मुंबई :चाकरमान्यांची चिंता वाढवणारी एक बातमी आहे. ऐन गणेशोत्सवासच्या तोंडावर म्हणजे दिनांक 11 सप्टेंबर या दिवशी एसटी बस कर्मचारी आंदोलन करणार असून त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास ते संपावर जाण्याची शक्यता आहे. या संपामुळे मुंबई पुण्यावरून कोकणात गावी जाणार्या चाकरमान्यांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागणार आहे.
एसटी कर्मचारी त्यांच्या मागण्यांसाठी पुन्हा आक्रमक झाले असून ऐन गणपतीच्या तोंडावर त्यांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. पगारवाढ, पदोन्नती अशा विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या मान्यताप्राप्त संघटनेने प्रलंबित आर्थिक मुद्द्यांच्या सोडवणुकीसाठी 11 सप्टेंबरला ही संपाची हाक दिलीय. हे कर्मचारी मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषण करणार आहेत. जर सरकारने ऐकले नाही तर 13 सप्टेंबरपासून प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक आगारात कर्मचारी काम बंद करून उपोषणाला बसणार आहेत.
छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीतहा निर्णय घेण्यात आलाय.
काय आहेत मागण्या?
बैठकीत करारातील तरतुदीनुसार सरकारने 42% महागाई भत्ता त्वरीत लागू करावा, घरभाडे भत्ता, वेतनवाढीचा दर यांचा फरक त्वरीत अदा करावा, मूळ वेतनात जाहीर झालेल्या पाच हजार, चार हजार, अडीच हजारामुळे सेवाज्येष्ठ कर्मचा-यांच्या वेतनात निर्माण झालेल्या विसंगती दूर कराव्यात
दहा वर्षांसाठी सातवा वेतन आयोग लागू करावा. एसटीची धाववेळ (रनिंग टाईम) निश्चित करावी.तसेच वाहकांचे (कंडक्टर) बदली धोरण रद्द करावे, खाजगी गाड्यांऐवजी स्वमालकीच्या नवीन बसेसचा पुरवठा त्वरीत करण्यात यावा. लिपिक- टंकलेखक पदाच्या बढतीसाठी 240 हजर दिवसांची अट रद्द करावी. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पत्नीसह व विद्यमान कर्मचाऱ्यांना महामंडळाच्या सर्व प्रकारच्या गाड्यांचा वर्षभर मोफत फॅमिली पास देण्यात यावा.अनेक विभागात 10-12 वर्षापासून कर्मचारी TTS आहेत त्यांना एकवेळची बाब म्हणून TS करण्यात यावे, जुल्मी शिस्त व आवेदन कार्यपद्धती त्वरीत रद्द करावी, अशा मागण्या संघटनेने केल्या आहेत.
गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात मुंबई पुण्यातून चाकरमानी कोकणातील आपल्या गावी जात असतो. एसटी महामंडळही मोठ्या प्रमाणात अतिरिक्त गाड्या सोडून प्रवाशांना सेवा देते. या गाड्यांना चांगला प्रतिसाद मिळतो आणि या काळात एसटीला चांगला फायदा होतो. हीच गोष्ट हेरून संघटनेने त्याच वेळी संपाचे हत्यार पुन्हा उगारले आहे.
रत्नागिरी :कोकण रेल्वे मार्गावरील वसई रोड रेल्वे स्टेशन महाराष्ट्र आणि सावंतवाडी , सिंधुदुर्ग दरम्यान नियमित विशेष ट्रेन सुरु करण्यात यावी यासाठी खासदार विनायक राऊत यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची दिल्ली येथे भेट घेतली. या भेटीत त्यांनी या गाडीच्या मागणीचे निवदेन रेल्वे मंत्र्यांना दिले.
