवगड पोलीस स्थानकात मंगळवारी रात्री उशिरा या घटनेची नोंद करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक श्याम बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संतोष उगलमुले पुढील तपास करत आहेत.

‘शक्तीपीठ’ तीन महामार्गांना जोडेल! – आमदार दीपक केसरकर

   Follow us on        

सावंतवाडी: ‘शक्तीपीठ’ महामार्ग तीन महामार्गांना जोडला जाईल आणि याद्वारे पर्यटन विकास घडवला जाईल असे विधान सावंतवाडी येथील निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना आमदार दीपक केसरकर यांनी काल केले,. दोडामार्ग तालुक्यातील काही गावे ‘इको सेन्सिटिव्ह’ झोनमध्ये समाविष्ट झाल्यामुळे तेथे काही निर्बंध आले आहेत, ज्यांचे पालन करणे गरजेचे आहे. या भागातील वृक्षतोट रोखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सजगता निर्माण करण्यासाठी एनजीओच्या मदतीने प्रत्येक गावात जाऊन जनजागृती केली जाणार आहे.

​मतदारसंघातील तिन्ही तालुक्यांच्या आमसभा गेल्या काही वर्षांपासून झालेल्या नव्हत्या, मात्र आता त्या होत असल्याची आनंदाची बाब त्यांनी व्यक्त केली. वेळापत्रकानुसार सावंतवाडी तालुक्याची आमसभा ६ ऑगस्टला तर दोडामार्ग तालुक्याची आमसभा ७ ऑगस्टला होणार असून, सावंतवाडी व दोडामार्गपाठोपाठ पुढील आठवड्यात वेंगुर्ला तालुक्याची आमसभा घेतली जाईल. या तिन्ही तालुक्यांचा सर्वांगीण विकास आणि पर्यटन विकासाला आपले प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

​याशिवाय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्यामुळे सावंतवाडी रेल्वे स्थानकावर तीन नव्या गाड्यांना थांबा मिळाला आहे. भविष्यात या भागात अजून जास्त गाड्या उपलब्ध करून देण्याच्या आणि सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला पाण्याची व्यवस्था पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे केसरकर यांनी शेवटी सांगितले.

पाश्चिम रेल्वेकडून विशेष गाड्यांना मुदतवाढ; कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या एका गाडीचा समावेश

   Follow us on        

Railway Updates: स्वातंत्र्य दिनी लागून आलेल्या सुट्ट्या आणि सणासुदीच्या काळाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष गाड्यांच्या फेऱ्या वाढवल्या आहेत. यात ०९४२४ / ०९४२३ | अहमदाबाद – मंगळुरू विशेष या कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या गाडीचा समावेश असल्याने कोकणात जाणार्‍या प्रवाशांची सोय होणार आहे.

मुंबई, २९ जुलै २०२६:

अतिरिक्त प्रवासी वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षित व आरामदायी प्रवासाची खात्री करण्यासाठी पश्चिम रेल्वेने अनेक लोकप्रिय विशेष गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवासारख्या आगामी सणांच्या काळात चाकरमानी आणि प्रवाशांना होणारी गर्दी लक्षात घेता हा निर्णय अत्यंत दिलासादायक ठरणार आहे.

महत्त्वाच्या गाड्यांचे तपशील व फेऱ्यांचा विस्तार:

| ट्रेन क्रमांक | गाडीचे नाव (मार्ग) | फेरीचा वार (Frequency) | वाढीव कालावधी / विस्तार

| ०९००५ / ०९००६ | बांद्रा टर्मिनस – भिवानी सुपरफास्ट विशेष | साप्ताहिक (बुधवार / गुरुवार) | २६.०८.२०२६ / २७.०८.२०२६ पर्यंत |

| ०९००१ / ०९००२ | मुंबई सेंट्रल – भिवानी सुपरफास्ट विशेष | द्वि-साप्ताहिक (मंगळवार-शुक्रवार / बुधवार-शनिवार) | २८.०८.२०२६ / २९.०८.२०२६ पर्यंत |

| ०९१८५ / ०९१८६ | मुंबई सेंट्रल – कानपूर अनवरगंज सुपरफास्ट विशेष | साप्ताहिक (रविवार / सोमवार) | ३०.०८.२०२६ / ३१.०८.२०२६ पर्यंत |

| ०९४२४ / ०९४२३ | अहमदाबाद – मंगळुरू विशेष | साप्ताहिक (शुक्रवार / शनिवार) | २८.०८.२०२६ / २९.०८.२०२६ पर्यंत |

| ०९४४७ / ०९४४८ | अहमदाबाद – पाटणा सुपरफास्ट विशेष | साप्ताहिक (बुधवार / शुक्रवार) | ०५.०८.२०२६ / ०७.०८.२०२६ पर्यंत |

| ०९०९३ / ०९०९४ | उधना – अयोध्या धाम / अयोध्या कॅन्ट – उधना विशेष | साप्ताहिक (शनिवार इ.) | २९.०८.२०२६ पर्यंत |

| ०९०९७ / ०९०९८ | उधना – अयोध्या कॅन्ट विशेष | साप्ताहिक (मंगळवार / बुधवार) | २५.०८.२०२६ / २६.०८.२०२६ पर्यंत |

| ०९०३३ / ०९०३४ | उधना – मालदा टाउन विशेष | साप्ताहिक (गुरुवार / रविवार) | २७.०८.२०२६ / ३०.०८.२०२६ पर्यंत |

| ०९४५१ / ०९४५२ | गांधीधाम – भागलपूर विशेष | साप्ताहिक (शुक्रवार / सोमवार) | २८.०८.२०२६ / ३१.०८.२०२६ पर्यंत |

आरक्षण आणि महत्त्वाची माहिती:

आरक्षण सुरू: या सर्व वाढीव फेऱ्यांचे आरक्षण आजपासून म्हणजेच २९ जुलै २०२६ रोजी सकाळी ८:०० वाजल्यापासून सर्व पीआरएस (PRS) काऊंटर्स आणि आयआरसीटीसी (IRCTC) च्या अधिकृत वेबसाइटवर सुरू झाले आहे.

या सर्व गाड्या विशेष भाड्याने (Special Fare) चालवल्या जातील आणि त्यांचा कालावधी ऑगस्ट २०२६ च्या अखेरपर्यंत राहील.

वेळापत्रक व थांबे: गाड्यांच्या वेळा, थांबे आणि रचनेसंबंधीची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी प्रवाशांनी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

 

 

View this post on Instagram

 

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search