सिंधुदुर्ग: देवगड तालुका व्यापारी पर्यटन समितीने देवगड येथे कातळशिल्प सहलीचे आयोजन केले आहे. दिनांक ८ जानेवारी २०२३ ला हि सहल आयोजित केली गेली आहे. ह्या सहलीत देवगड विविध ठिकाणाची १८ कातळशिल्प दाखवली जातील.
ह्या सहलीसाठी ४५० रुपये आकारण्यात येणार आहेत त्यामध्ये प्रवास भाडे, सकाळचा चहा, नाश्ता आणि दुपारी शाकाहारी जेवण समाविष्ट असेल. पर्यटक स्वतःची गाडी पण या सहलीसाठी आणू शकतात. अशा पर्यटकांना सवलत दिली जाईल.
Follow us on
सहलीची रूपरेषा
दिनांक – रविवार दिनांक ८ जानेवारी २०२३ रोजी सकाळी 8:00 वाजता देवगड स्टॅन्ड वरून प्रवासाला सुरवात होणार आहे. वाघोटन येथील कातळशिल्प व ऐतिहासिक वास्तू पाहून त्यानंतर बापर्डे,वानिवडे,तळेबाजार, दाभोळे येथील पोखरबावं येथील कातळशिल्पे पाहून माघारी फिरुन देवगडला सहल समाप्त होईल. या पूर्ण सहलीत 15 ते 18 सुबक कातळ शिल्पे पाहायला मिळतील.
कातळशिल्पे म्हणजे काय?
नवाश्मयुगीन माणसाने जांभा खडकावर म्हणजेच कातळावर जी चित्रे कोरली त्यालाच आपण कातळशिल्प असे म्हणतो. कातळशिल्प जगात काही मोजक्या ठिकाणीच आढळतात ब्राझील, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका या ठिकाणी आढळून आली आहेत. पण भारतातील कोकणात फार मोठ्या प्रमाणात ती आढळतात आणि याचंच भान राखून देवगड इतिहास संशोधन मंडळाने कातळशिल्प शोध मोहीम व ती सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रयत्नांना साथ म्हणून ह्या सहलीचे आयोजन करण्यात आले आहे.
ह्या सहलीबद्दल अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी श्री अजित टाककर ,मोबाईल नंबर -9689163017 यांच्याशी संपर्क साधावा.
Grampanchayat Election 2022 : जास्तीत जास्त मतदारांनी या ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान करावे यासाठी १८ डिसेंबरला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ज्या खाजगी आस्थापनांना आपल्या कर्मचाऱ्यांना सुट्टी देणं शक्य नसेल त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना किमान २ तासांची सवलत द्यावी असे आदेश शासनाकडून जारी करण्यात आले आहेत. तसेच मतदानासाठी कर्मचाऱ्यांना सवलत न देणाऱ्या दुकाने, कार्यालयांवर कारवाई केली जाणार असल्याचही या आदेशात म्हटलं गेलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, उर्जा आणि कामगार विभागाने हे आदेश जारी केले आहेत.
नक्की काय आहे हा आदेश
1) निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार/अधिकारी/कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी.
2) सदर सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना लागू राहिल (उदा. खाजगी कंपन्या यामधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाटयगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इ.)
Follow us on
3) अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत त्यांनी संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहिल. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहिल.
4) वर नमूद केल्यानुसार उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींच्या मालकांनी/व्यवस्थापनाने वरील सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास, त्यांच्याविरुध्द योग्य कारवाई करण्यात येईल.
Konkan Railway News :ख्रिसमस सण साजरा करण्यासाठी गोव्यात जाणाऱ्या पर्यटकांसाठी एक खुशखबर आहे. कोंकण रेल्वेने ह्या सणासाठी या मार्गावर अजून काही अतिरिक्त गाड्या सोडायचा निर्णय घेतला आहे.
खालील गाड्या विशेष शुल्कासह ह्या मार्गावर चालविण्यात येणार आहेत.
1) Train no. 09057 / 09058 Udhana – Mangaluru Jn. – Udhana (Bi-Weekly) Special on Special Fare
ह्या गाड्या उधना ते मंगुळुरु ह्या स्थानकांदरम्यान चालविण्यात येणार आहेत.
