पुणे- गेल्या २० दिवसांपासून मृत्यूशी झुंज देणार्या मराठी चित्र आणि नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ कलाकार विक्रम गोखले यांचे आज शनिवारी पुण्यात निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. गेल्या २० दिवसांपासून विक्रम गोखले यांच्यावर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. यादरम्यान त्यांच्या प्रकृतीत अनेक चढ-उतार पाहायला मिळाले. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. मात्र, आज दुपारी १ वाजून ४५ मिनिटांनी विक्रम गोखले यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी वृषाली आणि कन्या असा परिवार आहे.
आज संध्याकाळी वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.
Facebook Comments Box
Related posts:
ST Bus Fare Hike: मुंबई-पुण्यातून कोकणात एसटीने जाण्यासाठी आता किती पैसे मोजावे लागणार?
कोकण
मुंबई गोवा महामार्गाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणार; नितीन गडकरी यांची ग्वाही
महाराष्ट्र
राज्यात ११ वाजेपर्यंत १८.१८% टक्के मतदान; कोल्हापूर मतदारसंघात सर्वात जास्त मतदानाची नोंद, जाणून घ्य...
लोकसभा निवडणूक २०२४