
मुंबई :यंदा कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्यां चाकरमान्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकावेळी एक नाही तर दोन खुशखबर दिल्या आहेत. यावर्षी शिंदे गटाकडून मोफत एसटी बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदार संघ विभागातून १२ ते १८ मोफत बसगाड्या सोडल्या जाणार आहेत. तर कोल्हापूर मार्गे जाणाऱ्यांसाठी टोलमाफी दिली जाणार आहे. शनिवारी वर्षा बंगल्यावर या संदर्भात निर्णय घेण्यात आला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली या संदर्भात काल वर्षा बंगल्यावर बैठक पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. मुंबई गोवा महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे शिंदे गटाने सांगितले.
तसेच ज्यांना बुकिंग मिळालं नाही किंवा ज्यांच्याकडे जाण्याची काही सोय नाही अशा लोकांसाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबईच्या प्रत्येक विधान सभा मतदार संघातून या गाड्या सोडल्या जाणार आहेत. वर्षा बंगल्यावर झालेल्या या बैठकीत मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, श्रीकांत शिंदे उपस्थित होते. तसेच काही पदाधिकारी देखील या बैठकीला उपस्थित होते.
Facebook Comments Box
Related posts:
Mumbai Goa Highway: खुशखबर! कशेडी घाट बोगदा लवकरच पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला होणार
कोकण
अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरण तपासात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल टेरव रत्नागिरीचे सुपुत्र सहा...
कोकण
📽️.. तर कोकणच्या अशा प्रकारच्या विकासाला 'रानमाणसांची' साथ | प्रसाद गावडे |युआरएल फाऊंडेशन पुरस्कार
कोकण गौरव