Author Archives: Kokanai Digital

राज्यातील मुलींना १ लाख १ हजार रुपये लाभ देणाऱ्या ‘लेक लाडकी’ योजनेस मंत्रिमंडळाकडून मान्यता.

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आज मंगळवारी  पार पडली. या बैठकीत मुलींसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. मार्च 2023 च्या आर्थसंकल्पीय अधिवेशनात लेक लाडकी योजनेची (Lek Ladki Yojana) घोषणा झाली होती, या योजनेला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली आहे. या योजनेनुसार, मुलगी जन्माला आल्यापासून ते मुलगी सज्ञान होईपर्यंत तिला आर्थिक मदत केली जाणार आहे. या योजनेनुसार, राज्यात मुलीच्या जन्मानंतर 5000 रुपये देण्यात येणार आहेत. तर मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर मुलीला रोख 75 रुपये देण्यात येतील.
या ‘लेक लाडकी’ योजनेचा लाभ राज्यातील पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांतील मुलींना मिळणार आहे.  
अशी मिळणार मुलींना आर्थिक मदत
मुलगी जन्माला आल्यानंतर 5,000 रुपये
मुलगी पहिलीत गेल्यावर 6,000 रुपये
मुलगी सहावीत गेल्यावर 7,000 रुपये
मुलगी अकरावीत गेल्यावर 8,000 रुपये
मुलगी 18 वर्षांची झाल्यावर 75,000 रुपये 
अशा रितीने मुलीला एकूण 1 लाख 1 हजार रुपये एवढा लाभ राज्य सरकारकडून मिळणार आहे.

Loading

दिवा सावंतवाडी एक्सप्रेसला जोडण्यात आलेल्या एसी डब्यांना मुदतवाढ

Konkan Railway News : गाडी क्रमांक 50107 / 50108 सावंतवाडी – मडगाव – सावंतवाडी आणि त्याच रेकसह प्रवास विस्तार करणारी गाडी क्रमांक 10105 / 10106  दिवा – सावंतवाडी – दिवा एक्सप्रेस या गाड्यांना यंदाच्या  गणेशोत्सवासाठी  प्रथमच इकॉनॉमी थ्री टायर श्रेणीचे दोन वातानुकूलित डबे जोडण्यात आले होते. प्रवाशांची मागणी आणि गरज लक्षात घेऊन हे डबे  पुढील सूचना मिळेपर्यंत या गाडीला कायम ठेवण्यात येणार आहेत अशी माहिती रेल्वे प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.  
मडगाव ते सावंतवाडी आणि पुढे सावंतवाडी दिवा या गाडीच्या प्रवासाला अधिक आरामदायी बनवण्यासाठी वातानुकूलित डबे जोडले जावेत अशी मागणी रेल्वेकडे करण्यात आले होती. कोकण रेल्वेने नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवा त्याची अंमलबजावणी देखील केली. गणेशोत्सवात रेल्वेने जाहीर केल्याप्रमाणे इकॉनोमी थ्री टायर श्रेणीचे दोन डबे 14 ऑक्टोबर 2023 पर्यंत राहतील असे कळवले होते. मात्र आता त्यांना पुढील सूचनेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

Loading

सावंतवाडी टर्मिनससाठी निधी ‘सिंधुरत्न’ योजनेतून उपलब्ध करून दिला जाईल; दीपक केसरकर यांची ग्वाही