या निवेदनात म्हटले आहे की , मोठ्या संख्येने कोकणातील लोक वसई आणि जवळपासच्या भागात काम आणि व्यवसाय इत्यादीसाठी राहतात. ते त्यांचे मूळ गाव कोकण ते वसई दरम्यान वारंवार प्रवास करतात. मात्र, सध्या वसई रोड स्थानकावरून सावंतवाडीला जाण्यासाठी थेट नियमित गाडी नाही, त्यामुळे कोकण आणि वसई दरम्यान रेल्वेने ये-जा करण्यासाठी दादर आणि ठाणे ही रेल्वे स्थानके हेच पर्याय उपलब्ध असल्याने त्यांची गैरसोय तर होतेच शिवाय त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
कोकण रेल्वेमार्गावर वसई रोड ते सावंतवाडी दरम्यान विशेष ट्रेन सुरू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. कोकणातील लोकांच्या या मागणीचा अनुकूलपणे विचार करून कोकण रेल्वे मार्गावर वसई रोड स्टेशन (महाराष्ट्र) आणि सावंतवाडी दरम्यान नियमित विशेष ट्रेन त्वरित सुरू करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी खा . राऊत यांनी केली आहे
आंबोली | पर्यटन संचालनालयाच्या माध्यमातून स्थानिक ग्रामपंचायत, जिल्हा प्रशासनातर्फे १२ ते १६ ऑगस्ट या कालावधीत ‘आंबोली वर्षा महोत्सव’ आयोजित केला आहे.
या महोत्सवाचे उदघाटन राज्याचे पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार असून, केंद्रीय मंत्री नारायण राणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, विधानसभा आमदार वैभव नाईक, विधानसभा आमदार नितेश राणे, विधान परिषद सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे, निरंजन डावखरे आणि अनिकेत तटकरे तसेच आंबोली गावचे सरपंच सौ. सावित्री संतोष पालकर या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. या महोत्सवास उपस्थित राहण्याचे आवाहन राज्य पर्यटन प्रधान सचिव श्रीमती राधिका रस्तोगी, राज्याचे पर्यटन संचालनालय संचालक डॉ. बी. एन. पाटील आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्रीमती के. मंजूलक्ष्मी यांनी केले आहे.
पाच दिवसांच्या या वर्षा महोत्सवाची सुरुवात आंबोली येथे १२ ऑगस्टला सकाळी ११ वाजता स्थानिक ढोलताशा, गणेशवंदनाच्या माध्यमातून होईल. साहसी क्रीडा प्रकार, झिप लाईन सफर, दशावतार, नाईट सफर, १३ ऑगस्टला जलक्रीडा प्रकार, जेटस्की, स्पीड बोट, बनाना बम्पर राईड, हिरण्यकेशी ट्रेकिंग, सांस्कृतिक कार्यक्रम, फुगडी, जंगल सफर, १४ ला रॅपलींग जैवविविधता माहिती, सांस्कृतिक कार्यक्रम ”चांगभलं”, जंगल सफर, १५ ला सैनिक स्कूल मुलांच्या कवायती, शहीद हवालदार पांडुरंग गावडे स्मारक येथे माजी सैनिकांचे संचलन, सांस्कृतिक कार्यक्रम चित्रकथी, जंगल सफर, १६ ला महादेव गड ट्रेकिंग, आंबोली सफर आदी विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. जिल्ह्यातील पावसाळी पर्यटन वाढीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. राज्याने जिल्ह्यातील बारमाही पर्यटनासाठी सुरू केलेल्या उपक्रमाचे पर्यटन महासंघाने स्वागत केले असून, अशा महोत्सवांमुळे जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी मदत होईल, असा विश्वास मोंडकर यांनी व्यक्त केला आहे.
मुंबई : मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेची दखल उच्च न्यायालयाने घेतली असून या महामार्गाच्या दुरवस्थेविरोधात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर उद्या शुक्रवारी उच्च न्यायालयात सुनावणी करण्यात येणार आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की मुंबई गोवा महामार्गावरील मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल नेटवर्किंग साईटवर व्हायरल होत आहेत. या महामार्गावर एका भल्यामोठ्या खड्ड्यात एक तरुणाने उतरून पोहण्याचा बनवलेला व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. हे व्हिडिओ याचिकाकर्ते अॅड ओवेस पेचकर यांनी न्यायालयात सादर करून गंभीर स्थिती न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. या व्हिडिओची मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या खंडपीठाने दखल घेतली असून त्याबाबत उद्या दिनांक 11 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार असल्याचे जाहीर केले.