Train No 09057
ही गाडी दिनांक 21/12/2022 ते 01/01/2023 पर्यंत प्रत्येक बुधवार आणि रविवार ह्या दिवशी चालविण्यात येणार आहे. ही गाडी उधना ह्या स्थानकावरुन रात्री 20.00 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी संध्याकाळी 18.30 वाजता मंगुळुरु स्थानकावर पोहोचेल.
Train No 09058
ही गाडी दिनांक 22/12/2022 ते 02/01/2023 पर्यंत गुरुवार आणि सोमवार ह्या दिवशी चालविण्यात येणार आहे. ही गाडी मंगुळुरु स्थानकावरून रात्री 20.45 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी संध्याकाळी 19.25 वाजता उधना स्थानकावर पोहोचेल.
2) Train no. 09412 / 09411 Ahmedabad Jn – Karmali – Ahmedabad Jn (Weekly) Special on Special fare.
ह्या गाड्या अहमदाबाद ते करमाळी ह्या स्थानकांदरम्यान चालविण्यात येणार आहेत.
Train no. 09412
ही गाडी दिनांक 20/12/2022 आणि 27/12/2022 मंगळवारी चालविण्यात येणार आहे. ही गाडी अहमदाबाद स्थानकावरून सकाळी 09.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 05.00 वाजता करमाळी जंक्शन ह्या स्थानकावर पोहोचेल.
Train no. 09411
ही गाडी दिनांक 21/12/2022 आणि 28/12/2022 बुधवारी चालविण्यात येणार आहे. ही गाडी करमाळी स्थानकावरून सकाळी 09.20 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 07.00 वाजता अहमदाबाद ह्या स्थानकावर पोहोचेल.
09411 या गाडीचे आरक्षण उद्या दिनांक 18/12/2022 पासून रेल्वेच्या सर्व तिकीट खिडक्यांवर आणि ऑनलाईन पोर्टलवर चालू होईल अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
रत्नागिरी :आज मुख्यमंत्री एकनाथ यांचा रत्नागिरी दौरा होता. ह्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरी जिल्हा आढावा बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत घेतल्या गेलेल्या निर्णयाची संक्षिप्त माहिती.
मुंबई ते सिंधुदुर्ग ग्रीन फील्ड रस्ता करण्याबाबत आराखडा तयार करण्याचे आदेश.
MMRDA प्रमाणेच कोकण विकास प्राधिकरण स्थापन करणार
मत्स्य व्यवसायातून परकीय चलन उपलब्ध होण्यासाठी तामिळनाडू आणि गुजरातच्या मत्स्य व्यवसाय धोरणांचा अभ्यास करून त्याप्रमाणे निर्णय घेणार.
पर्यटन वाढीसाठी ‘बांधा आणि वापरा’ तत्वावर सेवा सुविधा पुरवल्या जातील.
कोकण विभागातील गड किल्ल्यांच्या विकासाबाबत निर्णय घेतले जातील.
मुंबई: कालनिर्णयच्या दिनदर्शिकेत छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचा उल्लेख केला गेला नसल्याने त्याविरोधात सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी त्याविरोधी पोस्ट्स लिहिल्या आणि प्रसारित केल्या होत्या. कोणी हे कॅलेंडर घेऊ नये असे आवाहनही करण्यात आले होते. मात्र हि चूक निदर्शनास येताच कालनिर्णयने तात्काळ खुलासा करत दिलगिरी व्यक्त केली आहे. कालनिर्णयने त्यांच्या ट्विटर हँडलवरून खालील शब्दात खुलासा केला आहे.
कालनिर्णय 2023च्या आवृत्तीमध्ये 16 जानेवारी रोजी असणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिनाचा उल्लेख करण्याचे राहून गेले आहे. या पुढील कालनिर्णयच्या उर्वरित सर्व प्रतींमध्ये तसेच या पुढील सर्व आवृत्त्यांमध्ये हा उल्लेख केला जाईल.धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आम्हाला अतीव आदर आहे. छत्रपती संभाजी महाराजप्रेमींच्या भावना अनवधानाने दुखावल्या गेल्या असल्यास आम्ही मनापासून दिलगीर आहोत.