सावंतवाडी: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्या सावंतवाडी रेल्वे स्थानकावर थांबल्या पाहिजेत यासाठी आग्रही आहे. सावंतवाडी टर्मिनस देखील झाले पाहिजे. कोकण रेल्वेकडे निधी नसेल तर सिंधुरत्न योजनेतून उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांनी दिली.
खासदार विनायक राऊत यांनी सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे स्वप्न निधी अभावी धुसर झाले अशा प्रकारे केलेले वक्तव्य चुकीचे आहे. रखडलेले काम मार्गी लागण्यासाठी सिंधुरत्नमधून मी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून देईन. त्याचबरोबर वंदे भारतसह अन्य गाड्या थांबविण्यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे आपण मागणी केली आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी आज येथे दिली
खासदार राऊत यांनी सावंतवाडी टर्मिनसचे रखडलेले काम मार्गी लावण्यासाठी रेल्वेकडे निधी नाही, त्यामुळे हा प्रकल्प होण्याची शक्यता धुसर बनली आहे, अशी वक्तव्य केले होते. याबाबत श्री. केसरकर यांना विचारले असता ते म्हणाले, “याठिकाणी वंदे भारत ट्रेनसोबत अन्य महत्वाच्या गाड्या थांबविण्यासाठी मी केंद्रीय रेल्वेमंत्र्याकडे मागणी केली आहे. टर्मिनसचे स्वप्न धुसर होणार, असे वक्तव्य करणे चुकीचे आहे. काही झाले तरी ते काम पुर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेला निधी मी सिंधुरत्न योजनेतून उपलब्ध करून देणार आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची नुकतीच भेट घेऊन चर्चा केली आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकावर प्रवाशांना सुविधा व रेल्वे गाड्या मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहे. 

Loading

सावंतवाडी: माडखोल व कारिवडे येथील चार शाळा ‘निपुण शाळा’ म्हणून घोषित

सावंतवाडी: निपुण भारत अंतर्गत माडखोल केंद्रातील चार शाळांनी गुणवत्तेची प्रमुख तीन ध्येय पूर्ण केल्याने या शाळांना ‘निपुण शाळा’ म्हणून घोषित करण्यात येत आहे. जिल्ह्यात प्रथमच या चार शाळा ‘निपुण शाळा’ म्हणून घोषित झाल्या असून आता माडखोल केंद्रातील सर्व प्राथमिक शाळा घोषित करण्यात येणार असल्याची माहिती माडखोल केंद्रप्रमुख रामचंद्र वालावलकर यांनी दिली.
निपुण शाळा घोषणेची १०० टक्के उद्दिष्ट यशप्राप्ती करणाऱ्या शाळांमध्ये कारिवडे डंगवाडी, कारिवडे आपट्याचे गाळू माडखोल धुरीवाडी, माडखोल बामणादेवी या शाळांचा समावेश आहे. या चारही निपुण शाळांना आयएसओ मानांकित शाळा माडखोल धवडकी शाळा नं. २ चे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उदय राऊत, शाळेच्या मुख्याध्यापिका भावना गावडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. निपुण शाळा घोषणेची १०० टक्के उद्दिष्टे पूर्ण केल्यानंतर त्या शाळांनी त्याची घोषणा करायची आहे. या शाळेतील शिक्षक एकसमन्वय आणि समाधानाची जाणीव यातून शैक्षणिक कार्य करतात. त्यामुळे निपुण शाळेचे सर्व श्रेय या शाळेतील शिक्षकांचे असून त्यांना गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके यांचेही मार्गदर्शन मिळत असल्याचे वालावलकर यांनी सांगितले. यावेळी वारंग, शुभदा (डंगवाडी), सतीश राऊळ (आपट्याचे गाळू), प्रशांत कांदे (धुरीवाडी), अमिषा कुंभार (बामणादेवी) या निपुण शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक अरविंद सरनोबत यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

Loading

लोकसभा निवडणुकीसाठी मनसेची संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर; वाचा तुमच्या मतदारसंघातून कोण निवडणूक लढविणार…

मुंबई :सर्व राजकीय पक्षांनी येत्या 2024 लोकसभा निवडणुकी साठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना  लोकसभा निवडणुकीत लढवणार हे निश्चित झाले आहे, मनसे खाली नमूद केलेल्या लोकसभा क्षेत्रात सध्या चाचपणी करत असून त्यातील पाहिले संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. 

