Author Archives: Kokanai Digital

पेण येथे रेल रोको आंदोलन…”ह्या” आहेत मागण्या…

   Follow us on        
पेण: आपल्या विविध मागण्याकरिता आणि पेण रेल्वे स्थानकात सध्याच्या गैरसोयी रेल्वे प्रशासनाच्या लक्षात आणून आणून देण्यासाठी माझं पेण आणि रेल्वे प्रवासी सन्मान समिती तर्फे पुढील महिन्यात ११ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे. 
ह्या मागण्यांमध्ये मुख्य मागणी म्हणजे ह्या स्थानकाला काही गाड्यांचे थांबे मिळवणे हि असली तरी अजून काही मागण्या आहेत. पेण तालुका हा जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण असून त्याची लोकसंख्या सुमारे २ लाखापेक्षा जास्त आहे. पेण तालुक्यातून मुंबई,नवी मुंबई, पनवेल, माणगाव, रोहा आणि इतर ठिकाणी नोकरी, शिक्षण तसेच व्यापाराच्या कारणासाठी नियमित प्रवास करतात. त्याचप्रमाणे काही मोठ्या कंपन्या पण तालुक्यात आहेत. सुबक मूर्तीसाठी पेण तालुका पूर्ण विश्वात प्रसिद्ध आहे. हे रेल्वे स्थानक मुंबई गोवा हायवे च्या जवळ आहे. ह्या सर्व गोष्टी अनुकूल असताना पेण ह्या रेल्वे स्थानकाला रेल्वे प्रशासनाकडून योग्य सन्मान भेटत नाही आहे अशी ह्या समितीची तक्रार आहे. 
काय आहेत मागण्या ?
१. कोरोना पूर्व काळात पेण स्थानकात थांबणारी दिवा-सावंतवाडी-दिवा (१०१०५/१०१०६) ह्या गाडीला पेण, कासू, नागोठणे, रोहा येथे पूर्ववत थांबा मिळावा. 
२. कोरोना काळात सामान्य Passenger गाडयांना लावलेले अधिक तिकीट दर पूर्ववत करण्यात यावेत.
३. रोहा – पनवेल – रोहा या मार्गावर मेमू गाड्यांच्या फेऱ्या वाढवाव्यात आणि त्या नियमित वेळापत्रकानुसार असाव्यात. 
४. पेण दिवा पेण मेमू शनिवार आणि रविवार देखील सुरु राहावी.
५ यादीतील किमान ५ एक्सप्रेस गाडयांना पेण येथे थांबा देण्यात यावा.
याचप्रमाणे स्थानकावर अतिरिक्त तिकीट खिडकी, तिकीट तपासणीस नेमण्यात यावा असे रेल्वेच्या हितासाठी काही मागण्या पण आहेत.
ह्या सर्व मागण्या दिनांक १०.१२.२०२२ पर्यंत पूर्ण करण्यात याव्यात नाहीतर दिनांक ११.१२.२०२२ रोजी सकाळी ११ वाजता रेल रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा  “माझं पेण” आणि “रेल्वे प्रवासी सन्मान समिती” ने दिला आहे. 
   

Loading

मृत्यूशी झुंज अपुरी… ज्येष्ठ कलाकार विक्रम गोखले यांचे निधन

 

 

पुणे- गेल्या २० दिवसांपासून मृत्यूशी झुंज देणार्‍या मराठी चित्र आणि नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ कलाकार विक्रम गोखले यांचे आज शनिवारी पुण्यात निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. गेल्या २० दिवसांपासून विक्रम गोखले यांच्यावर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. यादरम्यान त्यांच्या प्रकृतीत अनेक चढ-उतार पाहायला मिळाले. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. मात्र, आज दुपारी १ वाजून ४५ मिनिटांनी विक्रम गोखले यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी वृषाली आणि कन्या असा परिवार आहे.

आज संध्याकाळी वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.