कालनिर्णयकडून हा तात्काळ खुलासा करण्यात आला आहे. तसेच कालनिर्णयने ही चूक पुन्हा न करण्याची हमीही दिली आहे.
Konkan Railway News : ख्रिसमस सण आणि ३१ डिसेंबर साजरे करण्यासाठी गोवा राज्याला भेट देणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन, तसेच नाताळाच्या सुट्टीत हिवाळी पर्यटनासाठी कोकणात जाणाऱ्या पर्यटकांसाठी रेल्वे प्रशासनाने काही गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
खालील गाड्या ह्या मार्गावर चालविण्यात येणार आहेत.
1) Train no. 01445 / 01446 Pune Jn. – Karmali – Pune Jn. Special (Weekly)
ह्या गाड्या पुणे जंक्शन ते करमाळी ह्या स्थानकांदरम्यान चालविण्यात येणार आहेत.
Train No 01445
ही गाडी दिनांक 16/12/2022 ते 13/01/2023 पर्यंत प्रत्येक शुक्रवारी चालविण्यात येणार आहे. ही गाडी पुणे जंक्शन ह्या स्टेशनवरुन संध्याकाळी 17.30 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी सकाळी 8.30 वाजता करमाळी स्थानकावर पोहोचेल.
Train No 01446
ही गाडी दिनांक 18/12/2022 ते 15/01/2023 पर्यंत प्रत्येक रविवारी चालविण्यात येणार आहे. ही गाडी करमाळी स्थानकावरून सकाळी 09.30 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 23.35 वाजता पुणे जंक्शन ह्या स्थानकावर पोहोचेल.
ह्या गाड्या पनवेल जंक्शन ते करमाळी ह्या स्थानकांदरम्यान चालविण्यात येणार आहेत.
Train no. 01448
ही गाडी दिनांक 17/12/2022 ते 14/01/2023 पर्यंत प्रत्येक शनिवारी चालविण्यात येणार आहे. ही गाडी करमाळी स्थानकावरून सकाळी 09.20 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 20.15 वाजता पनवेल जंक्शन ह्या स्थानकावर पोहोचेल.
Train no. 01447
ही गाडी दिनांक 17/12/2022 ते 14/01/2023 पर्यंत प्रत्येक शनिवारी चालविण्यात येणार आहे. ही गाडी पनवेल जंक्शन या स्थानकावरून रात्री 22.00 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी सकाळी 08.30 वाजता करमाळी स्थानकावर पोहोचेल.
ह्या गाड्या लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी स्थानका दरम्यान चालविण्यात येणार आहेत.
Train no. 01459
ही गाडी दिनांक 19/12/2022 ते 11/01/2023 पर्यंत प्रत्येक सोमवार आणि बुधवार या दिवशी चालविण्यात येणार आहे. ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस ह्या स्टेशनवरुन रात्री 20.45 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी सकाळी 8.30 वाजता करमाळी स्थानकावर पोहोचेल.
Train no. 01460
ही गाडी दिनांक 20/12/2022 ते 12/01/2023 पर्यंत प्रत्येक मंगळवार आणि गुरुवार या दिवशी चालविण्यात येणार आहे. ही गाडी करमाळी ह्या स्थानकावरून सकाळी 09.20 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 21.30 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकावर पोहोचेल.
01446, 01448 आणि 01460 ह्या गाड्यांचे आरक्षण उद्या दिनांक १६/१२/२०२२ पासून रेल्वेच्या सर्व तिकीट खिडक्यांवर आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर चालू होईल अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
रत्नागिरी : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या शुक्रवार दि. 16 डिसेंबर रोजी रत्नागिरी दौर्यावर येत असून, या दिवशी रत्नागिरी मतदार संघात तब्बल पाचशे कोटीहून अधिक रुपयांच्या विकास कामांची भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे. याचबरोबर बहुचर्चित तारांगणाचे उद्घाटनही मुख्यमंत्री करणार आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार 16 डिसेंबर 2022
सकाळी 10.00 – राजभवन हेलिपॅड, मुंबई येथे आगमन व शासकीय हेलिकॉप्टरने रत्नागिरी विमानतळाकडे प्रयाण.
सकाळी 11.00 – रत्नागिरी विमानतळ येथे आगमन व मोटारीने मारुती मंदीर रत्नागिरीकडे प्रयाण.