ही यादी खालील प्रमाणे 

  • कल्याण लोकसभा – श्री राजू पाटील
  • ठाणे लोकसभा – श्री अभिजित पानसे/ श्री अविनाश जाधव
  • पुणे लोकसभा – श्री वसंतराव मोरे
  • उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा- सौ.शालिनीताई ठाकरे
  • दक्षिण मुंबई लोकसभा- श्री बाळा नांदगावकर
  • संभाजी नगर लोकसभा – प्रकाश महाजन
  • सोलापूर लोकसभा – दिलीप धोत्रे
  • चंद्रपूर लोकसभा – श्री राजू उंबरकर
  • रायगड लोकसभा – वैभव खेडेकर

Loading

कोकण रेल्वे मार्गावर पुढील आठवड्यात दोन ठिकाणी मेगाब्लॉक; ५ गाड्यांच्या वेळापत्रकांवर परिणाम

Konkan Railway News: कोकण रेल्वे मार्गावर पुढील आठवड्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी रेल्वेच्या मालमत्तेच्या देखभालीसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत. या मेगाब्लॉक मुळे मार्गावर धावणाऱ्या ५ गाड्यांच्या वेळापत्रकांवर परिणाम होणार आहे.
मंगळवार दिनांक १० ऑक्टोबर रोजी कडवाई – रत्नागिरी या मार्गावर सकाळी ०७:४० ते १०:४० या  वेळेदरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. या मेगाब्लॉक मुळे खालील गाड्यांच्या वेळापत्रक परिणाम होणार आहे.
१) Train no. 19577 Tirunelveli Jn. – Jamnagar  Express
दिनांक ०९ ऑक्टोबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी ठोकूर ते रत्नागिरी या दरम्यान ३ तास उशिराने धावणार आहे.
२) Train no. 16346 Thiruvananthapuram Central – Lokmanya Tilak (T)  Netravati Express 
दिनांक ०९ ऑक्टोबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी ठोकूर ते रत्नागिरी या दरम्यान १ तास ३० मिनिटे उशिराने धावणार आहे.
३) Train no. 12051 Mumbai CSMT – Madgaon Jn. Janshatabdi Express
दिनांक १० ऑक्टोबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी खेड ते चिपळूण दरम्यान २० मिनिटे उशिराने धावणार आहे. 
गुरुवार दिनांक १२ ऑक्टोबर रोजी मडगाव – कुमता  या मार्गावर सकाळी ११:०० ते दुपारी ०२:०० या  वेळेदरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. या मेगाब्लॉक मुळे खालील गाड्यांच्या वेळापत्रक परिणाम होणार आहे.
1) Train no.06602 Mangaluru Central – Madgaon Jn. Special 
दिनांक १२ ऑक्टोबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी कुमता ते मडगाव दरम्यान रद्द करण्यात आली आहे.
2) Train no. 06601 Madgaon Jn. – Mangaluru Central – Special  
दिनांक १२ ऑक्टोबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी मडगाव ते कुमता दरम्यान रद्द करण्यात आली आहे.

Loading

ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वेच्या तिकीट दरातील सवलत पुन्हा सुरु करावी; दीपक केसरकरांचे रेल्वे राज्यमंत्र्यांना साकडे

मुंबई : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची रामटेक या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. याप्रसंगी केसरकर यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वे तिकीट दरात असलेली सवलत पुन्हा सुरू करण्यात यावी. तसेच महालक्ष्मी आणि हरिप्रिया एक्सप्रेसचे जुने डबे बदलून मिळावेत, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांच्याकडे पत्राद्वारे केली.
मंत्री केसरकर म्हणाले की, ज्येष्ठ नागरिक हे सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी रेल्वेला प्राधान्य देतात. त्यांना रेल्वे प्रवासात यापूर्वी लागू असलेली सवलत पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी मागणी अनेक ज्येष्ठ नागरिकांनी आपल्याकडे केली आहे. यामुळे त्यांच्यावरील आर्थिक भार कमी होण्याबरोबरच त्यांना सुरक्षित आणि सुखद प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे. त्याचप्रमाणे कोल्हापूर येथे तिरूपती तसेच मुंबई येथून अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात. यासाठी उपलब्ध असलेल्या हरिप्रिया तसेच महालक्ष्मी एक्सप्रेसचे डबे जुने आणि गैरसोयीचे झाले असल्याने ते बदलून मिळण्याबाबत भाविक आणि प्रवाशांकडून विनंती करण्यात येत आहे. हे डबे बदलून नवीन डबे मिळाल्यास प्रवाशांचा रेल्वे प्रवास सुरक्षित आणि सुखद होऊ शकणार असल्याचे मंत्री केसरकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांना सांगितले.