Loading

अपघातग्रस्तांना तात्काळ मदत करणाऱ्यांना दिला जाणार पुरस्कार

दिल्ली: केंद्र शासनाच्या रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने मोटर वाहनांच्या जीवघेण्या अपघातात अपघातग्रस्त झालेल्या व्यक्तीस तात्काळ मदत करणाऱ्या आणि अपघाताच्या गोल्डनअवर मध्ये अपघातग्रस्तांना हॉस्पिटल ट्रामा केअर सेंटरमध्ये वैद्यकीय उपचािासाठी घेऊन जाणाऱ्या ‘गुड समेरिटनला’ अपघातात बळी पडलेल्या व्यक्तीचे प्राण वाचवल्याबद्दल त्या व्यक्तीस पुरस्कार देण्याची योजना जाहीर केली आहे.

रस्त्यावरील होणाऱ्या अपघातातील अपघातग्रस्तांना
आपत्त्कालीन परिस्स्थतीत मदत किण्याकरिता सामान्य जनतेस प्रवृत्त करणे व निष्पाप जीव वाचविण्यासाठी इतरांना प्रवृत्त / प्रेरित करण्याच्या उद्देशाने हि योजना सुरू करण्यात येणार आहे.सदर पुरस्काराची अंबलबजावणी करण्याच्या दृष्टीने राज्यस्तरीय देखरेख समिती बनविण्यात येणार आहे. हि समिती या योजनेच्या प्रभावी व कार्यक्षम अंबलबजावणीचा आढावावेळोवेळी त्रैमासिक बैठकीद्वारे घेईल आणि नामांकने रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाकडे पाठवून अंतिम पुरस्कार जाहीर करण्यात येईल.

Loading

मुंबई सीएसएमटी मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस नेहमीच उशिरा – प्रवाशांचे हाल

Konkan Railway News :१२०५१/१२०५२  मुंबई सीएसएमटी मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस हि चाकरमान्यांना मुंबईमधून कोकणात आणि कोकणातून मुंबईला कमी वेळात आणि कमी खर्चात पोहोचवणारी एक्सप्रेस म्हणून ओळखली जाते. एवढेच नाही तर ह्या एक्सप्रेस ने त्याच दिवशी कोकणात जाऊन पुन्हा मुंबईला येते असे ह्या गाडीचे वेळापत्रक आहे. सकाळी मुंबई सीएसमटी स्थानकावरून सकाळी ५.१० वाजता सुटणारी हि एक्सप्रेस मडगावला त्याच दिवशी दुपारी १४.१० ला पोचते. परतीच्या प्रवासात हि गाडी मडगाव स्थानकावरून १४.४० ला सुटून ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे २३.३० ला पोहोचते. त्यामुळे ह्या गाडीला कोकणवासीयांची पहिली पसंदी आहे. 
पण अलीकडच्या काही दिवसात हि गाडी नेहमीच उशिरा धावत असल्याचे दिसत आहे. कोकणातून मुंबईला येताना प्रवाशांना खूप मनस्ताप करावा लागत आहे. ठाणे, दादर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे हि गाडी रात्री १.३० / २.०० च्या दरम्यान पोचत असल्याने उपनगरीय लोकल्स ने पुढचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे खूप हाल होत आहेत. कारण ह्या वेळेला उपनगरीय रेल्वे गाड्या बंद असतात, त्यामुळे दूर जाणाऱ्या प्रवाशांना सकाळच्या पहिल्या ट्रेन चे प्रतीक्षा करावी लागते किंवा इतर महागड्या पर्याय निवडावा लागतो. 
पावसाळी वेळापत्रक होते तेव्हा कोकण रेल्वे दोन स्वतंत्र गाड्या ह्या मार्गावर चालवीत असे, त्यामळे हि समस्या येत नसे. हि गाडी वेळेवर असे. आता १२०५१ जी गाडी दुपारी १४.१० ला पोहोचते तीच गाडी १४.४० ला १२०५२ परतीच्या प्रवासाला सोडण्यात येत आहे. त्यामुळे मुंबई वरून मडगाव ला जाणारी गाडी जर उशिरा गेली तर त्याचा परिणाम तेथून मुंबईसाठी सुटणाऱ्या १२०५२ गाडी वर होतो आणि उगमस्थानावरूनच हि गाडी उशिरा निघते. त्यामुळे दोन स्वतंत्र गाड्या वापरण्यात याव्यात अशी मागणी होत आहे. 
  