प्रतिज्ञापत्रकात पुन्हा खोटा दावा.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आत्ताच आपले प्रतिज्ञापत्र सादर केले असून त्यात फक्त दीड किलोमीटर भागात काहीश्या प्रमाणात खड्डे पडले असल्याचे नमूद केले आहे. मात्र खरी परिस्थिती वेगळी आहे. इंदापूर ते कासू दरम्यान खूप मोठे खड्डे पडल्याचे चित्र दिसत आहे. यावरून नेहमीप्रमाणे NHAI अधिकाऱ्यांचा खोटारडेपणा समोर आला आहे.
रायगड : मुंबई गोवा महामार्गाची सध्या मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. अनेक प्रयत्न करूनही महामार्गाच्या कामाला गती मिळू शकलेली नाही. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे, प्रवाशांचे आणि वाहनचालकांचे हाल होत आहेत. वडखळ ते इंदापूर या मार्गाची सध्या चाळण झालेली आहे. महामार्गाच्या या दुरावस्थेकडे कोकणातील लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी रायगड प्रेस क्लबच्या वतीने आंदोलन करण्यात आले. आज सकाळी अकरा वाजता महामार्गावर वाकण फाटा येथे हे आंदोलन करण्यात आले. स्थानिक लोप्रतिनिधींनी विरोधात बोंबाबोंब करण्यात आली.
मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त आणि ज्येष्ठ पत्रकार एस एम देशमुख, मिलिंद आष्टीवकर, रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज खांबे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण पालकमंत्री उदय सामंत खासदार सुनील तटकरे आणि खासदार श्रीरंग बारणे, महिला व बालकलयाण मंत्री आदिती तटकरे यांना एसएमएस पाठविण्यात आले .
Konkan Railway News: प्रवाशांची अतिरिक्त गर्दी पाहून पश्चिम रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावर एक अतिरिक्त गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
Train No. 09018 / 09017 Udhna – Madgaon Jn. – Udhna (Bi-Weekly) Special on Special Fare:
09018 Udhna – Madgaon Bi-Weekly Special
ही गाडी शुक्रवारीदिनांक 11/08/2023 या दिवशी उधना येथून दुपारी ३.२५ वाजता सुटेल ती मडगाव स्टेशन ला दुसऱ्यादिवशी सकाळी ०९:३० ला पोहचेल.
09017 Madgaon – Udhna Bi-Weekly Special
ही गाडी शनिवार दिनांक 12/08/2023 या दिवशी मडगाव येथून सकाळी १०:२० वाजता सुटेल ती उधना स्टेशनला दुसऱ्यादिवशी सकाळी ०५:०० ला पोहचेल.
ह्या गाड्या नवसारी, वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी , राजापूर रोड, वैभववाडी रोड,कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रॊड, थिवीम, करमाळी ह्या सर्व स्थानकांवर थांबतील.
डब्यांची स्थिती
Composite ( First AC + 2 Tier AC) – 01 Coach, 2 Tier AC – 02 Coaches, 3 Tier AC – 06 Coaches, Sleeper – 08 Coaches, General – 03 Coaches, SLR – 01, Generator Car – 01. असे मिळून एकूण 22 LHB डबे
आरक्षण
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक 09017 Madgaon – Udhna Bi-Weekly Special on Special Fare या गाडीचे आरक्षण उद्या दिनांक 10 ऑगस्ट पासून अधिकृत संकेतस्थळांवर आणि आरक्षण खिडक्यांवर सुरू होणार आहे.
आंबोली : जंगलात होणारे मानवीअतिक्रमण, अतिप्रमाणात होणारी वृक्षतोड आणि शिकारीमुळे अनेक वन्य प्रजातीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. काही प्रजाती तर समूळ नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. मात्र वनपरिसंस्थेचे महत्व जाणून त्याचे जाणून त्याचे रक्षण करणे, प्राणिमात्रांवर दया दाखवणे हे आपले आद्य कर्तव्य मानणारे अजूनही काही लोक आपणास कोकणात आढळून येत आहे. याची अनुभूती आज आंबोली येथे अनुभवण्यास मिळाली.