Loading

पुण्यात गोवन दारूचा मोठा साठा जप्त; आरोपींमध्ये सिंधुदुर्गातील दोघेजण

पुणे: राज्य उत्पादन शुल्क पथक क्रमांक 1 ने आज पुण्यातील कात्रज परिसरात एका लक्झरी बसमधून गोव्याच्या  दारूचा मोठा साठा जप्त केला. जप्त केलेल्या दारूची अंदाजे किंमत 42,90,000 रुपये आहे. या कारवाईत अवैध धंद्यात गुंतलेल्या तीन जणांना अटक करण्यात आली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला अवैध धंद्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार निरीक्षक एस.एल. पाटील यांच्या पथकाने जुना पुणे-सातारा रोडवरील कात्रज परिसरात गस्त घालत असताना भारत पेट्रोल पंपासमोर सहा चाकी लक्झरी बस अडवल्या.
तपासणी केल्यावर, त्यांना बॅगपायपर क्लासिक व्हिस्कीच्या 180 सील न केलेल्या बाटल्या (15 बॉक्स) सापडल्या, हा ब्रँड महाराष्ट्रात प्रतिबंधित आहे परंतु गोव्यात कायदेशीर आहे. जप्त केलेल्या दारूची अंदाजे किंमत 42,90,000 रुपये आहे.
गणेश बाळकृष्ण चव्हाण (वय 50, रा. सिंधुदुर्ग), अक्षय अनंत जाधव (वय 32, रा. नालासोपारा पश्चिम) आणि उमेश सीताराम चव्हाण (वय 37 रा . सिंधुदुर्ग) तिघांनाही ताब्यात घेण्यात आले

Loading

‘वंदे भारत’चा नवा स्लिपर व्हर्जन लवकरच; फोटो येथे पहा

Sleeper Version Of Vande Bharat : आरामदायी, वेग आणि अत्याधुनिक अशी ओळख असलेल्या वंदे भारतचा प्रवास आणखी आरामदायी होणार आहे. ट्रेनमध्ये नवा स्लिपर व्हर्जन येणार आहे.
केंदीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नव्या स्वरुपातील स्लिपर व्हर्जनचे फोटो शेअर केले आहेत. ट्रेनमधील स्लिपर कोच अतिशय आरामदायी असून, यामुळे प्रवाशांना सुखद अनुभव मिळणार आहे.
नव्याने प्रस्तावित स्लिपर कोच पुढील वर्षाच्या (२०२४) सुरवातीला येणार असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी म्हटले आहे.

Loading

पुणे-विजयदुर्ग एसटी बस प्रवासात वाहकाचे चांगले वर्तन; भारावलेल्या प्रवाशाने लिहिले आगाराला कौतुकाचे पत्र

सिंधुदुर्ग :एसटीच्या अस्तित्वात चालकासोबतच वाचकाचा (कंडक्टर) चा वाटा पण महत्त्वाचा मानला जातो. वाहकाची वागणूक जर विनम्र आणि सोज्वळ असेल तर प्रवासी एसटीला प्राधान्य देतो. त्यामुळे वाहकाने गर्दी आणि कामाच्या ताणला न कंटाळता अगदी प्रवाशांबरोबर चांगले वागणे गरजेचे आहे.

कित्येक वेळा एसटीच्या प्रवासात खूप चांगले अनुभव वाहकांकडून प्रवाशांना येत असतात. असाच एक अनुभव पुणे ते विजयदुर्ग या मार्गावर गणेश चतुर्थीदरम्यान प्रवास करणार्‍या एका प्रवाशाला आला. वाहकाच्या प्रवाशांना दिल्या गेलेल्या चांगल्या वागणुकीमुळे भारावून गेलेल्या या प्रवाशाने विजयदुर्ग आगाराला चक्क पत्र लिहून त्या वाहकाचे कौतुक केले आहे.

गाडी मध्ये गर्दी असूनही वाहक शिरसाट यांचा व्यवहार खूपच चांगला आणि प्रवाशांना मदत करणारा होता. अशा वाहकांमुळे एसटीची प्रतिष्ठा वाढत असल्याचे त्याने या पत्रात म्हटले आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने या पत्रास एसटीचा गौरव मानून आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंट वर प्रसिद्ध केले आहे.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search