Loading

ओव्हर हेड एक्युपमेंट वायर तुटली.. कोकण रेल्वेची वाहतुक विस्कळीत

 

Block "Google News" not found

Konkan Railway News :कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातल्या दिवाणखवटी ते विन्हेरे स्टेशनदरम्यान ओव्हर हेड एक्युपमेंट वायर तुटली आहे.यामुळे मध्यरात्रीपासून कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. सर्व गाड्या इलेक्ट्रिक इंजिनवर धावत असल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.अनेक गाड्या विविध स्थानकांमध्ये खोळंबल्या होत्या.  

Read Also : मुंबई सीएसएमटी मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस नेहमीच उशिरा – प्रवाशांचे हाल

मडगाव-मुंबई कोकणकन्या एक्स्प्रेस वीर स्टेशनवर रखडली होती. अनेक गाड्या विविध स्थानकांमध्ये खोळंबल्या होत्या. पण अखेर पाच तासांनी बिघाड दुरुस्त करण्यास रेल्वे प्रशासनाला यश आलं. त्यानंतर कोकणकन्या एक्सप्रेस मार्गस्थ झाली. कोकण रेल्वे प्रशासनाकडून इलेक्ट्रिकऐवजी डिझेल इंजिनची उपलब्धता करून हळूहळू एक्सप्रेस मार्गस्थ करण्यात येत आहेत. तरीही अद्यापही कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक उशिरानंच सुरु आहे. कोकण रेल्वे मार्गावरील अनेक गाड्या तीन ते चार तास उशिरानं धावत आहेत. कोकण कन्या, तुतारी, मंगलोर एक्स्प्रेस, मडगांव एक्स्प्रेस अशा अनेक गाड्या उशिरानं धावत आहेत. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत  मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Read Also :कोकण रेल्वेचा दिलासा….कोकणातील उद्योजकांसाठी नवीन सुविधा….

Read Also : पेण येथे रेल रोको आंदोलन…”ह्या” आहेत मागण्या…

Loading

सावंतवाडी तालुक्यात गवा रेड्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

सावंतवाडी : गव्याच्या हल्ल्यात सावंतवाडी तालुक्यात एका शेतकर्‍याचा मृत्यू झाला आहे. चौकुळ केगदवाडी येथील ७० वर्षीय शेतकरी सोनू साबा परब असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे., बुधवारी (दि.२३) रात्री उशिरा ही दुर्देवी घटना घडली.सोनू परब हे काही कामानिमित्त बुधवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास जंगलाच्या दिशेने गेले होते. परंतु रात्री उशिरापर्यंत ते घरी परतलेच नाहीत. यानंतर कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली. दरम्यान परब यांचा मृतदेह रक्ताळलेल्या अवस्थेत खालचा भाटला तळीकडे आढळून आला. याबाबत पोलीस व वनकर्मचाऱ्यांना माहिती देण्यात आली.

वनकर्मचाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर परब यांचा मृत्यू गव्याच्या हल्ल्यात झाल्याचे निर्दशनास आले. यानंतर वनविभागाचे आंबोली वनक्षेत्रपाल विद्या घोडके-कांबळे व कर्मचाऱ्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी सावंतवाडी पाठवला. परब यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, पत्नी असा परिवार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गवा रेड्यांचे प्रमाण खूप प्रमाणात वाढले आहे. रात्री जंगल दाटी प्रदेशातून प्रवास करणे खूप धोक्याचे बनले आहे त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगावी. 

