
Follow us on
>Click Here to Download…
Mumbai Goa Highway News :मुंबई-गोवा महामार्गावरील अपूर्ण राहिलेल्या कामासंदर्भात आज मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकाऱ्यांसोबत सविस्तर आढावा घेतला.
मुंबई-गोवा महामार्गावरील अपूर्ण रस्त्यांची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत. तसेच या महामार्गावरील इंदापूर ते झाराप दरम्यानच्या चौपदीकरणाचे काम जलदगतीने पूर्ण करून जनतेला तातडीने दिलासा द्यावा अशी सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज दिल्या.
Also Read > कोकणवासियांचा राग दिसून येत नाही–मनसे अध्यक्ष राज ठाकरे
यावेळी मंत्री चव्हाण यांनी पनवेल ते इंदापूर या मार्गावरील कासू ते इंदापूर टप्पा १, पनवेल ते कासू (वडखळजवळ) टप्पा २, आदी रस्त्याची सद्यस्थिती, या मार्गावरील दुरुस्तीचे काम, त्याचप्रमाणे इंदापूर ते झाराप या रस्त्याचे बळकटीकरण व चौपदीकरणचे कामच्या सदयस्थितीच्या कामाबद्दल आढावा घेतला.सर्व कामे तांत्रिकदृष्ट्या कशा पद्धतीने जलदगतीने पूर्ण करण्यात येतील याबाबत आवश्यक सूचना संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी दिल्या. या महामार्गावरील परशुराम घाट, कशेडी घाट आदी घाट रस्त्याच्या लांबीतील उतारांचे स्थिरीकरण करुन अपघातमुक्त करण्याबाबत तसेच हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासंदर्भात सूचना मंत्री चव्हाण यांनी दिल्या.
Also Read > जोपर्यंत महामार्ग पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल वसूल केल्यास… माजी खासदार निलेश राणे यांचा इशारा.
या कामातील ज्या तांत्रिक व प्रशासकीय अडचणी असतील त्या दूर करण्याच्यादृष्टीने सर्वांनी तातडीने कार्यवाही करावी असे निर्देशही मंत्री चव्हाण यांनी दिले. परशुराम घाटातील ग्रामस्थांचे स्थानांतरण करण्यासाठी २ कोटी निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग करण्यात आलेला आहे, तो तात्काळ संबंधितांना वितरीत करण्यात यावा असे सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांनी यावेळी दिले.
Konkan Railway News : कोकणकन्या एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने आज कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. आज सकाळी आठच्या सुमारास कोकण कन्या एक्स्प्रेस (Konkan Kanya Express) मुंबईहून गोव्याकडे जात असताना कोकिसरे रेल्वे फाटकापासून काही अंतरावर अचानक इंजिनमध्ये बिघाड झाल्याने ट्रेन बंद पडली होती. त्यानंतर राजापूर स्टेशनवरुन नवीन इंजिन उपलब्ध करण्यात आले असून इंजिन बदलण्यात आले होते.
आताच्या माहितीनुसार कोकण रेल्वे मार्गावरील वाहतुक पूर्वपदावर आली आहे. काही गाड्या वगळता सर्व गाड्या काही मिनिटांच्या फरकाने धावत आहेत.
सिंधुदुर्ग:ह्या महिन्यात होणार्या ग्रामपंचायत निवडणूकीच्या दरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये, जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहावी यासाठी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी, त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराचा वापर करुन महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व 37 (3) नुसार संपूर्ण जिल्ह्यात मनाई आदेश लागू केला आहे. दिनांक 6 डिसेंबर रोजी 00.01 वाजल्यापासून ते दिनांक 20 डिसेंबर 2022 रोजी 24.00 वाजेपर्यंत हा आदेश राहील.
सध्याची राजकीय परिस्थिती, राजकिय पक्षांच्या एकमेकांच्या विरोधात केलेल्या टीका- टिप्पणीमूळे जिल्ह्यात दाखल झालेले गुन्हे यामुळे जिल्हय़ात तणाव निर्माण झाला आहे. येणार्या निवडणुकीत पुन्हा वाद निर्माण होऊन आंदोलनात्मक घटना घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक मागणीकरिता उपोषणे, मोर्चा, निदर्शने, रास्ता रोको वैगरे सारखे आंदोलनात्मक कार्यक्रमांचे वेळोवेळी नियोजन करण्यात येत असते. त्यामुळे या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संपूर्ण भूभागात खालील कृत्य करण्यास मनाई करण्यात येत आहे.
Follow us onशासनाचा आदेश
कलम 37 (1)
कलम 37(3)
वरील कालावधीतील मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग तसेच त्यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांस व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांस राहील. या आदेशाचे जो कोणी उल्लंघन करील तो महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 135 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील.
Content Protected! Please Share it instead.