आंबोली फौजदारवाडी येथील हिरण्यकेशी नदीपात्रात आज सकाळी कुत्र्यांनी एका सांबराच्या पिल्लाला शिकारीसाठी घेरले होते. त्याचवेळी तेथून रिक्षा घेऊन जाताना जवळच घर असणाऱ्या रानमाणूस” प्रथमेश गावडे याला लक्षात आल्यानंतर त्याने त्या पिल्लाला सोडवण्यासाठी प्रयत्न केले.त्याच्यासोबत मग शैलेश गावडे आणि राकेश अमृसकर हे देखील आले यानंतर त्यांनी आंबोली वन विभागाला कळवल्यानंतर बाळा गावडे आणि वनरक्षक श्री. गाडेकर यांनी त्या पिल्लाला आंबोली वनकार्यालयात नेले पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून उपचार करून नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात येणार आहे. हे पिल्लू साधारण अंदाजे वर्षभराचे आहे. कुत्र्यांच्या झुंडीत सापडल्याने पिल्लू भयभीत झाले होते. आईपासून दुरावलेले हे पिल्ले भरकटलेल्याने वाट चुकले आणि कुत्र्यांच्या तावडीत सापडले. कुत्र्यांनी त्याला चारही बाजूंनी घेरले; मात्र त्याचवेळी तेथे पोहोचलेले प्रथमेश गावडे यांच्यामुळे पिल्लास जीवदान मिळाले.
रत्नागिरी |कोकणातील पर्यटनाला चालना देण्याकरिता रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण रेल्वे स्थानकांच्या पोहोच मार्गाची देखभाल दुरुस्ती व परिसराचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे त्यासाठी कोकण रेल्वे महामंडळ मर्यादित KRCL आणि सार्वजनिक बांधकाम विभाग PWD यांच्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला होता. या करारानुसार प्रवाशांची वर्दळ असणाऱ्या महत्त्वाच्या १२ रेल्वे स्थानकांचे काम पहिल्या टप्प्यात हाती घेण्यात आले आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात या स्थानकांवरील कामांकरिता ५६.२५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून या कामांचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते भूमिपूजन ऑनलाईन पध्दतीने काल करण्यात आले.
खालील १२ रेल्वे स्थानकांचे होणार सुशोभिकरण :
✅रायगड जिल्हा- वीर, माणगाव आणि कोलाड
✅रत्नागिरी जिल्हा – चिपळूण, रत्नागिरी, संगमेश्वर, राजापूर आणि खेड
✅सिंधुदुर्ग जिल्हा – कणकवली, सिंधुदुर्गनगरी, कुडाळ आणि सावंतवाडी
पाश्चिम रेल्वेने नुकत्याच जाहीर केलेल्या विशेष गाड्यांचे आरक्षणाची तारीख रेल्वे प्रशासनाने जाहीर केली आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार खालील गाड्यांचे आरक्षण दिनांक 12 ऑगस्ट रोजी अधिकृत संकेतस्थळ आणि तिकीट आरक्षण खिडक्यांवर चालू होणार आहे.
1) Train no. 09019 Madgaon – Udhna Bi-Weekly Special on Special Fare
2) Train no. 09411 Kudal (Weekly) – Ahmedabad Jn. Special on Special Fare
Konkan Railway News | 08 Aug 2023 21:30 :रेल्वे प्रशासनाने दिलेल्या अधिक माहितीनुसार प्रवाशांच्या सोयीसाठी वेस्टर्न रेल्वे अहमदाबाद ते कुडाळ ही एक अजून एक विशेष गाडी चालविणार आहे. त्यामुळे या तिन्ही गाड्यांच्या एकूण २२ फेऱ्या होणार आहेत. या गाडीची अधिक माहिती खालीलप्रमाणे
3) Train no. 09412 / 09411 Ahmedabad Jn. – Kudal – Ahmedabad Jn. (Weekly) Special on Special Fare:
Train no. 09412 Ahmedabad Jn. – Kudal (Weekly) Special on Special Fare:
ही गाडी दि. सप्टेंबर महिन्याच्या १२,१९आणि २६ या तारखांना (मंगळवारी) अहमदाबाद या स्थानकातून सायंकाळी ०९:३० वाजता सुटून दुसर्या दिवशी कुडाळ येथे पहाटे ०४ वाजून १० मिनिटांनी पोहचेल
Train no. 09411 Kudal (Weekly) – Ahmedabad Jn. Special on Special Fare:
ही गाडी दि. सप्टेंबर महिन्याच्या १३,२०आणि २७ या तारखांना (बुधवारी) कुडाळ या स्थानकातून सकाळी ०६:३० वाजता सुटून दुसर्या दिवशी अहमदाबाद येथे पहाटे ०३:३० वाजता पोहचेल
2 Tier AC – 02 Coach, 3 Tier AC – 06 Coaches, Sleeper – 08 Coaches, Second Seating – 04 Coaches , SLR – 01, Generator Van – 01 असे मिळून एकूण 22 LHB डबे
Konkan Railway News | 08 Aug 2023 19:30: गणेशोत्सवासाठी गावी जाणार्या चाकरमान्यांसाठी एक खुशखबर आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी वेस्टर्न रेल्वेने अजून काही गाड्या कोकण रेल्वेमार्गावर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार खालील गाड्या गणेशोत्सवासाठी विशेष गाड्या म्हणून चालविण्यात येतील.