 

Loading

पहिली, दुसरीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा नाही, तिसरी ते आठवी सर्वच पास..महाराष्ट्रात केरळ मॉडेल आधारित शिक्षण पद्धती

मुंबई :पहिली, दुसरीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेण्याचा तर तिसरी ते आठवीच्या कोणत्याही विद्यार्थ्यांला नापास न करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली मुंबईत पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. याशिवाय महाराष्ट्रात केरळ मॉडेल आधारित शिक्षण पद्धती राबविण्याचे सुतोवाचही केसरकर यांनी केले.

राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले, संपूर्ण देशातील अशी जी काही राज्य आहेत, ज्यांनी शिक्षणात प्रगती केली आहे, त्यांचं नाव आहे, अशा राज्यात आमच्या शिक्षणामध्ये विभागाने दौरे केले. त्यात केरळने शिक्षण विभागात अनेक प्रयोग केले, अनेक इनिशिएटिव्ह केरळने शिक्षणात घेतले आहेत. काही मॉडेल जे यशस्वी झालेत ते पुढे न्यावे लागतात. केरळ आणि महाराष्ट्राची तशी तुलना करता येणार नाही. पण केरळसोबत पंजाब, राजस्थानमधून सुद्धा आम्ही मॉडेल घेणार आहोत, विद्यार्थी फोकस सुधारणा आम्ही राज्यात करणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं.

दप्तराचे ओझे कमी
विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले जात आहेत. त्याचा एक भाग म्हणून आता यापुढे पुस्तकांमध्ये सरावासाठी कोरी पाने जोडली जाणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत वेगळ्या वह्या घेऊन जाण्याची गरज भासणार नाही.

Loading

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाची बातमी खोटी.

पुणे : बुधवारी संध्याकाळपासून विक्रम गोखले यांच्या निधनाच्या अफवा सोशल मीडियावर पसरत आहेत. त्यावर आता त्यांची पत्नी वृषाली गोखले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “बुधवारी दुपारी ते कोमात गेले आणि तेव्हापासून ते स्पर्शाला प्रतिसाद देत नाहीयेत. ते व्हेंटिलेटरवर आहेत. पुढे काय करायचं हे सकाळी डॉक्टर ठरवतील. त्यांची प्रकृती सुधारतेय का, ते प्रतिसाद देत आहेत का, यावरून डॉक्टर पुढील निर्णय घेतील”, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

विक्रम गोखले हे 5 नोव्हेंबरपासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल असल्याचंही त्यांनी सांगितलं. “त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. मात्र आता पुन्हा ती बिघडली. हृदयाशी आणि किडनीशी संबंधित समस्या त्यांना जाणवत आहेत. त्यांचे अनेक अवयव निकामी झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे”, असं वृषाली गोखले यांनी सांगितलं. विक्रम गोखले यांची एक मुलगी परदेशी राहते. ती सॅन फ्रान्सिस्कोहून पुण्याला परतली आहे. तर दुसरी मुलगीही सध्या पुण्यातच आहे.

 

Loading

जनआक्रोश सभा ! 2023 पर्यंत मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण नाही झाले तर…..

 

मुंबई :आज दिनांक-20.11.2022 रोजी दादर मुंबई येथे जनआक्रोश सभा कोकणकरांच्या उपस्थितीत संपन्न झाली.

सभा आयोजकांनी सदर सभेला 25 सामाजिक प्रतिष्ठान, संस्था, संघटना यांनी पाठींबा दिला आहे असे अशी माहिती दिली आहे. याच 25 संघटनेचे सभासद अंदाजित 01 लाखाच्या वर असून नक्कीच याचा फायदा जनआक्रोश आंदोलनाला होईल.तसेच 180 कोकणकर या सभेला उपस्थित राहिले.या सभेला कोकणकरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

सदर सभेत जे काही शेवटी निर्णय घेण्यात आले त्यांची माहिती खालील प्रमाणे-

1. मुंबई गोवा महामार्ग ध्येयपूर्ती समिती अस नाव विचारात आणले आहे.

2. विविध 12 प्रकारच्या कमिटी असून ज्या सदस्यांना कोणत्याही कमिटीवर काम करावयाचा इच्छा असेल तर उद्या पाठविण्यात येणारा फॉर्म व्यवस्थितरित्या भरून सादर करावा यामधून नियुक्ती लवकरात लवकर करण्यात येईल.

