Author Archives: Kokanai Digital
गोवा – गोव्याहून मुंबईच्या दिशेने ट्रक मधून बेकायदा होणाऱ्या दारू वाहतुकीवर गोवा अबकारी खात्याच्या पथकाने पत्रादेवी तपासणी नाक्यावर कारवाई करत २२ लाख रुपये किमतीच्या दारुसह एकूण ३७ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
या बद्दल सविस्तर वृत्त असे की काल सायंकाळी उशिरा पत्रादेवी तपासणी नाक्यावर गोव्यातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकला (एमएच ११ बीएल ९८८४) तपासणीसाठी थांबविण्यात आला. कागदपत्रे तपासताना वैयक्तिक चौकशीवेळी चालक गांगरला. ते पाहून ट्रकची प्रत्यक्ष तपासणी करण्याचे ठरवून अधिकारी बाहेर आले. तेवढ्यात चालकाने तेथून पळ काढला.
या ट्रकची तपासणी करताना या ट्रक च्या पाठीमागील हौद्यात सिमेंटचे ब्लॉक आढळून आलेत. या कारवाईत पेडणे अबकारी निरीक्षक कमलेश माजीक, विभूती शेट्ये यांच्यासह विनोद सांगडेकर, नितेश नाईक, दिनकर गवस, रामचंद्र आचार्य, रामनाथ गावस, सत्यवान नाईक, नितेश मळेवाडकर, विठोबा नाईक, स्वप्नेश नाईक, चालक दीपक परुळेकर यांनी सहभाग घेतला.
सिमेंट लाद्यांखाली दारूचे बॉक्स
ट्रकच्या बाहेरील भागात सिमेंट काँक्रीटच्या लाद्या रचून ठेवल्या होत्या. अबकारी कर्मचाऱ्यांनी त्या खाली उतरवल्या असता त्यात दारूचे लपवलेले बॉक्स आढळले. वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत कर्मचाऱ्यांनी कळविले.सर्व बॉक्सचा पंचनामा करून ट्र्क ताब्यात घेतला यात आँरेंज ,ग्रीन ॲपल,रॉयल ब्ल्यू ,किंग फिशर बीअर , डारवेज व्हीस्की, बाँम्बे कस्क या प्रकारचे बॉक्स मिळाले. सदर गाडी फोंड्याहून मुंबईला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
रत्नागिरी – महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रित) व कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड KRCL यांच्यात नुकताच सामंजस्य करार झाला आहे . या कराराअंतर्गत कोकण रेल्वेच्या रत्नागिरीस्थित प्रस्तावित कोल्ड स्टोरेज प्लांटची (Cold Storage Plant) उभारणी करण्यासाठी तसेच इतर प्रकल्पांवरही संयुक्तपणे काम करण्यात येणार आहे. या कोल्ड स्टोरेज प्लांटमुळे कोकणात उत्पादित केल्या जाणार्या शीघ्र नाशवंत उत्पादनांची साठवणूक करता येईल तसेच त्यांची निर्यात करणे सोपे होईल अशी माहिती KRCL ने आपल्या ट्विटर अकाऊंट वर दिली आहे.
महाप्रितचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी व कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
KRCL & MAHAPREIT has entered into an agreement for development of Integrated pack house Cold storage warehousing facilities at Ratnagiri station.The facilities will prove a catalyst for storage infrastructure of Export oriented products in Konkan region. @RailMinIndia @mahapreit pic.twitter.com/eTKhBZs442
— Konkan Railway (@KonkanRailway) May 12, 2023

चिपळूण – माझ्या जमिनीत अतिक्रमण झाले आहे. आपल्याला न्याय जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत मी हे आंदोलन थांबवणार असे म्हणत एका प्रकल्पग्रस्त शेतकर्यांने मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूणच्या कामथे येथे चक्क लोळण घातली आणि महामार्ग अर्धा तास अडविला. भर उन्हात काल सकाळी तब्बल वीस ते पंचवीस मिनिटे तो रस्त्यावर झोपून होता. यामुळे दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
अधिक माहितीनुसार, मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूणच्या कामथे येथे हे आंदोलन करण्यात आले आहे. सदर शेतकरी प्रकल्पग्रस्त असून त्याने आपल्याला मोबदला मिळाला नसल्याचा आरोप केला आहे. जोपर्यंत मला याचा मोबदला मिळत नाही तोपर्यंत मी रस्त्यावर बसून राहणार आहे असं त्याने सांगितलं आहे.
चिपळूण पोलिसांना याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि नैनीश दळी नामक त्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेत महामार्ग मोकळा केला.