1) Train No. 09020 / 09019 Udhna – Madgaon Jn. – Udhna (Bi-Weekly) Special on Special Fare:
09020 Udhna – Madgaon Bi-Weekly Special
ही गाडी सप्टेंबर महिन्याच्या १६,२०,२३, २७,३० (बुधवार आणि शनिवार) या दिवशी उधना येथून दुपारी ३.२५ वाजता सुटेल ती मडगाव स्टेशन ला दुसऱ्यादिवशी सकाळी ०९:३० ला पोहचेल.
09019 Madgaon – Udhna Bi-Weekly Special
ही गाडी सप्टेंबर महिन्याच्या १७,२१,२४, २८ आणि ओक्टोम्बर महिन्याच्या १ तारखेला (गुरुवार आणि रविवार) या दिवशी मडगाव येथून सकाळी १०:२० वाजता सुटेल ती उधना स्टेशनला दुसऱ्यादिवशी सकाळी ०५:०० ला पोहचेल.
ह्या गाड्या नवसारी, वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिर, राजापूर रोड, वैभववाडी रोड,कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रॊड, थिवीम, करमाळी ह्या सर्व स्थानकांवर थांबतील.
डब्यांची स्थिती
Composite ( First AC + 2 Tier AC) – 01 Coach, 2 Tier AC – 02 Coaches, 3 Tier AC – 06 Coaches, Sleeper – 08 Coaches, General – 03 Coaches, SLR – 01, Generator Car – 01. असे मिळून एकूण 22 LHB डबे
2) Train No. 09057 / 09058 Udhna – Mangaluru Jn. – Udhna (Weekly) Special on Special Fare:
Train no. 09057 Udhna Jn. – Mangaluru Jn. Weekly Special
ही गाडी दि. सप्टेंबर महिन्याच्या १३,२०आणि २७ या तारखांना (बुधवारी) उधाणा येथून सायंकाळी ८ वाजता सुटून दुसर्या दिवशी मंगळरू येथे संध्याकाळी ०६ वाजून ३० मिनिटांनी पोहचेल
Train no. 09058 Mangaluru Jn. – Udhna Jn. Weekly Special
ही गाडी दि. सप्टेंबर महिन्याच्या १४,२१ आणि २८ या तारखांना (गुरुवारी) मंगळरू येथून रात्री २०:४५ वाजता सुटून दुसर्या दिवशी संध्याकाळी ८ वाजता ती उधणा येथे पोहचेल.
Konkan Railway News :पश्चिम रेल्वेने कोंकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या ट्रेन क्र 20932 / 20931 इंदूर – कोचुवेली – इंदूर साप्ताहिक एक्सप्रेस या गाडीच्या डब्यांच्या संरचनेत बदल केला आहे. या गाडीचे 02 स्लीपर कोच बदलून त्याऐवजी 02 इकॉनॉमी थ्री टायर एसी डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे.
20932 इंदूर-कोचुवेली साप्ताहिक एक्सप्रेस या गाडीसाठी हा बदल दिनांक १९ डिसेंबर २०२३ पासून करण्यात येणार आहे.
20931कोचुवेली – इंदूर साप्ताहिक एक्सप्रेस या गाडीसाठी हा बदल दिनांक २२ डिसेंबर २०२३ पासून करण्यात येणार आहे.