सकाळी 11.30 – छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण व अभिवादन.(स्थळ : मारुती मंदीर, रत्नागिरी)
सकाळी 11.40 – मोटारीने श्री देव भैरीबुवा मंदिर, रत्नागिरीकडे प्रयाण.
सकाळी 11.45 – रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरीबुवा मंदीर येथे आगमन व दर्शन.
सकाळी 11.55 – मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरीकडे प्रयाण.
दुपारी 12.00 – रत्नागिरी जिल्हयातील विविध विकास कामांबाबत आढावा बैठक. (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी). दुपारी01.20 वाजता मोटारीने शासकीय विश्रामगृह, रत्नागिरीकडे प्रयाण.
दुपारी 01.30 ते 02.45 – शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे आगमन व राखीव. दुपारी 02.45 ते 03.30 वाजता विविध संघटनांच्या शिष्टमंडळास भेट –
१) भाजपा पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा.
२) रत्नागिरी जिल्हा बार असोसिएशन (8 प्रतिनिधी)
३) एस.टी. महामंडळ कर्मचारी संघटना (8 प्रतिनिधी )
४) शिक्षक संघटना ( 8प्रतिनिधी)
५) मच्छिमार संघटना (8 प्रतिनिधी)
६) आंबा बागायतदार संघटना ( 8 प्रतिनिधी)
७) जिल्हा परिषद (5 प्रतिनिधी) व महसूल (5 प्रतिनिधी) अधिकारी /कर्मचारी संघटना.
(स्थळ : शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी).
दुपारी 03.30 – मोटारीने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, रत्नागिरीकडे प्रयाण.
दुपारी 03.45 ते 04.45 – शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, रत्नागिरी भूमिपुजन कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, रत्नागिरी).
सांयकाळी 04.45 – शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, रत्नागिरी येथून माळनाका रत्नागिरी कडे प्रयाण.
सांयकाळी 05.00 ते 05.15 – श्रीमान हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगण लोकार्पण सोहळयास उपस्थिती. (स्थळ : माळनाका, रत्नागिरी) सांयकाळी 05.15 वाजता माळनाका, रत्नागिरी येथून शासकीय विश्रामगृह, रत्नागिरीकडे प्रयाण. सायंकाळी 05.20 ते 05.45 वाजता शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे राखीव.
सांयकाळी 07.00 – रत्नागिरी येथून मोटारीने पाली, जि. रत्नागिरीकडे प्रयाण.
सांयकाळी 07.30 ते 08.30 – उदय सामंत, मंत्री उद्योग यांचे पाली येथील निवासस्थानी आगमन व राखीव.
रात्रौ 08.30 – वाजता पाली, जि. रत्नागिरी येथून मोटारीने कोल्हापूर विमानतळाकडे प्रयाण. रात्रौ 10.15 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण.
ही गाडी पुण्यातून येते तेव्हा पुण्यात असलेल्या कोकणी बांधवांना ही लाभदायक ठरेल
मराठवाडा विभागातून थेट कोकणात आली तर कोकणात असलेल्या अधिकारी वर्गाला तसेच विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल.
ही गाडी पनवेल ते चिपळूण- दिवसा असल्याने या गाडीला प्रतिसादही चांगला मिळेल.
Follow us on
मुंबई : नांदेड -पनवेल एक्स्प्रेसचा चिपळूणपर्यंत विस्तार केला जावा, या मागणीसाठी बुधवारी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे एक निवेदन देण्यात आले आहे. जल फाउंडेशन कोकण विभाग या नोंदणीकृत संस्थेच्या एका शिष्टमंडळाकडून हे निवेदन दिले गेले आहे. मराठवाडा विभागातून थेट कोकणात येण्यासाठी ही रेल्वेगाडी उपयुक्त ठरणार असल्याने याकडे रेल्वे राज्य मंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले आहे.