रत्नागिरी : रत्नागिरी रेल्वेस्टेशनवर ब्राउन हेरॉईन ची तस्करी करणाऱ्या एका तरुणाला शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने काल अटक केली, त्याच्याकडून 12.8 ग्रॅम ब्राउन हेरॉईन हा अंमली पदार्थ मिळून आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलिस उपनिरीक्षक आकाश साळुंखे व पोलिस अंमदलार शहरातील विविध भागांमध्ये पेट्रो लिंग करत होते.तेव्हा रत्नागिरी रेल्वेस्टेशन परिसरातील प्लॅटफॉर्म नं.1 वरुन पार्सल गेटने पार्किंगकडे एक तरुण जाताना त्यांना दिसून आला.त्याच्या पाठीवर एक सॅक होती आणि त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने या पथकाने त्याला थांबवून त्याची चौकशी केली.तेव्हा त्याच्या जिन्स पॅन्टच्या उजव्या खिशात 5 पारदर्शक प्लास्टिक पिशव्या ज्यात 450 टर्की पावडर असलेल्या कागदी पुड्या मिळून आल्या.त्याच्याकडील सर्व मुददेमाल जप्त करण्यात आला असून त्याच्यावर शहर पोलिस ठाण्यात एन.डी.पी .एस अॅक्ट कलम 8 (क),22 (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलिस उपिनिरीक्षक आकाश साळुंखे,पोलिस हेड काँस्टेबल प्रसाद घोसाळे,गणेश सावंत,प्रविण बर्गे,अमोल भोसले,पोलिस नाईक आशिष भालेकर,विनय मनवाल आणि रत्नकांत शिंदे यांनी केली असून अधिक तपास सुरु आहे.
Road Accident News – राज्यातील खेड्यापाड्यात वाहतुकीची सार्वजनिक वाहतुकीची अपुरी सोय, खिशाला न परवडणारे खाजगी वाहतुकीचे पर्याय यामुळे तेथे सर्रास नियम मोडून क्षमते पेक्षा अधिक प्रवासी भरून वाहने चालवण्यात येतात, त्यामुळे अपघातांची शक्यता वाढते. अशाच एका प्रकारामुळे रत्नागिरी येथील खेड येथे एका महिलेला अपघातात जीव गमवावा लागला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की रत्नागिरी जिल्ह्यातल्या काल मंगळवारी 9 मे रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास खेड शिवतर मार्गावर मुरडे शिंदेवाडी या ठिकाणी नातेवाईकांच्या लग्नाला जात असताना एक रिक्षा नातवडी धरणाच्या कॅनलमध्ये कोसळली.यात एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याचे कळते तर सहा जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे.अपघात मुरडे शिंदेवाडी येथून जाणाऱ्या कॅनॉलमध्ये घडला.माहितीनुसार खेडमधील एकाच कुटुंबातील काही लोक ऑटो रिक्षा मधून मुरडे शिंदेवाडी या ठिकाणी आपल्या नातेवाईकांच्या लग्नाला जात होते. नातूवाडी धरणाच्या कॅनॉलच्या ठिकाणी असलेल्या मोठ्या चढावर रिक्षा चढली नाही व रिक्षा चालकाचा ताबा सुटून रिक्षा उलटी खाली येऊन थेट आठ ते दहा फूट खोल असणाऱ्या कॅनॉलमध्ये पडली. या रिक्षात 7 ते 8 प्रवासी बसले होते.
Konkan Railway News | उन्हाळी सुट्टीत कोकण रेल्वेमार्गे प्रवास करणाऱ्या प्रशांसाठी एक रेल्वेकडून महत्वाची बातमी आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेतून रेल्वे प्रशासनाने या मार्गावर धावणाऱ्या काही गाडयांना तात्पुरत्या स्वरूपात अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. या अतिरिक्त डब्यांमुळे प्रतीक्षा यादीतील प्रवाशांचा फायदा होणार आहे.
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार खालील गाड्या अतिरिक्त डब्यांसहित समोर दिलेल्या तारखांना चालविण्यात येतील.
Sr. No. Train No. Journey Commences On Coach Augmented
1 22908 Hapa - Madgaon Express Ex Hapa on 10/05/2023 1
2 22907 Madgaon Jn. - Hapa Express Ex. Madgaon Jn. on 12/05/2023 1
3 20910 Porbandar - Kochuveli Express Ex. Porbandar on 11/05/2023 1
4 20909 Kochuveli - Porbandar Express Ex. Kochuveli on 14/05/2023 1
5 17310 Vasco Da Gama - Yesvantpur Daily Express Ex. Vasco Da Gama on 09/05/2023 1
6 17309 Yesvantpur - Vasco Da Gama Daily Express Ex. Yesvantpur on 10/05/2023 1
7 16595 KSR Bengaluru City - Karwar Daily Express Ex. KSR Bengaluru City on 09/05/2023 1
8 16596 Karwar - Bengaluru City Daily Express Ex Karwar on 10/05/2023 1