3.ऑनलाईन पोर्टलद्वारे विविध माध्यमातून पत्र पाठविण्यात येतील.

4. गडकरी साहेब,मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री,आमदार,खासदार यांना पत्रव्यवहार करून अधिवेशन मध्ये मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न मार्गस्थ लावणे.

5.अपघातात मृत्यू झालेल्या नागरिकांना सरकारकडून मदत जाहीर करणे व यापुढे खराब महामार्गमुळे एखादा अपघात झाला तर प्रशासकीय अधिकारी, आमदार, खासदार व ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करणे.

6.जर हे महामार्ग 2023 मध्ये पूर्ण झाले नाही तर लोकप्रतिनिधी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशा आशयचे पत्र देऊन त्यांच्याकडून पोचपावती घेणे.

7. यापुढे कोकणातील कोणतेही लोकप्रतिनिधी ट्रेन, विमानने कोकणात जाण्यासाठी वापर करीत असतील तर त्यांना अडवून महामार्गानेच प्रवास करावे अन्यथा जनआक्रोशच्या वतीने निषेध म्हणून आक्रमक भूमिका घेण्यात येईल.

8. जो पर्यंत पनवेल ते झारप 471 किलोमीटरचा रस्ता वापरण्यायोग्य व 100% काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल आकारू नये.

9. बनविण्यात येणारा रस्त्या हा 10 वर्षात एकही खड्डा पडणार नाही अशी लेखी हमी देऊन नियमावली बनविण्यात यावी जेणेकरून बनणारा रस्त्या उत्तम दर्जाचा असेल.

10.जनजागृतीकरीता ठिकठिकाणी सभा आयोजित करून याबाबत जनआक्रोश कशासाठी आहे यासाठी माहिती देणे.

11. या वरील विषयात सरकार कडून दिरंगाई दिसत असेल किंवा 01 मे 2023 पर्यंत काम पूर्ण होईल अशा पद्धतीचे स्वरूप दिसत नसेल तर आझाद मैदान ते मंत्रालय असा जनआक्रोश आंदोलन उभारून मंत्रालयाला घेराव घालणे.

12.जो पर्यंत मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होत नाही तोपर्यंत सर्व कोकणकरांच्या वतीने निवडणुकीवर बहिष्कार  टाकण्यात येईल यासाठी गावागावात जाऊन जनजागृती करण्यात येईल.

यांसारख्या अनेक विषयांवर सभेत चर्चा करण्यात आली.
सदर सभेतील चर्चा खालील लिंक वर बघू शकता.

 

Loading

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीच्या नोकरभरतीमध्ये अधिवास प्रमाणपत्राची अट नाही – रोहित पवार यांचा आक्षेप

 

MAHAGENCO RECRUITMENT NEWS : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी ने असिस्टंट इंजिनीयर व ज्युनियर इंजिनीयर या पदांसाठी ५९० जागांची भरती प्रक्रिया सुरु केलीय. या परीक्षेसाठी सर्व उमेदवारांना महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य करणं आवश्यक असतानाही खुल्या प्रवर्गासाठी अधिवास प्रमाणपत्राची अट टाकण्यात आलेली नाही. परिणामी खुल्या प्रवर्गाच्या २३९ जागांसाठी सर्व देशभरातून अर्ज येतील आणि राज्याच्या युवकांना मर्यादित संधी मिळेल. एकीकडं राज्यातील उद्योग बाहेर जात असल्याने युवांना आधीच नोकऱ्या नाहीत, अशा स्थितीत राज्याच्या हक्काच्या भरती प्रक्रियेत तरी किमान राज्यातील युवांना न्याय मिळायला हवा.

त्यामुळं शासनाने या परीक्षेसाठी अधिवास प्रमाणपत्र सर्वांना अनिवार्य करण्याबाबत महाजेनकोस निर्देश द्यावेत, अशी विनंती राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांनी शासनाकडे केली आहे. 

 

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search