Author Archives: Kokanai Digital


Konkan Railway News : कोकण रेल्वे मार्गावर एक थरारक घटना घडली आहे. कोकण रेल्वेच्या गेटमनची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. कोलाडजवळील तिसे येथील रेल्वे फाटकाजवळ हा हत्येचा थरार रंगला.यामुळे रेल्वे फाटक परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
कोकण रेल्वे मार्गावरील कोलाड स्थानकाजवळ गेटमनची गोळया झाडून हत्या करण्यात आली. चंद्रकांत कांबळे असे असे हत्या झालेल्या गेटमनटे नाव आहे. मृत मोटरमन हा तेथून जवळच असलेल्या महाबळे गावचा रहिवासी आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर आरोपी तेथून पसार झाला आहे. हल्लेखोर आणि हत्येमागचे कारण अद्याप समजू शकले नाही.
या हत्येचे वृत्त समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा सुरू केला. या घटनेनंतर महाबळे ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. भर दिवसा हत्या झाल्याने ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले. जोपर्यंत मारेकऱ्याला अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली होती. यामुळे येथे तणावाचे वातावरण होते.


Train no. | Station | Timings | With Effect from Journey commences on |
---|---|---|---|
16345 Lokmanya Tilak (T) - Thiruvananthapuram Central Netravati Express | Sangameshwar Road | 17:34 / 17:36 | 22/08/2023 |
16346 Thiruvananthapuram Central - Lokmanya Tilak (T) Netravati Express | Sangameshwar Road | 09:56 / 09:58 | 22/08/2023 |
12618 H. Nizamuddin - Ernakulam Jn. Mangala Express | Khed | 10:08 / 10:10 | 22/08/2023 |
12617 Ernakulam Jn. - H. Nizamuddin Mangala Express | Khed | 08:12 / 08:14 | 22/08/2023 |
22113 Lokmanya Tilak (T) - Kochuveli Express | Khed | 20:56 / 20:58 | 22/08/2023 |
22114 Kochuveli - Lokmanya Tilak (T) Express | Khed | 02:20 / 02:22 | 24/08/2023 |
Mumbai Goa Highway : कोकणवासीयांना त्रास देणारा आणि येथील राजकारण्यांना शरमेने मान खाली घालाव्या लागणार्या मुंबई गोवा महामार्गाचा विषय महाराष्ट्राची हास्यजत्रा या मराठी विनोदी मालिकेत सुद्धा चांगलाच गाजला आहे. ज्या विनोदी मालिकेत प्रेक्षकांना हसवण्यात येते त्याच विनोदी मालिकेत हा गंभीर विषय दाखविण्यात आला आहे.
मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे हा कधीच विनोदाचा विषय होऊ शकत नाही यात वाद नाही. कारण या खड्ड्यांमुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. मात्र या विनोदी मालिकेत या विषयाचे भांडवल न करता साध्या आणि सोप्या पद्धतीने कोकणातील जनतेला एक स्पष्ट मेसेज देण्यात आला आहे. ‘मी एकटा काय करणार?’ ह्या विचाराने कित्येक कोकणवासिय या प्रश्नावर गप्पच असल्याने हा विषय सुटत नाही. या प्रश्नासाठी प्रत्येकाने आपल्या परीने सुरवात केली पाहिजे.