गाडीचे सध्याचे वेळापत्रक
17613/17614 ही गाडी पनवेल ते हुजूर साहिब नांदेड स्थानकांदरम्यान चालविण्यात येत आहे. ही गाडी पनवेल स्थानकावरून संध्याकाळी 4 वाजता सुटते आणि दुसर्या दिवशी सकाळी 8 वाजून 45 मिनिटांनी हुजूर साहिब नांदेड स्थानकावर पोहोचते. परतीच्या प्रवासात ही गाडी हुजूर साहिब नांदेड ह्या स्थानकावरून संध्याकाळी 6 वाजुन 20 मिनिटांनी सुटते ती पनवेल स्थानकावर दुसर्या दिवशी सकाळी 9 वाजता पोहोचते.
सकाळी पनवेल स्थानकावर 9 वाजता ही गाडी पोहोचल्यावर संध्याकाळी 4 वाजता नांदेड साठी निघते ह्या दरम्यानच्या वेळेमध्ये ही गाडी पुढे काही स्थानकांपर्यंत चालवता येवू शकते. पनवेल ते चिपळूण मधील अंतर साधारणपणे 3.30 तासाचे आहे. कोकण मार्गावरील इतर गाड्यांचे वेळापत्रक लक्षात घेऊन ह्या गाडीच्या वेळापत्रकात किंचित बदल करून तर ही गाडी पुढे चिपळूण पर्यंत विस्तारित करता येणे शक्य आहे.
ह्या विस्ताराने हे लाभ मिळतील
ही गाडी मराठवाडा विभागातून थेट कोकणात आली तर कोकणात असलेल्या अधिकारी वर्गाला तसेच विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. तसेच ही गाडी पुण्यातून येते तेव्हा पुण्यात असलेल्या कोकणी बांधवांना ही प्रवास करायला सोपा पर्याय उपलब्ध होईल. ही गाडी पनवेल ते चिपळूण- दिवसा असल्याने या गाडीला प्रतिसादही चांगला मिळेल आणि आपल्याला एक गाडी मिळेल जेणेकरून इतर गाड्यांवर असलेला ताण कमी करण्यासाठी ही मदत होईल.
Konkan Railway News:कोकण रेल्वेमार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. रेल्वे प्रशासनाने या मार्गावरील काही गाड्यांच्या डब्यांच्या संरचनेत बदल केला आहे. या गाड्यांच्या प्रत्येकी २ जनरल डब्यांचे इकॉनॉमी थ्री टायर एसी डब्यांमध्ये रूपांतर केले आहे.
या गाड्या याआधी टु टायर एसी – ०२ + थ्री टायर एसी – ०६ + स्लीपर – ०८ + जनरल – ०४ + जनरेटर कार – ०२ असे मिळून एकूण २२ डब्याच्या संरचनेनुसार चालविण्यात येत होत्या त्या आता खालील सुधारित डब्यांच्या संरचनेनुसार चालविण्यात येणार आहे.
टु टायर एसी – ०२ + थ्री टायर एसी – ०६ + इकॉनॉमी थ्री टायर एसी – ०२ + स्लीपर – ०८ + जनरल – ०२ + जनरेटर कार – ०२ असे मिळून एकूण २२ डबे. ह्या गाड्यांच्या सर्व डबे LBH स्वरूपाचे असणार आहेत.
सिंधुदुर्ग:ग्रामिण भागातील नागरीकांना आपल्या घराच्या जवळ चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा देण्याच्या उददेशाने श्री.मंगेशजी सांवत यांच्या प्रेरणेतून मंगळवार, 21 डिसेंबर 2022 रोजी साईलिला हॉस्पिटल नाटळ, प्रथमेश हॉटेल्स प्रा.ली. मुंबई आणि माता वैष्णोदवी महाविद्यालय ओसरगांव यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्व रोग निदान व औषधोपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबीर माता वैष्णोदेवी महाविद्यालय, ओसरगांव, मुंबई-गोवा हायवे, ओसरगांव तलाव शेजारी आयोजीत करण्यात आले आहे. शिबीराची वेळ सकाळी 10 ते दुपारी 02 अशी आहे. तरी कणकवली, ओसरगांव,कसाल, आंब्रड, हेवाळे, पोखरण, कुंदे, बोर्डवे या पंचक्रोशीतील सर्व नागरीकांनी या मोफत आरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहीती व नावनोंदणी करीता साईलिला हॉस्पिटल नाटळ संपर्क क्रमांक 02367 246099 / 246100 / 8275137575 यावर संपर्क करावा.